मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी| श्लोक ५१ व ५२ आत्मबोध प्रकाशिनी प्रारंभ: श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ श्लोक ५ श्लोक ६ व ७ श्लोक ८ श्लोक ९ व १० श्लोक ११ व १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ व १६ श्लोक १७ व १८ श्लोक १९ व २० श्लोक २१ व २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ व २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० व ३१ श्लोक ३२ व ३३ श्लोक ३४ व ३५ श्लोक ३६ व ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ व ४२ श्लोक ४३ व ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ व ४८ श्लोक ४९ व ५० श्लोक ५१ व ५२ श्लोक ५३ श्लोक ५४ व ५५ श्लोक ५६ व ५७ श्लोक ५८ श्लोक ५९ व ६० श्लोक ६१ व ६२ श्लोक ६३ श्लोक ६४ श्लोक ६५ श्लोक ६६ व ६७ श्लोक ६८ आत्मबोध टीका - श्लोक ५१ व ५२ वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathनिरंजन रघुनाथमराठी श्लोक ५१ व ५२ Translation - भाषांतर वाह्यानित्यसुखासक्तिंहित्वामसुखनिर्वृत: ।घटस्थदीपवच्छश्वदंतरेव प्रकाशते ॥५१॥टी० - शब्दस्पर्श रूप रस गंध । हे बाह्य विषय असति पंचविध । जे इंद्रिय योगें जग अबत्ध । क्षणैक सुख सेविताति ॥६६॥ ते अनित्य जाणोनि निश्चित । जो आत्मसुखीच असे रत । जैसा दीप ठेविला असता घटांत । तो घटा अंतरि विलसतसे ॥६७॥ तैसा निजात्मसुखें करुन । जो अखंडित असे निमग्न । तो मग बाह्य विषयाचि जाण । इच्छा न करि सर्वथा ॥६८॥ तुं ह्मणसि तो काइ येक न करि । कर्मि वर्ते अन्यत्राचीये परि । अन्नवस्त्रादि करोनि सर्वत्रि । सेविता दिसे मुनिवर्य ॥६९॥ तरि येविषइं एकवचन । तो सेवित दिसे दुजालागुन । परि तो कांहींच न करि जाण । आपुलिया अनुभवें ॥७०॥उपाधिस्थोपितद्धमैर्नलिप्तो व्योमवन्मुनि: ।सर्वविन्मूढवत्तिष्ठेदसक्तो वायुवच्चरेत् ॥५२॥टी० - तो देहाचिया संगि असता । तयाचा धर्मे न लिंपे तत्वता । मी कर्ता आणि मी भोक्ता । न ह्मणेचि तो कदापि ॥७१॥ मी सुखि दु:खि आणि दुर्बळ । मी पापि आनि पुण्यसीळ । मी सदय निर्दय आणि खळ । न म्हणोचि तो सर्वथा ॥७२॥ जरा मरण क्षुत्पिपासा । भयशोकादिकाचा वळसा । हे साहि विकार तो सहसा । अपुल्याकडे न घेचि ॥७३॥ जरा मरण देहधर्म । क्षुत्पिपासा हे प्राणाचे कर्म । भय शोकादिक संभ्रम । मनाचाचि असे पै ॥७४॥ ऐसें जाणोनिया अंतरि । तो प्रारब्धाचा क्षय करि । साक्षित्वें नभाचिया परि । अलिप्त सर्वां अचरणि ॥७५॥ असोनि सर्ववित् सर्वज्ञ । लोकासि दिसे जैसा मूढ अज्ञ । कोण्हीच जयाते न म्हणे तज्ञ । ऐसा राहे साधारण ॥७६॥ यथासांग कर्मेंही करि । परि तो करोनि अकर्ता निजनिर्धारि । ब्रह्मचर्यादि अश्रम चार्हि । लिलामात्रें वर्ततसे ॥७७॥ आतां फार सांगु काइ । तो सर्व करोनि अकार्ता पाहि । लिप्त नसे कोण्हेहि ठाइ । वायुपरि तो मुनिवर्य ॥७८॥ तंव सिष्य ह्मणे जि गुरुराजा । आपण जे सांगितले वोजा । परि यथेष्टाचरणियाचे काजा । येउ पाहाति हे वचनें ॥७९॥ यथेष्टाचरणि ह्मणे मी अकर्ता । काहि भय नसे मज पाप कर्ता । ऐसे वदोनि दुष्ट कर्में अचरता । होय अत्यादरेसि ॥८०॥ तो पेउ नये तेचि करि पान । खाउ नये ते चि करि भक्षण । अचरु नये तेचि अचरण । करी अत्यादरेसि ॥८१॥ ह्मणवोनि आपणाप्रति मुक्त । स्नान संध्यादि कर्मे समस्त । टाकोनि उगाचि किडे स्वस्थ । पशुचीया सारिखा ॥८२॥ दुष्ट कर्मां लागि करिता । ह्मणे मी याचा साक्षि अकर्ता । कर्तृत्व सर्व देहाचा माथा । नसे मजकडे काहिही ॥८३॥ ऐसा जो का यथेष्टाचरणि । तो हे वचन साह्य करोनि । उगेचि पाषांड वाढवील जनि । स्वामिराया मज वाटे ॥८४॥ सद्गुरू ह्मणति तू ऐसा न ह्मणे । तो ज्ञानीच नोव्हे ऐसा जाणे । आरे ज्ञानियाप्रति यथेष्टाचरणें । कैसी संभवति सांग पा ॥८५॥ जन्मजन्मांतरि सदाचरण । करिता जाले तत्वज्ञान मग कैचे करील यथेष्टाचरण । पुर्वाभ्यासा वाचोनि ॥८६॥ जैसा रणकंदना माझारि । योद्धा असीलता घेवोनि करि । तो युद्ध करिता भोमीवर्हि । मस्तक पडिले परशस्त्रे ॥८७॥ अंगि होता वीरस्त्रिचा वारा । तेणे कबंध धावे सैरावैरा । मग काय तेव्हां सांडोनि प्रथम शस्त्रा । घेइल नुतन शस्त्राते ॥८८॥ किंव्हा कुल्लाळाचे घरिचें चक्र । फिरत होते सव्याकार । ते मडके उतरिलिया वर्हि न फिरे । अपसव्ये करोनि ॥८९॥ किव्हा हतचा पाहुनि सुटला बाण । तो पुर्वेचे वेधोनि विंदान । जैसा पुर्वेसीच करि गमन । पश्चमेसि न फिरता ॥९०॥ तैसा तो मननसीळ मुनि । सत्कर्में जाला ब्रह्मज्ञानि । मग तैसाचि वोघ सदाचरणि । चाले त्याचा सेवटवर्हि ॥९१॥ पहिले सांडावें सदाचरण । नवे करावे असदाचरण । इतुका तरि खटाटोप कोण । करि तया योगियाचा ॥९२॥ तस्मात् जाते वास्तवीक नाहि ज्ञान । तोचि करि यथेष्टाचरण । हेचि त्याचि बोळखण ।निश्चयेसि जाण पा ॥९३॥ संमत् वासिष्ठ ॥ श्लो० ॥ - सांसरिकसुखासक्तो ब्रह्मास्मीतिच वादिन: । कर्म ब्रह्मोभयं भ्रष्टं तंत्यजेदंत्यजं यथा ॥१॥ संसार सुखाचे ठाइ रत । आणि मी ब्रह्म ऐसे उचारित । कर्म ब्रह्म उभइ अंचवत । तो अंतेजवत त्यजावा ॥९४॥ संमतगीता ॥ श्लो० ॥ - येहिसंस्पर्शजाभोगा दु:खयोनय एवते । आद्यतवंत: कौंतेय न तेषु रमते बुध: ॥१॥ ऐसि भगवद्वाणि निश्चित । ज्ञानि विषयाचे ठाइ नसे रमत । दु:खरूप जाणोनि अंतवंत । सांडि विषया लागुनि ॥९५॥ N/A References : N/A Last Updated : November 22, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP