मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी|

आत्मबोध टीका - श्लोक ५४ व ५५

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


यल्लाभान्नापरोलाभो यत्सुखान्नापरंसुखम् ।
यद्ज्ञानान्नापरंज्ञानं तद्व्रह्मेत्यवधारयेत् ॥५४॥

या लाभापेक्षां द्वितीयलाभ । आणीक नसेचि गा सुभग । यासुखापेक्षां सुखाचा कोंभ । दुसरा नाहिं जाण पा ॥४॥
जेंजें कांहिं सुख होतसे । तेंतें आत्मस्वरुपाचेंचि असे । जैसें भूमंडळी जें तोय असे । ते समुद्राचें सर्वही ॥५॥
जालिया येक ब्रह्मज्ञान । दुजें आणीक नसे ज्ञान । जें सर्व ज्ञानाचे सिरोभागरत्न । तें हें ब्रह्म जाण पां ॥६॥

यदृष्ट्रवा नापरं दृश्यं यद्रभूत्वा न पुनर्भव: ।
यज्ञात्त्वा नापरं ज्ञेयं तद्व्रह्मेत्यवधारयेत् ॥५५॥

हें चिदानंद ब्रह्म परिपूर्ण । लक्षिलें असतां ज्ञानद्रिष्टिकरून । मग उरे आणिक जाणने । तें हें ब्रह्म जाण पा ॥७॥
महावाक्य विचारें करुन । ब्रह्मि जालें असतां ऐक्यत्त्वपण । पुन्हा मागति आणिक होणें । नाहि देहधारित्त्वें ॥८॥
हें येक जाणलें आसतां । आणीक जाणने नुरे तत्त्वतां । जे सर्वाधिष्ठान सर्वसत्ता । तें हें ब्रह्म जाण पां ॥९॥
ऐसि ऐकोनि उदारवाणि । सिष्य विनवि करुणावचनिं । जें अज्ञापिलें असे स्वामिनिं । किं येक कळतां सर्व कळे ॥१०॥
तरि ज्ञानि असतां गोदातिरिं । त्यातें काय वर्तलें कासिमाझारि । हें नकळे कि निजनिर्धारि । स्वामिराया दयाळा ॥११॥
अचार्य म्हणति रे लडिवाळा । हे नोव्हे ब्रह्मज्ञानाचि कळा । जो तपें करोनि असेल अगळा । त्यासि ह्या सित्ध वोळगति ॥१२॥ त्या सित्धिहि असति येकदेसि । कासि चिंतोनिया मानसि । वर्तले सांगेल तये देसि । परि द्वारकेचे नकळे पै ॥१३॥
जेव्हां द्वारकेचे करील ध्यान । तेव्हां तेथील सांगेल वर्तमान । असो ऐसे येकदेसीपण । तया तपोबळाचे ॥१४॥
तैसा नोव्हे हा आत्मज्ञानि । कारणरूप आत्मा आनुभवोनि । त्याचिच कार्यात व्याप्ति पाहोनि । आत्मस्थितिनें वर्ते पै ॥१५॥ येविषइं येक इतिहास । तूतें सांगतों पा अतिसुरस । जो कार्यकारत्त्वें दृष्टांतास । उपेगासि ये या काळि ॥१६॥
कोण्ही येक सद्ब्राह्मणाचा पुत्र । कासींत पढोनिया दोन शास्त्र । गृहाप्रति येवोनि तो पवित्र । वंदिता जाला पितियातें ॥१७॥
केलें होतें वचन । बोलता जाला चमत्कारे ॥१८॥
पुत्रा तुं ऐसें पढलासि कांहिं । जे येक कळतां कळे सर्वहि । तो ह्मणे पहडलो नाहि । आणिक अध्यन राहिलेसे ॥१९॥
मागति जावोनि कासिप्रति । संपादिलि चार शास्त्रेम वित्त्पत्ति । ते निवेदावया जनकाप्रति । गृहालागि पातला ॥२०॥
तेणें चार शास्त्रें अध्ययन । दाखविता पिता बोले वचन । आरे तैसे नोव्हे अध्ययन । जे येक कळतां सर्व कळे ॥२१॥
आसो तो मागति जावोन । आला साहि शास्त्रे पढोन । परि तयायोगे पित्याचें मन । संतुष्ट नोव्हे सर्वथा ॥२२॥
मग तो पुत्र बोले तये वेळा । ऐसि कोणति आहे हो ज्ञानकळा । येक कळतां सर्व दृश्यमेळा । समजोनि येइल निश्चइं ॥२३॥
मग पिता बोलता होय त्यातें । तुं जावोनिया कुल्लाळगृहाते । घटशरावादिक पदार्थांते । घेवोनि येइ सर्वश्वें ॥२४॥
तेणें धन देवोनि कुल्लाळासि । सर्वस्वे आवाचि आणिला गृहासि । तो ठेवोनियां पित्यापासी । अग्रभागि स्थित जाला ॥२५॥
मग पिता त्यातें बोले वचन । हे बहु प्रकारिचे पदार्थ जाण । याचि वेगळालि नामाभिधान । घटशरावादि करोनि ॥२६॥
याचि नामरुपें असति अनेक । परि सर्विं मृत्तिका असे येक । सर्वाचे आदि अंतिं मध्यें निष्टंक । मृत्तिकाचि असे निश्चइं ॥२७॥ तैसा आत्मा सच्चिदानंदघन । सर्व दृश्यमात्रि असे व्यापुन । कांहीं येक पदार्थ तयावीण । नसे आदि अंतिं मध्येहि ॥२८॥
असो तया ब्रह्मनिष्ठ पितियानें । पुत्राते ब्रह्म - साक्षात्कार करून । पदार्थमात्रिं अद्वैतज्ञान । केलें अखंड अविनाशि ॥२९॥
तैसे सिष्या येक ब्रह्म जाणतां । आणिक जाणनें नुरेचि तत्वतां । जैसे येक कनक अनुभवासि येतां । अळंकार आले सर्वहि ॥३०॥ नामरूपामात्र घडे मोडे । परि ब्रह्म तैसेचि लोणकडे । आसो अणीक तुतें उघडें । सांगतों तें ऐक पा ॥३१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP