मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी|

आत्मबोध टीका - श्लोक ४६

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


तत्वस्वरूपानुभवादुत्पन्नं ज्ञानमंजसा ॥
अहं ममेति चाज्ञानं बाधते दिग्भ्रमादिवत् ॥४६॥

कोण्ही येक पुरुष निसि माझारि । उठोनि मार्गक्रमणाकरि । पुर्वेस जाणियाचा हेतु अंतरि । धरोनिया चालिला ॥२५॥
अंधार पडला असता बहुत । तव मार्ग चुकला अकस्मात । तया योगे तो असे भ्रमत । अष्ट दिसेप्रति पै ॥२६॥
नकळे कोणति दिशा कोण । पश्चम उत्तम पूर्व दक्षण । हे काहि नणोनिया आपण । पश्चमेसिं चालिला ॥२७॥
बहुत क्रमिले मार्गाप्रति । तव अकस्मात उगवला गभस्ति । मग तो विचारोनिं पाहे चित्ति । तव मार्ग दिसे पश्चमेचा ॥२८॥
या परि तो चित्ति समजोन । येक योजन मागति फिरून । पुर्व दिशा वास्तविक समजोन । तया मार्गें पै गेला ॥२९॥
तयापरि गा तुजलागुन । अज्ञान काळुखे अति दारुण । त्या योगे माझे मिपण । उप्तन्न जाले सत्पुत्रा ॥३०॥
मी देहे आणि हा माझा पुत्र । माझे ग्रह आणि माझे कलत्र । हे आप्त सोइरे माझे मित्र । वस्त्रपात्रादि देह माझे ॥३१॥
स्वस्वरूप अज्ञाने करुन । मी माझे जाले दिशाभ्रमण । तव अकस्मात गुरु कृपेकरुन । ज्ञानरूप भानु उदेला ॥३२॥
तेणे मी माझेपणाचे दिशाभ्रमण । जावोनिया समूळ अज्ञान । स्वस्वरूप चिदानंदघन । होवोनिया ठेलासि ॥३३॥
अगा भ्रमेकरून सर्वहि । आत्माचि जगद्रुपे मानिला पाहि । परि हे जग जालेचि नाहि । आत्माचि असे सर्वस्वे ॥३४॥
जैसा रज्जुचिया ठाइ । सर्प कधींच जाला नाहि । परंतु अज्ञाने करोनिया पाहि । भाविला वृथा ॥३५॥
असो हें अपवादाचे लक्षण । तुजलागि कथिले जाण । आता अन्वयाचेही प्रकर्ण । तुजलागि सांगतो ॥३६॥
तू म्हणसि कि सर्प भान । कोठे जाले रज्जु वाचुन । तैसा आत्मा सांडोनि जगद्भान । कोठे जाले सर्वहि ॥३७॥
ते मज सांगा विवंचुन । ऐसे जरि इच्छिल तुझें मन । तरि ये विषइचे तुजलागुण । उत्तर सांगतो ऐक पा ॥३८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP