TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पुराणे|गणेश पुराण|क्रीडा खंड|पूर्वार्ध|
अध्याय २४

क्रीडा खंड - अध्याय २४

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


सनक सनंदनास विनायकाचा साक्षात्कार

(मंदाक्रांता)

पूजेसाठीं करुन बसले सिद्धता लोक सारे ।

आतां येई अदिति-सुत तो पाहती वाट सारे ।

कोणाच्याही सदनिं विभु तो पातला नाहिं साच ।

बाळांना तो चुकवुनि गृहा येउनी नीजलाच ॥१॥

वार्ता त्यांना कळली म्हणुनी येत पाचारणासी ।

सांगे त्यांना अशन करुनी देत तो ढेकरेसी ।

कांहीं तेथें अडुन बसले भोजनासीच नेती ।

जाती तेथें झडकरि विभु तो भोजनीं तृप्त होती ॥२॥

(गीति)

इकडे स्नान करुनियां, सनक सनंदन गृहाप्रती आले ।

कोणातरि विप्राच्या, भोजन करण्या गृहाप्रती गेले ॥३॥

तेथें विनायकाचें, पूजन चालू असेंच ते बघती ।

क्षत्रियसदनीं राहे, भ्रष्ट तया मानुनी गृहा त्यजिती ॥४॥

पुष्कळ सदनीं गेले, दिसलें पूजन म्हणून माघारी ।

शुक्लब्राह्मणसदनीं, जातां दिसला मुनीस जेवि तरी ॥५॥

दुसर्‍या गांवीं जाऊं, भोजन करुं कीं तिथेंच शांतपणें ।

ऐसा विचार करिती, निघते झाले तिथोन तूर्णपणें ॥६॥

जिकडे तिकडे पाहति, दिसली मूर्ती विनायक प्रभुची ।

घेती नयनां मिटुनि, ध्यानें करिती शिवादि विष्णूचीं ॥७॥

त्यांचीं रुपें नयनीं, दिसलीं नाहीं विनायका बघती ।

बालस्वरुप जाउन प्रकटे मूर्ती स्वरुप हें बघती ॥८॥

(शार्दूलविक्रीडित)

सिंहीं तो बसला किरीट शिरसा दाही भुजांनीं असा ।

तेजानें रविसा अलंकृत असा नानानगीं पूर्णसा ।

दोघांसी सहसा तिथेंच दिसला नानाप्रकारीं असा ।

भेदाभेद असा निगर्वहि असा गेला मनींचा असा ॥९॥

(रमणी)

रुप हें दिसलें नयनीं मुनीसी । भक्तिसी जडले विनयें पदांसी ।

स्तोत्र तें करिती सनसेंकरुनी । देव तो प्रकटे श्रवणेंकरुनी ॥१०॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2010-10-15T15:08:42.3300000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अठ्ठ्याण्णव

  • वि. ९८ ही संख्या . [ सं . अष्टनवति : प्रा . अट्ठाणउइ ; हिं . अठाणवे ; सिं . अठानवे ]. 
  • ( व . ) बदमाष ; लबाड . 
  • a  Ninety-eight. 
RANDOM WORD

Did you know?

बांस की लकड़ी
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.