मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी| श्लोक ९ व १० आत्मबोध प्रकाशिनी प्रारंभ: श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ श्लोक ५ श्लोक ६ व ७ श्लोक ८ श्लोक ९ व १० श्लोक ११ व १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ व १६ श्लोक १७ व १८ श्लोक १९ व २० श्लोक २१ व २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ व २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० व ३१ श्लोक ३२ व ३३ श्लोक ३४ व ३५ श्लोक ३६ व ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ व ४२ श्लोक ४३ व ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ व ४८ श्लोक ४९ व ५० श्लोक ५१ व ५२ श्लोक ५३ श्लोक ५४ व ५५ श्लोक ५६ व ५७ श्लोक ५८ श्लोक ५९ व ६० श्लोक ६१ व ६२ श्लोक ६३ श्लोक ६४ श्लोक ६५ श्लोक ६६ व ६७ श्लोक ६८ आत्मबोध टीका - श्लोक ९ व १० वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathनिरंजन रघुनाथमराठी श्लोक ९ व १० Translation - भाषांतर यथाकाशो हृषीकेशो नानोपाधिगतोविभु: ।तद्भेदाद्भिन्नवद्भाति तन्नशे केवलो भवेत् ॥९॥जैसे उपाधिरहित आकाश । सर्वगत विभू आणि अविनाश । तया परि हा इंद्रियाचा ईश । हृषीकेश अविनाशत्वें ॥१०७॥ घटमठादि उपाधी करून । येकचि आकाश भिन्नभिन्न । परि उपाधि नाश पावतां संपूर्ण । येकचि गगन सर्वहि ॥१०८॥ तैसा आत्मा एकचि असतां । उपाधियोगें अनेकता । दिसे परंतु विचारें पाहातां । अनेकत्व नसे आत्मयातें ॥१०९॥ विचारद्रिष्टीनें पाहतां । अद्वय ब्रह्म अनुभवासी येतां । मग देहद्वय उपाधि तत्वता । नाश पावे तत्क्षणिं ॥११०॥नानोपाधिवशादेव जातिवर्णाश्रमादय: ।आत्मन्यारोपितास्तोयरसवरेणादिभेदवत् ॥१०॥नाना उपाधि योगेंकरून । आत्मनि आरोपित जाति अश्रमवर्ण । ब्राह्मण क्षत्रि आणि वैश्य जाण । शुद्र आदिकरोनि ॥११॥ ब्रह्मचारी आणि ग्रहस्थ । त्रितीय अश्रम वानप्रस्त । चतुर्थ अश्रम सन्यस्थ । सिखा सुत्र त्यागेसी ॥१२॥ गौ मानव गज तुरंगम । नाना जाति उत्तम मध्यम । भूचरें जळचरें व्यहंगम । आदि करोनि सर्वहि ॥१३॥ अपार जातींचे तरूवर । मर्गजादि पाषाण गिरिवर । ऐसा हा जातिवर्णादिक प्रकार । उपाधियोगें जाहाला ॥१४॥ येर्हविं ब्रह्म निर्मळ निरामय । अनाम अवर्ण अनाश्रम होय । परी अज्ञान उपाधियोगें समुदाय । नामादिकांचा जाहाला ॥१५॥ जैसें शुद्ध निर्मळ तोय । तें संगें करोनि विकारि होय । जा जा उपाधिमाजि जाय । तैसें तैसें भासतसे ॥११६॥ मिरचीसेंव होय तिखट । चिंचेसवें होय अंबट । निंबासवें होय कडुवट । अवळ्याचेनि तुरट पैं ॥१७॥ निळीसवें होय काळें । पिवळिसवें होय पिवळें । हिरवें होय जंगाळें । अरक्त हिंगूळप्रभावें पै ॥१८॥ ऐसें येकउदक सर्व संगति । उपाधि योगें पावे विकृति । परंतु वास्तवीक जळधर्मस्थिति । निर्मळद्रवत्व शैत्यत्व पै ॥१९॥ तंव सिष्य म्हणे जि गुरूमोर्ति । ऐकोनि घ्यावि मम विज्ञाप्ति । विचारितों जें पायाप्रति । सांगोनि द्यावें सर्व तें ॥१२०॥ आत्मयाचें काय लक्षण । आणि अरोपो अला कोठुन । उभयतांचें स्पष्ट विवरण । मजलागि सांगावें ॥२१॥ पहिले वदलाति आत्माचि सारा । मागति सांगतां भेदपसारा । आत्मा येक अरोप दुसरा । उपाधि योगें जाहला ॥२२॥ तरी या बोलसि माझें मन । होतसे स्वामि अंदोलायमान । मी अरोप किंव्हा अधिष्ठान । हें मज कांहिं नेणवे ॥२३॥ अधिष्ठान जरी मि म्हणावें । तरी तें तों मज नसे ठावें । दृश्य अरोपासेअए अंगिकारावें । तरि तें मिथ्या म्हणतसां ॥२४॥ मी कोण हें मजसि नेणवे । या भवसिंधूसि कैसें तरावें । हें मज दासातें निरोपावें । स्वामीराया कृपाळा ॥२५॥ विषय सुखावरि घालिता झडा । तेणें दु:खा होतसे वरपडा । जैसा अन्यगायीचा लघु पाडा । दुसरीस पेउं घातला ॥२६॥ तेणें स्वमायेतें नोळखतां । दुसर्या गाइचा बैसती लाता । तैसा आत्मा नेणोनि विषय संघाता । सेवोनि दु:ख पावतो ॥२७॥ मागे तुम्हि निरोपिले । जैसें सुवर्णाचिं कटककुंडलें । तैसे आत्म्याहुनि जग वहिलें । वेगळे नसे सर्वथा ॥२८॥ ऐसें ऐकोनि माझें चित्त । बहुत जालें अनंदयुक्त । कीं हे दृश्यचि आत्मा निश्चित । दिसे भासे सर्व जो ॥२९॥ मागति म्हणतां हें दृश्य अरोपित । आणि आत्मा आहे याविरहीत । हें ऐकोनि माझें चित्त । खेदयुक्त होतसे ॥३०॥ हें दृश्यचि मात्र मजला दिसे । आत्मा कधींहि ठाउक नसे । येथें माझा तरि अन्याय असे । काय स्वामिदयाळा ॥३१॥ करोनि श्रीगुरूनें हास्यवदन । मग बोलते जाले मृदूवचन । अरे हा अनादि अज्ञानप्रवाह जाण । आला असे येथवरि ॥३२॥ अतां त्याचि अज्ञानातें घेउन । करितों तूतें उपपादन । जैसें लोहशस्त्रातें घेउन । लोहश्रंखळा तोडावि ॥३३॥ तेसा स्वरूपिं अध्यारोप करुन । मग सांगेन अपवाद लक्षण । जेंणें करून आत्मखुण । ठाऊकि पडे तुजलागि ॥३४॥ अध्यारोप म्हणजे अरूप करणें । अपराधावीण अपराध लावणें । कीं वंध्यासुताचे वाखाणनें । विवाहादीक संभ्रमें ॥३५॥ अपवाद म्हणजे निवारण । आरोपाचे जे जे गुण । जैसे बंधेचे वंध्यत्वपण । कळतां नाहिं सतति ॥३६॥ तैसीया परि गा सिष्यवर्य । स्वरूपिं अरोपुनिया माया । सेखिं विचारें करूनि विलया । नेउनि तूतें दाखवितों ॥३७॥ पहिला सांगेन आध्यारोप । मायाचि जयाचें स्वरूप । जेणें करूनि अज्ञानताप । खवळे तुझा अधिकसा ॥३८॥ जैसा विद्य रोगियासि । कुपथ्य देउनि प्रथम दिवसिं । रोग आणोनि उद्भवासि । मग वोषधासि योजितसे ॥३९॥ किं अंगिं असतां पिशाच्च दुष्ट । पंचाक्षरी बोलवि घडघडाट । मग मारोनि मंत्राचि चपेट । दूर करि तयातें ॥४०॥ तैसें स्वरुपीं अध्यारोपालागुन । करुनि दाखवितों पहिल्यानें । सवेंचि अपवादाचें लक्षण । सांगोनि अज्ञान नासितों ॥४१॥ पहिलें शुद्ध स्वरूप असतां । तेथें स्फुरण जालें गा तत्वता । अहं ऐसी आत्मसत्ता । स्फुरति जालि ॥४२॥ तयेचे नांव मूळ माया ॥ चिद्ववर्त ह्मणविजे तया । जैसें गगनिं अभ्रउदया पावतें जालें अकस्मात् ॥४३॥ किं सूर्यरस्मिचिया ठायीं । मृगजळ अकस्मात भासलें पाहि । तैसें आत्मस्वरुपिं नसतां कांहीं । माया विवर्त भासला ॥४४॥ ते माया द्विप्रकारचि जाण । विद्या अविद्या नामें करून । विद्यावच्छिन्न जें चैतन्य । ते ईश्वर रुपें जाहालें ॥४५॥ त्या ईश्वर चैतन्याचे अंशभूत । जे अविद्यावच्छिन्न जालें निश्चित । तें जीवनामें विख्यात । होते जाले ॥४६॥ त्या मायावच्छिन्न इश्वरातें वहिली । श्रिष्टि करावी हें इच्छा जालि । तेव्हां महत्तत्व हें नांव पावलि । तेचि माया ॥४७॥ महत्तत्वा पासोनि अहंकार । होता जाला त्रिप्रकार । सत्व रज तम परिकर । ती गूणक्षोभिणि माया पैं ॥४८॥ सत्व अहंकार ते ज्ञानशक्ति । राजस अहंकार ते क्रियाशक्ति । तामस अहंकरा ते द्रव्यशक्ति । होति जालि अनुक्रमें ॥४९॥ सत्व अहंकार ज्ञान शक्ति पासून । जाहालें पंचविध अंत:करण । रजो अहंकार शक्ति पासून । इंद्रिय संपुर्ण जाहाले ॥५०॥ तामस अहंकार शक्ती पासून । जन्म जाला आकाशा लागून । तया आकाशा पासून पवन । होता जाला निश्चयीं ॥५१॥ वायू पासोनि जाला अग्नि । अग्निपासुन जालें पाणि । जळा पासोनि मेदिनि । होती जालि गंधरुपि ॥५२॥ ऐसें हे जाए पंचभुते । तें अत:करण इंद्रिया समेत । पंचवीस तत्वें येकवटोनि समस्त । पंचमहाभूते जाहालि ॥५३॥ N/A References : N/A Last Updated : November 21, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP