मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|आत्मबोध प्रकाशिनी| श्लोक १३ आत्मबोध प्रकाशिनी प्रारंभ: श्लोक १ श्लोक २ श्लोक ३ श्लोक ४ श्लोक ५ श्लोक ६ व ७ श्लोक ८ श्लोक ९ व १० श्लोक ११ व १२ श्लोक १३ श्लोक १४ श्लोक १५ व १६ श्लोक १७ व १८ श्लोक १९ व २० श्लोक २१ व २२ श्लोक २३ श्लोक २४ श्लोक २५ व २६ श्लोक २७ श्लोक २८ श्लोक २९ श्लोक ३० व ३१ श्लोक ३२ व ३३ श्लोक ३४ व ३५ श्लोक ३६ व ३७ श्लोक ३८ श्लोक ३९ श्लोक ४० श्लोक ४१ व ४२ श्लोक ४३ व ४४ श्लोक ४५ श्लोक ४६ श्लोक ४७ व ४८ श्लोक ४९ व ५० श्लोक ५१ व ५२ श्लोक ५३ श्लोक ५४ व ५५ श्लोक ५६ व ५७ श्लोक ५८ श्लोक ५९ व ६० श्लोक ६१ व ६२ श्लोक ६३ श्लोक ६४ श्लोक ६५ श्लोक ६६ व ६७ श्लोक ६८ आत्मबोध टीका - श्लोक १३ वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathनिरंजन रघुनाथमराठी श्लोक १३ Translation - भाषांतर अनाद्यविद्या निर्वाच्या कारणोपाधिरुच्यते ।उपाधित्रितयादन्य मात्मानमवधारयेत् ॥१३॥अनादि अविद्या अनिर्वचनीय । हे देहद्वयाचि कारण होय । विचारें पाहातां न सांपडे सोय । अविचारें होय भ्रमकर्त्रि ॥७०॥ अविद्या कधिं जालि उत्पन्न । हें कांहींच नसे प्रमाण । म्हणोनिया अनादित्वपण । इज लागीं असे पैं ॥७१॥ तूं जरि म्हणसि कांहिं ऐसें । कीं येक्या आत्मयातेंचि अनादित्व असे । तयावीण तनादित्व नसे । आणिकातें सर्वथा ॥७२॥ जरि अविद्या अनादि म्हणावि । तरि आत्मयाबरोबरि गणावि । मग द्वैतापत्ति अघवि । होउं पाहे सेवटिवर्हि ॥७३॥ तरि तूं न म्हणे गा ऐसें । आत्मयातें आदिअंत नसे । आणि अविद्येतें अंत असे । तत्वज्ञानें करुनि ॥७४॥ मिथ्या म्हणावी तरि वेड लावि । सत्य म्हणावि तरि नासे अघवि । म्हणोनि सद ना असद हे देवि । अनिर्वचनीय असे पैं ॥१७५॥ या अविद्येचे लक्षणें दोन । येक विक्षेप येक अवरण । विक्षेप म्हणजे घटपटायमान । दृश्य जात सर्वहि ॥७६॥ अवरण म्हणजे मी कोण । जें तूं पुससि मज लागुन । हेंचि अवरणरूपलक्षण । अविद्येचें जाण तुं ॥७७॥ अध्यारोपाचा प्रकार । येथवरि जाला गा परिकर । पुढें अपवादाचाहि विस्तार । बोलेन तूंतें निश्चइं ॥७८॥ परि उद्भवलें असे जें अज्ञान । त्याचें व्हावया लागि निरसन । सांगतों शुद्ध आत्मलक्षण । व्यतिरेक मात्रें करोनि ॥७९॥ व्यतिरेक म्हणजे अनात्म्याहून । आत्माचि जाणावा वेगळेपण । जैसा कोंडा सांडोनिया कण । निवडोनि घ्यावा सुयुक्ति ॥१८०॥ येथवरि श्रिष्टिचि उत्पत्ति । तूंते सागीतलिया निगुति । ते अनात्मिका जाण निश्चिति । आत्मलक्षण तें ऐक आतां ॥८१॥ स्थूल सूक्ष्म आणि कारण । ऐसी हे उपाधित्रय जाण । जे सांगितलि विवंचून । सार्धद्वयश्लोकेसि ॥८२॥ तया त्रयदेहाहुनि अन्य । आत्मा असे शुद्ध विलक्षण । ऐसा निश्चयेसि जाण । विचारयोगें सत्सिष्या ॥८३॥ N/A References : N/A Last Updated : November 21, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP