मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय २०

गणेश पुराण - अध्याय २०

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(वसंततिलका)

एणेंपरी प्रतिदिनीं नव विघ्नं येती ।

राहे विवाह नृपती जन व्यग्र होती ।

आले असूर परि कूपक-कंदरादी ।

मारी विनायक बघे नृपलोक-मांदी ॥१॥

ऐके नरांतक अशी कटु लोकवाणी ।

धाडी असूर दल अंधक तुंग आणी ।

अंभोसुरासह असे बहु शूर वीर ।

मारा विनायक वदे असुरांस वीर ॥२॥

आले समीप नगरा असुराख्य तीघे ।

युद्धास सिद्ध करिती नृपतीस तीघे ।

युद्धांत राक्षस बहू पडतीच जेव्हां ।

लाभे न त्या जय असे बघतीच तेव्हां ॥३॥

केला विचार कपटें त्रय राक्षसांनीं ।

आधीं वदे असुर अंधक पूर्ण मानी ।

ज्ञांकीं रवी त्वरित मी अपुल्या बळानें ।

अंधार तो करिन मी नगरीं प्रयत्‍नें ॥४॥

अंभोसुरास वदला नगरासभोंतीं ।

टाकी जलें करुन खंदक कीं सभोंतीं ।

जातील लोक मग ते कवण्या पथानें ।

बोलेच तुंग मग तो अपुल्या मुखानें ॥५॥

होईन पर्वत अहो नगरीं पडेन ।

जातील लोक चिरडून पिठासमान ।

सल्ला पटून सकलां बहु हर्ष झाले ।

अंभोसुरेंच जलमग्न पुरास केलें ॥६॥

(गीति)

मोठी वृष्टी झाली, वाडे पडले पुरांत एकसरें ।

झंजावातें तेव्हां, झाडें पडलीं असंख्य त्या नगरें ॥७॥

मोठा गोंधळ झाला, निर्मी वटवृक्ष तेधवां प्रभु तो ।

झाला स्वतांच पक्षी, भव्य असा त्या वटावरी बसतो ॥८॥

शत योजनें किं चौरस, पंख असे तेधवांच तो पसरी ।

संपूर्ण उदक प्याला, जिकडे तिकडे प्रकाश तो पसरी ॥९॥

पाहुन जनांस वाटे, विघ्ननिवारण खरोखरी झालें ।

बहु हर्षयुक्त होउन, करिती व्यवहार ते गृहीं गेले ॥१०॥

यापरि दिवस दहा कीं, अंधक अंभोसुरास दमवीलें ।

ठरल्यापरीच तुंगें पर्वतरुपास तेधवां धरिलें ॥११॥

अपुल्यावरती पर्वत, येत असे पाहुनीच तो पंख ।

फडफड पक्षी झाडी, वातानें पर्वतास दे दुःख ॥१२॥

गरुड जसा चंचूनें, सर्पा धरितो गिरीस त्यापरिंनीं ।

धरिला चंचुंत त्याला, अंधक अंभोसुरास धरि नखरीं ॥१३॥

तीनी राक्षस धरुनी, गगनीं उड्डाण तो करी पक्षी ।

घरघर घिरटया घालुन, रविसंनिध जातसेच तो पक्षी ॥१४॥

घिरटयांनीं भोंवळ ये, रवितापानें शरीर तें पोळे ।

पक्षी तिघांस टाकी, भूमीवरती तयांस त्या वेळे ॥१५॥

गेले प्राण तयांचे, पाहुन प्रभु तो स्वतां त्यजी रुप ।

होई खरा विनायक, पाहे कौतुक परोपरी भूप ॥१६॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP