मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी| श्लोक ४९ व ५० आत्मबोध प्रकाशिनी प्रारंभ: श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ श्लोक ५ श्लोक ६ व ७ श्लोक ८ श्लोक ९ व १० श्लोक ११ व १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ व १६ श्लोक १७ व १८ श्लोक १९ व २० श्लोक २१ व २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ व २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० व ३१ श्लोक ३२ व ३३ श्लोक ३४ व ३५ श्लोक ३६ व ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ व ४२ श्लोक ४३ व ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ व ४८ श्लोक ४९ व ५० श्लोक ५१ व ५२ श्लोक ५३ श्लोक ५४ व ५५ श्लोक ५६ व ५७ श्लोक ५८ श्लोक ५९ व ६० श्लोक ६१ व ६२ श्लोक ६३ श्लोक ६४ श्लोक ६५ श्लोक ६६ व ६७ श्लोक ६८ आत्मबोध टीका - श्लोक ४९ व ५० वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathनिरंजन रघुनाथमराठी श्लोक ४९ व ५० Translation - भाषांतर जीवन्मुक्तस्तुतद्विद्वान्पूर्वोपाधिगुणांस्त्यजेत् ।सच्चिदानंदरूपत्वाद्भेवद् भ्रमरकीटवत् ॥४९॥॥ टीका ॥ ऐसा जयाचा दृढनिश्चय । तोचिं जिवन्मुक्तिदशापन्न होय । पुर्वउपाधि जे देह द्वय । टाकि तयाचा गुणाते ॥५४॥ पूर्वि म्हणत होता मी देहेदेही । तेणे पडोनि त्रिगुणाचा प्रवाहि । रागद्वेषाचिया डोहि । बुडत होता निश्चित ॥५५॥ ऐसे जे का देह संबंधि गुण । ते सर्वस्वें सांडिले आसति जेण । करिता सच्चिदानंद चिंतन । होता जाला तद्रुप ॥५६॥ जैसि कीटिका भ्रमरिगृहात । भयेकरोनि भ्रमरिते चिंतित । तव कीटिकाचि स्वये भ्रमरी होत । तीव्र चिंतने करोनि ॥५७॥ तैसे करोनि महावाक्य श्रवण । त्याचे करोनि अंतरि मनन । अभेदत्वे करिता निजध्यासन । साक्षात्कारता पावला जो ॥५८॥ तो मागति न म्हणे मी देह देही । सर्वापरि होउनि नि:संदेहि । म्हणे मी सच्चिदानंद अक्षइं । अजरामर होय पै ॥५९॥ किंबहुना देहद्वया समेत । जो आत्माचि जाला निभ्रांत । नाहिं जया स्वरूपासि अंत । तेचि होवोनि राहिला ॥६०॥तीर्त्वा मोहार्णवं हत्वा रागद्वेषादिराक्षसान् ।योगी शांतिसमायुक्त आत्मारामो विराजते ॥५०॥॥ टी० ॥ पदार्थ आपणाहूनि असावे भिन्न । ह्मणोनि प्रीति व्हावि उत्पन्न । ते तव सर्वथा नसेचि जाण । यास्तव राग केला तयाचा ॥६१॥ अथवा तयाचा स्वरूपा वेगळा । पदार्थ कोण्हि असावा निराळा । ह्मणोनि यावा कंटाळा । हेंही नसे जापासि ॥६२॥ बांधोनि ज्ञानाचा स्वेतु परिकर । आणि अज्ञान - मोहार्णव दुस्तर । न स्पर्शिता पैलपार सत्वर । पावला तो योगीराज ॥६३॥ रावणकुंभकर्ण रागद्वेष । जे साधकाते भक्षिते राक्षस । ते जिवेंची मारोनिया नि:शेष । टाकिले जेणें ॥६४॥ मग शांति सीता निज अंतुरि । घेवोनि स्वसुखाचे मांडिवरि । आत्माराम योगि रावणारि । निज सिंव्हासनि विराजे ॥६५॥ N/A References : N/A Last Updated : November 22, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP