मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी| श्लोक २९ आत्मबोध प्रकाशिनी प्रारंभ: श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ श्लोक ५ श्लोक ६ व ७ श्लोक ८ श्लोक ९ व १० श्लोक ११ व १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ व १६ श्लोक १७ व १८ श्लोक १९ व २० श्लोक २१ व २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ व २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० व ३१ श्लोक ३२ व ३३ श्लोक ३४ व ३५ श्लोक ३६ व ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ व ४२ श्लोक ४३ व ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ व ४८ श्लोक ४९ व ५० श्लोक ५१ व ५२ श्लोक ५३ श्लोक ५४ व ५५ श्लोक ५६ व ५७ श्लोक ५८ श्लोक ५९ व ६० श्लोक ६१ व ६२ श्लोक ६३ श्लोक ६४ श्लोक ६५ श्लोक ६६ व ६७ श्लोक ६८ आत्मबोध टीका - श्लोक २९ वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathनिरंजन रघुनाथमराठी श्लोक २९ Translation - भाषांतर निषिध्य निखिलोपाधीन्नेतिनेतीति वाक्यत: ।विद्यादैक्यं महावाक्यैर्जीवात्म - परमात्मनो: ॥२९॥टीप :- करोनि सर्व उपाधीचा निरास । महावाक्ये करून जीवात्म परमात्मियास । पाहावें ऐक्य येकरस । ज्ञानद्रिष्टि करोनि ॥८५॥ करोनि त्वं पदाचा वाच्चार्थत्याग । आणि घ्यावा तयाचा लक्षार्थ सुभग । तैसाचि तत्पदाचा लक्षार्थ चांग । वाच्चार्थ त्यागें घ्यावा पै ॥८६॥ त्वं पदाचे वाच्चार्थ लक्षण । तें तुज सांगतों विवंचुन । करोनि तयाचे निसिधिकरण । अवसिष्ट भाग सेवि पै ॥८७॥ स्थूळ देह हा नोव्हे आत्मा । आणि लिंगदेहे हाही अनात्मा । तैसाचि कारण देहे नोव्हे आत्मा । अज्ञानरूपो निश्चित ॥८८॥ महाकारण देहे चवथा । जयाचि जाणीव तुर्या अवस्था । देहलिदीपंन्याये तत्वता । तोहि अनात्मा असे पै ॥८९॥ ऐसे या चव - देहाचे निसिधिकरण । करिता राहे जें अवसिष्टपण । त अयाचि गुरुमुखे वोळखोनि खुण । लक्षार्थेसि गणावि ॥९०॥ तैसाचि त्वं पदाचा जो वाच्चार्थ । तयाचा स्पष्ट सांगतो अर्थ । त्याचा त्यागें जो लक्षार्थ । राहील तोचि घेइ पा ॥९१॥ इश्वराचे स्थूळ - देह तो विराट । लिंगदेह हिरण्यगर्भ स्पष्ट । तिजी माया कारण देह प्रगट । चवथा देह मूळ माया ॥९२॥विराट ह्मणजे हें ब्रह्मांड । पंचभूताचें दळवाडें प्रचंड । हें समजोनि मायेचे बंड । अनात्मपणें त्यागावें ॥९३॥हिरण्यगर्भ जो लिंग देह जाण । इंद्रचंद्रादीक देवगण । हे आत्मा नोव्हेत आसें जाणोन । त्याग करावा तयाचा ॥९४॥ तिजि माया कारणदेहे । जे प्रळयकाळिं शून्यत्वपणें राहे । तोहि आपल्या नि:संदेहे । जाणोनिया त्यागावा ॥९५॥ आता चवथा देह मूळ माया । जे अहंपणें स्फुरलि मूळठाया । ते आत्मा नोव्हे हें समजोनिया । त्याग करावा तियेचा ॥९६॥ करितां चहूदेहाचा निसिद्धार्थ । तळी अवसिष्ट राहील जो अर्थ । तोचि इश्वराचा पै लक्षार्थ । जाणोनि घ्यावा गुरुमुखें ॥९७॥ जहद आणि अजहद । तिसरे तें जहदाजहद । येणें करोनि महावाक्यार्थ विशद । तुजलागि सांगतों ॥९८॥ जहद म्हणजे सर्वस्वें त्याग । अजहद म्हणजे सर्वश्वें अत्याग । जहदाजहद म्हणजे भागत्याग । कांहीं घेणें कांहीं टाकणें ॥९९॥ जैसा पाहिला होता जो कासींत । तोचि हा गृहस्थ येथें द्वारकेंत । ऐसे म्हणतां तत्क्षणिं देशकाल निरस्त । करोनि गृहस्थ घ्यावा पै ॥४००॥ तैसें उभयपक्षीचें अष्टदेहे । त्यागिता उभयभागिचा जो शुद्धार्थ राहे । तेणें जीवेश्वराचें ऐक्यत्व होय । ज्ञान दृष्टीनें पाहातां ॥१॥ तूं म्हणसि की पहिलेचि ऐक्य असे । तरीमग जाणावें तें काइसे । तरि त्वा न म्हणावें गा ऐसें । जाणणें नको म्हणऊनि ॥२॥ तुझें चित्ती असे अज्ञानभेद । जीव ईश्वर असतां अभेद । त अया अविद्येचा करावया छेद । विद्या पाहिजे यदर्थी ॥३॥ अविद्या म्हणजे आत्मयाते नेणणें । जीवेश्वराचा भेद वाखाणणें । जीवेश्वराची ऐक्यता पाहाणें । तीतें विद्या म्हणावी ॥४॥ जीवाची किंचिज्ञत्वादि लक्षणें । आणि ईश्वराचि सर्वज्ञत्वादी लक्षणें । ऐसें उभयपक्षिचे त्याग करून । आत्मत्विं ऐक्य पाहावें ॥५॥ जैसि घट मठ उपाधि त्यागितां । घटाकाश मठाकाशाचि होय ऐक्यता । तयापरि वाच्चार्थ त्यागें लक्षार्थता । ऐक्य पाहावि दोहीचि ॥६॥ वाच्चार्थ म्हणजे आत्मलक्षन । लक्षार्थ म्हणजे शुद्ध आत्मा जाण । तया शुद्ध आत्मयाचेंचि ऐक्यपण । होत असे निश्चइं ॥७॥ अन्यथा जो वाच्यार्थ निशिद्ध । तो अनात्मा जाणोनिया अबद्ध । सर्वस्वें नासिवंत प्रसिद्ध । म्हणोनिया त्यागावा ॥८॥ N/A References : N/A Last Updated : November 21, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP