TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ४४

क्रीडा खंड - अध्याय ४४

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


दिवोदासाची कथा

(दिंडी)

मुनी कीर्तीला चरित सांगतात ।

दिवोदासाचें ऐक हें पुनीन ॥

पूर्वि जगती हा श्रेष्ठ असे राजा ।

सोमंवशी तो जनित असे राजा ॥१॥

असे उपकारी द्वेषभाव नाहीं ।

तशी परक्याचे धनीं आस नाहीं ॥

जितेंद्रिय तो असुनि बहू दाता ।

तसा लढवय्या बहुत शूर होता ॥२॥

तपोबल हें त्यास पूर्ण होतें ।

म्हणुन विधि कीं तुष्ट बहू होते ॥

विधी काशीचें राज्य तया देई ।

करी राज्यातें भूप अशा ठायीं ॥३॥

बहुत वरुषें काशीस नसे झालीं ।

मेघवृष्टी ती म्हणुन प्रजा गेली ॥

दिवोदासानें पुण्य बहू केलें ।

म्हणुन वर्षावीं विपुल नीर झालें ॥४॥

असें पाहूनियां परत लोक येती ।

अतां कथितों हे भूपपत्‍नी मी ती ॥

नाम सुशिला हें योग्य तीस होतें ।

तसे साध्वीचे पूर्ण गूण होते ॥५॥

(गीति)

आणून पंडितरायें, वर्तन करण्यास उचित ते नियम ।

करवी तयांकडूनी, वर्तन-व्यवहार शुद्धता नियम ॥६॥

वागे प्रजा तयाची, न्यायानें म्हणुन त्या नसे दंड ।

अपमृत्यूही नाहीं, दुःख तसा शोकही न हो दंड ॥७॥

यज्ञादि सर्व कर्मे, चालू झालीं पुन्हां तिथें कीर्ती ।

देव प्रसन्न होती, यास्तव शांती सदैव हो कीर्ती ॥८॥

तो देवांना स्तवि मग, देव तसे वानिती दिवोदास ।

ऐसें चरित्र त्याचें, कथिता झाला मुनी तया सतिस ॥९॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-10-15T15:09:00.3570000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

तर

 • उअ . जर या उभयान्वयी अव्ययाचे उत्तरगामी उभयान्वयी अव्यय . याचा अर्थ तसे झाल्यास , असल्यास , त्याअर्थी इ० ; बर्‍याच वेळा तर ह्या शब्दाचा वाक्यपूरक म्हणून उपयोग करितात . अशा वेळी त्या वाक्यांत कांही विशेष अर्थ व जोर येतो . जसे - हो ! आता मी जातो तर = मी सर्वथा जाणार नाही . कित्येक वेळा तर हा शब्द त्याने जोडलेल्या दोन वाक्यांच्या अर्थाचा विरोध दाखवितो . उदा० तुम्ही तर लाख रुपये मागतां व मी तर केवळ गरीब पडलो . याने संदीग्धता , अनिश्चियहि दाखविला जातो . उदा० मी ते नाटक पाहण्यास आलो तर येईन . मध्ये तर दिसते आहे , मध्ये तर आणू नका , लावू नका . या वाक्यातहि सापेक्षता , यदृच्छाघटित , सांकेतिकत्व निर्दिष्ट आहे . परंतु पहा . [ सं . तर्हि ] 
 • विशेषणास लागणारा तारतम्यवाचक तद्धित प्रत्यय . उदा० गुरु = मोठा ; गुरुतर = अधिक मोठा . प्रियतर ; दृढतर . [ सं . ] 
 • वि. ओले ; ताजे ; रसपूर्ण . तर मेव्याचे व खुश्क मेव्याचे खोन . - रा . १० . २९६ . [ फा . तर ] 
 • स्त्री. १ ( हेट . कु ) होडी ; मचवा . तरी पहा . २ ( मचवा इ० काने उतरुन जाता येईल अशी ) खाडी . ३ ( नाविक कु . ) खाडीतील होड्य़ा लावण्याची किनार्‍यावरील सोईस्कर जागा , ठिकाण . ४ पलीकडील बाजू , तीर . अर बांधे तर बांधे । - वैद्यक ७६ . [ सं . तृ = तरणे ] ( वाप्र . ) तरीपार करणे - सक्रि . खाडीवरुन , समुद्रातून होडी इ० नी पलीकडे नेणे , पोहोचविणे . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

महावाक्य पंचीकरण हे पुस्तक कुठे मिळेल ?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.