मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी| श्लोक ३ आत्मबोध प्रकाशिनी प्रारंभ: श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ श्लोक ५ श्लोक ६ व ७ श्लोक ८ श्लोक ९ व १० श्लोक ११ व १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ व १६ श्लोक १७ व १८ श्लोक १९ व २० श्लोक २१ व २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ व २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० व ३१ श्लोक ३२ व ३३ श्लोक ३४ व ३५ श्लोक ३६ व ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ व ४२ श्लोक ४३ व ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ व ४८ श्लोक ४९ व ५० श्लोक ५१ व ५२ श्लोक ५३ श्लोक ५४ व ५५ श्लोक ५६ व ५७ श्लोक ५८ श्लोक ५९ व ६० श्लोक ६१ व ६२ श्लोक ६३ श्लोक ६४ श्लोक ६५ श्लोक ६६ व ६७ श्लोक ६८ आत्मबोध टीका - श्लोक ३ वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathनिरंजन रघुनाथमराठी श्लोक ३ Translation - भाषांतर अविरोधितया कर्म नाविद्यां विनिवर्तयेत् ।विद्याविद्यां निहंत्येव तेजस्तिमिरसंघंवंतं ॥३॥टीका :- नवज्वर येतां रोगिया अंगिं । दुग्ध पाजिली तयालागि । रोग न जातां लागवेगिं । मृत्युगृहासि जाय तो ॥५३॥ किं कामिलागि कामशास्त्र । किं भ्रमिलियालागि मोइनास्त्र । तैसें अज्ञाननाशनि कर्मशास्त्र । उपेगा लागि नयेचि ॥५४॥ अग्नि लागला गृहासि । वरति प्रोक्षणें तैलासि । कर्में करुनिया आज्ञानसि नाश तैसा नोव्हेचि ॥५५॥ कर्म सानकूळ अज्ञानासि । म्हणोनि अज्ञान न नासे तयासि । येथें पाहिजे विनाशासि । विरोधि भाव निश्चित ॥५६॥ जैसें ज्वरितासि कटु वोषध । किं भ्रमिष्टालागि पंचाक्षरि प्रसिद्ध । कीं कामिकालागि वैराग्य विषद । निश्चयेंसी पाहिजे ॥५७॥ जळ पाहिजे अग्निनाशासि । किं प्रकाश पाहिजे तमनिरासि । तैसें समूळ अज्ञान नासावयासि । विद्याचि येथें पाहिजे ॥५८॥ तंव सिष्य म्हणे वो स्वामिकृपाळा । प्रतिशरीरिं आत्मा वेगळा । अवच्छिन्न दिसे माझिया डोळा । त्यासी मुक्ति कैसि संभवे ॥५९॥ येके देहिं आत्मा मुक्ता आणि येके देहिं बद्ध निश्चित । हे मज वाटे संशययुक्त । महाराजा श्रीगुरु ॥६०॥ मी सर्वस्वें शरणागत । दास स्वामींचा अंकित । कृपा करोनि माझें चित्त । संशयरहित करावें ॥६१॥ मग श्रीगुरु होउनिया प्रसन्न । करोनि सिष्यातें सु - ईक्षण । म्हणति होवोनि सावधान । वचन आतां परियेसि ॥६२॥ N/A References : N/A Last Updated : November 21, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP