मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी|

आत्मबोध टीका - श्लोक ५९ व ६०

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


तदुक्तमखिलं वस्तु व्यवहारस्तदन्वित:
तस्मात्सर्वगतं ब्रह्म क्षीरे सर्पिरिवाखिले ॥५९॥

विषयांत आत्मा असे व्यापुन । तोचि प्रत्यगात्मरूपें वृत्तितें व्यापुन । आत्मसत्तेनें विषय करि ग्रहण । एवं आत्माचि संपुर्ण असे पै ॥४९॥
सर्व पदार्थमात्रिं ब्रह्म असे । ह्मणोनि प्रियत्व सर्विं वसे । दुग्धामाजि घृत जैसे । मिष्टतेसि कारण ॥५०॥
तस्मात् आत्म्यावाचोनि प्रियकरासि । दुसरें नाहिंच निश्चयेसि । प्रियतेसि कारण सर्वत्रासि । आत्माचि येक जाण तुं ॥५१॥ आणिक हि येक आत्मलक्षण । ऐकोनि घेइ पां सुलक्षण । जेणें अतिशयें होय दृढीकरण । तुझिया आत्मानुभवाचें ॥५२॥

अनण्वस्थूलमह्रस्वमदीर्घमजमव्ययम् ।
अरूपगुणवर्णाख्यं तद्ब्रह्मेत्यवधारयेत् ॥६०॥

ब्रह्मिं नसे स्थूळता आणि कृशता । नसे उच्चता आणि र्‍हस्वता । नसे जन्ममरणाचि वार्ता । अज अव्यय असे जें ॥५३॥ गूणवर्ण अभिवानदि लक्षण । हे सर्वथा जेथें नसति जाण । ऐसि जे वस्तु शुद्ध चिद्घन । तेंचि हें ब्रह्म जाण पा ॥५४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP