मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी| श्लोक १४ आत्मबोध प्रकाशिनी प्रारंभ: श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ श्लोक ५ श्लोक ६ व ७ श्लोक ८ श्लोक ९ व १० श्लोक ११ व १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ व १६ श्लोक १७ व १८ श्लोक १९ व २० श्लोक २१ व २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ व २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० व ३१ श्लोक ३२ व ३३ श्लोक ३४ व ३५ श्लोक ३६ व ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ व ४२ श्लोक ४३ व ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ व ४८ श्लोक ४९ व ५० श्लोक ५१ व ५२ श्लोक ५३ श्लोक ५४ व ५५ श्लोक ५६ व ५७ श्लोक ५८ श्लोक ५९ व ६० श्लोक ६१ व ६२ श्लोक ६३ श्लोक ६४ श्लोक ६५ श्लोक ६६ व ६७ श्लोक ६८ आत्मबोध टीका - श्लोक १४ वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathनिरंजन रघुनाथमराठी श्लोक १४ Translation - भाषांतर पंचकोशादियोगेन तत्तन्मय इवस्थित: ।शुद्धात्मा नीलवस्त्रादियोगेन स्फटिको यथा ॥१४॥पंचकोशादिकाचे संगतीनें । आत्मा भासे पंचकोशाप्रमाणें । जैसा स्फटिक नीलवस्त्रादीयोगेंकरून । तैसा तैसा भासतसे ॥८४॥ माघें तुज केलें कथन । देहत्रय उपाधीप्रकर्ण । त्यामाजि हे पंचकोश जाण । मिश्रीत असे सर्वहि ॥१८५॥ स्थूळ देह जो संपूर्ण । हा अन्नमय कोश असे जाण । लिंगदेहामाजि कोश तीन । सांगतों ते ऐक पां ॥८६॥प्राणमय आणि मनोमय । तिसरा जाण पां विज्ञानमय । ऐसे हे असति कोशत्रय । लिंगदेहामाझारि ॥८७॥ कारणदेहाचा माझारि । अनंदयम कोश गा निर्धारि । ऐसि हे पंच कोशाचि कुसरि । समजोनि घेइ निश्चित ॥८८॥ कोणत्या कोशाचें काय लक्षण । हें तुज नाहिं केलें निरुपण । तरि आतां त्याचें विशिदिकरण । करोनिया सांगतों ॥८९॥ अन्नापासोनि जालें रेत । त्यायोगें हा स्थूळ देह निर्मित । ह्मणोनिया अन्नमयकोश तयात । ह्मणति जाण निश्चित ॥१९०॥ प्राणमय ह्मणजे पंचप्राण । आणि तयाचे पंच उपप्राण । कर्मेंद्रियपंचक मिळोन । प्राणमय कोश बोलिजे ॥९१॥ मनोमय कोशाचें ऐक चिन्ह । ज्ञानेंद्रिय पंचक आणि मन । संकल्पविकल्पादि गूण । जयाचे ठाइं आसति ॥९२॥ विज्ञानमय कोश ते बुद्धि । निश्चयात्मिका जयेचि प्रसिद्धि । जीचा आश्रययोगें चिदाब्धि । जीवतरंगत्व पावला ॥९३॥ ते बुद्धि अज्ञानीं लीन होतां । सर्व इंद्रियांसि होय उपरमता । कांहीं येक संसारदु:ख नसतां । अनंदमय कोश तोचि पै ॥९४॥ ऐसे हे पंचकोश आसति जाण । आत्मा तयाचा योगेंकरुन । सुखि दु:खि कर्तृत्वपणें । दिसे आज्ञानि जनातें ॥१९५॥ जैसा नील पीत वस्त्रासंनिध । ठेविला आसतां स्फटिकमणि शुद्ध । तैसा तैसा भासे विविध । वस्त्राचियासारिखा ॥१९६॥ तेंचि शोधोनिया पाहतां । नसे स्फटिक - वस्त्राचि ऐक्यता । तैसा आत्मा विचारें शोधितां । नसे पंचकोशत्वें ॥९७॥ ऐसें ऐकोनि श्रीगुरुचें वचन । शिष्य बोलता जाहला म्लानवदनें । म्हणे कैसा घ्यावा निवडोन । आत्मा पंचकोशांतील ॥९८॥ जैसे कर्नाट देशींचे तांदुळ । अध तांदूळ अर्धे हारळ । निवडोनि घेउं जातां निर्मळ । न होतिच सर्वथा ॥९९॥ चाळणि घेउनि चाळुं जाता । दोहिहि रिचवति तत्वता । मागति भरोनिया घेतां । येति होता दोन्हि हि ॥२००॥ तैसा आत्मा आणि अनात्मा मिश्रित । सांडितां घेतां होतो घात । तरि कैसे करावेंजी निश्चित । स्वामिराया या प्रति ॥२०१॥ मग श्रीगुरु म्हणतिरे लेकुरा । ऐकोनि घेइ युक्तिचा उत्तरा । शुद्धआत्मा शोधोनिया बरा । घेइ विचारें करोनि ॥२॥ N/A References : N/A Last Updated : November 21, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP