मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी| श्लोक ३६ व ३७ आत्मबोध प्रकाशिनी प्रारंभ: श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ श्लोक ५ श्लोक ६ व ७ श्लोक ८ श्लोक ९ व १० श्लोक ११ व १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ व १६ श्लोक १७ व १८ श्लोक १९ व २० श्लोक २१ व २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ व २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० व ३१ श्लोक ३२ व ३३ श्लोक ३४ व ३५ श्लोक ३६ व ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ व ४२ श्लोक ४३ व ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ व ४८ श्लोक ४९ व ५० श्लोक ५१ व ५२ श्लोक ५३ श्लोक ५४ व ५५ श्लोक ५६ व ५७ श्लोक ५८ श्लोक ५९ व ६० श्लोक ६१ व ६२ श्लोक ६३ श्लोक ६४ श्लोक ६५ श्लोक ६६ व ६७ श्लोक ६८ आत्मबोध टीका - श्लोक ३६ व ३७ वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathनिरंजन रघुनाथमराठी श्लोक ३६ व ३७ Translation - भाषांतर एवं निरंतरं कृत्वा ब्रह्मैबास्मीति वासना ।हरत्यविद्या विक्षेपान् रोगानिव रसायनम् ॥३६॥याप्रमाणें निरंतर भावना । मी ब्रह्म ऐसें स्मरत असतांना । अविधाकृत चित्त विक्षेपवासना नि:शेष नाश पावतसे ॥२६॥ जैसें उत्तम रसायण । रोगियें चिरकाल करितां सेवन । नि:शेष रोगकरीहाण । तैसें ब्रह्मचिंतन हें ॥२७॥ तूं ह्मणसि हें शब्दज्ञान । मी ब्रह्म मी ब्रह्म ह्मणउन । तरी येताद्विषई तूं तें ध्यान । सांगतों तें ऐक पा ॥२८॥ परी हा सांगितला जो प्रकार । तो साधकिं स्मरावा वारंवार । तेणें अविद्या विक्षेपपरिहार । होत असे निश्चइं ॥२९॥ आगा हा अनादि संसार । देहभावना होता वारुंवार । जीवात्मा जाला देहाकार । अग्नि लोहोपिंडापरी ॥३०॥ जीवात्मा नसता देहाकृति । परि ध्यास जाला काळ बहुति । तेणें पडोनि स्वस्वरूपभ्रांति । देहदसेसि पातला ॥३१॥ सत्यत्वे देह नसतां आपण । परि निजध्यासे पावला देहत्वगुण । तैसा स्वस्वरूप आत्मा चिद्घन । निजध्यासें का नोव्हे ॥३२॥ तव सिष्य म्हणे जि श्रीगुरूमुर्ति । ऐकोनि घ्यावि माझि विज्ञाप्ति । देह प्रत्यक्ष दिसे याज - प्रति । म्हणोनि देह मी म्हणतासे ॥३३॥ तैसा देहासारिखा अपरोक्ष । आत्मानुभव होइल प्रत्यक्ष । तेंव्हा तेथें ठेवोनिया लक्ष । ब्रह्मरूप होइल पै ॥३४॥ ऐसि ऐकोनि सिष्य - वाणि । सद्गुरु ह्मणति धन्य तू ये क्षणिं । जे मुमुक्षता उपजालि तुझे मनि । अपरोक्ष ब्रह्म स्वरूपाचि ॥३५॥ आतां ब्रह्म स्वरूप किंलक्षण । तें मी तुतें सांगतों जाण । मग तें अंतरिं करोनि मनन । निजध्यासन करी त्याचें ॥३६॥ साधन आणीक साध्यता । या दो श्लोकिं सांगतों तत्वता । जेणें वस्तुचि चढे हाता । साधकाचा तात्काळ ॥३७॥विविक्त देश आसीनो विरागोविजितेंद्रिय: ॥भावयेदेकमात्मानं तमनंतमनन्यधी: ॥३७॥॥टी०॥ वैराग्यें इंद्रियें जिंकुन । शुद्ध एकांत स्थळिं बैसून । अनंत ब्रह्म स्वरूपा लागुन । अनन्यबुद्धि चिंतावें ॥३८॥ यास्तव बैसावें येकांतिं । जनाचा अखंड विषयाकार मति । साधकें बैसतां त्याचे निकटवर्ति । मन होतसे तैसेंचि ॥३९॥ जैसा पाणियाचा वोहट । चाले भूमि पाहोनि सपाट । पुढें लागलीया अवघड घाट । फिरे मागति उलटुनि ॥४०॥ तैसि मनासि विषय - सुख - गोडि । म्हणोनि धरि जन - संग - आवडि । तेथें दु:ख होतां कडोविकडि । खेदालागि पावतसे ॥४१॥ ये विषइं श्री भगवंत । अर्जुनाप्रति सांगति निश्चित । किं संगें करोनि मोठा घात । होत अशे साधकाचा ॥४२॥ N/A References : N/A Last Updated : November 21, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP