मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी| श्लोक १५ व १६ आत्मबोध प्रकाशिनी प्रारंभ: श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ श्लोक ५ श्लोक ६ व ७ श्लोक ८ श्लोक ९ व १० श्लोक ११ व १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ व १६ श्लोक १७ व १८ श्लोक १९ व २० श्लोक २१ व २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ व २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० व ३१ श्लोक ३२ व ३३ श्लोक ३४ व ३५ श्लोक ३६ व ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ व ४२ श्लोक ४३ व ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ व ४८ श्लोक ४९ व ५० श्लोक ५१ व ५२ श्लोक ५३ श्लोक ५४ व ५५ श्लोक ५६ व ५७ श्लोक ५८ श्लोक ५९ व ६० श्लोक ६१ व ६२ श्लोक ६३ श्लोक ६४ श्लोक ६५ श्लोक ६६ व ६७ श्लोक ६८ आत्मबोध टीका - श्लोक १५ व १६ वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathनिरंजन रघुनाथमराठी श्लोक १५ व १६ Translation - भाषांतर वपुस्तुषादिभि: कोशैर्युक्तं युक्त्यावघातत: ।आत्मानमंतरं शुद्धं विविच्यात्तंडुलं यथा ॥१५॥आत्मा आसतां पंचकोशातीत । परि भासतो पंचकोशिं अवृत्त । तरि विचारें करोनि निश्चित । करि निरास देहाचा ॥३॥ जैसा तूं घटपटातें पाहासि । त्यापरि स्थूल देहातें जाणसि । तुजहूनि वेगळा तयासि । आत्मा कैसा म्हणावा ॥४॥ तैसाचि तूं लिंगदेहा लागुन । हे माझे इंद्रिय प्राण बुद्धिमन । जाणसि स्थूळ देहा समान । आपणांहूनि वेगळे ॥५॥ मी कांहिंच जाणत नाहिं । ऐसें अनुभविसि सुषुप्ति ठाइं । तेव्हां त्या नेणन्याहूनिया पाहि । वेगळाचि तूं आससि ॥६॥ यापरि विचारें विवंचुन । काढावा निजात्मा शोधुन । जड अनात्मिया लागुन । जाणोनिया त्यागावें ॥७॥ जैसा कांडणार युक्तिवंत । उखळांत घालोनिया साळिभात । प्रथम काढि टर्फलातें । वर्हिल मोठ्या कोंड्यातें ॥८॥ मागति घालोनिया उखळिं । काढि तयाचि तांबडि खोळि । पुन्ह: पुन्हा घेवोनि चोळि । शुभ्र निर्मळ व्हावया ॥९॥ तैसा आत्मा विचारें करून । युक्तिनें पंचकोशांतील शोधुन । जाणावा स्पष्ट वेगळेपणें । सच्चिदानंदस्वरूपत्वें ॥१०॥सदा सर्वगतोप्यात्मानसर्वत्रावभासते ।बुद्धावेवावभासेत स्वच्छेषु प्रतिबिंबवत् ॥१६॥म्हणसि सर्वगत आत्मा आसतां । मानव देहिंच कां विशेषता । तरि ये विषईचें उत्तर आतां । ऐकुनि घेइ निश्चित ॥११॥ सर्वगत आत्मा निश्चयेंसि । संदेह नाहिं या वचनासि । स्थावर जंगमादि व्यक्तिसि । व्यापोनि असे सर्वदा ॥१२॥ परि अत्यंत जड स्थावर योनि । बुद्धिउदय नसे तये स्थानिं । लिंगदेहे लीन असे कारणिं । म्हणोनि मूढता ते स्थळिं ॥१३॥ जंगमाचिया हृद्देसिं । स्पष्टत्व असे लिंग देहासि । ह्मणोनि आत्मा प्रत्ययासि । बुद्धियोगें येतसे ॥१४॥ तया जंगमाचिया माझारि । योनि आसति नानापरि । त्यांमाजि मानव देहा अंतरिं । विशेष बुद्धि - प्रकाश ॥१५॥ त्या मनुष्य योनिमाजि जाण । जो साधन शतुष्टयसंपन्न । तया हृदइं गुरुकृपें करुन । विशेषतर आत्मा प्रगटतो ॥१६॥ जैसें मनिं घृत अदर्श तोयांत । तैल आदिकरुनि स्वच्छ द्रव्यातं । सूर्यादि प्रतिबिंबें निश्चित । दिसताति स्पष्टत्वें ॥१७॥ तेचि सूर्यच्छाया पृथ्विवरि पडे । परी न दिसे सूर्य प्रतिबिंबरूपडें । तें स्वच्छ द्रव्याचेनि योगें रोकडें । प्रतितिलागिं येतसे ॥१८॥तैसा आत्मा सर्वगत तरि आहे । परि बुद्धिचा संग जरि लाहे । तरीच प्रतीतीस येताहे । प्राणिमात्राचा शरीरिं ॥१९॥ तंव सिष्य बोले प्रश्नोत्तर । जी माझे मनिं ऐसा असे निर्धार । कीं आत्माच करितो व्यापार । बुद्धिमाजि प्रकटोनि ॥२०॥ हें सत्य किं मिथ्या निवडून । सांगावें जि मजलागुन । ऐसें ऐकोनीया वचन । आचार्य जाले बोलते ॥२१॥ N/A References : N/A Last Updated : November 21, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP