मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी|

आत्मबोध टीका - श्लोक २७

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


आत्मावभासयत्येको बुध्यादीनींद्रियाणिहि ॥
दीपो घटादिवत्स्वात्मा जडैस्तैवभास्यते ॥२७॥

अगा येकला आत्मा बुद्ध्यादिकासि । अपुलिया प्रकाशानें प्रकासि । परि बुद्धि आदि करोनि जडरासि । आत्म्यासि प्रकाशु न सकति ॥५२॥
मन - बुद्धि - चित्त - अहंकार - देहे । हे सर्वहि असति अज्ञान कार्यें । जडत्त्वाचा स्वयंभ ठाय । हे तुं जाण निश्चइं ॥५३॥
याचें सर्वही परतंत्र वैभव । मग याणि आत्मयातें काय पाहावें । जैसे गर्भांधासि नसे ठावे । अन्यत्राचे रूपडें ॥५४॥
अंध अपुलियातें न पाहाती । माझि गौर वा शाम अहे कांति । ते दुसरीयातें काय पाहुं सकति । अपुलीया नेत्रानें ॥५५॥
किंव्हा अनेक घट असति । ते दीपातें प्रकाशउं न सकति । परी एकला दीप सर्व घटाप्रति । प्रकाशवि अपुल्या प्रकाशें ॥५६॥
तैसे बुद्धे आदिकरूनि सर्वहि । आत्म्यासि प्रकाशु न सकति पाहि । परि येक आत्मा बुद्ध्यादीक सर्वहि । प्रकाशि अपुल्या प्रकाशें ॥५७॥
तूं जरि म्हणसि ऐसें काहीं । किं आत्माचि प्रकाशि सर्वहि । परि त्या आत्म्याचें ज्ञान व्हावया पाहि । द्वितीय अपेक्षा पाहिजे ॥५८॥
तरी ये विषइंचा प्रकार । तूंते सांगतों गा सविस्तर जेणें द्वितीय अपेक्षेचा परिहार । होय ज्ञानविषइंचा ॥५९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP