मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी|

आत्मबोध टीका - श्लोक २१ व २२

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


अज्ञानात्मानसोपाधे: कर्तृत्वादीनि चात्मनि ॥
कल्पन्तेंबुगते चंद्रचलनादि यथांभस: ॥२१॥

कोण्हीयेक नदीचीया तिरिं । मार्ग चालता निसिमाझारिं । चंद्र दिसे चालल्यापरि । उदकाचिया अतुनि ॥५१॥
मार्गस्थ जाय पूर्वेप्रति । त्यास चंद्राचि दिसे तैसीच गति । होवोनि अज्ञानाचि भ्रांति । विपरीत भान जाहालें ॥५२॥
अथवा सरोवराचिया माझारिं । उदक चंचळ होतां निर्धारिं । भ्रांतासि दिसे नानापरि । चंद्रबिंब चंचळत्वें ॥५३॥
तैसि आत्मस्वरूपिं अज्ञानउपाधि । देहे इंद्रियमनबुद्धि । यांचिया योगें कर्तृत्वसिद्धि । आत्मयासि दिसतसे ॥५४॥
परि आत्माआसे निष्क्रिय । व्यापारशून्य निरामय । तया निर्व्यापारासि काय । व्यापार लागुं शकेल पैं ॥५५॥
तरि हें कर्तृत्व असे कवणाचें । हें तूज सांगोनि देतों साचें । श्रुत्या युक्त्या अनुभवाचें । बोलणें हें ऐक पां ॥५६॥

रागेच्छासुखदु:खादिबुद्धौसत्यां प्रवर्तते ।
सुषुप्तौ नास्ति तन्नाशे तस्माद्बुद्धेस्तु नात्मन: ॥२२॥

रागइच्छासुखदु:ख आदिकरोन । हे बुद्धिचेचि असति गूण । सच्चिदानंद आत्मलक्षण । नोव्हेति जाण निश्चइं ॥२५७॥
जागृति आणि स्वप्नावस्था । बुद्धिचा ठाइं असति तत्वता । ह्मणोनिया सर्व व्यवस्था । होय कर्मअकर्माचि ॥५८॥
बुद्धिचे ठाइं काम वसति । बुद्धिच धरि विषयाचि प्रीति । सूखइच्छा धरोनिया निगुति । इंद्रीयद्वारें प्रवतें पैं ॥५९॥
विषयप्राप्तिनें मानि सुख । तें प्राप्त न होतां मानि दु:ख । बुद्धिच होउनि सर्वतोमुख । प्रवर्त होय कर्मासि ॥२६०॥
तेचि बुद्धि सुषुप्तिमाझारिं । लीन होतां आज्ञानाभीतरिं । रागेच्छाअ सुखदु:खें सहपरिवारिं । नाशाप्रति पावति ॥६१॥
तेव्हां आत्मा तरि असतचि आसे । परी रागइच्छादी कर्म नसे । मागति बुद्धि उठतांचि ठसे । रागेच्छादिकाचे उमटति ॥६२॥
तरि जें करणें क्रियाकर्म । तें सर्वहि जाण बुद्धिचे धर्म । अविनासि आत्मा निर्धर्म । निष्क्रियत्वें असे पैं ॥६३॥
तंव सिष्य ह्मणे जि बरें कथिलें । हें माझ्या प्रत्ययालागि आलें । परि आत्मलक्षणातें सांगितलें । पाहिजे मजलागुनि ॥६४॥
मग श्रीगुरु ह्मणति भला । रे भला । येथवरि तुवां व्यतिरेक ऐकिला । तो आनात्मा जाणोनिया वहिला । ठेवि वेगळा जडभाग ॥६५॥
पुन्हा हे शंका न घेइ सर्वथा । कर्तृत्व नेमि बुद्धेंद्रियाचे माथा । सांडोनि देइ अविचारगाथा । किं कर्ता आत्मा म्हणउनि ॥६६॥ जैसें कुंकु आणि गोपीचंदन । करितां येकत्र मेळवण । नसे अरक्त ना शुभ्रपण । दोन्हिहि होति विपरित ॥६७॥
तैसें अज्ञानयोगेंकरुन । आत्मा आणि देह येकत्रपण । मेळवोनिया विपरीत भान । जालें होतें तुजलागिं ॥६८॥
तरि सांडोनि बुघ्यादिकाचा संग । होइ पां आत्मस्वरूपीं नि:संग । तेणेंकरोनि भवभंग । होइल तुझा निश्चइं ॥६९॥
आतां किंलक्षण । कैसि तयाचि वोळखण । ते तूज सांगतों निश्चयें करून । करि श्रवण ये क्षणिं ॥७०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP