मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय ४८ वा

पांडवप्रताप - अध्याय ४८ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ कर्णपर्वऐकतां कर्णीं ॥ कर्णतृप्त होती तेचिक्षणीं ॥ ज्याची कीर्तिवर्णिती व्या करणी ॥ व्यास वैशंपायनादिक ॥१॥
सावधान उर्वीपती ॥ तुझिया पूर्व जांची अगाध कीर्ती ॥ कर्ण आणि सुभद्रा पती ॥ रणांगणीं उभे तेव्हां ॥२॥
तों समसप्तकीं मिळोन ॥ पाचारिला वीर अर्जुन ॥ कृष्णवर्त्मा जाळी कानन ॥ संहारीत उठे तैसा ॥३॥
जैसा सघन ॥ वर्षे घन ॥ तैसे पार्थ सोडी मार्गण ॥ अपार शिरें छेदून ॥ राशी पाडिल्या समरांगणीं ॥४॥
सम सप्तक टाकिती शर ॥ अपार छेदी पार्थ वीर ॥ इकडे धर्मा वरी सूर्य पत्र ॥ बाण वर्षत धांवत ॥५॥
अचूक धर्माचें संधान ॥ विजे ऐसे सोडी बाण ॥ परी सकल वीरांचीं कवचें पूर्ण ॥ छेदी कर्ण समरां गणीं ॥६॥
रणतूर्यें वाजती अपार ॥ प्रलय हांक देती असुर ॥ जैसा मध्यान्हींचा भास्कर ॥ कर्ण वीर दिसे तैसा ॥७॥
न्याहाळितां कर्णाचें वदन ॥ पाहूं न शकतीं भयें करून ॥ धृष्टद्युम्नाचें सैन्य ॥ अपार कर्णें पाडिलें ॥८॥
देशोदेशींचे राजे जाणा ॥ शरीं खिळिल्या त्यांच्या पृतना ॥ तों सुषेण वृषसेन त्या क्षणा ॥ पुत्र कर्णाचे धांवले ॥९॥
पितया देखतां दोघां जणीं ॥ ख्याति केली रणांगणीं ॥ संहारिली बहुत वाहिनी ॥ तटस्थ नयनीं वीर पाहती ॥१०॥
तों कर्णाचा तृतीय पुत्र ॥ ज्याचें नाम भानुदेव पवित्र ॥ तेंणें सप्त बाणीं वृकोदर ॥ भेदिला तेव्हां समरांगणीं ॥११॥
भीमें टाकूनि निर्वाणशर ॥ उडविलें भानुदेवाचें शिर ॥ मग वृकोदरें ॥ अपार ॥ कौरवसेना पाडिली ॥१२॥
कृत वर्मा आणि शारद्वत ॥ दोघे धांवले रणपंडित ॥ नकुल सहदेवांवरी बाण वर्षत ॥ सुषेष रागें ऊठला ॥१३॥
बाण सोडूनि बहुत ॥ तेणें खिळिले माद्री सुत ॥ तों सात्य कीनें छेदूनि रथ ॥ केला विरथ सुषेण तो ॥१४॥
शरीं मूर्च्छित पाडिला धरणीं ॥ मग दुःशासनें नेला रथीं घालूनी ॥ इकडे द्रौपदीच्या पंच नंदनीं ॥ ख्याति केली कर्णा पुढें ॥१५॥
टाकूनि बाण पांच शत ॥ समरीं भेदिला सूर्य सुत ॥ शत बाणीं धर्म नृपनाथ ॥ भेदिता जाहला कर्णातें ॥१६॥
त्र्यहात्तर बाण टाकून ॥ भेदिता जाहला धृष्टद्युम्न ॥ ऐशीं बाणीं दारुणा ॥ सात्यकीवीरें भेदिला ॥१७॥
शत शत बाणीं तितुके वीर ॥ कर्णें केले समरीं जर्जर ॥ हस्तला घव केलें थोर ॥ सूर्यपुत्रें तेधवां ॥१८॥
कर्णाचा थोर प्रताप ॥ घातला बाणांचा मंडप ॥ तीनशें रथी करूनि प्रताप ॥ तरणिसुतें संहारिले ॥१९॥
धर्म राज जर्जर ते क्षणीं ॥ कर्णें केला समरांगणीं ॥ तेव्हां सर्व वीर मिळोनी ॥ रक्षिते जाहले धर्मासी ॥२०॥
कर्णाचें हस्तला घव थोर ॥ कोणासी हालवूं नेदी कर ॥ शस्त्रां सहित सत्वर ॥ भुजा उडवी तेधवां ॥२१॥
दहा बाण टाकून ॥ धर्में भेदिला ह्र्दयीं कर्ण ॥ मग बोले तयासी वचन ॥ ऐकें दुर्जना राधेया ॥२२॥
पार्थाशीं झुंजेन समरीं ॥ ऐसीं हांव धरितोसी अंतरीं ॥ कनक कांसें समसरी ॥ कैसें पावेल सांग पां ॥२३॥
रात्रि आणि दिवस ॥ वैनतेय आणि वायस ॥ श्रृगाल आणि सिंहास ॥ सरी कैसी होईल पैं ॥२४॥
सुधनिक आणि दरिद्र ॥ रावण आणि राम चंद्र ॥ तैसा कर्ण आणि सुभद्रावर ॥ समान कैसे होतील पैं ॥२५॥
आनकदुंदुभि ह्रदय रत्न ॥ पद्मज जनक पद्माक्षी जीवन ॥ तो सारथी ज्याचा जगन्मोहन ॥ त्याशीं स्पर्धा करिसी तूं ॥२६॥
ऐशा रीतीं धर्म बोलोन ॥ काळदंडा ऐसे सोडी बाण ॥ जर्जर केला मित्र नंदन ॥ चाप बाण गळाले ॥२७॥
विकल पडिला वीर कर्ण ॥ धर्म उगाचि न सोडी बाण ॥ कौरव दळ संपूर्ण ॥ हडबडिलें ते काळीं ॥२८॥
पांडवदळीं आनंद परम ॥ वर्णिती धर्माचा पराक्रम ॥ तंव तो कर्ण वीरोत्तम ॥ सावध जाहला तेधवां ॥२९॥
प्रलयीं खवळे कृतान्त ॥ तैसा राधेय बाण वर्षत ॥ एकषष्टि बाणीं कुंती सुत ॥ समरीं ताडिला पराक्रमें ॥३०॥
सवेंचि सोडूनि तीक्ष्ण बाण ॥ छेदिलें धर्माचें सायकासन ॥ युधिष्ठिरें शक्ति तीक्ष्ण ॥ सोडिली तेव्हां कर्णावरी ॥३१॥
गभस्तिसुतें सप्त बाणीं ॥ शक्ति छेदूनि पाडिली धरणीं ॥ चार तोमर ते क्षणीं ॥ धर्में टाकिले कर्णावरी ॥३२॥
ह्रदयीं एक दुजा शिरीं ॥ दोन बैसले दोहों भुजां वरी ॥ सवेंचि तो वीर भास्करी ॥ उसणें घेता जाहला ॥३३॥
दिव्य शर सोडूनि ते काळीं ॥ धर्माचा मुकुट पाडिला तळीं ॥ तेव्हां एकचि हांक गाजली ॥ धर्म मारिला म्हणू नियां ॥३४॥
छेदिला ध्वज मारिला सूत ॥ तिल प्राय केला धर्म रथ ॥ धर्म आणिके रथीं बैसत ॥ परतो नि जात तेधवां ॥३५॥
धर्में पाठी दिली जाणोन ॥ वायु वेगें धांवला कर्ण ॥ धर्मासी आडवा येऊन ॥ रथाशीं रथ झगट विला ॥३६॥
आपुलिया रथा वरून ॥ धर्थ रथीं चढला कर्ण ॥ दोन्ही भुजा आकर्षून ॥ धर्माच्या तेव्हां धरियेल्या ॥३७॥
तों धांवला शल्य वीर ॥ म्हणे कर्णा ऐकें विचार ॥ छत्रपति जो नृपवर ॥ त्यासी सर्वथा धरूं नये ॥३८॥
तों आठवलें कुंतीचें वचन ॥ एक वेगळा करूनि अर्जुन ॥ चौघांचे रक्षावे प्राण ॥ समरांगणीं सांपडल्या ॥३९॥
कर्ण म्हणे धर्मा लागून ॥ तुवां करावे महायज्ञ ॥ किंवा करावें वेदाध्ययन ॥ अनुष्ठान अतिनेमें ॥४०॥
आपुला प्रताप पुरुषार्थ ॥ कोणाशीं करूं नको व्यर्थ ॥ तुज मीं सोडिलें आजि जीवंत ॥ जाईं शिबिरा त्वरेनें ॥४१॥
त्रूटि न वाजे इतुक्यांत ॥ कर्ण प्रवेशला निजदळांत ॥ धर्म राज परम लज्जित ॥ आज्ञा पीत निजवीरां ॥४२॥
म्हणे सर्वही वीर मिळोन ॥ रणीं आजि मारा कर्ण ॥ तों द्रौपदीचे पंच नंदन ॥ वर्षत बाण ऊठले ॥४३॥
दळा सहित द्रौपदीचा बंधू ॥ धांवला वेगें प्रताप सिंधू ॥ कर्णाचा इच्छूनि वधू ॥ विराट दळें धांवती ॥४४॥
दोन्ही मिसळलीं रणीं ॥ वीरां होत झोड धरणी ॥ कंदुका ऐसीं गगनीं ॥ शिरें तेधवां उसळती ॥४५॥
आकांत मांडला दोन्ही दळीं ॥ कोल्हाळ न समाये गगन मंडळीं ॥ उर्वीतळ डळमळी ॥ ग्रीवा डोलवी भोगींद्र ॥४६॥
प्रति शब्द उठे निराळीं ॥ ऐसी भीमें हांक गाज विली ॥ विद्युल्लते ऐसा ते वेळीं ॥ कौरव दळीं प्रवेशला ॥४७॥
कुंजर ताडी कुंजरें ॥ रहंवर ताडी गदा प्रहारें ॥ तुरंग पळतां धांवोनि त्वरें ॥ चरणीं धरूनि आपटीत ॥४८॥
तों शल्यासी म्हणे कर्ण ॥ भीमाकडे चालवीं स्यंदन  ॥ इकडे स्ववीरांसी भीम सेन ॥ म्हणे रक्षा धर्म आतां ॥४९॥
धर्म राजा ऐसें निधान ॥ नेत होता धरूनि कर्ण ॥ आतां तरी जपून ॥ धर्म राज रक्षावा ॥५०॥
शल्य म्हणे कर्णा लागून ॥ आजि काळ रूप दिसे भीमसेन ॥ किंवा पेटला प्रलय कृशान ॥ वीर कानन जाळील तो ॥५१॥
अनिवार भीमाचार मार ॥  येणें कीचक मारिले समग्र ॥ तैसे हिडिंब बक किर्मीर ॥ आपटू नियां मारिले ॥५२॥
कर्णें सोडूनि शत बाण ॥ वक्षःस्थलीं ताडिला भीमसेन ॥ येरें शत बाणीं नंदन ॥ तरणीचा तेव्हां ताडिला ॥५३॥
सवेंचि सोडूनि एक बाण ॥ तोडिलें हातींचें सायकासन ॥ मूर्च्छना येऊनि कर्ण ॥ ध्वज स्तंभीं टेंकला ॥५४॥
पांडव दळीं जय जय कार ॥ कौरव दळ उठावलें समग्र ॥ त्यांत विवत्स धार्म राष्ट्र ॥ भीमें रणीं संहारिला ॥५५॥
सवेंचि पराक्रमें वृकोदरें ॥ छेदिलीं पांच कौरवांचीं शिरें ॥ हें देखोनियां अर्कपुत्रें ॥ केलें धांवणें तेधवां ॥५६॥
कर्णानें एक शत बाणी ॥ भीम भेदिला समरां गणीं ॥ शत चूर्ण स्यंदन करूनी ॥ क्षणमात्रें टाकिला ॥५७॥
गदा घायें वृकोदर ॥ कर्णाचा रथ करी चूर ॥ सात शतें कुंजर ॥ संहारिले कौरवांचें ॥५८॥
पांच शतें महारथी ॥ भीमें मारिले रणपंथीं ॥ समरीं वीर न ठरती ॥ भार पळती कौरवांचे ॥५९॥
दहा सहस्त्र महावीर ॥ अश्वांसहित केला संहार ॥ पाय दळ शत सह्स्त्र ॥ संहारिलें तेधवां ॥६०॥
सहा सहस्त्र सेना तत्त्वतां ॥ शकुनीची पाठविली मृत्यु पंथा ॥ यमदंष्ट्रवर्धिनी पाहतां ॥ रक्तनिम्नगा चालिली ॥६१॥
समसप्तकांशीं फाल्गुन ॥ तिकडे युद्ध करी निर्वाण ॥ तंव ते दांडगे अवघे जण ॥ रथ वेढिती पार्थाचा ॥६२॥
नाना शस्त्रांचे मार ॥ करिती तेव्हां अनिवार ॥ मग हनुमंतें पुच्छ थोर ॥ पसरो नियां बांधिले ॥६३॥
समसप्तकांचे भार ते क्षणीं ॥ बांधोनि कपि फिरवी गगनीं ॥ मग आपटिले धरणीं ॥ मृद्धटवत चूर्ण होती ॥६४॥
एकाचे मोडिले चरण ॥ एकाचे तोडिले नासिका कर्ण ॥ एकाच्या ग्रीवा पिळून ॥ गगनपंथें भिरकावी ॥६५॥
अनिवार देखोनि पुच्छमार ॥ दशदिशां पळती ते वीर ॥ तों पुढें पुच्छ शेषाकार ॥ आडवें येत तिकडूनी ॥६६॥
एक उडती गगनीं ॥ तों पुच्छ येई वळतें वरूनी ॥ लपतां गिरिकंदरीं जाऊनी ॥ पुच्छ येऊनि मारीत ॥६७॥
तों पार्थें घातलें सर्पास्त्र ॥ नागपाशें बांधिले समग्र ॥ रथ टाकूनियां पळती वीर ॥ हाहाकार जाहला ॥६८॥
तों तिकडूनि सुशर्मा महावीर ॥ तेणें सोडिलें सुपर्णास्त्र ॥ सर्प पळाले समग्र ॥ देखोनि नरवीर कोपला ॥६९॥
जैसा प्रदीप्त ज्वालामाली ॥ तैसा किरीटी दिसे ते काळीं ॥ दहा सहस्त्र वीर बळी ॥ शिरें छेदूनि पाडिले ॥७०॥
चवदा सहस्त्र रथीं ॥ रणीं पाडी सुभद्रा पती ॥ तीन सहस्त्र हस्ती ॥ विदारूनि पाडिले ॥७१॥
इकडे द्रुपद पुत्र सुकेत ॥ कृपाचार्याशीं युद्ध करीत ॥ तंव महावीर शारद्वत ॥ असंख्यात शर सोडी ॥७२॥
अर्धचंद्र मुख सोडी शर ॥ छेदिलें सुकेताचें शिर ॥ परमप्रताप गौतमपुत्र ॥ रणपंडित निपुण तो ॥७३॥
इकडे दुर्यो धन धृष्टद्युम्न ॥ युद्ध करिती निकरें करून ॥ परस्परें भेदूनि बाण ॥ मय़ूरा ऐसे दिसती पैं ॥७४॥
दुर्यो धनाचा स्यंदन ॥ धृष्टद्युम्नें केला चूर्ण ॥ चरणींच पळे दुर्यो धन ॥ पांडवदळ हांसतसे ॥७५॥
तों दुर्यो धन बंधु दंडधार ॥ तेणें आपुलिया रथीं सत्वर ॥ बैसवूनि दुर्यो धन नृपवर ॥ नेला अन्यत्र तेधवां ॥७६॥
उणें देखोनि सूर्य सुत ॥ कोपला जैसा प्रलय कृतान्त ॥ बाण धारीं अमित ॥ पांडवसेना संहारिली ॥७७॥
विद्युल्लता पडे धरणीवरी ॥ तैसे बाण खोंचती शरीरीं ॥ पांडवदळ ते अवसरीं ॥ पळों लागलें दशदिशां ॥७८॥
धर्म आला कर्णा समोर ॥ सोडीत सहस्त्रांचे सहस्त्र शर ॥ परी तोही कर्णें जर्जर ॥ करू नियां परा भविला ॥७९॥
सोडूनि ते क्षणीं ॥ कोस एक टाकूनि मेदिनी ॥ कर्ण भयें जाऊनी ॥ धर्म राज स्थिरावला ॥८०॥
कर्ण नव्हे हा प्रलयाग्न ॥ जाळिलें पांडवदळ कानन ॥ तें दुर्यो धनें देखोन ॥ गौरवीत कर्णातें ॥८१॥
म्हणे वीरा ये समयीं ॥ तुझा मी उतराई होऊं कायी ॥ पांडव मारिल्या सर्वही ॥ हें राज्य तुझेंचि असे ॥८२॥
दुर्यो धनाशी शपथ ॥ बोलता जाहला आचार्य सुत ॥ धृष्टद्युम्नें माझा तात ॥ असतां ध्यानस्थ मारिला ॥८३॥
हेंचि आतां प्रतिज्ञावचन ॥ धृष्टद्युम्नासी मारिल्या विण ॥ अंगींचें कवच जाण ॥ न काढीं मी यावरी ॥८४॥
हें जरी न करवे माझेन ॥ तरी ब्रह्म हत्या गोहनन ॥ मातापिता गुरुवध जाण ॥ हें पाप माझे मस्तकीं ॥८५॥
पार्थ म्हणे श्रीकर धरा ॥ सतेजर विकरवरांबरा ॥ तिकडे कर्णें जग दुद्धरा ॥ प्रलय केला वाटतें ॥८६॥
अहो ते गरुड जावळीचे तुरंग ॥ श्रीरंगें धांवडिले सवेग ॥ अंजनी ह्रदया रविंद भृंग ॥ गगन गाजवी भुभुःकारें ॥८७॥
दिव्य रथ कनकमंडित ॥ ध्वज झळके गगन चुंबित ॥ मनोवेगें आला पार्थ ॥ तों धर्म तेथें दिसेना ॥८८॥
समस्तांचे ध्वज रथ सतेज ॥ परी कोठें न दिसे धर्म राज ॥ बंधूकारणें तो तेजःपुंज ॥ परम घाबरा जाहला ॥८९॥
मग शिबिरा प्रति धांवोन ॥ येते जाहले कृष्णा र्जुन ॥ तों तेथें धर्म राज देखोन ॥ परम संतोष पावले ॥९०॥
कर्णें त्रासिला युधिष्ठिर ॥ तेणें त्याचें संतप्त शरीर ॥ उभय कृष्ण देखोनि उत्तर ॥ बोलता जाहला तेधवां ॥९१॥
म्हणे हे पार्था सुगुणा ॥ मम ह्रदया नंदव र्धना ॥ मारू नियां दुष्ट कर्णा ॥ आलासी काय सांग तूं ॥९२॥
हे श्रीरंगा यादवेंद्रा ॥ मम ह्र्दया रविंद भ्रमरा ॥ रुक्मिणी चित्त पंकजर विकरा ॥ कर्ण मारिला कीं नाहीं ॥९३॥
मज तेणें जर्जर केलें रणीं ॥ मुकुट फोडूनि पाडिला धरणीं ॥ तो तुम्हीं कर्ण मारिला रणीं ॥ तेणें करूनि मी संतोषें ॥९४॥
कर्ण नव्हे तो केवळ कृतान्त ॥ पराक्रमें जेवीं पुरुहूत ॥ तेजें प्रत्यक्ष आदित्य ॥ कीं वैवस्वत दूसरा ॥९५॥
भार्गव किंवा भूमिजा रमण ॥ तैसा रणपंडित परम प्रवीण ॥ जो आम्हांसी मानी तृणासमान ॥ मारिला कैसा सांग तो ॥९६॥
तुम्ही षंढतिळ म्हणोन ॥ बोलिला जो आम्हां वचन ॥ तो तुम्हीं आजि वधिला कर्ण ॥ थोर केला पुरुषार्थ ॥९७॥
मग अर्जुन बोले वचन ॥ समसप्तकांसी संहारून ॥ सैन्यांत आलों धांवोन ॥ तों स्यंदन तुझा दिसेना ॥९८॥
पहावया तव मुख चंद्र ॥ माझे नेत्र जाहले चकोर ॥ कर्णें आजि प्रलय थोर ॥ रणांगणीं केला असे ॥९९॥
सात शत रथी भले ॥ कर्णें आमुचे रणीं मारिले ॥ आतां आज्ञा देईं ये वेळे ॥ जाऊनि मारीन कर्णातें ॥१००॥
धर्म बोले दुःखे करून ॥ अजूनि वांचला आहे कर्ण ॥ माझें ह्रदय जळतसे पूर्ण ॥ वर्षें घन पार्था तूं ॥१०१॥
मज लागली चिंताव्याधी ॥ तूं देईं सत्वर औषधी ॥ अरे हा कर्ण परम दुर्बुद्धी ॥ द्रौपदीस येणें गांजिलें ॥१०२॥
द्रौपदी ऐसें थोर निधान ॥ गांजिलें येणें सभेंत नेऊन ॥ तुझें प्रतिज्ञा वचन ॥ गेलें जळोन मज वाटे ॥१०३॥
वृथा शिणविली माता पृथा ॥ तुझी विद्या गेली सर्व वृथा ॥ तुझें सामर्थ्य पार्था ॥ कोणें नेलें हिरूनी ॥१०४॥
आम्हांसी कैंचे राज विलास ॥ आमुचे कपाळीं वनवास ॥ गांडीव देईं श्रीकृष्णास ॥ तूं सारथी होईं आतां ॥१०५॥
धिक्‍ तूणीर धिक्‍ गांडीव शर ॥ धिक्‍ ध्वज धिक्‍ रहंवर ॥ गांडीवनिंदा ऐकतां सुभद्रावर ॥ प्रलयाग्नी ऐसा क्षोभला ॥१०६॥
शस्त्र घेऊनि झडकरी ॥ धर्मावरी धांवली ते अवसरीं ॥ श्रीरंग धांवूनियां आवरी ॥ ह्रदयीं धरी पार्थातें ॥१०७॥
जो पंडुनृपसमान धर्म राज ॥ जो सोमवंश विजय ध्वज ॥ जो तपस्व्यां माजी तेजःपुंज ॥ सागर पूर्ण सत्याचा ॥१०८॥
जो दयाका शींचा रोहिणी पती ॥ जो सत्यवचनी केवळ गभस्ती ॥ जो क्षमेचा निश्चिती ॥ कनकाचलचि केवळ ॥१०९॥
अजातशत्रु समानस्थिती ॥ त्याचा वध इच्छिसी चित्तीं ॥ ब्रह्मांड भरी अपकीर्ती ॥ तुझी होईल जाण पां ॥११०॥
मरीचिजलवत संसार ॥ यांत जे सद्विवेकी नर ॥ सत्कीर्ति ठेवूनि अपार ॥ पावती परत्र सुकृती ते ॥१११॥
पार्थ म्हणे गांडीव दे सत्वर ॥ ऐसें केवीं बोलिला युधिष्टिर ॥ हा शब्द ऐकतांचि शिर ॥ तयाचें म्यां छेदावें ॥११२॥
माझा नेम तरी ऐसा ॥ आतां बुद्धि सांग तूं कमलेशा ॥ ब्रह्मा नंदा ह्रषीकेशा ॥ तुझी आज्ञा प्रमाण ॥११३॥
यावरी बोले जग न्मोहन ॥ वडिलांसी शब्द बोलतां कठिण ॥ तरी वधाहूनि श्रेष्ठ पूर्ण ॥ विद्वज्जन बोलती ॥११४॥
ऐसें बोलतां श्रीरंग ॥ पार्थासी प्राप्त जाहला अनुराग ॥ मग श्रीकृष्णें तो कृष्ण सवेग ॥ धर्मरायासी भेट विला ॥११५॥
अजात शत्रूचे चरण ॥ साष्टांगें नमीत अर्जुन ॥ आपुला अपराध आठवून ॥ उकसाबुकसीं स्फुंदतसे ॥११६॥
पार्थ तेव्हां बोले सद्नद ॥ जळो जळो हा पापी क्रोध ॥ क्रोध नव्हें हा प्रमाद ॥ केला होता आजि म्यां ॥११७॥
क्रोधें उत्पन्न होय आधी ॥ क्रोधेंचि प्रकटती महाव्याधी ॥ परम सज्ञान जो सुबुद्धी ॥ क्रोधें होय तृण वत ॥११८॥
परम सद्विवेकी पंडित ॥ क्रोधें होय पिशाचवत ॥ भूत संचार निश्चित ॥ क्रोधचि ऐसें जाणावें ॥११९॥
असो युधिष्ठिरें उचलून ॥ ह्र्दयीं आलिंगिला अर्जुन ॥ म्हणे विजया विजयी होईं पूर्ण ॥ कर्णाप्रति वधूनियां ॥१२०॥
धर्म म्हणे जी वनमाळी ॥ तूं आमुची काम धेनु माउली ॥ आपुलें वत्स साभाळीं ॥ वेळोवेळीं काय सांगों ॥१२१॥
मग बोले बैकुंठनाथ ॥ आजि कर्णासी वधील पार्थ ॥ संदेह न धरावा मनांत ॥ पाहें तेथें येऊ नियां ॥१२२॥
पार्थ म्हणे ते अवसरीं ॥ जरी आजि कर्णासी न वधीन समरीं ॥ तरी मातेचे उदरीं ॥ व्यर्थ जन्मा मी आलों ॥१२३॥
हें जरी नव्हे यथार्थ ॥ तरी कृष्ण दास्य गेलें व्यर्थ ॥ सोमवंशा लागीं सत्य ॥ डागचि मग लागला ॥१२४॥
जरी आजि न वधीन कर्ण ॥ तरी मातापिता गुरु हनन ॥ माझिया माथां तें पाप पूर्ण ॥ मग वदन काय दावूं ॥१२५॥
माझी प्रतिज्ञा समस्त ॥ सिद्धीस नेईल द्वारकानाथ ॥ जय द्रथवधीं पण यथार्था ॥ कोणें केला तया विण ॥१२६॥
असो आज्ञा घेऊनि कृष्णार्जुन ॥ मनो वेगें सोडिला स्यंदन ॥ दोन्ही दळां मध्यें येऊन ॥ उभे ठाकले चपलत्वें ॥१२७॥
जैसा माध्यान्हीं आदित्य ॥ तैसा दिसे सकलां विजय रथ ॥ वाद्य घाई लागली बहुत ॥ धाकें कांपत भूगोल ॥१२८॥
वाटे मेदिनी गेली रसातळा ॥ आकाश मंडप तुटोनि पडिला ॥ शेष कूर्म ते वेळां ॥ भूभार सोडूं इच्छिती ॥१२९॥
तेथीं चिया वाद्य गजरें ॥ पावका अंगीं भरलें शहारें ॥ सप्तसमुद्रींची नीरें ॥ तप्त जाहली ते धवां ॥१३०॥
इकडे भीम कौरव भारीं ॥ संचरोनि सेना संहारी ॥ इभ पळता पायीं धरी ॥ धरेवरी आपटीत ॥१३१॥
रथावरी रथ आपटीत ॥ द्विपावरी द्विप आदळीत ॥ तुरंगही स्वारां सहित ॥ असंख्यात मारिले ॥१३२॥
मग सर्व कौरवीं मिळोन ॥ वेढिला तेव्हां भीम सेन ॥ कीं बहुत जंबुकीं जाण ॥ व्याघ्र जैसा वेढिला ॥१३३॥
मग गदाघायें भीम सेन ॥ सकल सैन्य करी चूर्ण ॥ करेंचि कुणपें उचलोन ॥ वाहिनी पाडिली अपार ॥१३४॥
लोहार्गला लंबाय मान ॥ तैसे हस्तिदंत घेतले उपडोन ॥ वीर पाडिले झोडून ॥ अशुद्धें करून डवरला ॥१३५॥
जैसा सिंदूरें घवघवीत पार्वती कुमार ॥ तैसा आरक्त दिसे वृकोदर ॥ कीं तो रणभैरव दुर्धर ॥ चवताळत चहूंकडे ॥१३६॥
शकुनीचें सर्व दळ ॥ दंतघायें झोडिलें सबळ ॥ कीं वीर साळी गदा मुसळ ॥ घेऊ नियां कांडीतसे ॥१३७॥
स्थूलदेह हा कोंडा केवळ ॥ लिंग शरीर सडिले तांदुळ ॥ उद्धरोनि जाती तत्काळ ॥ भीमहस्तें करू नियां ॥१३८॥
कीं रण मंडल हें होम कुंड ॥ द्वेषाग्नि प्रज्वलित प्रचंड ॥ कौरव बस्त उदंड ॥ आहुति माजी पडताती ॥१३९॥
द्वारावतीची कृष्ण भवानी ॥ पांडवांची हे कुल स्वामिनी ॥ ते अर्जुनाचे रथीं येऊनी ॥ कलरू पिणी बैसली ॥१४०॥
असो भीमें समरांगणीं ॥ मूर्च्छित पाडिला कपटी शकुनी ॥ तो दुर्यो धनें उचलोनी ॥ नेला घालूनि रथा वरी ॥१४१॥
कौरव दळ आटिलें भीम सेनें ॥ पांडव दळीं प्रलय केला कर्णें ॥ मग पार्थ श्रीरंगासी म्हणे ॥ रथ सत्वर धांवडीं ॥१४२॥
पार्थ चापाचा सुटला बाण ॥ त्याहूनि पुधें धांवें स्यंदन ॥ शल्य म्हणे कर्णा अर्जुन ॥ तुज लक्षून येत त्वरें ॥१४३॥
आतां आपुली विद्या सर्वही ॥ आठवीं तूं ये समयीं दुर्यो धनादि कौरवही ॥ पाठी रक्षिती कर्णाची ॥१४४॥
तों पार्थ वीरें ते क्षणीं ॥ गांडीव टणत्कारिलें रणीं ॥ तेव्हां अवघ्या लघुकिंकिणी ॥ झणत्कारल्या एकदांचि ॥१४५॥
गांडीव ओढितां सत्वरा ॥ एकसरें वाजलें करकरां ॥ तेव्हां नक्षत्रें रिचवलीं एकसरां ॥ सीमा समुद्रें ओलांडिली ॥१४६॥
प्रलय चपल ऐसा रथ ॥ दिव्य कळस वरी झळकत ॥ मुक्तजाळिया मिरवत ॥ लावण्य अद्भुत न वर्णवे ॥१४७॥
तों मागें टाकूनि मारु तगती ॥ पुढें धांवले नव्वद रथी ॥ अष्टदिशांनीं पार्था प्रती ॥ विंधिते जाहले तेधवां ॥१४८॥
पूर्ण चार घटिकां पर्यंत ॥ युद्ध जाहलें अत्यद्भुत ॥ पार्थ प्रतापी रणपंडित ॥ केला निःपात ॥ तितुक्यांचा ॥१४९॥
तों हस्ती वरी बैसवून ॥ दुर्यो धनें म्लेंच्छ तेरा जण ॥ पार्थाचे पाठी मागून ॥ पाठविले मारावया ॥१५०॥
पुढेंही वीर मारिती बाण ॥ मागूनि मारिती त्रयो दश यवन ॥ विजय धनुर्विद्येंत निपुण ॥ लघव दाखवी ऐका तें ॥१५१॥
पुढें पाहोनि करी संधान ॥ मागें न पाहतां सोडी बाण ॥ गजां सहित तेरा जण ॥ यवन वधून टाकिले ॥१५२॥
न पाहतां मारिले सर्व ॥ पाहूनि धनुर्विद्येचें लाघव ॥ तर्जनी शिर वासव ॥ डोलवूनि धन्य म्हणे ॥१५३॥
कर्णाचे पाठीशीं लवलाहें ॥ कौरव दडती पार्थ भयें ॥ दुःशासन ते वेळीं पाहें भीमावरी धांविन्नला ॥१५४॥
पांच शत सोडूनि शर ॥ विकळ पाडिला वृकोदर ॥ सारथि आणि रहंवर ॥ चूर्ण केला दुःशासनें ॥१५५॥
ह्रदय भीमाचें लक्षून ॥ आणीक सोडिले नऊ बाण ॥ मग वृकोदर साव धान ॥ होऊन शक्ति भिरकावी ॥१५६॥
ते महा शक्ति दुःशासन ॥ क्षण न लागतां टाकी तोडून ॥ यावरी धर्मा नुज गहन ॥ कर्म करिता जाहला ॥१५७॥
स्वदिरांगार धग धगित ॥ तैसे केले नयन आरक्त ॥ करकरां खाऊ नियां दांत ॥ काय बोलत तेधवां ॥१५८॥
आजि सर्व वीरां देखतां जाण ॥ तुझें वक्षःस्थल फोडून ॥ करीन मी रक्तपान ॥ तरीच नंदन पंडूचा ॥१५९॥
मग महा शक्ति ते वेळीं ॥ दुःशासनें वेगें प्रेरिली ॥ भीमें धरूनि अंतराळीं ॥ पिष्ट केली मोडूनियां ॥१६०॥
दहा लोहतोमर जाण ॥ सवेंचि प्रेरी दुःशासन ॥ ते भीमाचे ह्रदयीं येऊन ॥ आदळती वज्रप्राय ॥१६१॥
प्रलयीं क्षोभें कृतान्त ॥ तैसा भीम सेन धांवत ॥ कीं वीज पदे अकस्मात ॥ दुःशासन वरी तेवीं आला ॥१६२॥
घोडे सारथी स्यंदन ॥ गदाघायें केले चूर्ण ॥ चरणचाली दुःशासन ॥ भिडत तेव्हां भीमाशीं ॥१६३॥
अलातचक्रवत भ्रमोनी ॥ दुःशासनाचे मस्तकीं ते क्षणीं ॥ गदा घातली उचलोनी ॥ वज्र जैसें पर्वतीं ॥१६४॥
कृतांताचे मनीं बैसे दचक ॥ तैसी भीमें दिधली हांक ॥ दोन्ही दळें मूर्च्छित देख ॥ हांकेसरशीं जाहलीं ॥१६५॥
घोर मूर्च्छना येऊन ॥ भूमीवरी पडिला दुःशासन ॥ त्या चिया उरावरी गदा ठेवून ॥ उभा राहिला वृकोदर ॥१६६॥
सावध व्हावा म्हणोन ॥ वारा घाली भीम सेन ॥ तंव तेणें उघडिले नयन ॥ भीमा कडे पाहा तसे ॥१६७॥
मग त्याच्या उरावरी चरण ॥ देऊनि पुसे भीम सेन ॥ म्हणे द्रौप दीचें कच ग्रहण ॥ कोण्या हस्तें केलें तुवां ॥१६८॥
वीर गुंठी अवभृथस्नानीं ॥ बांधी स्वहस्तें पांचालनंदिनी ॥ ते तुवां हस्तीं धरोनी ॥ नेली सभेसी विटंबावया ॥१६९॥
येरू म्हणे वामहस्तें करून ॥ केलें द्रौपदीचें कच ग्रहण ॥ मग भीमें तीच भुजा धरून ॥ मुळा पासून उपडिली ॥१७०॥
तेचि भुजेनें वारंवार ॥ वक्षःस्थळीं ताडी तो दुराचार ॥ मग असिलता काढूनि सत्वर ॥ छेदी शिर तयाचें ॥१७१॥
तेथूनि नि घालें उष्ण रक्त ॥ तें भीम सेन क्रोधें प्राशीत ॥ सर्वां गासी उटी लावीत ॥ दिसे आरक्त भया नक ॥१७२॥
म्हणती हा केवळ कृतान्त ॥ मनुष्याचें रक्त प्राशीत ॥ उरलें दळ ग्रासील समस्त ॥ न उरे येथें कांहीं आतां ॥१७३॥
जैसें यागांतीं सोमपान ॥ तैसें रक्त प्राशी भीम सेन ॥ दोन्ही दळें कंपाय मान ॥ भीम सेना देखतां ॥१७४॥
भीमाचें भया नक वदन ॥ न शकती पाहूं विलोकून ॥ शस्त्रें हातींचीं सोडून ॥ वीर पळती दशदिशां ॥१७५॥
हांक फोडिती वीर सकळ ॥ म्हणती पळ रे पळा आला काळ ॥ कीं हा राक्षस सबळ ॥ घट श्रोत्र दुसरा पैं ॥१७६॥
दुःशासनाचा प्राण ॥ गेला न लागतां एक क्षणा ॥ तया प्रति भीम सेन ॥ पुनः बोलत सक्रोधें ॥१७७॥
म्हणे गौर्गौः या वचना ॥ आठवीं आतां दुःशासन ॥ षंढतिल आम्हां पांचां जणां ॥ बोलिलासी आठवीं तें ॥१७८॥
लाक्षा सदनीं लाविला अग्न ॥ कां रे विष घातलेंमज लागून ॥ घोषयात्रेचें मिष करून ॥ दरवडाघालूं आलां तुम्ही ॥१७९॥
पद्मजात जन काची भगिनी ॥ तिचीं वस्त्रें फेडिलीं सभा स्थानीं ॥ वन वास अज्ञातवास करूनी ॥ आजितुज साधिलें पां ॥१८०॥
हांक फोडूनि म्हणे भीम सेन ॥ हे पार्था हे पीतवसन ॥ आजि मी तृप्त जाहलों संपूर्ण ॥ प्रतिज्ञा सत्य जाहली ॥१८१॥
आतां दुर्यो नाचें शिर ॥ पायें मर्दीन मी साचार ॥ जैसा मुखीं ताडिजे पादोदर ॥ सबळ पाषाण घेऊनी ॥१८२॥
कीं उपानहघायें देख ॥ ताडिजे जैसा वृश्चिक ॥ तैसें सुयो धनाचें मस्तक ॥ चूर्ण करीन यावरी ॥१८३॥
हकडे धृत राष्ट्राचा नंदन ॥ ज्याचें नाम चित्र सेन ॥ सात्य कीनें त्याचा प्राण ॥ तत्क्षणींच घेतला ॥१८४॥
असो दुःशासनाचा घेतला प्राण ॥ स्यंदनारूढ जाहला भीमसेन ॥ घेऊनियां धनुष्यबाण ॥ ख्याति केली समरांगणीं ॥१८५॥
आणीक दुर्यो धन बंधु दहा जण ॥ त्यांचीं शिरें छेदिलीं न लागतां क्षण ॥ कौरवदळीं आकांत दारूण ॥ हाहाकार प्रवर्तला ॥१८६॥
कर्णा प्रति शल्य म्हणत ॥ पाहें कौरव भार पळत ॥ पहा भीमें केला पुरुषार्थ ॥ कैसा आकांत ओढवला ॥१८७॥
समरीं सोडूनियां धीर ॥ पहा हे पळताती नृपवर ॥ हा दुर्यो धन भयातुर ॥ दिसतो कैसा अवलोकीं ॥१८८॥
तुज वधूं पाहे तो पार्थ वीर ॥ कर्णा तूं धरीं बरवा धीर ॥ इकडे गदा खांदीं घेऊनि वृकोद ॥ रणरंगीं नाच तसे ॥१८९॥
द्रौपदी भवानी यथार्थ ॥ दुःशासन हा मातला बस्त ॥ तिच्या उद्देशें मारूनि स्वस्थ ॥ मन केलें तियेचें ॥१९०॥
गदा हाचि पोत पाजळून ॥ दुःशासनरक्त तैल घालून ॥ दिवटा जाहला भीम सेन ॥ गोंधळ घाली रणमंडपीं ॥१९१॥
कर्ण पुत्र वृषे सन ॥ धांवला वेगें वर्षत बाण ॥ सहस्त्र बाणीं अर्जुन ॥ भेदिला तेणें तेधवां ॥१९२॥
पार्थासी म्हणे तमालनीळ ॥ पहा युद्ध करितो कर्णाचा बाळ ॥ शरजाळीं पांडवदळ ॥ झांकिलें तेणें प्रतापें ॥१९३॥
तो प्रतापी कर्ण नंदन ॥ श्रीकृष्णा वरी द्वादश बाण ॥ सप्त बाणीं भीम सेन ॥ भेदिला तेव्हां समरांगणीं ॥१९४॥
नकुला वरी बाण दश ॥ सहदेवारी टाकिले वीस ॥ धन्य बाळयोद्धा राजस ॥ दोन्ही दळें मानवती ॥१९५॥
असो पार्थें सोडूनि दिव्य शर ॥ छेदिलें कर्ण पुत्राचें शिर ॥ कौरव दळीं हाहाकार ॥ दुःख अपार न सांगवे ॥१९६॥
ऐसें देखोनि कर्ण वीर ॥ कोपला जैसा प्रलय रुद्र ॥ पार्था वरी सोडीत शर ॥ चपले ऐसा धांवला ॥१९७॥
रुक्मिणी ह्रदया ञमिलिंद ॥ म्हणे पार्था होईं सावध ॥ महाप्रलयीं पेटे जातवेद ॥ कर्ण तैसा दिसतसे ॥१९८॥
पहा कर्णाच्या भयें करूनी ॥ पळे पांचाळ विराट वाहिनी ॥ कर्णा पुढें समरां गणीं ॥ काळ धीर धरीना ॥१९९॥
तरी तूं महावीर रणपंडित ॥ तुझी विद्या जे कां अद्भुत ॥ ते सतेज आहे कीं समस्त ॥ इंद्रशिवद्त्त जे कां पैं ॥२००॥
यावरी बोले सुभद्रा वर ॥ दारु कयंत्रीसूत्र धार ॥ त्याचे आधीन बाहुलीं समग्र ॥ यादवेंद्रा तैसा तूं ॥२०१॥
कमला यतना कमललोचना ॥ कमलनाथा कमलशायना ॥ कमलप्रिया कमलवदना ॥ कर्ता कारण सर्व तूंचि ॥२०२॥
त्रैलोक्य नगरांर भस्तंभा ॥ या विश्वाची तूचि शोभा ॥ मन्मथ जनका ॥ रुक्मिणी वल्लभा ॥ ब्रह्मा नंदा जग द्नुरो ॥२०३॥
पांडवकैवारिया मधु सुदना ॥ तुझें राज्य तुझीं सेना ॥ परा जय जगन्मोहना ॥ तुझी रचना सांभाळीं तूं ॥२०४॥
मी एक योद्धा रणपंडित ॥ ऐसें जेव्हां धरीन मनांत ॥ तेव्हां तूं आम्हांसी कैंचा प्राप्त ॥ श्रीराब्धिजा ह्रदय विलासा ॥२०५॥
वैसंपायन म्हणे जन मेजया ॥ फाल्गुनें ऐसें बोलू नियां ॥ गांडी वचाप ओढो नियां ॥ टणत्कारिलें समरांगणीं ॥२०६॥
ये प्रसंगीं कर्णासी मुक्ती ॥ कृष्णा र्जुनांसी जय प्राप्ती ॥ तें सादर परिसावें श्रोतीं ॥ सावधान होऊ नियां ॥२०७॥
ब्रह्मा नंदा जग दुद्धारा ॥ श्रीपांडुरंग नगर विहारा ॥ पांडवपालका श्रीधरवरा ॥ अत्युदारा जग द्नुरो ॥२०८॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ कर्ण पर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ अठ्ठेचाळिसाव्यांत कथियेला ॥२०९॥
इति श्री श्रीधरकृतपांडवप्रतापेकर्णपर्वणिदुःशासनवधोनाम अष्टचत्वारिंशाध्यायः ॥४८॥

॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP