मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी| श्लोक १७ व १८ आत्मबोध प्रकाशिनी प्रारंभ: श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ श्लोक ५ श्लोक ६ व ७ श्लोक ८ श्लोक ९ व १० श्लोक ११ व १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ व १६ श्लोक १७ व १८ श्लोक १९ व २० श्लोक २१ व २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ व २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० व ३१ श्लोक ३२ व ३३ श्लोक ३४ व ३५ श्लोक ३६ व ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ व ४२ श्लोक ४३ व ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ व ४८ श्लोक ४९ व ५० श्लोक ५१ व ५२ श्लोक ५३ श्लोक ५४ व ५५ श्लोक ५६ व ५७ श्लोक ५८ श्लोक ५९ व ६० श्लोक ६१ व ६२ श्लोक ६३ श्लोक ६४ श्लोक ६५ श्लोक ६६ व ६७ श्लोक ६८ आत्मबोध टीका - श्लोक १७ व १८ वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathनिरंजन रघुनाथमराठी श्लोक १७ व १८ Translation - भाषांतर देहेंद्रियमनोबुद्धिप्रकृतिभ्यो विलक्षणत् ।तद्वृत्तिसाक्षिणं विद्यादात्मानं राजवत्सदा ॥१७॥देहनगरिचा माझारिं । आत्मा साक्षित्वें राज्य करि । बुद्धि प्रधान मन कारभारि । इंद्रियें प्रजा सर्वहि ॥२२२॥ तया राजा प्रधाना मध्यंतरिं । अज्ञानचिकाचा पडदा भीतरि । प्रजा मंत्रि राजास नेणति परि । राजा जाणे सर्वांतें ॥२२३॥ तयाचा सत्ता मात्रेंकरुन । बुद्धि मन इंद्रियें संपूर्ण । स्व - स्व विषइं प्रवर्तति जाण । परि आत्मा असे साक्षित्वें ॥२२४॥ जैसा राजा असतां साक्षित्वेंसी । प्रधान चालवि सर्व राज्यासि । तैसि मनोवृत्ति करि व्यापारासि । आत्मा साक्षि वेगळा ॥२२५॥ हे विचारद्रिष्टिनें पाहातां । अनुभवा येईल आत्मा अकर्ता । यर्हविं अज्ञानद्रिष्टीनें पाहातां ॥ आत्मा कर्ता भासेल पैं ॥२२६॥व्यावृत्तेष्विंद्रियेष्वात्मा व्यापारीवाविवेकिनाम् ।दृश्यतेभ्रेषु धावत्सु धावन्निव यथाशशी ॥१८॥जैसा अभ्राचा योगें करुन । चंद्र दिसे पलायमान । किं रथगमनप्रभावें करुन । भूमि चंचळ दिसतसे ॥२२७॥ समुद्रजळ निश्चळ असे परि । जहाज चालतां तयावर्हि । दिसे उदकाचि अति सरारि । गंगेसम धावता ॥२२८॥ चंद्र भूमि आणि समुद्र । हे तिन्हिही आसति स्थीर । परि उपाधियोगें अस्थीरे । वाटति भ्रमें करुनि ॥२९॥ तैसा आत्मा असोनि अकर्ता । अज्ञानयोगें भासे कर्ता । होउनि देहात्मबुद्धि विषमता । अस्ताव्यस्त बरळति ॥२३०॥ अज्ञानि म्हणति देहासवें । आत्मा बोले चाले धावे । आत्मा कर्ता भोक्ता सर्वभावें । विषयालागि ग्रहण करि ॥३१॥ परि आत्म अकर्ता सर्वापरि । असो विवेकिया व्यापारिं । अथवा पश्वादि जीव नानापरि । सर्वत्रिं आत्मा निष्क्रिय ॥३२॥ इंद्रियाचा योगें करुन । आत्मात्विं दिसें कर्तृत्वपण । जेसें अभ्रादियोगें अतिधावन । दिसे चंद्रादिकांसि ॥३३॥ यापरि ऐकोनिया वचन । सिष्य करिता जाला प्रश्न । आत्मा अकर्ता म्हणउन । सांगतां तुम्हि श्रीगुरु ॥३४॥ तरि इंद्रियबुद्धि आणि मन हे जडरासि असति संपुर्ण । याचे ठाइं कर्तृत्वपण लक्षण । न संभवेचि सर्वथा ॥२३५॥ तरि विषयव्यापार - प्रवृत्ति । कोण करितसे जि श्रीगुरुमुर्ति । हें मज सांगोनि द्यावें निगुति । जेणें प्रत्ययासि ये माझा ॥३६॥ ऐकोनि सिष्यवाणि परिकर । श्रीगुरु देति प्रत्योत्तर । जेणें सिष्यशंकेचा परिहार । होवोनि जाय तत्क्षणिं ॥३७॥ N/A References : N/A Last Updated : November 21, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP