मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय ४३

क्रीडा खंड - अध्याय ४३

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(शार्दूलविक्रीडित)

कीर्तीला मुनि सांगती चरित तें ऐके सती गोडसें ।

मारी त्या असुरां बघून सुर तें पुष्पीं यजीती असे ।

आनंदें प्रभुला स्तवीत गृह तें दीशापती आदिक ।

चारी वर्ण तसे अनेक जिव त्या आधार तूं रक्षक ॥१॥

कर्माग्रें तुज पूजिती जगति ते धुंडीत सारेच ते ।

देती नाम तुला म्हणून म्हणती ढुंढी पुढें राज ते ।

ढूंढीराज तुझें प्रथीत मग तें झालें असें नाम तें ।

पूजाध्यान तसें स्मरोन बघती तूझ्या स्वरुपास ते ॥२॥

धर्मार्थायुत काम-मोक्ष मिळती त्या साधनांनीं प्रभू ।

ऐसा तो स्तविला सुरादि वहिला पूजा करुनी प्रभू ।

आम्ही त्या प्रभुला समर्पण तदा मांदार-पुष्पें शमी ।

केली तीं प्रभूंनीं स्व-भक्त म्हणूनी स्वीकारिलीं त्या नमीं ॥३॥

(गीति)

देव गजानन राहे, निर्मित मूर्तीसहीत काशीस ।

ढुंढीराजप्रभूचें, ऐकें आख्यान हें वदे सतीस ॥४॥

सूतांनीं त्या मुनिंना, सत्रामाजी कथीत हें केलें ।

भृगु भूपतीस सांगति, चौघांनीं तें समग्र आयकिलें ॥५॥

ऐसें वृत्त कथी तो, वाचकनविसूत ऐक ते कीर्ती ।

कवनें करुन गुंफी, गणपतीचीं ती अगाध हे कीर्ती ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP