मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी|

आत्मबोध टीका - श्लोक १

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


तपोभि: क्षीणपापानां शांतानां वीतरागिणाम् ॥
मुमुक्षूणामपेक्ष्योय मात्मबोधोविधीयते ॥१॥   

टीका :-
करोनि सात्वीक तप आनुष्ठान । पातकें क्षीण जालिं तिहीं करून । शांतींवैराग्य मुमुक्षुत्वपण । असेच अतोचि अधिकारी ॥२१॥ येरासि नोव्हे अधिकार । सांगतां वृथा जाति उत्तर । पर्वतिं जालिया अपार । मेघवृष्टि जापरि ॥२२॥
या करितां अधिकारि श्रोता । उत्तमचि पाहिजे प्रमाता । जैसे सुक्षेत्रीं बीज पेरितां । तात्काळचि उगवे ॥२३॥
आतां तया अधिकारियाचें लक्षण । करोनि सांगतों विशिदिकरण । अर्थान्वय जेणें करून । श्रोतियासि कळों ये ॥२४॥
तप ह्मणजे स्ववर्णाश्रमें करून । नित्य नैमित्यक आनुष्ठान । नित्य संध्या वंदनादि जाण । नैमित्यक कृछ्र चांद्रायणादि ॥२५॥ काम्यकर्माचा करोनि त्याग । निसिद्धाचा मोडोनि मार्ग । करणें जें कां कर्म सुभग । यया नामें सात्वीक तप ॥२६॥
नानापरि  चिंता खेद विस्मय । ऐसे जे का अंत:करणांत्यील अशय । हे सर्वस्वें पावले क्षय । यया नाभें शांति पै ॥२७॥
येथील स्रगचंदनादि भोग । स्वर्गिं आमृतपान देवांगनासंग । ये विषइं जों करणें त्याग । या नामें वैराग्य बोलिजे ॥२८॥
येक्या मोक्षाचिया वांचून । दुजें न चिंति जयाचें मन । या नामें ममुक्षुत्वपण । सत्य जाणा श्रोते हो ॥२९॥
ऐसा जो कां सदाचारि । तोचि येथें अधिकारि । ऐसि आचार्यवाणि सुंदरि । वदति जालि स्पष्टत्वें ॥३०॥
तंव सिष्य तपस्वि पुण्यसीळ । वैराग्य सेवोनिया निर्मळ । मोक्षालागि अती विव्हळ । होवोनि जाला बोलता ॥३१॥
जीजि स्वामि कृपामूर्ति । ऐसें वाटतें माझिया चित्तिं । तें निवेदितों श्रीचरणाप्रति । श्रवण केलें पाहिजे ॥३२॥
मी करित आलों सत्कर्मातें । तेणेंचि  मोक्ष होईल मातें । कीं आणिक उपाय मोक्षातें । आसे काय स्वामिया ॥३३॥  
मग कृपासिंधुसि येउनि भरतें । जाले स्पष्टोत्तरा देते । ऐकें सत्सिष्या हे मी तूंतें । निश्चयेसि सांगतों ॥३४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP