मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी|

आत्मबोध प्रकाशिनी - प्रारंभ:

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


॥ अथ आत्मबोध - प्रकाशिनी - प्रारंभ: ॥

श्रीगुरुदत्तात्रेयायनम: ॥ श्रीगुरुरघुनाथाय नम: । श्रीगणेशायनम: ॥
ॐ नमोजि श्रीगुरुनाथा । परात्पर स्वामी अवधूता । त्रैलोक्यभरि तुझि सत्ता । वर्ते एकपणेंसि ॥१॥
तुं येकचि आसतां अनेक । होउनि ह्मणविसी जगन्नायक । परंतु येकपणाचि तुक । तुटों न देसि सर्वथा ॥२॥
जगदाकाराचि सोंड । लांबउनि म्हणविसि वक्रतुंड । लीला दाखवोनि उदंड । आलिप्तत्वें राहासि ॥३॥
अंगींच दाखविसि माया । जैसि शरीरप्रभावें छाया । सेखिं अद्वैतपणही वाया । जावों न देसि सर्वथा ॥४॥
इच्छामात्रें जीव आणि ईश्वर । अपुणचि होउनि द्विप्रकार । सेव्यसेवकत्व लोकाचार । वाढविसि निजशक्ति ॥५॥
तुझिया अंशमात्रें करून । जीव कोटि - निविष्टपण । मागुं पातलों वरदान । ग्रंथ सिद्ध व्हावया ॥६॥
तुम्हि म्हणाल मी निर्गुण । कैचें मागसी तुं वरदान । निष्क्रियातें क्रियत्वपण । लाउं नये किं सर्वथा ॥७॥
तरि तुमचेंचि स्पष्टोत्तर । भगवत् गीतेमाजि परिकर । तेंचि स्मरुनी वारंवार । तया अधारें विनवितों ॥८॥

श्लोक - ‘ यदा यदाहि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानम् सृजाम्यहम् ॥१॥

’ होवोनि धर्माचि ग्लानि । जालिया अधर्माचि उभारणि । तेव्हां मी आपणातें निर्मोनि । धर्मालागि स्थापितों ॥९॥
आत्मविद्या हा मुख्य धर्म । स्थापावया अतीसंभ्रमें । प्रगटवोनिया निजवर्म । अविद्या अधर्म नासितो ॥१०॥
यया करितां मी युगायुगिं । होवोनि सर्वज्ञ महायोगि । भक्तजन संरक्षावया लागि । नाना अवतार धरितसे ॥११॥
कृतायुगीं जाले श्रीदत्तात्रय । त्रेतायुगिं वसिष्ठ मुनिवर्य । द्वापारिं बुद्धिप्रतापवीर्य । व्यास आपण जाहाले ॥१२॥
कलयुग हा चवथा प्रहर । जाला शंकराचार्य अवतार । तया पाठिं श्रीरघुविर । जनस्थानिं प्रगटाले ॥१३॥
जे शांतीचे मुख्य कोंभ । जे ब्रह्मांडीचे धैर्यस्तंभ । मूर्तिमंत ब्रह्मचि स्वयंभ । जगदोधारा प्रगटले ॥१४॥
जयाचिया वचनें करून । हारलें माझें जन्ममरण । दिधलें पद निरंजन । अखंडित निवासा ॥१५॥
ऐसि चतुर्युगाचे ठाइं । धर्म संस्थापना केली पाहि । ह्मणोनि स्वामीचिया पाइं । विनंति करितों आदरें ॥१६॥
आचार्य वाणी अतिप्रसिद्ध । ग्रंथानाम आत्मबोध । प्राकृत जनासि व्हावया बोध । टीका करुं इच्छितों ॥१७॥
परि जालिया आपुलें वर अदान । करीन ग्रंथाचें निरोपण । करीन ह्मणतां लाजे मन । परि शक्ति स्वामी कृपेचि ॥१८॥
आतां श्रोते होइजे सादर । सद्भाव धरोनि अत्यादर । आचार्यवाणि परिकर । श्रवणद्वारिं सेवावी ॥१९॥
परी या आत्मबोधाचा श्रवणासि । आधिकार पाहिजे श्रोतियासि । ह्मणोनिया प्रथम श्लोक्सि । वदते जाले आचार्य ॥२०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP