मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी|

आत्मबोध टीका - श्लोक २८

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


स्वबोधे नान्यबोधेच्छा बोधरूपतयात्मन: ।
न दीपस्यान्यदीपेच्छा यथा स्वात्मप्रकाशने ॥२८॥

आत्मा स्वत:सिद्ध बोधरूप आसे । त्यातें अन्यत्र बोध अपेक्षा नसे । स्वयंवेद्यपणें विलसे । अखंडीत चिदात्मा ॥६०॥
जैसे दीपासि पाहावयासाठिं । नलगे दुसर्‍या दीपाचि अटाटि । त्याचाचि प्रभेनें त्याची भेटि । घ्यावि जावोनि जापरि ॥६१॥ तयापरि प्रत्यगात्मियाणें । पाहावें परमात्मिया लागुन । अनादि ऐक्य अखंडितपणें । आहे तें जाणावें स्पष्टत्वें ॥६२॥
तुं म्हणसि कीं तो अखंड आणि अद्वय । चिदात्मा सत्यस्वरूप होय । तेथें आत्मा प्रत्यगात्मा हें द्वय । कैशापरि योजावें ॥६३॥ तरी हें द्वैत कधिं नव्हतें बा रे । परी तुवाचि अज्ञानें कल्पिलें किं रे । म्हणोनि द्वैत उपपादन हें सारें । करणें अलें तुजसाठिं ॥६४॥
परि हे द्वैत म्हणू नयेगा सर्वथा । हे द्वैत निरसनाचिच कथा । जैसि रोगिये मुखाते अलिया कटुता । कटु वोषधें निवारे ॥६५॥
कां अपुलीया मुखा लागुन । पाहू इच्छितें जालें मन । तरी घेवोनिया स्वच्छ दर्पण । तया योगें पाहावें ॥६६॥
ये विषईं श्री भगवान् । अर्जुनाप्रति वदले जाण । त्रितीय अध्याइं गीतावचन । ते मी तूंतें सांगतो ॥६७॥

संमतगीता ॥श्लोक ॥ -
एवंबुत्धे: परंबुध्वा संस्तभ्यात्मान मात्मना इति ॥ तंव सिष्य म्हणे जि श्री गुरुमुर्ति । अशंका वाटति माजिया चित्तिं । तुम्हि माधें कथिलि कीं आत्मास्थिति । बुत्धिस न कळे म्हणउनि ॥६८॥

आतां ह्मणतां बुद्धीनें पाहावें । या उभयांतूनि कोणतें घ्यावें । हें मजप्रति सांगोनि द्यावें । श्रीगुरुराया दयाळा ॥६९॥
मग स्वामि म्हणति रे ऐक सुमति । बुत्द्घीस अग्राह्य आत्मस्थिति । आणि बुत्धीस ग्राह्य हेहि उक्ति । बोलताति उपनिषदें ॥७०॥ आतां बुत्धीतें आत्मा कैसा दिसे । आणि बुद्धिसि आत्मा कैसा न दिसे । हें तूज दृष्टातें करोनि विन्यासें । सांगतों तें ऐक पा ॥७१॥
जैसे उपनेत्र लावोनि नेत्रासि । मंदचक्षु पाहाति अक्षरासि । तैसें परमात्म स्वरूप जीवात्मियासि । शुद्ध बुत्धीनें लक्षावें पै ॥७२॥ तया उपनेत्रा लागुन । न दिसे नेत्राचिया वाचुन । त्या परि बुत्धीसि स्वतंत्रपणें । न दिसे आत्मस्वरूप पै ॥७३॥
तूं जरि म्हणतील ऐसे काहिं । किं आत्मयावीण बुत्धी स्वतंत्र नाहिं । आणि बुत्धीवीण आत्मयास सर्वथाहि । न दिसे परमात्म स्वरूप तें ॥७४॥
तरि येतावता काय झालें । उभयाचेही समानत्व आले । तेव्हां अन्य पएक्षा करणें लागले । आत्मयासि प्रसिद्ध ॥७५॥
तरी तूं ऐसें न म्हणे कांहिं । बुद्धी आत्म्यावीण स्वतंत्र नाहिं । तें आत्मस्वरूपाचि प्रभा पाहि । नसे भिन्न त्याहुनि ॥७६॥
जैसा अग्नि निर्धूम सोज्वळा । त्या माजि वसे त्याचि ज्वाळा । उठतां बैसतां भाव वेगळा । नसे तया ज्वाळेचा ॥७७॥
असो हा तूज सांगितला प्रकार । तो पूर्ण अनुभवि जाणति चतुर । जाणे ज्ञानद्रिष्टीनें परिकर । आत्मा लक्षिला असेल पै ॥७८॥ मागति घेवोनिया शंका । सिष्य पुसे गुरुकूळटिळका । ज्ञानद्रिष्टिनें जीवात्मिया येका । जाणता कार्य कां नोव्हे ॥७९॥
जीवात्मा देहिं अपरोक्ष वसे । आणि परमात्मा तो परोक्ष असे । या उभयतांचें ऐक्य कैसें । होउं सके स्वामिया ॥८०॥
मग श्रीगुरु देति प्रत्योत्तर । जीवात्मा देहिं वसे निरंतर । तो येकला अनुभवावा साचार । ऐसे ह्मणसि जरी तुं ॥८१॥
तरी जिवात्मा अविद्यापासें गुंतला । सर्वस्वे तयेचा स्वाधीन जाला । यास्तव विद्याचि पाहिजे त्याला । अविद्यापाशछेदनासि ॥८२॥ ती विद्या परमात्मियाचि शक्ति । तिचेनी अनुभवासि ये परमात्मव्यक्ति । जीवात्म परमात्म ऐक्यस्थिति । पाहातां मुक्ति होतसे ॥८३॥
तूं म्हणसि तो परोक्ष असे । जीवाचे त्याचे ऐक्य घडे  कैसे । तरी येतद्विषइं मी विन्यासे । तुजलागि सांगतों ॥८४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP