मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय १२ वा

पांडवप्रताप - अध्याय १२ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्री गणेशाय नमः ॥
करितां धर्माचें वर्णन ॥ स्वधर्म होय वर्धमान ॥ सकल पापें जळती जाण ॥ भीम सेना वर्णितां ॥१॥
पार्थकीर्ति वर्णितां विशेष ॥ दुर्जन परा जय शत्रुनाश ॥ वर्णितां नकुल सहदेवांस ॥ सकल रोगां क्षय होय ॥२॥
कृष्ण कृपेचें बल अद्भुत ॥ दुःख न पावती कदा भक्त ॥ लक्षा गृहांतूनि मुक्त ॥ पांडव जाहले पूर्वींच ॥३॥
हिडिंब बक मारून ॥ विजयी जाहला भीम सेन ॥ पंथें जातां कृष्ण द्वैपायन ॥ भेटोन गुज सांगितलें ॥४॥
वल्कलवोष्टित जटा धारी ॥ दिव्य विभूति चर्चिली शरीरीं ॥ जैसे शशी मित्र अंबरीं ॥ जलद जालें झांकिले ॥५॥
कीं अवतरले पंचदेव ॥ पांचाल पुरा आले पांडव ॥ तों छप्पन्न देशींचे राव ॥ स्वयंवरा तेथें पातले ॥६॥
पांचाल पुरा भोंवतें पाहात ॥ तों द्वादश योजनें पर्यंत ॥ राजांच्या पृतना अद्भुत ॥ सैरावैरा उतरल्या ॥७॥
तगटी कनकांबर शिबिरें ॥ उभविलीं झळकती अपारें ॥ यावेगळीं दिव्य चंदनागारें ॥ द्रुपदें दिधलीं भूभुजां ॥८॥
लक्षावधि कळस झळकती ॥ चपले ऐसे ध्वज तळपती ॥ बंधूं सहित दुर्योधन नृपती ॥ स्वयंवरासी आलासे ॥९॥
यादवां सहित यादवेंद्र ॥ भक्रवत्सल करुणा समुद्र ॥ पश्चिमेसी उतरला रुक्मिणीवर ॥ दलभार न वर्णवे ॥१०॥
सप्तपुर्‍या सप्तद्वी पांडून ॥ नवखंडांचे आले ब्राह्मण ॥ असो द्रुपदस भेसी अवघे जन ॥ राजे ऋषि मिळाले ॥११॥
कुंतीसी कुलालशाळे ठेवून ॥ सभेसी पातले पांच जण ॥ वेष पालटोनि पंच पंचानन ॥ विप्रस भेंत बैसती ॥१२॥
मग मनांत भाविती पांडव ॥ आजि शल्य आणि कौरव ॥ यांचे उतरू नियां गर्व ॥ निस्गेज करूं निर्धारें ॥१३॥
रायें उभविलें यंत्र पूर्ण ॥ आजि कोण भेदितो पाहूं बाण ॥ कर्णाचे कर्ण उघडून ॥ टाळें मोकळें करूं आजी ॥१४॥
पांडवीं वल्कलें वेष्टून ॥ केलें असे भस्मोद्धारण ॥ परी तीं दिव्य स्वरूपें पूर्ण ॥ पंचादित्य जैसे कीं ॥१५॥
द्रुपद म्हणे निज पुत्रांसी ॥ आतां द्रौपदी आणावी सभेसी ॥ जो भेदील यंत्रासी ॥ तो द्रौपदीसी वरील ॥१६॥
म्यां पूर्वीं इच्छिल अर्जुन जामात ॥ परी पांडव लाक्षा गृहीं जाहले गुप्त ॥ किंवा आहेत पृथ्वींत ॥ न कळे कोठें विचरती ते ॥१७॥
असो करिणीवरी बैसवूनी ॥ द्रौपदी लावण्य़रत्न खाणी ॥ सभेसी आणिली तये क्षणीं ॥ आकर्ण नयनी श्यामांगी ॥१८॥
कृष्णा सारिखी शयामवर्ण ॥ म्हणोनि कृष्णा नामा भिधान ॥ अंगींचा सुवास पूर्ण ॥ एक कोश धांवतसे ॥१९॥
सभेसी राजे बैसले समस्त ॥ धृष्टधुम्र द्रौपदीसी दावीत ॥ नामा भिधानें बल अद्भुत ॥ यथाक्रमें सांगतसे ॥२०॥
मग धृष्टद्युन्म बोले गर्जोन ॥चक्ररंध्रें भेदोनि बाण ॥ जो उडवील मत्स्य नयन ॥ त्यासी हें रत्न प्राप्त होय ॥२१॥
ऐशी परिसतां मात ॥ समस्त राजे भयभीत ॥ म्हणती धनुष्य हें अद्भुत ॥ प्रथम न उचले कोणासी ॥२२॥
मग हें यंत्र भेदील कोण ॥ परी त्यांत उठला वीर कर्ण ॥ जैसा जन कस भेसी रावण ॥ गर्वें करून सरसावला ॥२३॥
तैसा  कर्ण बोले ते क्षणीं ॥ द्रौपदी माझीच पट्टराणी ॥ पण भेदितों पहा नयनीं ॥ समस्त नृप हो आतांचि ॥२४॥
शिवकोदंडतुल्य चाप पूर्ण ॥ उचला वया गेला कर्ण ॥ जानू पर्यंत उचलितां जाण ॥ कासावीस जाहला ॥२५॥
धांपा दाटल्या अपार ॥ निस्तेज जाहलें शरीर ॥ उलथे जैसा तरुवर ॥ तैसा पडला भूमीवरी ॥२६॥
मुकुट उसळूनि पडला क्षितीं ॥ पदकें रत्नहार तुटती ॥ हाहाकार कौरव करिती ॥ तों द्रौपदी बोले तेधवां ॥२७॥
जरी येणें यंत्र भेदिलें आतां ॥ तरी मी यासी न वरीं तत्त्वतां ॥ हा अवर्ण कुलहीणन पाहतां ॥ माळ न घालीं सह साही ॥२८॥
परम अप मानला कर्ण ॥ स्वस्थलीं बैसली जाऊन ॥ तों द्रुपद बोले गर्जोंन ॥ पृथ्वी निःक्षत्रिय जाहली कीं ॥२९॥
मग विप्रस भेमधुन ॥ उठिले तेव्हां भीमार्जुन ॥ कीं गिरिदरी मधूनि पंचानन ॥ दोघे तैसे ऊठती ॥३०॥
कीं जैसें चंद्र आणि सूर्य ॥ पावले एक दांचि उदय ॥ द्रुपद चकित होऊनि पाहे ॥ सकल रायां समवेत ॥३१॥
एक म्हणती हे ब्राह्मण ॥ कैसा भेदितील न कळे पण ॥ कोणी म्हणती ईश्वर करणी विचित्र पूर्ण ॥ न कळे कांहीं कोणासी ॥३२॥
एकला ब्राह्मण पर शुधर ॥ तेणें निःक्षत्रिय केली धरा समग्र ॥ कीं बलीचे येथें वामन विप्र ॥ पदें त्रिभुवन आटीतसे ॥३३॥
घटोद्भवाची तनु धाकुटी ॥ परी तेणें समुद्र सांठविला पोटीं ॥ एकला सूर्य सर्व सृष्टीं ॥ उजेड पाडी प्रतापें ॥३४॥
धनुष्या जवळी आला अर्जुन ॥ पाठीं उभा भीम सेन ॥ कर्ण शल्य दुर्यो धन ॥ देखतां बलहीन जाहले ॥३५॥
तंव तो महावीर पार्थ ॥ धनुष्यासी प्रदक्षिणा करीत ॥ क्षण न लागतां चढवीत ॥ कार्मुका गुण हेला मात्रें ॥३६॥
स्मरू नियां रुक्मिणीरमण ॥ वेगें घेतले पंचबाण ॥ प्रथम शरें यंत्र भेदून ॥ मत्स्य नयन उडविला ॥३७॥
जाहला एकचि जय जय कार ॥ विमाना मधूनि पुरंदर ॥ वर्षत सुमन संभार ॥ होत गजर दुंदुभींचा ॥३८॥
तंव द्रौपदी पद्मनयनी ॥ करिणी खालीं उतरोनी ॥ पार्थाचे गळां नेऊनी ॥ दिव्य माला घालीतसे ॥३९॥
द्रुपद परिवारासी आज्ञा करी ॥ ब्राह्यण रक्षा रे बरव्यापरी ॥ राजे उठतील झुंझारीं ॥ अनर्थ पुढें दिसतसे ॥४०॥
मग पार्थ म्हणे धर्मासी ॥ द्रौपदीसी न्यावें कुंतीपाशीं ॥ नकुल सह देव घरासी ॥ याज्ञ सेनीसी नेते जाहले ॥४१॥
तों उठावले अवघे नृपवर ॥ म्हणती छेदा द्रुपदाचें शिर ॥ अपमानूनि राज कुमार ॥ नवरी दिधली भणंगातें ॥४२॥
अवचित यंत्रीं भेदिला बाण ॥ आम्ही न म्हणों हें शरसंधान ॥ आतां झुंजोनि निर्वाण ॥ हिरोनि घ्यावी नोवरी ॥४३॥
कौरवांसी क्रोध फार ॥ सोडिती शरांचे पूर ॥ म्हणती राज कन्या नेती विप्र ॥ लाज गेली आमुची ॥४४॥
द्रुपद राज भय भीत ॥ ब्राह्मणस भेमाजी लप ॥ विप्र थरथरां कांपत ॥ वाट नाहीं पळा वया ॥४५॥
मग हांसूनि बोले भीम सेन ॥ स्वस्थ असा सकल ब्राह्मण ॥ सुखें करा वेदाध्ययन ॥ निश्चिंत मन करू नियां ॥४६॥
विशाल वृक्षातलीं बैसले ब्राह्मण ॥ तोचि वृक्ष भीमें उपडोन ॥ कल्पांतक हांक फोडून ॥ झाडून घेतला खांद्या वरी ॥४७॥
मनांत म्हणे पांचाल ॥ हा केवळ दिसतो काळ ॥ भीम किंवा वाटे सबळ ॥ हनुमंतचि प्रकटला ॥४८॥
पांडव वांचले लाक्षा सदनीं ॥ किंचित ध्वनि ऐकिली कर्णीं ॥ ब्राह्मण म्हणती मौन धरूनी ॥ उगाचि पहावें नावेक ॥४९॥
धनुष्यासी बाण लावून ॥ वैरियांसी पाचारी अर्जुन ॥ तों बलरामारी श्री कृष्ण ॥ संकेतें खूण दाखवीत ॥५०॥
म्हणे हा पार्था पाठां भीम सेन ॥ पहिले धर्म नकुल सह देव जाण ॥ हे देखिले मागु त्यान ॥ धन्य धन्य आजि जाहलों ॥५१॥ आतां या पांडवांहातीं ॥ निष्कंटक करवीन क्षिती ॥ येथें आल्या निश्चितीं ॥ लाभ हाचि आम्हांसी ॥५२॥
यांसी एकांतीं भेटावें जाऊन ॥ तों येथें मांडलें घोर रण ॥ मुकुंद आणि रेवतीर मण ॥ कौतुक पाहती दुरू नियां ॥५३॥
तों क्रोधें बोले दुर्यो धन ॥ जीवें मारा हे दोघे ब्राह्मण ॥ द्रुपद आणि धृष्टद्युन्म ॥ शिरें छेदा यांचीं रें ॥५४॥
भोंवतीं वेढिले भीमार्जुन ॥ सोडिती शक्ति शस्त्रें बाण ॥ चतुरंग दल लोटोन ॥ आलें तेव्हां दोघांवरी ॥५५॥
वृक्ष घेऊनि वृकोदर ॥ करीत उठला सर्व संहार ॥ कोटयनुकोटि अश्व कुंजर ॥ वृक्ष घायें मारिले ॥५६॥
पाय दळ आणि रथ ॥ वृक्ष घायें चॄर्ण करीत ॥ हाहाकार जाहला तेथ ॥ म्हणती कृतान्त क्षोभला ॥५७॥
कौरव भार गेले संहारून ॥ तंव शर सोडीत धांवला कर्ण ॥ देखोनि पार्थें मांडिलें ठाण ॥ वर्षे पर्जन्य बाणांचा ॥५८॥
म्हणती एक काल एक कृतान्त ॥ कीं एक विष्णु एक उमाकान्त ॥ आमुचे गर्व हरा वया समस्त ॥ येणें रूपें अवतरले ॥५९॥
तों बाणत्रय सोडून ॥ ह्रदयीं खिळिला वीर कर्ण ॥ पार्थाचें संधान देखोन ॥ गर्व हरला कौरवांचा ॥६०॥
मग बोलिला वीर कर्ण ॥ ब्राह्मणा तुझा गुरु कोण ॥ भार्गव किंवा जानकी जीवन ॥ द्रोण कीं अर्जुन सांग पां ॥६१॥
तुम्ही कृत्रिमवेष घेऊन ॥ फिरतां होऊनि ब्राह्मण ॥ सत्य बोलावें वचन ॥ ऐकतां अर्जुन हांसत ॥६२॥
म्हणे रे युद्ध सांडोनि गोष्टी ॥ मांडिली या रणतळवटीं ॥ गुरु प्रसादें हे अखिल सृष्टी ॥ निष्कंटक करीन मी ॥६३॥
भार्गवे तुज विद्या दिधली पाहीं ॥ तो आजि झाडा दे लवलाहीं ॥ ऐसें उत्तर ऐकतां हृदयीं ॥ कर्ण बहुत दचकला ॥६४॥
प्रेत कळा ते अवसरीं ॥ आली कौरवांचे मुखा वरी ॥ रथ मुरडिले झडकरी ॥ शिबिराकडे तेधवां ॥६५॥
तों येरीकडे ते अवसरीं ॥ शल्य धांवला भीमावरी ॥ शूल टाकिला झडकरी ॥ तो ह्रदया वरी आदळला ॥६६॥
भीमें तरुवर भोवंडिला ॥ शल्याचे पृष्ठावरी मोडिला ॥ मग मल्लयुद्ध ते वेळां ॥ चार घटिका जाहलें ॥६७॥
मग भीमें अद्भुत केलें ॥ शल्यासी बळें उचलिलें ॥ गगनीं नेऊनि टाकिलें ॥ पृथ्वी वरी तयासी ॥६८॥
भूमीवरी उताणा पडत ॥ भीमें वक्षः स्थलीं दिधली लात ॥ मागुती उचलोनि पुसत ॥ ब्राह्मणांसी वृकोदर ॥६९॥
याचा घेऊं आजि प्राण ॥ किंवा देऊं जीवदान ॥ विप्र म्हणती दे सोडून ॥ धर्म मारील पुढें यासी ॥७०॥
मग लाथ देऊनि पृष्ठावरी ॥ भीमें सोडिला ते अवसरीं ॥ पाठ देऊनि शल्य झडकरी ॥ कौरव भारांत मिसळला ॥७१॥
पांचालपुर दूर सोडून ॥ एक योजनावरी राहिले जाऊन ॥ म्हणती ब्राह्मण आहेत कोण ॥ मना आणून मग जाऊं ॥७२॥
वरकड आले होते जे नृपती ॥ ते आपापल्या देशीं जाती ॥ म्हणती पांडवचि हे होती ॥ एवढी शक्ति आणिकां कोणां ॥७३॥
असो पांडव घेऊनि द्रौपदीसी ॥ येते जाहले कुंतीपाशीं ॥ म्हणती उत्तम भिक्षा आम्हांसी ॥ माते मिळाली जाण पां ॥७४॥
माता म्हणे वांटून ॥ पांच जण घ्या समान ॥ बाहेरी पाहे जंव येऊन ॥ तंव याज्ञ सेनी देखिली ॥७५॥
म्हणे न कळतां बोलिल्यें वचन ॥ मग म्हणे पुत्रां लागून ॥ माझें वचन न मानावें प्रमाण ॥ द्रौपदी अर्जुन वधूवरें ॥७६॥
अर्जुन म्हणे माते प्रती ॥ तुझी असत्य नव्हे वचनोक्ती ॥ यावरी व्या सदेव तेथें येती ॥ ते करिती प्रमाण तें ॥७७॥
तंव संकर्षण आणि श्रीपती ॥ उभे ठाकले येऊनि एकांतीं ॥ पितृभगिनीसी वंदिती ॥ आलिंगिती पांचां जणां ॥७८॥
धर्मासी म्हणे द्वारकाधीश ॥ तुम्हीं भोगिले बहुत क्लेश ॥ तरी दुर्जन पावतील नाश ॥ तुम्ही स्वस्थानास जाल सुखें ॥७९॥
ऐसें बोलोनि यादवराणा ॥ गुप्तरूपें गेला स्वस्थाना ॥ पांडवीं करूनि भिक्षाटना ॥ भोजन केलें ते दिवशीं ॥८०॥
तों रात्रींमाझीं गुप्तहेर ॥ धृष्टद्युन्में ठेविले सत्वर ॥ ते घेऊनि आले समाचार ॥ जें जें बोलिले रजनींत पैं ॥८१॥
म्हणती ते नव्हती ब्राह्मण ॥ ते महाक्षत्रिय प्रलयाग्न ॥ चार्‍ही प्रहर युद्धावांचून ॥ गोष्टी नाहीं ऐकिल्या ॥८२॥
द्रुपद शोक करी बहुत ॥ म्हणे भणंगीं कन्या नेली अकस्मात ॥ त्यांचा वर्णही न कळे सत्य ॥ चार्‍ही वर्णांत कोण तो ॥८३॥
द्रौपदी ऐसें दिव्य रत्न ॥ कोण भिकारी गेले घेऊन ॥ लोकां माजी निंद्य पूर्ण ॥ शोक दारूण राव करी ॥८४॥
पुत्र म्हणे ताता अवधारीं ॥ म्यां हेर पाठविले होते रात्रीं ॥ ते आहेत महाक्षत्री ॥ निर्धार आम्हीं केला हा ॥८५॥
त्यांचे संगतीं आहे माता ॥ मज वाटतें पांडवचि तत्त्वतां ॥ तों द्रुपद म्हणे रे सुता ॥ मजही गमतें तैसेंचि ॥८६॥
मग धृष्टद्युन्म आणि पुरोहित ॥ सवें घेऊनि अश्व गज रथ ॥ कुलाल शाले पर्यंत ॥ महोत्साह करीत आले ॥८७॥
पृथे सहित पांचही जण ॥ वंदूनि तेव्हां धृष्टद्युन्म ॥ म्हणे राव पाहूं इच्छी चरण ॥ तेथवरी आपण चलावें ॥८८॥
पांचही जण अवश्य म्हणती ॥ एके रथीं बैसे द्रौपदी कुंती ॥ पांचही जण आरूढती ॥ रथावरी वेगळाले ॥८९॥
इकडे राजद्वारा पर्यंत ॥ अपार ठेविलें वस्तुजात ॥ नाना उदमी बैसत ॥ वस्तु अद्भुत दाविती ॥९०॥
सकल अव्हेरूनि पंडुकुमार ॥ जेथें रचिले होते शस्त्रभार ॥ तेथें नावेक राहिले स्थिर ॥ शस्त्र परीक्षा करा वया ॥९१॥
धृष्टद्युन्म म्हणे हे क्षत्रिय सत्य ॥ ब्राह्मण नव्ह्ती यथार्थ ॥ असो पावले राज मंदिरांत ॥ भद्रीं बैसत धर्मराव ॥९२॥
मर्यादा अत्यंत धरून ॥ बंधू पाठीशीं चौघे जण ॥ शोक भय विस्मय पूर्ण ॥ किंचित नाहीं तयांलागीं ॥९३॥
द्रुपदाची संपदा अपार ॥ त्यांचे द्दष्टींत नाहीं साचार ॥ गुप्तरूपें पाहे नृपवर ॥ म्हणे राजे निर्धारें हे होती ॥९४॥
यावरी द्रुपदाची राणी ॥ मस्तक ठेवी कुंतीचे चरणीं ॥ द्रौपदी सहित गृहांत नेऊनी ॥ वस्त्रा भरणीं पूजीत ॥९५॥
मग द्रुपदराज येऊन ॥ पांडवांसी भेटे प्रीती करून ॥ देऊ नियां क्षेमा लिंगन ॥ पांचही जणां संतोष विलें ॥९६॥
द्रुपदें सुहृद मेळवून ॥ पाडवां सहित केलें भोजन ॥ एके पंक्तीं सारिलें पूर्ण ॥ षड्रसान्नें न वर्ण वती ॥९७॥
भोजन जाहलिया त्रयोदश गुणी ॥ विडे बैसले घेऊनी ॥ मग द्रुपद कर जोडूनी ॥ धर्मरायासी विनवीत ॥९८॥
म्हणे कवण याति कवण कुल ॥ कवण देश कवण स्थल ॥ सांगो नियां वृत सकल ॥ मज मेळवा आपणांत ॥९९॥
मग हांसोनि धर्म बोलत ॥ हस्ति नापुरींचा पंडुनृपनाथ ॥ तयाचा हा ज्येष्ठ सुत ॥ धर्म राज जाण मी ॥१००॥
हे भीमार्जुन नकुल सहदेव ॥ परद पुरुषार्थी बलार्णव ॥ ज्यांशीं समरांगणीं हांव ॥ कालही धंरू शकेना ॥१०१॥
धनुर्धरां माजी निपुण ॥ पूर्वीं भार्गव किंवा रघुनंदन ॥ त्यावरी भीष्म द्रोण ॥ पांचवा अर्जुन हा एक ॥१०२॥
श्री कृष्ण कृपेचें बल पूर्ण ॥ आणि पितृव्य विदुराचा प्रयत्न ॥ तेणें काढिलें जोहरांतून ॥ कृपा पूर्ण बाल कांवरी ॥१०३॥
त्या विदुराचे उपकार ॥ बहुत जन्में न पडे विसर ॥ महाराजा कृष्ण कृपापात्र ॥ त्रिकाल ज्ञानी तो होय ॥१०४॥
कुंती निजमाता हे जाण ॥ आम्हीं हिंडविली वनोपवन ॥ असो तुम्हां पुण्य पुरुषांचें दर्शन ॥ पुण्यें करून जाहलें ॥१०५॥
ऐसें ऐकतां उत्तर ॥ जाहला एकचि जय जय कार ॥ द्रुपद धांवोनि चरण सत्वर ॥ धरिता जाहला धर्माचे ॥१०६॥
प्रेमें दिधलें आलिंगन ॥ नेत्रीं वाहे अश्रु जीवन ॥ म्हणे कौरव परम दुर्जन ॥ कापटय सागर दुरात्मे ॥१०७॥
आतां तुमचे निमित्तें करून ॥ जीतचि कौरव आणीन धरून ॥ क्रोधें बोले धृष्टद्युन्म ॥ शिरें छेदीन तयांचीं ॥१०८॥
देखोनि पांडव जामात ॥ द्रुपदाचा हर्ष न मावे गगनांत ॥ मग पाहूनियां सुमुहूर्त ॥ लग्न तेव्हां धरियेलें ॥१०९॥
धर्म म्हणे द्रुपदराया ॥ आम्हां पांचांची एक जाया ॥ द्रुपद शंका ऐको नियां ॥ म्हणे अघटित घडे हें ॥११०॥
संकट पडलें द्रुपदाला गून ॥ तों कृष्ण आणि कृष्ण द्वैपायन ॥ कृष्णा पांचासी द्यावया पूर्ण ॥ निश्चय करूं पातले ॥१११॥
पांडव आनंदें पूर्ण ॥ धांवोनि वंदिती व्यास चरण ॥ श्री कृष्ण चरण नमून ॥ आलिंगिती अति प्रीतीं ॥११२॥
द्रुपद वंदूनि चरण ॥ म्हणे आज्ञा करा मज लागून ॥ द्रौप दीसी भ्रतार पांच जण ॥ किंवा एक सांगा तें ॥११३॥
बोले सत्यवती ह्रदय रत्न ॥ इणें भ्रतार पांच वेळ दे म्हणोन ॥ आराधो नियां त्रिनयन ॥ पूर्वीं बोलली तप करितां ॥११४॥
प्रसन्न जाहला जाश्वनीळ ॥ घे घे वदे पांच वेळ ॥ यालागीं हे वेल्हाळ ॥ पांचां जणां अर्पावी ॥११५॥
व्यास ऐसी आज्ञा करून ॥ तत्काल पावले अंतर्धान ॥ द्रुपदें मूळ पाठवून ॥ ब्राह्मण राजे पाचारिले ॥११६॥
द्रुपदें जाऊनि सत्वर ॥ यादवां सहित यादवेंद्र ॥ बहुत करूनि आदर ॥ राहविला लग्नासी ॥११७॥
मग अनुक्रमें करून ॥ पांचांसीं लाविलें लग्न ॥ चार दिवस संपूर्ण ॥ उत्साह जाहला अद्भुत ॥११८॥
साडे जाहल्या नृपवर ॥ आंदण देत पांडवांसी अपार ॥ म्हणे हें राज्य तुमचें साचार ॥ मज सहित सर्वही ॥११९॥
गज भरोनि यदुवीर ॥ उत्तम वस्त्रें अलंकार ॥ पांडवांसी अहेर ॥ प्रेम भावें अर्पीतसे ॥१२०॥
पांचां जाणांसी पांच सदनें ॥ अर्पिलीं तेव्हां द्रुपदानें ॥ कृष्णार्जुन प्रसन्न मनें ॥ प्रीतीनें राहती एके गृहीं ॥१२१॥
पांडव जोहरा पासूनि वांचले ॥ द्रुपदाचे जामात जाहले ॥ गुप्त हेर सांगों गेले ॥ कौरवांसी तेधवां ॥१२२॥
जेणें यंत्र भेदिलें पुर्ण ॥ तो महाराज वीर अर्जुन ॥ वृक्ष घायें भेदिलें सैन्य ॥ तोचि भीम ओळखावा ॥१२३॥
ऐकतांचि ऐसी मात ॥ कर्ण दुर्यो धन ह्रदय पिटीत ॥ शकुनि म्हणे झाला अंत ॥ आतां मरण आलें आम्हां ॥१२४॥
दुःशासन रडे धाय मोकलून ॥ म्हणे गळाले करचरण ॥ आतां विचार एक पूर्ण ॥ करा आधीं सत्वर ॥१२५॥
छप्पन्नकोटि यादवां सहित ॥ कृष्ण राम त्यांची पाठी राखीत ॥ सत्रा वेळ धरिला मग धनाथ ॥ तो बळिया अद्भुत बळि भद्र ॥१२६॥
भूरिश्रवा म्हणे ऐका वचन ॥ आतां स्त्रेह वाढवावा पूर्ण ॥ पांडवांसी भेटावें जाऊन ॥ द्रुपदा सहित कृष्णासीं ॥१२७॥
पुढें वाढवाल स्त्रेहादर ॥ तरी मागील विसरती सर्व वैर ॥ स्तुति करितां निंदा अपार ॥ नासे मागील सर्वही ॥१२८॥
पांडवांसी हातीं धरून ॥ न्यावें हस्तिनापुरा  लागून ॥ राज्य विभाग देऊन ॥ सुखरूप नांदवावें ॥१२९॥
ऐकोनि ऐसें वचन ॥ क्रोधावला परम कर्ण ॥ म्हणे गेलियाही प्राण ॥ ऐशी गोष्ट घडेना ॥१३०॥
पांडवांचीं शिरें छेदिल्या विण ॥ आम्ही न जाऊं कदा येथून ॥ ज्यांसी भय वाटेला जाण ॥ त्यांणीं रहावें शिबिरांत ॥१३१॥
कर्णवचनें दुर्यो धन ॥ म्हणे सिद्ध करा सकल सैन्य ॥ मग अवघे रथावरी वैसोन ॥ निज भारेंशीं धांविन्नले ॥१३२॥
वाजती रणतुरें भेरी ॥ गजबजली पांचाल गनरी ॥ कौरव पातले दलभारीं ॥ द्रुपदासी हें कळों आलें ॥१३३॥
द्रुपद म्हणे धृष्टद्युन्मा ॥ शालक पातले तव दर्शना ॥ शस्त्रघायें पृष्ठ गौरवूनि जाणा ॥ कुंजरपुरा बोळवावें ॥१३४॥
पांडवां साहित पांचाल ॥ बाहेरी निघाला तत्काल ॥ रणतुरें वाजतां सकल ॥ कौरव ऐकोन दचकले ॥१३५॥
दोन्ही सैन्यां जाहली भेटी ॥ पांडव असती द्रुपदाचे पाठीं ॥ क्षण एक अवलो किती द्दष्टीं ॥ संग्राम कौतुक कैसें तें ॥१३६॥
दोन्ही दळें सिद्ध जाहलीं ॥ सांग्रामिकांची झुंज लागली ॥ पांचालाचीं दळें दाबिलीं ॥ कौरवीं तेव्हां निजबळें ॥१३७॥
ऐसें देखतां तेव्हां न्य़ून ॥ मनोवेगें धांवले पांच जण ॥ किंवा पंच प्रल्याग्न ॥ ब्रह्माड जाळूं पातले ॥१३८॥
कीं ते पंचादित्य उगवत ॥ जाहले तेजहीन कौरव खद्योत ॥ कीं पंडित देखोनि अद्भुत ॥ मूढ जैसे दचकती ॥१३९॥
प्रत्यक्ष पांडव देखोन ॥ कौरवांचा मद गेला गळोन ॥ परी जय द्रथ आणि कर्ण ॥ पार्थावरी धांवले ॥१४०॥
त्या दोघांचे कुमार दोनी ॥ तेही पुढें धांवले ते क्षणीं ॥ अर्जुनें दोन बाण सोडूनी ॥ शिरें त्यांचीं छेदिलीं ॥१४१॥
देखोनि पुत्राचें मरण ॥ क्रोधें झेंपावला वीर कर्ण ॥ अर्जुनें सोडिले निर्वान बाण ॥ भेदिलें ह्र्दय कर्णाचें ॥१४२॥
तेणें आली गिरगिरी ॥ ध्वजस्तंभीं टेंकला क्षण भरी ॥ वीर श्रीमद ते अवसरीं ॥ गेला सर्व दिगंतरा ॥१४३॥
रथ माघारा काढिला ॥ तों भीमें दुर्योधन ॥ देखिला ॥ लाक्षा गृह आठवूनि ते वेळां ॥ दांत करकरां चावीत ॥१४४॥
क्रोधें वटारू नियां नेत्र ॥ वेगें उपडिला महातरुवर ॥ द्विजपंक्तीनें अधर ॥ रगडोनियां धांवला ॥१४५॥
पाठी देऊनियां कौरव ॥ पळों लागले तेव्हां सर्व ॥ भीम परतला जेथें धर्मराव ॥ पांचाल श्वशुर हांसत ॥१४६॥
पांडव प्रताप पुरुष थोर ॥ रणमदें जाहला कामातुर ॥ कौरव सेना नववधू साचार ॥ श्रृंगारोनि पातली ॥१४७॥
न तगतां युद्ध सुरतीं जाण ॥ पळाली अभिमानवस्त्रें टाकून ॥ असो हस्ती वाजी शिबिरें सांडून ॥ कौरव सर्व पळाले ॥१४८॥
पांचाळें सर्व लुटिलें ॥ आपुल्या नगरा पाठविलें ॥ सर्व पांडव द्रुपद पातले ॥ येऊनि भेटले राम कृष्णां ॥१४९॥
नगरीं जाहला जय जय कार ॥ आनंदलें नगर समग्र ॥ इकडे दीन वदनें कौरव भार ॥ हस्तिनापुरा पातले ॥१५०॥
म्हणती मर मर रे पुरोचना ॥ काय कार्य साधिलें बुद्धि हीना ॥ आपण मरोनि अपयश जाणा ॥ दिधलें आम्हां सर्वांतें ॥१५१॥
ऐसें दुर्यों धन बोलत ॥ कर्ण शकुनि यथार्थ म्हणत ॥ असो विदुरासी समस्त ॥ कळला वृत्तान्त झाला तो ॥१५२॥
धृत राष्ट्रासी सांगे येऊन ॥ तुमची स्त्रुषा झाली द्रौपदी पूर्ण ॥ अंध आनंदला ऐकोन ॥ म्हणे दुर्यो धन भाग्याचा ॥१५३॥
ऋषींनीं आशीर्वाद दिधले ॥ ते दुर्योधनासी सफल जाहले ॥ विदुर म्हणे ऐकें वहिलें ॥ वर्त मान पूर्वींचें ॥१५४॥
लाक्षा गृहा पासून ॥ पांडव वांचले पांच जण ॥ तिहीं पांचालपुरीं प्रकटोन ॥ द्रौपदी जिंकिली प्रतापें ॥१५५॥
मुहूर्त एक तटस्थ ॥ अंध राहिलासे निवान्त ॥ मग म्हणे भाग्य अद्भुत ॥ पांडव माझे वांचले ॥१५६॥
आतां यांचें त्यांचें सख्य गोड ॥ विदुरा तूं करीं एवढें सुघड ॥ येरू म्हणे बुद्धि सुद्दढ ॥ हेचि तुझी असों दे ॥१५७॥
कृष्ण कृपेच्या बळें जाण ॥ शत्रूंचीं कृष्णाननें करून ॥ कृष्णा वरिली हें कथन ॥ ऐकतां दग्ध दोष होती ॥१५८॥
विदुर नसतां सुयो धन ॥ जन कापाशीं एकांतीं येऊन ॥ म्हणे विदुराचे विचारीं मन ॥ न घालीं तूं सहसाही ॥१५९॥
द्यावा राज्य विभाग धन ॥ क्षणक्षणां बोधील विदुर येऊन ॥ तुवां आश्रय न द्यावा पूर्ण ॥ महाकपटी असे तो ॥१६०॥
जोहरांत वांचले पंडूनंदन ॥ ते आम्हां लावितील अग्न ॥ त्यांच्य़ा वधालागीं प्रयत्न ॥ करूं आतां अनेक ॥१६१॥
दुर्योंधनासी अंध म्हणत ॥ हेंचि आहे माझ्या मनांत ॥ मी विदुरा देखतां सत्य ॥ लटिकेंचि स्तवितों पांडवां ॥१६२॥
दुर्योधन म्हणे मंत्री धाडावे ॥ द्रुपद याज्ञ सेनांसी बोधावें ॥ पांडव तेथेंचि ठेवावे ॥ कदा न आणावे गजपुरा ॥१६३॥
येथें आणितां अपाय निश्चितीं ॥ ऐसा धाक घालावा चित्तीं ॥ राज्य विभाग न मागती ॥ ऐसें करूनि ठेवावें ॥१६४॥
हळूचि फोडावा याज्ञा सेन ॥ एके स्त्रीसी भ्रतार पांच जण ॥ तेथें कलह उपजे पूर्ण ॥ भोग निमित्तें भिडतां पैं ॥१६५॥
दावूनि विभाग वैभव ॥ फोडावे नकुल सहदेव ॥ नाना यत्न दावूनि भाव ॥ घात करावा तिघांचा ॥१६६॥
धर्म बापुडें नपुंसक ॥ त्याचा आम्हांसी नाहीं धाक ॥ ते भीमाचे बळें देख ॥ तृपप्राय आम्हां करिताती ॥१६७॥
एक मरतां भीम सेन ॥ कर्णासी मग तृण प्राय अर्जुन ॥ कृष्णाचें कपटें आर्जव करून ॥ त्यागवावे पांडव ॥१६८॥
मग बोलिला वीर कर्ण ॥ मागें तुम्हीं केले बहुत यत्न ॥ ते सर्वही निष्फल होऊन ॥ वैर वाढलें शत गुणें ॥१६९॥
द्रौपदी आणि पंडूनंदन ॥ कृष्णासी आवडती प्राणांहून ॥ पांचाल आणि याज्ञ सेन ॥ सर्व स्वेंही तयांचे ॥१७०॥
युद्ध करावें बळें करून ॥ हें राज्य रक्षावें संपूर्ण ॥ आपुला क्षत्रिय धर्म सोडून ॥ अन्य कार्य न साधावें ॥१७१॥
बोलावूनि भीष्म द्रोण ॥ त्यांसी पुसे अंबिकानंदन ॥ ते म्हणती विरोध टाकून ॥ पंडुनंदन आणावे ॥१७२॥
स्वार्थ सारिखाचि देख ॥ तुम्ही भोगितां ऐश्वर्य सुख ॥ पांडवीं मागावी भीक ॥ बरवा विवेक मांडिला ॥१७३॥
आतां तरी समजावूनी ॥ पांडव आणा मानें करूनी ॥ अर्ध राज्य त्यांसी देऊनी ॥ सुखें नांदा समस्त ॥१७४॥
पाठवा चतुर प्रधाना प्रती ॥ द्रुपदराज घेऊनि हातीं ॥ मुख्य गोष्ट रुक्मिणीपती ॥ सखा करावा सर्वखें ॥१७५॥
कर्ण म्हणे हें बरवें ज्ञान ॥ गृहांत सोडावे सर्प आणून ॥ सदनासी लावूनि कृशान ॥ मग सुखी कैसें निजावें ॥१७६॥
व्याघ्र पाळावे धेनूंत ॥ भुजंग सोडावे मूषकांत ॥ तैसे पांडव आणूनि येथ ॥ कौरव पाताळीं घालावे ॥१७७॥
न्यायनिष्ठुर बोले विदुर ॥ म्हणे कुटिलाचे तर्क फार ॥ राया ऐकसी याचा विचार ॥ तरी अनर्थ पुढें असे ॥१७८॥
पंडुसुत येथें आणितां ॥ क्षेमकल्याण तुझिया सुतां ॥ तुझी निर्मल कीर्ति तत्त्वतां ॥ दिगंतरीं जाईल ॥१७९॥
वृकोदरें वधिला हिडिंबासुर ॥ एकचक्रीं मारिला बाकासुर ॥ स्वयंवरीं राजे विभांडिले समग्र ॥ देशिकाचे प्रतापबळें ॥१८०॥
युद्ध सांडोनि बळिया पुढें ॥ कां पळोनि आलेती इकडे ॥ अंधा तुज भोंवतीं कोडें ॥ गोष्टी सांगोन रिझविती ॥१८१॥
युद्ध करिते पांडवांसीं ॥ तरी मृत्यें आवंतिलें होतें सर्वांसी ॥ मग धृतराष्ट्र म्हणे विदुरासी ॥ रथीं बैसावें सत्वर ॥१८२॥
भेटोनि पांचाल नृपती ॥ धृष्टद्युन्मा सहित निश्चितीं ॥ अहेर ॥ अलंकार सर्वां प्रती ॥ देऊ नियां गौरवावें ॥१८३॥
दिव्य वस्त्रीं दिव्या भरणीं ॥ शृंगारावी याज्ञ सेनी ॥ सकल स्त्रुषां सहित द्रुपदराणी ॥ गौरवावी आदरें ॥१८४॥
नमस्कारूनि कुंतीस ॥ स्त्रेह शब्दें पूजावी तीस ॥ माझें आशीर्वचन पांडवांस ॥ अत्यादरें सांगिजे ॥१८५॥
श्री कृष्णासी भेटोन ॥ साष्टांग सांगें माझें नमन ॥ पांडव आणीं आणीं बुझावून ॥ येथवरी दयाळा ॥१८६॥
आज्ञा होतांचि विदुर ॥ रथीं बैसला जाऊनि सत्वर ॥ पाचालपुर महानगर ॥ वेगें केलें जवळी पैं ॥१८७॥
दूत सांगती पांडवां प्रती ॥ विदुर येतो बैसोनि रथीं ॥ ऐकतां सप्रेमचित्तीं ॥ पांडव धांवती सामोरे ॥१८८॥
दुरूनि देखतां विदुर ॥ रथवरूनि उतरले पंचवीर ॥ घालिती भूमीवरी नमस्कार ॥ नयनीं नीर लोटलें ॥१८९॥
रथाखालीं उतरे विदुर ॥ उचंबळे स्त्रेह समुद्र ॥ आलिंगिले पांच पुत्र ॥ पंडुरायाचे प्रीतीनें ॥१९०॥
धर्म म्हणे विदुरासी ॥ किती आठवूं उपकारांसी ॥ ठायीं ठायीं रक्षिलेंसी ॥ बालकांसी स्त्रेहाळा ॥१९१॥
पांचाल येऊनि सामोरा ॥ ग्रामांत घेऊनि गेला विदुरा ॥ तों द्दष्टीं देखिलें यादवेंद्रा ॥ जग द्नुरु जगदात्मया ॥१९२॥
लोटांगण घाली विदुर ॥ उचंबळला कृपा समुद्र ॥ ह्रदयीं धरिला प्रियकर ॥ वाटे सहसा न सोडावा ॥१९३॥
मग एकान्त गृहीं बैसोन ॥ विदुरें सांगितलें वर्त मान ॥ चला स्वस्थानासी येथून  ॥ मनीं अनमान न धरावा ॥१९४॥
धर्म म्हणे स्वामी जगज्जीवन ॥ तो करील तेंचि आम्हां प्रमाण ॥ आणि विदुरा तुझेंडी वचत ॥ शिरीं वंदीन वेदाऐसें ॥१९५॥
कुंतीसी नमस्कारूनि विदुर ॥ सांगे सर्व समाचार ॥ धृतराष्ट्रें प्ररर्थिलें फार ॥ घेऊनि कुमार तेथें यावें ॥१९६॥
कुटुंबा सहित द्रुपद नृपवर ॥ वस्त्रा भरणीं गौरवी विदुर ॥ द्रौपदी श्रृंगारिली सत्वर ॥ करी नमस्कार वडिलांतें ॥१९७॥
द्रुपद आणि याज्ञा सेन ॥ यांसी विदुर सांगे विदुर सांगे वर्तमान ॥ चला पांडवांसी घेऊन ॥ स्थापूं नेऊन निजपदीं ॥१९८॥
मग बोले जगज्जीवन ॥ निघावें सुमुहूर्त पाहून ॥ मीही समागमें येईन ॥ विदुर ऐकोन आनंदला ॥१९९॥
स्थला आपुल्या जाती पांडव ॥ ते कथा आहे अभिनव ॥ परिसोत पंडित चतुर सर्व ॥ ब्रह्मानंदें करू नियां ॥२००॥
श्री धर स्वामी ब्रह्मा नंदा ॥ पांडुरंगा पुंडली कवरदा ॥ रुक्मिणी ह्रदय कम मिलिंदा ॥ स्वानंद कंदा अभंगा ॥२०१॥
सुरस पांडवप्रताप ग्रंथ ॥ आदिपर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ द्वादशाध्यायीं कथियेला ॥२०२॥
स्वस्ति श्री पांडव प्रताप ग्रंथ ॥ आदिपर्वटीका श्री धर कृत ॥ द्रौपदी स्वयंवर युद्ध बहुत ॥ विदुर पांडव भेटले ॥२०३॥
इति श्री श्रीधर धरकृतादिपर्वणि द्वादशाध्यायः ॥१२॥
श्री कृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 08, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP