मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय १५ वा

पांडवप्रताप - अध्याय १५ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्री गणेशाय नमः ॥ जय जय जगद्नुरो ब्रह्मा नंदा ॥ पांडुरंगा पुंडलीकवरदा ॥ विद्वज्जनह्रत्पद्ममिलिंदा ॥ आनंदकंदा जगत्पते ॥१॥
निकट भीमातट विहारा ॥ आदिपुरुषा दिगंबरा ॥ सनक ॥ सनंदनचित्तपंक जकीरा ॥ निर्विकारा निर्द्वंद्वा ॥२॥
आनंद कंदा अध्वरपालका ॥ अनंतवेषा ॥ आर्तिना शका ॥ अनदिसिद्धा सुखदायका ॥ स्वगवरकेतना हृषीकेशा ॥३॥
मन्मथजनका मनोहरा ॥ सौख्यसिंधो नीलगात्रा ॥ सुहास्यवदना शतपत्रनेत्रा विचित्र लीला दावीं तूं ॥४॥
गोपीमान सराजहंसा ॥ स्वानंदक्षीर सागर विलासा ॥ पूतनाप्राण शोषका अविनाशा ॥ वर्णितां शेषा अगम्य ॥५॥
कंसचाणूर प्राणहरणा ॥ मंदरोद्धारका गोवर्धनोद्धारणा ॥ कर्ममोचका कालिया मर्दना ॥ पांडवपालका पंढरीशा ॥६॥
दशावतारचरित्र चालका ॥ योगिमानसाल्हादकारका ॥ तुझी लीला विश्वव्यापका ॥ बोलवीं कथा येथूनी ॥७॥
पांडवप्रताप ग्रंथ सुरस ॥ सभापर्व बोलिला ब्यास ॥ सूत्रधार तूं ह्रषीकेश ॥ कथा सुरस चालवीं ॥८॥
मागें संपलें अदिपर्व ॥ पुढें सभापर्व अति अपूर्व ॥ चातुर्याचा अभिनव ॥ जलार्णव भरला हा ॥९॥
नवरसांचें भांडार ॥ रणशूर आणि नृपवर ॥ त्यांत वीररस अपार ॥ असंभाव्य येथें असे ॥१०॥
जे पंडित वेदविदुष ॥ त्यांसी वेदींचाचि सारांश ॥ समाधिसुख परमहंस ॥ श्रवणें भोगिती येथेंचि ॥११॥
भक्तांसी दाटे प्रेमरस ॥ विलासियांसी श्रृंगार सुरस ॥ युक्तिवंतांसी बुद्धि विशेष ॥ येथें प्रकटे श्रवणेंचि ॥१२॥
भक्त मुमुक्षु साधक संत ॥ यांसी विश्रांति येथें अद्भुत ॥ एवं नवही रस समस्त ॥ विराजती येथेंचि ॥१३॥
व्यास भारत सुवर्ण सुंदर ॥ त्याचे प्राकृत हे अलंकार ॥ लेवोत पंडित चतुर ॥ निर्मत्सर ह्रदय ज्यांचें ॥१४॥
अक्षरप्रबंध सुधारस ॥ कर्ता स्वामी वेदव्यास ॥ लिहिणार जेथें गणेश ॥ अतिविशेष रसज्ञ हा ॥१५॥
त्यांतील सारांश साचार ॥ वटबीजवत अणुमात्र ॥ ब्रह्मानंदें श्रीधर ॥ कथासार वणींतसे ॥१६॥
भारतत्नांचा पर्वत ॥ भाग्यें देखिला परमाद्भुत ॥ नुचलवेचि समस्त ॥ पाहें तटस्थ उगाचि ॥१७॥
मग त्यांतील रत्नें वरिष्ठ ॥ उचले ऐसी बांधिली मोट ॥ ग्रंथ वाढवितां अचाट ॥ घेतील वीट पंडित पैं ॥१८॥
संकोचित बोलतां साचार ॥ हेंही न मानिती चतुर ॥ अर्थर सकथासार ॥ साहित्यरसें बोलावें ॥१९॥
शौनकादि ऋषिपंक्ति ॥ नैमिषारण्यीं एकांती ॥ सूत मुखें श्रवण करिती ॥ ब्रह्मानंदें सर्वदा ॥२०॥
तेंचि जन मेजय करी श्रवण ॥ वक्ता निपुण वैशंपायान ॥ म्हणे नृपते सावधान ॥ उघडीं कान सर्वांगाचे ॥२१॥
आदिपर्व संपतां पूर्व ॥ सांगीतले खांडववनदहन ॥ मयदैत्यासी प्राण दान ॥ देऊन सोडिला कृष्ण पार्थीं ॥२२॥
तेणें उपकारें दाटोन ॥ प्रीतीनें स्तविले कृष्णार्जुन ॥ म्हणे मी आहें विद्याप्रवीण ॥ होईन उत्तीर्ण ॥ कांहींएक ॥२३॥
तों मयासी म्हणे फाल्गुन ॥ कृष्णार्जुनी केलें प्राणदान ॥ हें सर्वांपाशीं करिसी वर्णन ॥ तृप्त इतुकेन आम्ही असों ॥२४॥
तरी सखया जाईं निज मंदिरा ॥ सुख देईं निजदारा पुत्रां ॥ स्त्रेह वाढवीं पवित्रा ॥ क्षणक्षणां भेटोनि ॥२५॥
उपभोगें काम वाढत ॥ वणवा वाढे लागतां वात ॥ शुक्लपक्षी रोहिणी कान्त ॥ कला वाढत ज्यापरी ॥२६॥
धरितां शुचित्व नेम अमूप ॥ विशेष वाढे जैसें तप ॥ सत्यमागमें वाढे रोप ॥ दयेचें जैसें सर्वदा ॥२७॥
पुण्य वाढे करितां दान ॥ पराक्रमें वाढे प्रताप पूर्ण ॥ अत्यादर धरितां अनुदिन ॥ मैत्री वाढे अपार ॥२८॥
तरी मयासुरा तूं पूर्ण मित्र ॥ करूं भाविसी उपकार ॥ तरी जें सांगेल इंदिरावर ॥ तेंचि सिद्धी पाववीं ॥२९॥
मग बोले जगन्मोहन ॥ तूं शिल्प शास्त्रीं परम प्रवीन ॥ तरी सभा एक निर्णून ॥ करीं अर्पण धर्मातें ॥३०॥
ऐसें बोलतां जगदीश्वर ॥ मयें केला नमस्कार ॥ म्हणे माझें मनींचा आदर ॥ जाणूनि आज्ञा दीधली ॥३१॥
जगन्निवासा पुरुषोत्तमा ॥ दैत्यांमाजी मी विश्वकर्मा ॥ सभा रचीन जिची सीमा ॥ त्रिभुवनांत असेना ॥३२॥
न लावितां मृत्तिकापाषाण ॥ मणिमय रचीन सभा सदन ॥ शचीवराचेंही भुले मन ॥ कीं स्वर्ग टाकून वसावें येथें ॥३३॥
ऐसी रचीन दिव्य सभा ॥ त्रिभुवनींची आणीन शोभा । इतुकी सामुग्री पद्मनाभा ॥ कोठूनि आणीन ऐका तें ॥३४॥
पूर्वीं क्षोभोनि रमाधव ॥ निर्मूल करितां दैत्य सर्व ॥ वृषपर्वा दान वराव ॥ तेणें संपत्ति लपविल्या ॥३५॥
मेरूचे उत्तरेसी अपार ॥ भरलें आहे बिंदुसरोवर ॥ पर्वत जेथें मैनाक थोर ॥ रत्नांचा पार नाहीं तेथें ॥३६॥
यक्षराक्षस घेऊनि सांगातें ॥ क्षणांत सामुग्री आणीन येथें ॥ वाहतां वर्षें शतानुशतें ॥ सामुग्री ते सरेना ॥३७॥
जेथें जांबूनदाचे तुळवट ॥ हिरियांचे खांब सदट ॥ आणिक वस्तु तेथें वरिष्ठ ॥ दोन असती आणीन त्या ॥३८॥
चूर्ण होती गिरि सकळ ॥ ऐशी गदा तेथें आहे सबळ ॥ जे कनकोदकें रेखिली विशाळ ॥ वरती दिव्य रत्नबिंदु ॥३९॥
मुष्टीमाजी धरितेठायीं ॥ अनर्घ्य रत्नें जडलीं पाहीं ॥ ते भीमासी देईन सर्वही ॥ शत्रुदलें निवटा वया ॥४०॥
शंख एक देवदत्त ॥ ज्याच्या नादें शत्रु समस्त ॥ ऐकतां होती भयभीत ॥ दुमदुमतें त्रिभुवन ॥४१॥
तो दिव्य शंख आणून ॥ पार्था प्रती देईन ॥ त्यावरी मय आज्ञा घेऊन ॥ गेला बिंदु सरोवरा ॥४२॥
मग समस्तां प्रती पुसोन ॥ द्वारकेसी चालला जगज्जीवन ॥ दिव्य स्यंदनावरी बैसोन ॥ दारुक सारथी विराजे ॥४३॥
असो इकडे मया सुर ॥ वेगें पातला बिंदु सरोवर ॥ जेथें रत्नांचे पर्वत अपार ॥ सुवर्णाचल तैसेचि ॥४४॥
जेथें कल्प वृक्षांचें वन ॥ धन रत्नराशी पडल्या पूर्ण ॥ ऋषींनीं दक्षिणा नेतां उबगोन ॥ ठायीं ठायीं टाकिल्या ॥४५॥
इंदिरे सहित श्रीधर ॥ तप तेथें आचरला थोर ॥ दिव्य सहस्त्र वर्षें दीर्घ सत्र ॥ हरीनें केलें ते ठायीं ॥४६॥
भगी रथ तेथें आचरला तप ॥ चतुराननें तेथें अमूप ॥ याग केले सूख रूप ॥ इंद्रा दिकीं समस्तीं ॥४७॥
जेथें तप याग विशेष ॥ स्वयें करी व्यो मकेश ॥ दक्षिणा दिली ते निःशेष ॥ लेखा शेषा न करवे ॥४८॥
तेथींची सामुग्री घेऊनि अपार ॥ आठ लक्ष यक्षनि शाचर ॥ त्यांचे शिरीं देऊनि समग्र ॥ शक्र प्रस्थासी आणीत ॥४९॥
भीमासी गदा दिधली देख ॥ पार्थासी अर्पिला शंख ॥ मग मुहूर्त पाहोनि सुरेख ॥ सभा मंडप आरं भिला ॥५०॥
आठ लक्ष बली राक्षस ॥ सामुग्री देती विशेष ॥ दहा सहस्त्र हस्त चौरस ॥ सभा मंडप रचियेला ॥५१॥
मनीं कल्पिले तैसे तुळवट ॥ नवर त्नांचे खांब सदट ॥ स्वयंभू जाण अवीत ॥ हिरियांचे अणि येले ॥५२॥
मया सुर पांडवांचा मित्र ॥ जो दैत्यां माजी विधीचा अवतार ॥ तेणें ते सभा रचिली सुंदर ॥ जे अनुपम त्रिभुवनीं ॥५३॥
सभा अत्यंत वर्णिली येथ ॥ म्हणोनि सभा पर्व म्हणती पंडित ॥ तेथींची रचना अद्भुत ॥ न भूतो न भविष्यति ॥५४॥
सभा रचिली तये वेळीं ॥ आठही आय साधिले तळीं ॥ अष्टदिक्पाल महाबळी ॥ पायाचे मूळीं स्थापिले ॥५५॥
विद्रुमशिल आरक्त वर्ण ॥ तेणें पाया आणिला भरून ॥ स्फटिकशिला शूभ्र वर्ण ॥ त्यांचीं पोंवळीं लखल खीत ॥५६॥
सप्तरंगी पाषाण ॥ चक्रें झळकती आंतून ॥ अंतर्बाह्य देदीप्य मान ॥ पाहतां जन विस्मित ॥५७॥
शेषफणांच्य़ा आकृती ॥ चर्या जडित झळकती ॥ जेवीं उगवले गभस्ती ॥ बैसले पंक्तीं एकदां ॥५८॥
इंद्र नीलाचे वारण ॥ हिर्‍यांचे द्विज सतेज पूर्ण ॥ ते खालते जडून ॥ वरी मंडप रचियेला ॥५९॥
तळीं पद्मरागाचे तोळंबे सबळ ॥ वरी हिरियांचे खांब विशाळ ॥ निळयांचीं उथाळीं सुढाळ ॥ तेजाचे कल्लोळ दिसताती ॥६०॥
सुवर्णाचे तुळवट अखंड ॥ माणिकांचे दांडे प्रचंड ॥ गरुड पाचूंच्या किलचा उदंड ॥ अभेद पणें जडियेल्या ॥६१॥
पेरोजांचे उंबरे तलवटीं ॥ पुष्करा जांच्या वरी चौकटी ॥ गजास्य जडिले मध्यपीठीं ॥ आरक्त वर्ण माणिकांचे ॥६२॥
घोटींव जे मर्गज पाषाण ॥ तेणें साधिलें मंडपां गण ॥ वरी कन कवर्ण वृक्ष रेखून ॥ तटस्थ नयन पाहतां ॥६३॥
हिर्‍यांच्या मज लसा विशाळ ॥ त्यावरी मोति यांचे मराळ ॥ वदनीं विद्रुम तेजाळ ॥ अतिचपळ दिसताती ॥६४॥
नीलर त्नांचें शिखर साजिरें ॥ गरुडपा चूंचे कीर बरे ॥ रत्नमणि यांचीं सुंदरें ॥ जांबुळें मुखीं आकर्षिलिं ॥६५॥
धन्य मया सुराची करणी ॥ शुक पाचूचे बोलती क्षणो क्षणीं ॥ मयूर नाचती आनंदूनी ॥ पुतळ्या क्षणोक्षणीं खेळताती ॥६६॥
प्रत्यक्ष रत्न पुतळे बोलती ॥ सभेसी आल्या बैसा म्हणती ॥ कितीक पुतळे आनंदें गाती ॥ पुरे म्हणतां होती तटस्थ ॥६७॥
नवल कर्त्याची करणी ॥ पुढें सेवक वेत्र पाणी ॥ धांवा म्हणतां सभा जनीं ॥ चपल चरणीं धांवती ॥६८॥
मेष कुंजर एक सरी ॥ आज्ञा होतां घेती झुंझारी ॥ टाळ मृदंग वाज विती कुसरीं ॥ रागोद्धार करिती पैं ॥६९॥
घटिका भरतां दिवस ॥ एक पुतळे वाज विती तास ॥ देवांगनांचीं ॥ रूपें विशेष ॥ नृत्य करिती सांगतां ॥७०॥
हिरियांचें स्तंभांतरीं ॥ नृसिंह मूर्ति गर्जती हुंकारीं ॥ कौस्तु भमणि झळकती एक सरीं ॥ स्तंभां प्रति जडियेले ॥७१॥
कोठें जडिले स्यमंत कमणी ॥ कीं एक दांचि उगवले तरणी ॥ दिवस किंवा यामिनी ॥ तये स्थानीं न कळे कोणा ॥७२॥
एकावरी एक शत खण ॥ मंगल तुरें अनु दिन ॥ लेपें वाज विती नवल विंदान ॥ कर्तयानें दाविलें ॥७३॥
चपला तळपती एक सरीं ॥ तैसा पताका झळ कती अंबरीं ॥ कळस जडित नानापरी ॥ हिणा विती भगणांतें ॥७४॥
गरुड पाचूच्या ज्योती ॥ चित्र शाळे विचित्र दिसती ॥ गोलां गुलें झोळ कंबे घेती ॥ जीव नसतां चपलत्वें ॥७५॥
चतुर्दश भुवनें नृपां सहित ॥ भिंतींवरी पुतळे रत्न जडित ॥ ज्यांची जैशी आकृती सत्य ॥ प्रत्यक्ष तैसेचि काढिले ॥७६॥
नीलर त्नांचें वैकुंठ ॥ हिरयांचें कैलासपीठ ॥ पुष्कराजांचें वरिष्ठ ॥ केलें स्पष्ट ब्रह्म सदन ॥७७॥
इंद्र अग्नि यम नैऋती ॥ वरुण सोम कुबेर उमापती ॥ ज्यांचे तनूची विशेष दीप्ती ॥ प्रत्यक्ष मूर्ति दिक्पा लांच्या ॥७८॥
मित्र रोहिणीवर भूमि सुत ॥ सोम सुत गुरु शुक्र शनी सहित ॥ राहु केतु नव ग्रह मूर्ति मंत ॥ पाहतां तटस्थ जन होती ॥७९॥
मत्स्य कूर्म वराह नृसिंह मूर्ती ॥ वमन भार्गव राघवा कृती ॥ कृष्ण बौद्ध कलंकी अवतार स्थिती ॥ चरित्रा समवेत प्रत्यक्ष पैं ॥८०॥
अतल वितल सुतल ॥ शेष वासुकी फणिपाल ॥ एवं सप्तपा तालें निर्मल ॥ लोकां सहित रेखिलीं ॥८१॥
सप्त द्वीपें नव खंड ॥ छप्पन्न देश काननें प्रचंड ॥ सरिता सागर तीर्थें उदंड ॥ पापसंहारक रेखिलीं ॥८२॥
शिव चरित्रें विष्णु चरित्रें ॥ शक्त्याख्यानें अतिविचित्रें ॥ सोमकांत पाषाणीं सोपानें सुंदर बांधिलीं ॥८३॥
शीतोष्ण उदकांच्या पुष्करिणी ॥ मंगलस्त्रानें करितां जनीं ॥ तनूवरी राजकला ये तत्क्षणीं ॥ नवल करणी मयाची ॥८४॥
स्फटिक भूमी देखोन ॥ भुलती पाहत यांचे नयन ॥ कीं वाटे भरलें जीवन ॥ वस्त्रें सांव रून चालती ॥८५॥
जेथें भरलें जल ॥ तें भूमी ऐसें दिसे केवल ॥ वस्त्रें न सांवरिती अति कुशल ॥ तों सभा सकल हांसे तयां ॥८६॥
अतंर्बाह्य निर्मल दिसती ॥ सतेज काश्मीरांच्या भिंती ॥ मार्ग म्हणोनि सरळ धांवती ॥ तों ते आदळती भिंतीसी ॥८७॥
हिर्‍यांचीं कवाडें कडोविकडी ॥ झांकिलीं कीं न कळती उघडीं ॥ प्रवे शतां संशयीं पाडी ॥ मग हस्तें करूनि चांचपिती ॥८८॥
सरोवरी सुवर्ण कमला सुवास ॥ हे कला दाविली विशेष ॥ वरी नीलांचे भ्रमर साव कारू ॥ रुंजी घालिती आनंदें ॥८९॥
हिर्‍यांचे मत्स्य तळपती ॥ पाचूंचीं कांसवें अंग लपविती ॥ काश्मीरांचे बक धांवती ॥ मस्त्य धरा वया कारणें ॥९०॥
त्रिभुवन सौंदर्य एक वतलें ॥ तें मयस भेवरी ओतिलें ॥ तें सभास्थल जेणें विलो किलें ॥ तेणें देखिलें ब्रह्यांड ॥९१॥
सभेसी जातां मार्गीं भले ॥ चंद नाचे सडे घातले ॥ पुष्प भार विखुरले ॥ मृगमदें लिंपिले भित्ति भाग ॥९२॥
सभा सौंदर्य हाचि समुद्र ॥ पाहत यांचे चक्षु पोहणार ॥ ते न पावती पैलपार ॥ आली कडेचि बुचकळती ॥९३॥
कीं सभा सागराचें पैलतीर ॥ मनोविहंगम चपल थोर ॥ पावा वया नाहीं धीर ॥ तेजाचे आवर्तीं पडे पैं ॥९४॥
ज्या ज्या पदार्था कडे पाहती प्राणी ॥ तिकडेचि चित्त जाय जडोनी ॥ दिवस किंवा आहे रजनी ॥ पाहात यासी सम जेना ॥९५॥
स्वर्ग मृत्यु पाताळ शोधितां ॥ ऐसी सभा नाहीं तत्त्वतां ॥ धन्य तो मया सुर निर्मिता ॥ विरिंच्यंश सत्य पैं ॥९६॥
आरक्त पटांचे चांदवे दिसती ॥ मुक्ताघोंस भोंवते शोभती ॥ दिव्य आस्तरणें पसरलीं क्षितीं ॥ गाद्या झळकती विचित्र ॥९७॥
पीक दानें ऊर्ध्व मुख ॥ तांबूल पत्रें अति सुरेख ॥ परिमल द्र्व्यें मृगम दादिक ॥ पेटया झळकती तयांच्या ॥९८॥
कन कवेली रेखिल्या ॥ वाटती रत्नस्तं भींच चढल्या ॥ देव द्रुमांच्या दाटी जाहल्या ॥ फल पुष्पीं झळकती ॥९९॥
लवंगांचे वेल शोभती ॥ नाना वृक्ष विराजती ॥ मलयागर चंदन पुष्प जाती ॥ सुवास प्रकटती नवल हें ॥१००॥
भरतां मास चतुर्दश ॥ पूर्ण सभेचा जाहला कळस ॥ मय म्हणे धर्मास ॥ सभा द्दष्टीं अवलोकिंजे ॥१०१॥
मग बंधु कुमार प्रधान ॥ सवें अपार मुनि जन ॥ इष्ट आप्त संगें घेऊन ॥ सभे पातला युधिष्ठिर ॥१०२॥
सभा स्थानीं प्रवे शले ॥ बलिदान आधीं समर्पिलें ॥ वस्त्रालंकार ते वेळे ॥ अपार दिधले विप्रांसी ॥१०३॥
सभा पाहतां संपूर्ण ॥ विसरले अवघे भूक तहान ॥ मन न निघे तेथून ॥ वर्षा नुवर्षें पाहतां ॥१०४॥
धन्य धन्य तो सूत्र धार ॥ कमला सनांश मया सुर ॥ धर्में देऊनि वस्त्रें अलंकार ॥ प्रण सखा गौर विला ॥१०५॥
निरोप घेऊ नियां स्वस्थळा ॥ मया सुर तत्काळ गेला ॥ देशो देशींचे नृपाळ ते वेळां ॥ येती सभा पहा वया ॥१०६॥
लक्ष ब्राह्मणांसी भोजनें ॥ सभेंत दिधलीं कुंती नंदनें ॥ सुधार साहूनि गोड अन्नें ॥ वर्णितां ग्रंथ वाढेल ॥१०७॥
कला पात्रें बहुत येती ॥ मयस भेसी ओळंगती ॥ नाना शास्त्र चर्चा होती ॥ धर्मस भेसी सर्वदा ॥१०८॥
अपार ऋषि जन वसती ॥ धर्माचे संगतीं सुख भोगिती ॥ त्यांचीं नामें नानारीती ॥ बोलि जेती पुढती पैं ॥१०९॥
नाना देशींचे राज सुत ॥ धर्मा पाशीं सदा तिष्ठत ॥ असुर यवन गण ॥ बलवंत ॥ धर्मराया पुढें उभे सदा ॥११०॥
द्वादश जातींचे यादव ॥ वृष्ण्यंधका दिक सर्व ॥ सारण भोज अक्रूर उद्धव ॥ पार्थ संगें वसती पैं ॥१११॥
याद वांचें सकल सुत ॥ शाण्णव कुलींचे राज पुत्र समस्त ॥ पार्था पाशीं शिकत ॥ धनुर्वेद सर्वही ॥११२॥
साठ लक्ष कृष्ण कुमार ॥ प्रद्युन्म सांबा दिक समग्र ॥ त्यांसी किरीटी गुरु चतुर ॥ विद्या अपार देतसे ॥११३॥
गंधर्व राज चित्र सेन ॥ किन्नर अप्सरा अनु दिन ॥ तुंबरु स्वर्गवास सांडून ॥ मयस भेसी गातसे ॥११४॥
उदय पावला सुकृत मित्र ॥ पांडवांचें भाग्य विचित्र ॥ तों अकस्मात विधि पुत्र ॥ नारद स्वामी पातला ॥११५॥
व्यास वात्मीकि ध्रुव प्रर्‍हाद ॥ जयाचे शिष्य जग द्वंद्य ॥ चौदा विद्या चार्‍ही वेद ॥ मुखोद्नत जयासी ॥११६॥
चौसष्ट कला शास्त्रें बहुत ॥ ज्याचे मुखीं विस्तारलीं समस्त ॥ नारद नारायण यथार्थ ॥ पर माद्भुत महिमा ज्याचा ॥११७॥
दिव्य सुमनें दिव्य गंध ॥ सुरगणीं पूजिला विविध ॥ ज्याचें सामर्थ्य अगाध । ब्रह्मा दिकां नेणवे ॥११८॥
हें ब्रह्मांड मोडून ॥ दुसरें करील निर्णाण ॥ अन्याय विलो कितां पूर्ण ॥ शिक्षा करील इंद्रा दिकां ॥११९॥
ऐसा महाराज नारद मुनी ॥ युधिष्ठिरें द्दष्टीं देखोनी ॥ सामोरें धांवोनि धरणीं ॥ साष्टांग नमन केलें पैं ॥१२०॥
दिव्या सनीं बैसविला ॥ रत्ना भिषेक धर्में केला ॥ पूजा अर्पूनि ते वेळां ॥ बद्ध हस्तीं उभा पुढें ॥१२१॥
धर्मासी म्हणे नारद ॥ नामा सारखी करणी शुद्ध ॥ तुज पाशीं आहे कीं विशद ॥ धर्मात्मजा धर्म राया ॥१२२॥
पृथ्वीचें राज्य आलें समस्त ॥ तरी धर्मा वरी असावें सदा चित्त ॥ कामना बुद्धि टाकूनि यथो चित ॥ कर्में कृष्णार्पण करिसी कीं ॥१२३॥
कुल शील विद्या धन ॥ राज्य तप रूप यौवन ॥ या अष्टमदें करून ॥ मन भुलत नाहीं कीं ॥१२४॥  
सर्व ज्ञता अंगीं असोन ॥ निरभिमान असशी कीं पूर्ण ॥ ऐश्वर्य असोनि उदास मन ॥ धर्म राया आहे कीं ॥१२५॥
प्रज्ञा अंगीं असोनि बहुत ॥ भोळेपण न सांडिंजे किंचित ॥ अंतरीं बहु उदारत्व ॥ सुह्रद ऋषीशीं आहे कीं ॥१२६॥
श्रेष्ठांचा मूल आचार ॥ तोचि आचरिसी कीं सादर ॥ अविहित कर्म अनाचार ॥ नावडे कीं सर्वज्ञा ॥१२७॥
इंद्रियें आहेत कीं आधीन ॥ नित्यनै मित्तिकीं आर्त मन ॥ निषिद्ध कर्म संपूर्ण ॥ लोटिसी कीं पातल्या ॥१२८॥
भाग्य आलें अकस्मात ॥ भोगिसी कीं सुह्रदां समवेत ॥ शमदमा दिसा धनीं यथार्थ ॥ बुद्धि सदा वसे कीं ॥१२९॥
विकल पडतां प्राक्तन ॥ स्वधर्मीं रहाटे कीं मन ॥ काम क्रोधादि शत्रु संपुर्ण ॥ केले आधीन तुवां कीं ॥१३०॥
पाण पुण्य घडलें किती ॥ विचारिसी कीं अहो रात्रीं ॥ स्मरणें पूजनें भाव भक्तीं ॥ वश श्रीपति असे कीं ॥१३१॥
संतांशीं सदा मैत्री ॥ दान देशी कीं सत्पात्रीं ॥ धर्म करितां अपात्रीं ॥ सुकृता हानि होतसे ॥१३२॥
परस्त्रीशीं काम निषिद्ध ॥ ब्राह्मणावरी नसावा क्रोध ॥ सुह्रदयातीशीं मद ॥ सह साही न करावा ॥१३३॥
नसावा सर्व भूतीं मत्सर ॥ साधु संत विप्र पवित्र ॥ त्यांशीं दंभ अणुमात्र ॥ सर्वथाही नसावा ॥१३४॥
कर्ता सर्व ईश्वर ॥ म्हणोनि न धरावा अहंकार ॥ आपुलें सुकृत आचार ॥ स्वमुखें कदा न बोलावा ॥१३५॥
सकल गुणें मंडित पूर्ण ॥ असती कीं तव प्रधान ॥ तुझी आज्ञा शिरीं धरून ॥ कापटया भावें वर्तती कीं ॥१३६॥
विश्वा सूक जैसे प्राण ॥ जवळी आहेत कीं सेव कजन ॥ स्वामिकाजीं ओंवाळून ॥ देह टाकिती आपुले ॥१३७॥
भक्षिती राज वेतन ॥ इतर द्र्व्य तृणा समान ॥ सेवाव्यापारी सुजाण ॥ सेवक तुझे आहेत कीं ॥१३८॥
वृषली पुत्रासी अमात्यपद ॥ पवित्रासी सेवा निषिद्ध ॥ अपमानूनि संत वृद्ध ॥ न भजसी कीं अपात्रीं ॥१३९॥
आपुले काजीं वेचिलें प्राण ॥ त्यांचीं करिसी कीं कुटुंबें पालन ॥ स्वस्त्री टाकूनि मन ॥ परस्त्री विषयीं न रमे कीं ॥१४०॥
बाल मित्र भेटों आले ॥ कष्टी देखोनि सभाग्य केले ॥ परी ओळखी नेदोनि दवडिले ॥ ऐसें होत नाहीं कीं ॥१४१॥
पर गुण परीक्षा उत्तम ॥ जाणसी कीं विद्येचे श्रम ॥ पराचें साधन देखतां परम ॥ मन तुझें न सांकळे कीं ॥१४२॥
सर्व भूतीं द्यावें अन्न ॥ पूजा करावी सत्पात्र पाहून ॥ मागें न बोलावें दुजियाचें न्यून ॥ हें सुलक्षण असे कीं ॥१४३॥
सेवक कैसे वर्तती ॥ यश किंवा अपयश देती ॥ हेंमुख्यत्वें अहो रात्रीं ॥ चित्तीं सर्वदा आणिशी कीं ॥१४४॥
सुखें सारा नेमस्त घेऊन ॥ करिसी कीं प्रजेचें पालन ॥ त्यांसी पीडा करितां सेवक प्रधान ॥ पदा वेगळे करिसी कीं ॥१४५॥
देवाची पूजा करिती सांग ॥ तैसाचि देऊनि राज विभाग ॥ प्रजा वर्तती कीं अव्यंग ॥ स्वधर्मानें आपुल्या ॥१४६॥
घडिघडी आपुले राष्ट्रा ॥ कृपाद्दष्टीं पाहसी कीं पवित्रा ॥ लेंकरा ऐशा प्रजा समग्रा ॥ विलो किसी कीं सज्ञाना ॥१४७॥
मार्ग पाडे चोर निषाद ॥ यांचा करिसी कीं तत्काल वध ॥ यात्रा नागविती जे मैंद ॥ त्यांचें हनन करिसी कीं ॥१४८॥
दुर्बलासी क्लेश होई ॥ द्वारीं येऊनि उभा राही ॥ त्यासी जवळी बोलावूनि लवलाहीं ॥ क्लेशातीत करिसी कीं ॥१४९॥
ब्राह्मण मित्र प्रजा स्त्रेहाळ ॥ त्यांसी न आडविती कीं द्वारपाल ॥ दुष्ट दुर्जन जे कां खल ॥ आंत येऊं न देती किं ॥१५०॥
परराज्य जातां व्या वया ॥ सैन्य येतें झुंजा वया ॥ त्यासी जिंकोनि लुटितां राया ॥ ग्राम प्रजा रक्षिसी कीं ॥१५१॥
आपु लिया जे ग्रामांत ॥ दीन जन होती दुःखित ॥ तें तुज होऊ नियां श्रुत ॥ क्लेश त्यांचे हरिसी कीं ॥१५२॥
माता पित यांचें भजन ॥ पुत्र करिती कीं अनु दिन ॥ हें स्वग्रामांतील वर्त मान ॥ तुज लागीं श्रुत असे कीं ॥१५३॥
शिष्य गुर्वाज्ञा पाळिती ॥ स्त्रिया भ्रतारासी भजती ॥ सेवक स्वामिद्रोह न करिती ॥ ऐशीच स्थिति असे कीं ॥१५४॥
सासूसार्‍यांची सेवा ॥ सुना करिती कीं नर पार्थिवा ॥ रात्रीं चोर जार सदैवा ॥ नगर माजी करिसी कीं ॥१५६॥
दरिद्री ब्राह्मण तरुण ॥ गेला परदेशा लागून ॥ तरुण स्त्री भ्रतारा विण ॥ तळमळत वाट पाहे ॥१५७॥
तीं दोघें तो करूं नेदी त्यासी भोजन ॥ परम पीडितो हें ऐकून ॥ ऋण मोचन करिसी कीं ॥१५९॥
क्षुधार्त तृषित घरा येती ॥ सोय‍र्‍यां ऐसी त्यांवरी प्रीती ॥ पुत्रा हूनि स्त्रेहरीती ॥ संतांवरी करिसी कीं ॥१६०॥
आश्रित उपाध्याय ऋत्विज ब्राह्यण ॥ सांग करिती कीं अनुष्ठान ॥ जप याग पुरश्चरण ॥ कोठें न्य़ून न पडे कीं ॥१६१॥
वसु धारा आणि असि धारा ॥ दानोदक धारा वाग्धारा ॥ पंचामृत धारा अभिषेक धारा ॥ उदारा सदैव चालती कीं ॥१६२॥
आपुल्या हातें वर्षा सन ॥ देऊनि रक्षिसी कीं ब्राह्मण ॥ क्षत्रि यांसी नांदवून ॥ समाचार घेसी कीं ॥१६३॥
दुष्ट ग्रहांचें करूनि पूजन ॥ तयांसी करिसी कीं प्रसन्न ॥ गणक ज्योतिषी शास्त्रनि पुण ॥ निकट सदा असती कीं ॥१६४॥
वैद्य चिकित्सक पवित्र भले ॥ नाडीज्ञानीं चातुर्या गळे ॥ ते जवळी सदा ठेविले ॥ आहेत कीं राजेंद्रा ॥१६५॥
कोश गृहींचे रक्षक ॥ ते आहेत कीं निरपेक्षक ॥ अंतःपुरींचे नपुं सक ॥ किंवा वृद्ध आहेत कीं ॥१६६॥
पवित्र विश्वासु आणि चतुर ॥ पाककर्ते असावे साचार ॥ जाणताती जे सूप शास्त्र ॥ तेचि तुवां रक्षिले कीं ॥१६७॥
नापित हडपी अंगम र्दक ॥ उदक देणारे हुजरे देख ॥ हे निकट असणारे सेवक ॥ विश्वा सुक आहेत कीं ॥१६८॥
जे अविचारी अनिवार शूर ॥ युद्धांत ठेवावे साचार ॥ स्थिर बुद्धि ज धैर्यें थोर ॥ ते दुर्गतटी असती कीं ॥१६९॥
बृहस्पती ऐसे चतुर पंडित ॥ बोलों जाणती समयो चित ॥ विधिती शत्रूंसी निश्चित ॥ ऐसे निकट असती कीं ॥१७०॥
समय पाहूनि त्रिशुद्धी ॥ तुज शिक विती कीं सुबुद्धी ॥ अनर्थीं पडों नेदिती कधीं ॥ ऐसे निकट असती कीं ॥१७१॥
पिशुन शठ दुष्ट दुर्जन ॥ निष्ठुर वादक पाहती न्य़ून ॥ सत्पात्रांचा करिती अपमान ॥ ते सभास्थानीं वर्जिसी कीं ॥१७२॥
साधुदेवां बोलती दुष्ट शब्द ॥ त्यांचा करिसी कीं जिव्हा छेद ॥ रात्रीं जागा होऊन मनोबोध ॥ मोक्ष पावा वया करिसी कीं ॥१७३॥
जनीं वसे जना र्दन ॥ ते करिती निंदा कीं स्तवन ॥ मोक्षनरकांचें चिन्ह ॥ येथेंचि पुरें जाणसी कीं ॥१७४॥
शत्रु जिंकावे समरीं ॥ जिंकिले ते पाळावे चतुरीं ॥ शरणा गतां बरव्यापरी ॥ रक्षावें हें जाणसी कीं ॥१७५॥
गिरिदुर्गीं आणि पर्वतीं ॥ नूतन धान्यें वर्षा अंतीं ॥ जुनीं काढोनि पुढती ॥ नवी बहु साल भरिसा कीं ॥१७६॥
गडदुर्गांच्या भिंती ॥ जीर्ण होतां कोसळती ॥ ठायीं ठायीं रचा वया पुढती ॥ शिल्प खनक असती कीं ॥१७७॥
मठ धर्म शाला प्रासाद ॥ कूप वापी तडाग सुबद्ध ॥ हीं खचलीं कीं करूनि सिद्ध ॥ जीणों द्धार करिसी कीं ॥१७८॥
नैवेद्य दीप ठायीं ठायीं ॥ चाल विसी कीं देवा लयीं ॥ वर्षा कालीं पीडती पशु गायी ॥ त्यांसी गोठाणें बांध विसी कीं ॥१७९॥
वृद्ध दरिद्री अशक्त अती ॥ तपस्वी संन्यासी अतिथी ॥ हे वर्षा कालीं पंथीं ॥ न चालती ऐसें करिसी कीं ॥१८०॥
गोत्रज प्रजा वृद्ध तापस ॥ तुझा न घेती कदा त्रास ॥ श्रेष्ठ जे येती दर्श नास ॥ त्यां अपमा नीत नाहींस कीं ॥१८१॥
पुरोहित प्रधान पंडित ॥ आपुलें नष्ट होईल महत्त्व ॥ म्हणूनि भल्यांचा अप मान सत्य ॥ न करिती कीं सर्वथा ॥१८२॥
उदया स्तमानी शयन ॥ व्रत पर्व कालीं मैथुन ॥ पांक्तिभेद एकल्यानें भोजन ॥ तुज घडत नाहीं कीं ॥१८३॥
चार्‍ही वर्ण आपुल्या सुतां ॥ विद्या पढविती कीं नरनाथा ॥ बहु मूर्ख दवडोनि एका पंडिता ॥ धन मानें रक्षिसी कीं ॥१८४॥
एकान्त विचार गौप्य समस्त ॥ प्रकटत नाहीं कीं जगांत ॥ मंत्र आयुष्य वित्त ॥ न सांगसी कीं कोणातें ॥१८५॥
एक प्रकट लोकीं बोलावें ॥ एक साधुकर्णीचि सांगावें ॥ एक मनींचि गौप्य ठेवावें ॥ हें तूं बरवें जाणसी कीं ॥१८६॥
शत्रू काय करिती विचार ॥ क्षणोक्षणीं आण विजे समाचार ॥ सत्यवादी हेर चार ॥ धन देऊनि रक्षिसी कीं ॥१८७॥
तुजशीं स्त्रेह दाविती बहुत ॥ शत्रूंसी समाचार करिती श्रुत ॥ ते ओळखोनि मनांत ॥ साव धान अससी कीं ॥१८८॥
वार्ता आली जे अकस्मात ॥ तिचे सत्यत्वासी पाठवावे दूत ॥ अल्प यत्न लाभ बहुत ॥ तेथें त्वरा करिसी कीं ॥१८९॥
अल्प यशासी मोठी हानी ॥ गोष्टी न धरावी ते मनीं ॥ दान मान सुकृत जनीं ॥ प्रकट कदा न करिसी कीं ॥१९०॥
जे राज्यरक्षक रणशूर ॥ त्यांचें वेतन द्यावें समग्र ॥ त्यांसी कष्टी करितां निर्धार ॥ अनर्थ हें जाणसी कीं ॥१९१॥
आदा पाहो नियां वेंच ॥ करावा हें जाण साच ॥ गुरु गृहीं पुर विजे खर्च ॥ सर्वदा हें जाणसी कीं ॥१९२॥
आजि काय सांचलें धन ॥ वेंचिलें किती पत्रीं लिहून ॥ नित्य सायंकालीं आणून ॥ लेखक हे दाविती कीं ॥१९३॥
वस्त्रा भरणें नित्य लेऊन ॥ दर्शना येता कीं समस्त जन ॥ सुह्र्द रण शूर स्वतः होऊन ॥ उभय भागीं बैसती कीं ॥१९४॥
वस्त्रें शस्त्रें अलंकारें येर ॥ अवघे सारिखे रण शूर ॥ अश्वग जयानीं समग्र ॥ सतेज सदा असती कीं ॥१९५॥
सत्पात्रीं धन देतां बहुत ॥ नाहीं वारीत कीं पुरोहित ॥ विघ्न करिती ते पदच्युत ॥ तत्काळचि करिसी कीं ॥१९६॥
घोषांचे ते ग्राम ॥ ग्रामांचीं पट्टणें उत्तम ॥ पर्वत वनें वसवोनि परस ॥ मार्ग चालते करिसी कीं ॥१९७॥
न पडे जरी जल दजाल ॥ विशाल तडागें पाटस्थल ॥ शालीवनें पिकती पुष्कळ ॥ ऐसी भरती असे कीं ॥१९८॥
प्रजा कोणी अत्यंत दीन ॥ त्यांसी देऊनि धन धान्य ॥ करूनि सभाग्य पूर्ण ॥ मग राज धन घेसी कीं ॥१९९॥
प्रजापीडक हिंसक ॥ आततायी इतर देख ॥ त्यांचा वध तत्का लिक ॥ करिसी कीं राजेंद्रा ॥२००॥
क्षुधें पीडतां दुष्काळांत ॥ उत्तमें चोरी केली अकस्मात ॥ धरूनि आणितां राज दूत ॥ तत्काल मुक्त करिसी कीं ॥२०१॥
अंतर्बाह्य संरक्षण ॥ स्त्रियांसी करू नियां पूर्ण ॥ अष्ट भोग देऊनि जाण ॥ गुह्य भाषण न करिसी कीं ॥२०२॥
परराज्य घेतां सत्य ॥ ज्यासी जे जे लाभे वस्त ॥ ते त्यांसी करूनि मुक्त ॥ तोष विसी कीं तयांतें ॥२०३॥
युक्त आहार युक्त निद्र ॥ युक्त मैथुन जाण नरेंद्रा ॥ मृगया द्यूत व्यय चतुरा ॥ युक्तचि हीं करिसी कीं ॥२०४॥
सेवूनि औषध रसायन ॥ करिसी कीं शरीर संरक्षण ॥ भजन पूजन हरिकथा श्रवण ॥ साधु मुखें करिसी कीं ॥२०५॥
शब्द बोलसी जो यथार्थ ॥ तो न चळे जैसा पर्वत ॥ हित सांगती जें साधु संत ॥ ह्रदयीं द्दढ धरिसी कीं ॥२०६॥
गुरु वृद्ध देव ब्राह्नण ॥ प्रासाद गाय वृंदावन ॥ यज्ञ मंडप समाधि स्थान ॥ देखोनि नमन करिसी कीं ॥२०७॥
अश्व भांडार गज ॥ पवित्र भूमि देव ध्वज ॥ गंगा तीर्थें देखतां सहज ॥ नमन त्यांसी करिसी कीं ॥२०८॥
कार्य साधिती जे सेवक ॥ त्यांचें स्तवन करिसी कीं सम्यक ॥ सभा मंडपीं मानें देख ॥ गौरवीत आहेस कीं ॥२०९॥
अचाट कार्य अद्भुत ॥ करूनि आला जो मृत्य ॥ वेतनावे गळें अपरिमित ॥ द्रव्य वस्त्र देसी कीं ॥२१०॥
पर खंडींच्या वस्तु अद्भुत ॥ वणिज आणिती इच्छूनि स्वार्थ ॥ न विके तरी समस्त ॥ द्रव्या देऊनि घेसी कीं ॥२११॥
कोणी आणिती वस्तु उचिता ॥ त्यांसी दश गुणें नरनाथा ॥ द्रव्य देऊनि तत्त्वतां ॥ बोळ विसी कीं आदरें ॥२१२॥
देशा वर देऊनि अपरिमित ॥ स्वदेशा धाडिसी कीं विद्या वंत ॥ ते तुझी कीर्ति सांगत ॥ थोर सभेसी जाण पां ॥२१३॥
उत्तम वस्त्रें अलंकार ॥ सत्पात्रीं देतां कीर्ति फार ॥ स्थलीं स्थलीं मिरवतां थोर ॥ यश प्रकटे नरेंद्र ॥२१४॥
भोजन तांबूल सुमन चंदन ॥ वस्त्रें औषध उदक पान ॥ इतुक्यांत विष घालून ॥ द्विषी प्राण घेतील पैं ॥२१५॥
येविषयीं सदा साव धान ॥ निद्रेचें असे कीं द्दढ स्थान ॥ रात्रीं करिसी कीं जागरण ॥ सेवकजनांस मवेत ॥२१६॥
पुण्यवंतासी दोषी म्हणती ॥ दुर्ब लासी धनि कत्व स्थापिती ॥ दुरात्म्याचे दोष लपविती ॥ नाहीं रीती ऐसी कीं ॥२१७॥
धनिक न करिती दान ॥ दरिद्री न करी तीर्थटन ॥ त्या दोघां सही सांगोन ॥ हितकार्यीं योजिसी कीं ॥२१८॥
बाहेरी दावूनि आचार ॥ आंत अवघा अनाचार ॥ व्यभिचार कर्में अपार ॥ करिती त्यांसी दंडिसी कीं ॥२१९॥
माता पिता गुरु टाकून ॥ करूं धांवे तीर्थाटन ॥ त्या सही राया तूं दंडून ॥ भजन मार्गीं लाविसी कीं ॥२२०॥
बाहेरी योगियाचें चिन्ह ॥ पाळिती उदर आणि शिश्न ॥ अग्नि होत्र न घे वेदज्ञ ॥ तरी पठन व्यर्थचि तें ॥२२१॥
त्याचे ठायीं तुझें मन ॥ न लागे कीं अणुप्रमाण ॥ एवं सर्व विषयीं साव धान ॥ नृप वर्या अससी कीं ॥२२२॥
ऐसें हे किंचित्प्रश्न ॥ नारदें पुसिले धर्मा लागून ॥ जन मेजय करी श्रवण ॥ वैशं पायन सांगतसे ॥२२३॥
हें जो नित्य ऐके पढे ॥ त्यासी न पडे कदा सांकडें ॥ अंतीं हरिपद जोडे ॥ यश मिळे सर्वदा ॥२२४॥
पुढें श्रवण कीजे सावधान ॥ एक हूनि एक अध्याय गोड पूर्ण ॥ आदर धरोत विचक्षण ॥ ब्रह्मा नंदें करू नियां ॥२२५॥
रसिक साहित्य चातुर्यवाणी ॥ ब्रह्या नंदें वदोनी ॥ श्री धराची वाग्भवानी ॥ गोंधळ घालील स्वानंदें ॥२२६॥
त्या रंगामाजी चतुर पंडित ॥ आनंदें डोलतील समस्त ॥ भक्त मुमुक्षु साधक संत ॥ सुख दुःख समान जयां ॥२२७॥
जय जय भीमातट विलासा ॥ ब्रह्मा नंदा पंढरीशा ॥ श्री धर वरदा आदि पुरुषा ॥ अविनाशा दिगंबरा ॥२२८॥
सुरस पांडवप्रताप ग्रंथ ॥ सभा पर्वटीका श्री धरकृत ॥ मयसभेची रचना समस्त ॥ नारदनीति कथियेली ॥२३०॥
इति श्री श्रीधर कृतपांडवप्रतापे सभापर्वणि पंचदशाध्यायः ॥ श्री कृष्णार्पणमस्तु ॥

॥ श्री पांडवप्रताप पंचदशाध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 08, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP