मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी|

आत्मबोध टीका - श्लोक ३० व ३१

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


अविद्यकं शरीरादि दृश्यं बुद्बुदवत्क्षरं ॥
एतद्विलक्षणं विद्यादहं ब्रह्मेतिनिर्मलं ॥३०॥

टीप :- अविद्यारूप हें दृश्यजात । देहेमन - इंद्रियादिसमस्त हे जाणोनिया नासिवंत । सुविचारें त्यागवें ॥९॥
जैसे उदकावर्‍हि बुद्बुद उठति । सवेंचि नाशाप्रति पावति । परि अविनाशत्वें उदक स्थिति । असे जैसि तैसीच ॥१०॥
तैसें आत्मस्वरुपावर्‍हि हें जग भासलेसें निर्घारि । याहूनी विलक्षण ब्रह्म मी ऐसीयापरि । निर्मलस्वरूपातें जाणावें ॥११॥

देहान्यत्वान्नमेजन्मजराकार्श्यलयादय: ॥
शब्दादिविषयै:संगो निरंद्रियतयानच ॥३१॥

मी या देहद्वयाहूनि असे वेगळा । शुद्धस्वरूप ब्रह्म - पुतळा ।  देहद्वयाचीया गळा । सर्व विकार आसति ॥१२॥
जरामरण - कृशत्व - स्थूळ देहधर्म । क्षुप्तिपासा हें प्राणाचें कर्म । भयशोकादिक अनुक्रम । हे मनोधर्म आसति ॥१३॥
तैसेचि शद्ध - स्पर्श - रस - रूपगंध । या पंच विषयाचा भोग विविध । ते इंद्रियें भोगिति अबद्ध । आपुल्याल्या अधिकारे ॥१४॥ षडविकार षडभाव आणि पंचविषय । देहद्वय आसति याचे ठाइं । मी निर्धर्म निष्क्रिय आत्मा निरामय । निश्चयेसि सर्वदा ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP