मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ७६

क्रीडा खंड - अध्याय ७६

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

कळतां मात हरीसी, सुपर्ण-यानीं बसून इंद्राचे ।

नगरामध्यें आला, कळलें दैत्यांस तेधवां साचें ॥१॥

युद्धास सिद्ध झाले, असुर तयांसी रणामधीं आले ।

त्यांच्या पराक्रमानें, देव पळाले बघून हरि गेले ॥२॥

सोडिति दैत्यांवरि ते, चक्र सुदर्शन बहूत जोरानें ।

छेदुन सैन्य तयांचें, नाशियलें कीं प्रचूर लीलेनें ॥३॥

पाहुन अनर्थ सारा, देवांवरि चंड मुंड धांवून ।

आले निवडक सारे, राक्षस तेथें क्षणांत ते मिळुन ॥४॥

विष्णु करिं दैत्यांना, मारुन घायें गदा प्रहरांनीं ।

केलें विव्हळ पाहुन, सिंधू शिरतो त्वरीत नेटांनीं ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP