मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप| अध्याय २२ वा पांडवप्रताप मंगलाचरण अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय २० वा अध्याय १९ वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा पांडवप्रताप - अध्याय २२ वा पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास. Tags : granthapandavapratappothiग्रंथपांडवप्रतापपोथी अध्याय २२ वा Translation - भाषांतर ॥ श्री गणेशाय नमः ॥ संपदा राज्य सुख अपार ॥ देऊनि बोळविले पंडुकुमार ॥ हें देखोनि कौरव थोर ॥ संतापले मानसीं ॥१॥भयभीत जाहले मनीं ॥ सकल दुर्जन मिळोनी ॥ म्हणती महासर्प दुखवोनी ॥ ह्रदयीं कंठीं धरियेले ॥२॥तैसें वृद्धें केलें निश्चित ॥ राज्य सेना सेना शस्त्रां सहित ॥ पांडव सोडिले जीवें जित ॥ केला अनर्थ अंधानें ॥३॥सुयोधन दुःशासन कर्ण शकुनी ॥ वृद्धाप्रति सांगती येऊनी ॥ त्वां हे काय केली करणी ॥ कुलहानि मांडिली ॥४॥दोन डाव उरले असती ॥ तेणें धाडूं तयां वनाप्रती ॥ अज्ञातवास मागुती ॥ तेरावें वर्ष नेमावा ॥५॥प्रकट जाहलया किंचित ॥ मागुती तेरा वर्षेंपर्यंत ॥ नष्टचर्य भोगिती यथार्थ ॥ पुनः पुनः तैसेचि ॥६॥आतां पांडव आणितां येथ ॥ धृतराष्ट्र म्हणे दिसतो अनर्थ ॥ गांधारी म्हणे यथार्थ ॥ बुडविलें दुर्योधनें ॥७॥सोमद्त्त बाल्हीक द्रोण ॥ भीष्म विदुर गुरु नंदन ॥ कृपाचार्य भुरिश्रवा विकर्ण ॥ म्हणती अनर्थ पुढती हा ॥८॥दुर्योधन म्हणे ऐसी नीती ॥ वैरी वधावे नानायुक्तीं ॥ अपाय योजोनि पुढती । वनवासासी धाडावे ॥९॥अंध म्हणे जे होणार ॥ तें कालत्रयीं चुकेना साचार ॥ मग प्रातिकामी सारथि पुत्र ॥ धाडी सत्वर बोलावूं ॥१०॥तो धांवोनि पांडवां सांगत ॥ फिरा मागुती खेळा द्यूत ॥ आपुली आण निश्चित ॥ अंबिकासुतें घातले ॥११॥तुम्हांसी पितृवचन प्रमाण ॥ घ्यावें पितयाचें दर्शन ॥ मग बोलती भीमार्जुन ॥ कां हो दुर्जन फिरविती ॥१२॥काय योजिला अनर्थ ॥ कीं करूं पाहती प्राणान्त ॥ धर्म म्हणे हे अद्भुत ॥ श्री कृष्णमाया नेणवेचि ॥१३॥उतरावया भूभार ॥ अवतरला हो यादवेंद्र ॥ पंडव करूनि निमित्तमात्र ॥ दुष्ट संहारूं इच्छितो ॥१४॥कपट द्यूत जे तुटलें ॥ तें पुनः सांधा वया बोलाविलें ॥ न घें म्हणतां न सु टे वहिलें ॥ जें कां लिहिलें विधीनें ॥१५॥अधर्मस भेसी परतोन ॥ पांडव आले पांचही जण ॥ उभे ठाकले दुर्जन ॥ देऊनि मान बहुवस ॥१६॥धर्मासी म्हणे शकुनी ॥ चला डाव खेळूं मागुत्यानी ॥ आम्हांसी हारी आली ये क्षणीं ॥ नेमवाणी ऐक पां ॥१७॥वल्कलें मृगचर्में वेष्टून ॥ द्वादश वर्षें वनवास सेवून ॥ तेरावे वर्षीं जाण ॥ आज्ञातवास निर्धारें ॥१८॥प्रकट झालिया अवधारा ॥ पुढती वनवास वर्षें बारा ॥ मग यावें आपुल्या नगरा ॥ हाचि निर्धार तुम्हां आम्हां ॥१९॥धर्मराज विचारी मनीं ॥ जरी माघार घ्यावी ये क्षणीं ॥ तरी पुरुषार्था होय हानी ॥ आणि हे करणी ईश्वराची ॥२०॥धर्म दोन वेळां फांसे ढाळीत ॥ शकुनि जिंकिलें रे धर्मा म्हणत ॥ दुर्योधन गदगदां हांसत ॥ एकचि टाळी पिटियेली ॥२१॥कर्णासी सुख अपार ॥ म्हणे ध्वज उभारा सत्वर ॥ जयवाद्यांचा गरज ॥ राजभेरी ठीकिल्या ॥२२॥कौरव गर्जती जय जय करीं ॥ राज्य जाहलें एक छत्री ॥ दीन वदन ते अवसरीं ॥ पांडव दिसों लागले ॥२३॥काळवंडला आदित्य ॥ सुटला क्रोधें प्रलयवात ॥ थरथरां उर्वी कांपत ॥ उल्कापात जाहला ॥२४॥आकाशांतूनि अवधारा ॥ पडती तेव्हां तक्तधारा ॥ वृद्ध वृद्ध म्हणती धरा ॥ निर्वीर होईल यावरी ॥२५॥पांडवांसी म्हणे दुःशासन ॥ आतां करा वनासी प्रयाण ॥ अवदशा आली तुम्हां पूर्ण ॥ काय कारण नगरां ॥२६॥फेडा वस्त्रें अलंकार ॥ वल्कलें वेष्टावीं सत्वर ॥ काळीं वदनें करूनि साचार ॥ रक्षा लावा सर्वांगीं ॥२७॥नपुंसकें तुम्ही निर्बळें ॥ जैशी तिळांचीं शुष्क कोळें ॥ कीं व्याघ्रचर्में विशाळें ॥ प्राणहीन पसरलीं ॥२८॥अर्कतूल विगतधवा वंध्या विधुर ॥ भग्न भाजन वृक्ष खाकर ॥ श्मशान भूमि अकालमेघ निर्धार ॥ तैसेचि व्यर्थ तुम्हीही ॥२९॥जैसें अजाचें गललां गूल ॥ तैसे तुम्ही दिसतां केवळ ॥ कीं नपुंसक निष्फळ ॥ वनीं दरिद्रीप्रेत पडियेलें ॥३०॥द्रौपदीसी म्हणे दुःशासन ॥ वनवास ॥ परम कठिण ॥ दुर्योधनाची स्त्री होऊन ॥ शरीर अर्पीं तयातें ॥३१॥आम्ही बंधु एकशत ॥ मना आवडे तो वरीं त्वरित ॥ नपुंसक दरिद्री समस्त ॥ पांडव दूरी करीं पैं ॥३२॥हें ऐकोनि भीम सेन ॥ सिंहा ऐसा बोले गर्जोन ॥ ह्या बोल विषत रूचीं फळें जाण ॥ प्राप्त तुम्हां होतील पैं ॥३३॥मर्यादा सांडोनि येथ ॥ बोलसी दुष्टा विपरीत ॥ तूम माजलासी बहुत वस्त ॥ शरीर पुष्ट जाहलें तुझें ॥३४॥द्वारावतीची भवानी ॥ चतुर्भुज श्री कृष्णरूपिणी ॥ तिसी नवस केला आजिपा सोनी ॥ वनींहूनि आलिया ॥३५॥द्वेषाग्नि प्रज्वळेल प्रचंड ॥ रण मंडल तें होमकुंड ॥ तूं तेथें बस्त खंडविखंड ॥ गात्रें तुझीं करीन मी ॥३६॥प्रथम तुझें अवदान ॥ मग एकापाठीं एक शत जाण ॥ शेवतीं हा बस्तु दुर्योधन ॥ समर्पीन पूर्णाहुती ॥३७॥पक्षपाती जे तुमचे संपूर्ण ॥ ते गदाघायें करीन चूर्ण ॥ सूर्य सुताचें सदन ॥ पाहूं धाडीन समस्तां ॥३८॥तुम्ही शब्द शस्त्रें करा ताडण ॥ लोहशस्त्रें आम्ही फेडूं उसण ॥ जिव्हा छेदूनि उपडीन ॥ हस्त तुझे रणांगणीं ॥३९॥या शब्दांची आठवण ॥ देऊनि घेईन तुमचे प्राण ॥ हें ह्रदय पत्रीं लिहून ॥ ठेवा तुम्ही रासभ हो ॥४०॥असो यावरी वेष्टूनि वल्कलें ॥ वना जावया उदित जाहले ॥ नगर दुर्गावरी चढले ॥ कौरव कौतुक पाहावया ॥४१॥पांडव पायीं चालत ॥ गाय द्रौपदी कौरव म्हणत ॥ पांच पोळ हे धांवत ॥ गायीपाठीं एक सरां ॥४२॥मोकळे केश सोडूनी ॥ रडत जाय याज्ञ सेनी ॥ भीम वारंवार परतोनी ॥ कौरवांकडे पाहातसे ॥४३॥सिंहावलोकनें करून ॥ परतोनि पाहतां भीम सेन ॥ दुर्योधन वांकडे पाय करून ॥ उपहासीत वृकोदरा ॥४४॥सुयोधनासी म्हणे भीम सेन ॥ तुझे शिराचा कंदुक करून ॥ चेंडूफळी मी खेळोन ॥ निववीन मन अंधाचें ॥४५॥मी व्याघ्र भीम सेन ॥ दुःशा सनाचा कंठ फोडून ॥ आधीं करीन रक्तपान ॥ मग उटी घेईन सर्वांगीं ॥४६॥तें रक्त चर्चूनि हस्तीं ॥ पांचाळीचे केश मोकळे रुळती ॥ मग देऊनि तयांसी ग्रंथी ॥ वीरगुंठी बांधीन ॥४७॥सूर्य मार्ग चुकेल करितां भ्रमण ॥ नेत्रीं अंधत्व पावेल अग्न ॥ मशकाची थडक लागून ॥ जरी मेरु पडेल पैं ॥४८॥पाषाण प्रहार लागूर ॥ वायु पडेल मोदोनि चरण ॥ पिपीलिका शोषील सिंधुजीवन ॥ कीं विजेसी जाऊन मशक धरी ॥४९॥भडभडित अग्निज्वाळ ॥ कर्पूरतुषारें होईल शीतळ ॥ हेंही घडेल एक वेळ ॥ परी वचना चळ नव्हे माझे ॥५०॥यावरी आवेशें बोले पार्थ ॥ करीन कर्णाचा निःपात ॥ शिर भोंवंडीन आकाशांत ॥ तरीच सुत पंडूचा ॥५१॥मागें निंदा बोलती तोंडें ॥ त्यांचीं करीन शतखंडें ॥ कौरवांचीं उडवीन मुंडें ॥ कंदुका ऐसीं आकाशीं ॥५२॥मृगें द्राची निंदा देख ॥ करिती मागें जंबुक ॥ अलिका म्हणे विनायक ॥ धरूनि आणीन क्षणार्धें ॥५३॥तृणपुतळे मिळोनि बहुत ॥ वडवानलासी धरूं म्हणत ॥ ह्रदयीं भावी खद्योत ॥ आसडोनि आदित्य पांडू खालीं ॥५४॥शलभ बहुत मिळोनी ॥ वीज घालूं म्हणती वदनीं ॥ मृत्तिकेचा गज धांवोनी ॥ सागर शोषूं भावीत ॥५५॥परम कुमती जो बलहीन ॥ मागें निंदा जल्पे रात्रंदिन॥ समर भूमीसी पळे उठोन ॥ हें तों लक्षण श्वानाचें ॥५६॥सहदेव बाहू पिटून ॥ म्हणे रे शकुनि सावधान ॥ मीच ग्राहक असें जाण ॥ प्राणांसी तुझ्या निर्धारें ॥५७॥बहुत फांसे ढाळिले जाण ॥ तितुके अंगीं भेदीन बाण ॥ सुयोधना सहित सर्वही जण ॥ समरीं संहारीन निर्धारें ॥५८॥शकुनि मी तुझा काळ ॥ जरी छेदींना तुझें शिरकमळ ॥ तरी ते माद्री वेल्हाळ ॥ जन्मोनि व्यर्थ श्रमविली ॥५९॥हिमाचल चळेल आसनीं ॥ तेज सांडील वासरमणी ॥ शीतलत्व टाकील रोहिणी ॥ रमण जरी तत्त्वतां ॥६०॥शेष सांडील भूभार ॥ विष जरी वमील कर्पूर गौर ॥ हेंही घडेल परी निर्धार ॥ नेम माझा टळेना ॥६१॥भुजा पिटोनि नकुल बोलत ॥ कौरव कुल संहारीन समस्त ॥ धान्यक्षेत्राचें निर्मूल करीत ॥ कृषीवल जैसा एक सरें ॥६२॥ऐशा प्रतापप्रतिज्ञा बोलोन ॥ करिते जाहले वनीं प्रयाण ॥ धौम्य अग्निहोत्र पात्रें घेऊन ॥ सहकृशानु चालिला ॥६३॥धर्म दर्भपवित्रें हातीं घालीत ॥ पितृसूक्त जपत जात ॥ कौरवांचा होईल अंत ॥ चिन्ह पुढील दावीतसे ॥६४॥अजात शत्रु सुज्ञ धर्म ॥ समस्तांसी पुसे सप्रेम ॥ म्हणे वडील हो परम ॥ कृपा बहुत असों द्या ॥६५॥तुमच्या आशीर्वादें करून ॥ पुढती पाहूम तुमचे चरण ॥ समस्त कौरवांसी पुसोन ॥ धर्मराज चालिला ॥६६॥भीष्म द्रोण विदुर ॥ यांच्या नेत्रीं वाहे नीर ॥ धन्य महाराज युधिष्ठिर ॥ अजातशत्रु नाम साजे ॥६७॥धर्मासी म्हणे विदुर ॥ कुंती वृद्ध आणि सुकुमार ॥ ज्येष्ठ बंधूची पत्नी निर्धार ॥ माता माझी असों दे ॥६८॥माझिये घरीं ठेवून ॥ बा रे वन वासा करीं तूं प्रयाण ॥ मग वंदिले कुंतीचे चरण ॥ साष्टांगेंशीं धर्मराजें ॥६९॥ विदुर म्हणे धर्मराजा ॥ सोमवंशविजयध्वजा ॥ श्रीकृष्णस्मरणध्यान पूजा ॥ प्राणांतींही न विसंवें ॥७०॥ह्रदयीं ध्यातां कंसारी ॥ कदा भय नाहीं कांतारीं ॥ तोचि रक्षील नानापरी ॥ दुःख तिळभरी झगटेना ॥७१॥धर्म म्हणे विदुरासी ॥ तूं गुरु पिता देव आम्हांसी ॥ तुझी आज्ञा वंदूनि शीर्षीं ॥ अहर्निश वर्तेन ॥७२॥ऐसें बोलतां युधिष्ठिर ॥ धांवोनि आलिंगी त्यासी विदुर ॥ अश्रुधारा स्त्रवती नेत्र ॥ प्रेम सागर उचंबळला ॥७३॥कुंतीसी निरवूनि बहुत ॥ पांचही विदुरासी नमीत ॥ लक्षोनियां अरण्यपंथ ॥ जाते जाहले तेधवां ॥७४॥पांच पांडव राजहंस ॥ हंसिनी द्रौपदी डोळस ॥ जिचे अंगींचा सुवास ॥ वनामाजी फांकतसे ॥७५॥एके वस्त्रे द्रौपदी जात ॥ पांडव मागें वल्कलवेष्टित ॥ कुंती देखोनि आक्रंदत ॥ ह्रदय पिटीत स्वहस्तें ॥७६॥अंग टाकीत धरणीं ॥ अगे वेल्हाळे जाज्ञ सेनी ॥ पतिस मवेत नयनीं ॥ केव्हां तूतें देखेन ॥७७॥अहा द्वारका नगर विलासिया ॥ कोठें गुंतलासी विसांविया ॥ पांडवां व्यसनीं पडलिया ॥ नेणसी तूं व्यापका ॥७८॥कुरुकुलमुकुटावतंस ॥ पंडुराजा तूं पवित्र पुरुष ॥ तुज कैसा स्वर्गवास ॥ गोड वाटे एधवां ॥७९॥वना गेलिया श्रीराम चंद्र ॥ पाठीं धांवे कौसल्या सुंदर ॥ तैसी गजपुरा बाहेर ॥ कुंती धांवे पुत्रांमागें ॥८०॥अगे पांचाली माय बहिणी ॥ प्राण सखे सांगातिणी ॥ वदन दावीं गे परतोनी ॥ मज टाकूनि जातेसी ॥८१॥सहदेव आणि नकुळ ॥ तान्हीं बाळें केवळ ॥ मज निरवूनि वेल्हाळ ॥ माद्री गेली स्वर्गातें ॥८२॥नकुला सहदेवांच्या गळां ॥ कुंती मिठी घाली ते वेळां ॥ कौरवांच्या नारी सकळा ॥ देखोनि रडती तेधवां ॥८३॥म्हणती वैधव्य आम्हांसी आलें ॥ भुलले कौरव कां हें न कळे ॥ नगरवासी लोक ते वेळे ॥ शोक करिती अपार ॥८४॥मथुरे जातां यादवेंद्र ॥ यशोदा नंद गौळी समग्र ॥ गोपी शोक करिती अपार ॥ तैसेंचि येथें जाहलें ॥८५॥कुंतीसी सांवरूनि विदुर ॥ गृहासी नेत सत्वर ॥ सुभद्रा आणि सौभद्र ॥ द्वारकेसी पाठविलीं ॥८६॥पांडवांसी बोळवीत विदुर ॥ अरण्यांत गेला दूर ॥ नीति सांगोनि अपार ॥ मागुती येत स्वस्थलीं ॥८७॥इतर पांडवस्त्रिया सुंदर ॥ कुंती पाठवीत माहेरा ॥ वनवास सरल्या सकुमारा ॥ मागुती यावें भेटीतें ॥८८॥द्रौपदीचे पंच कुमारां ॥ विदुर पाठवी पांचालपुरा ॥ धृष्टद्युन्म द्रुपद अवधारा ॥ प्राणांपरी प्रिय करिती ॥८९॥धृतराष्ट्र पुसे विदुरा ॥ पांडव गेले वनांतरा ॥ विषाद धरिला अंतरा ॥ किंवा सुखरूना गेले पैं ॥९०॥विदुर म्हणे झांकूनि ॥ धर्में केलें वनप्रयाण ॥ मुखें धरिलें द्दढमौन ॥ न बोलत कोणाशीं ॥९१॥भुजा उभारोनि भीम सेन ॥ कल्पांतरुद्रसा क्रोधायमान ॥ गर्जत जैसा पंचानन ॥ हुंकारत तेवीं गेला ॥९२॥वाममुष्ट सिकता घेऊनी ॥ सव्य भागें विखरी मेदिनी ॥ शिर तुकावी विपिनीं ॥ पार्थवीर प्रवेशला ॥९३॥कर्दमें लेपूनियां वदन ॥ गेला सहदेव माद्रीनंदन ॥ जैसा आच्छादिला अभ्रेंकरून ॥ वासरमणि निराळीं ॥९४॥सर्वांगीं मृत्तिका चर्चून ॥ नकुल गेला बलसंपन्न ॥ जेवीं संसारमाया टाकून ॥ योगी जात तपोवना ॥९५॥मोकळे केश हस्तें झाडीत ॥ ह्र्दयीं पेटला क्रोधानळ बहुत ॥ नेत्रोदकें तो विझवीत ॥ द्रौपदी गेली वनांतरा ॥९६॥धौम्य दर्भां धरूनि मुष्टीं ॥ पढत गेला अंत्येष्टी ॥ ज्येष्ठकनिष्ठनामें अलोटी ॥ तर्पण पुढें करावया ॥९७॥विदुरासी धृतराष्ट्र म्हणत ॥ पांडवीं काय सुचविला अर्थ ॥ हीं लक्षणें विपरीत ॥ काय कारण दावावया ॥९८॥विदुर म्हणे तो अर्थ ॥ कासया पुससी तूं व्यर्थ ॥ पुत्रलोभें तुझें चित्त ॥ भ्रमीभूत जाहलें ॥९९॥समरांगणीं जीवनाश अपार ॥ होईल ब्रह्म सृष्टीचा संहार ॥ म्हणवूनि धर्मराज वक्र ॥ झांकोनि गेला न पाहे ॥१००॥तेरा वरुषांउपरी ॥ कौरवप्रेतें पडतील समरीं ॥ तींन पहावया द्दष्टीभरी ॥ मुख झांकिलें म्हणूनियां ॥१०१॥भुजा विलोकी भीमसेन ॥ मनांत संकल्पिलें हेंचि पूर्ण ॥ दोर्दंडबलें करून ॥ कौरव प्रेतें पाडीन मी ॥१०२॥सागरींची वाळून न गणवे जाण ॥ तैसे असंख्य सोडीन वाण ॥ घेईन कौरवांचे प्राण ॥ हेंचि अर्जुन चिंतीत ॥१०३॥फाल्गुनें दाविलें हेंचि पूर्ण ॥ फाल्गुनमासींचे मंत्र जाण ॥ जपतील तुझे नंदन ॥ येतां म मरण शेवटीं ॥१०४॥रक्तपंक माजेल रणीं ॥ कौरवप्रेतें पडतील मेदिनी ॥ चिखलें मुखें जातील भरूनी ॥ गृध्र बेसोनि टोंचिती ॥१०५॥हें चिन्ह सहदेवें दाविलें ॥ धुळीनें अंग भरिलें नकुलें ॥ स्वरूप त्याचें तेजागळें ॥ कामिनी भुलती पाहतां ॥१०६॥यालागीं मृत्तिकामलें ॥ शरीर झांकिलें नकुलें ॥ चिन्ह द्रौपदीनें दाविलें ॥ अर्थ ऐक तयाचा ॥१०७॥चवदा वर्षांउपरी जाणा ॥ ह्रदय पिटितील तुझ्या सुना ॥ मुक्तकेशा येतील स्त्राना ॥ अंत्येष्टिविधि पहावया ॥१०८॥धौम्य हेंचि जाणवीत ॥ कौरवांची क्रिया समस्त ॥ करावयासी जपत ॥ अंत्येष्टिविधि आधींच पैं ॥२०९॥पांडव प्रवेशतां वनांतरीं ॥ दुश्चिन्हें उदेलीं कुंजरपुरीं ॥ स्वन्पेम देखती कौरवनारी ॥ दुष्ट दुःखदायक जीं ॥११०॥विगतधवा कामिवा कामिनी ॥ ओंटी भरिती मृत्तिका घेऊनी ॥ मंगळसूत्रें तोडोनी ॥ काल पुरुष नेतसे ॥१११॥कृष्णवस्त्रवेष्टित नारी ॥ कौरवां चिया शिरावरी ॥ तैल सिंदूर घालिती झडकरी ॥ आरक्त पुष्पें तुरंवोनियां ॥११२॥पृथ्वी तप्त जाहली बहुत ॥ सूर्य वन्हिवृष्टी करीत ॥ मेघ रक्तधारा वर्षत ॥ प्रलयवात सूटला ॥११३॥भयभीत दुर्योधन ॥ विपरीत चिन्बें ऐकोन ॥ द्रोणासी म्हणे करीं ॥ जतन ॥ गुरुवर्या येथूनी ॥११४॥सुयोधनासी म्हणे द्रोण ॥ तुझिया काजीं वेंचीन प्राण ॥ सर्वांठायीं यश साधीन ॥ एका पांडवांवांचूनि ॥११५॥कृष्णकृपेचा वज्रपंजर ॥ पांच पांडव त्यांत कीर ॥ सुखरूप खेळती अहोरात्र ॥ निर्भत निःशंक सर्वदा ॥११६॥माझीं शस्त्रें त्यांसी समरीं ॥ न रुपतीच गा निर्धारीं ॥ जैसा मेघ वर्षतां पर्वतां पर्वत अंतरीं ॥ दुःख कांहीं मानीना ॥११७॥द्रुपदाचा केला अपमान ॥ तेणें तें वैर स्मरोन ॥ पुत्र जन्मविला धृष्टद्युन्म ॥ अग्निसंभन मजलागीं ॥११८॥त्याचे हातें मज मृत्य ॥ होणार न चुके बलवंत ॥ तरी मी एक सांगेन हित ॥ धरिसी जरी मानसीं ॥११९॥तरी वैरभाव सांडोनी ॥ पांडव आणावे परतोनी ॥ शक्रप्रस्थीं तयां स्थापूनी ॥ सुखरूप नांदावें ॥१२०॥धृतराष्ट्र म्हणे विदुरासी ॥ जाऊनि आणीं पांडवांसी ॥ समजावूनि तयांसी ॥ शक्रप्रस्था पाठवूं ॥१२१॥जरी ते न येती वनाहूनी ॥ तरी वस्त्र भूपणें वाजीवारणीं ॥ अपार संपत्ति नेऊनी ॥ द्यावी त्यांसी वनांतरीं ॥१२२॥मग बोले विदुर वचन ॥ ते सर्वथा न येती परतोन ॥ तुझा कुलक्षय केल्याविण ॥ समाधान नव्हेचि ॥१२३॥वचन विदुराचें परम तीव्र ॥ ऐकतां खोंचलें अंतर ॥ अंध व्याकुल अहोरात्र ॥ चिंतार्णवीं बुडाला ॥१२४॥संजय म्हणे अंबिकानंदना ॥ पांडव दवडिले दूरी वना ॥ एकछत्र राज्यासना ॥ द्दढ नांदें पुत्रपौत्रीं ॥१२५॥लक्ष्मी आणि यश ॥ तिहीं तुम्हांसी दिधली भाष ॥ ईश्वरी कळा आसमास ॥ काळें तुम्हांस दीधली ॥१२६॥तुम्हींसी हा भरंवसा निश्चित ॥ आतां कां वाटतें दुश्चित्त ॥ भाग्य भोगीं बहुत ॥ दिवसें दिवस चढतेंचि ॥१२७॥अंध खोंचला मानसीं मानसीं ॥ म्हणे कां काळिजीं सुरी घालिसी ॥ विपरीत व्हावें पांडवांसी ॥ माझे मानसीं नसे हें ॥१२८॥मी चक्षुहीन वृद्ध गलित ॥ पुत्र न मानिती वचनार्थ ॥ ऐश्वर्यमदें जाहले मत्त ॥ न गणिती हें त्रिभुवन ॥१२९॥पांडव माझे शत्रु केले ॥ चिंताग्नींत मज लेटिलें ॥ कालें पाश बांधिले ॥ कंठीं माझे संजया ॥१३०॥शूळावरी रोंविला प्राणी ॥ त्यासी उपभोग काय देऊनी ॥ कडया वरूनि लोटिला धरणीं ॥ सुमन शेज काय त्या ॥१३१॥तैसें पांडवांशीं वैर पडिलें ॥आतां सुख कासयाचें बोलिलें ॥ कुलक्षय होईल बळें ॥ हें मज कळलें संजया ॥१३२॥संजय म्हणे ते वेळां ॥ कुलक्षय हा तुवांचि केला ॥ पुत्राचिया बोला ॥ माजी तूंचि वर्तसी ॥१३३॥सभेसी आणिली पांचाळी ॥ पुतांसी न वारिसी ते वेळीं ॥ वस्त्रें फेडितां ह्रदय कमळीं ॥ सुख तुज वाटलें ॥१३४॥दुर्योधन दुरुक्ति बोलत ॥ कर्ण शकुनी अनुमोदीत ॥ ते देतभग्न करूनि समस्त ॥ वर्जिले नाहींत तुवां कीं ॥१३५॥पंचही भ्रतार टाकूनी ॥ रिघें तूं आमुचे सदनीं ॥ तुझा पुत्र बोलिला वाणी ॥ उगाचि ऐकूनि होतासी ॥१३६॥भीष्में आणि विदुरें नीती ॥ तुज सांगितली बहुत रीतीं ॥ परी न भरेचि तुझे चित्तीं ॥ वाउग्या गोष्टी काय आतां ॥१३७॥आपुल्या हस्तें घेऊनि शस्त्र ॥ काळ नाहीं छेदीत शिर ॥ बुद्धि विपरीत होतां निर्धार ॥ कालक्षोभ जाणिजे ॥१३८॥केल्या अन्यायाच्या राशी ॥ व्यर्थ कासया गोष्टी बोलसी ॥ केलें तें फल भोगिसी ॥ अल्पकाळेंचि तत्त्वतां ॥१३९॥महासती ते पांचाली ॥ जिचा कैवारी वनमाली ॥ अपार वस्त्रें पुरविलीं ॥ देखिलीं सकळीं सभेंत ॥१४०॥धृतराष्ट्र म्हणे संजयासी ॥ जितुक्या गोष्टी तूं बोलसी ॥ आल्या मज प्रत्ययासी ॥ सत्य सत्य सुजाण ॥१४१॥पांडवांचा रक्षक ॥ पूर्ण असे द्वारका नायक ॥ हें जाणतां मूर्ख ॥ कैसा जाहलों संजया ॥१४२॥माझें प्रारब्ध घोर गहन ॥ न कळे तयाचें निदान ॥ दुःख भोगवील संपूर्ण ॥ हें मीं बरवें जाणिलें ॥१४३॥द्रौपदी क्षोभविली परम ॥ कौरव होती अवघे भस्म ॥ ईश्वरी मायेचें दुर्गम ॥ विंदाण वाटे मजलागीं ॥१४४॥पांडव गेले बाहेरी ॥ एकचि आकान्त जाहला नगरीं ॥ आक्रंदल्या सकल नारी ॥ जाहली बोहरी वंशाची ॥१४५॥द्रौपदीसी कुशब्द बोलिले ॥ ते श्रीधरें सकल ऐकिले ॥ तेणें मनांत ऐसें भाविलें ॥ ते शब्द लागले देवकीतें ॥१४६॥द्रौपदी नव्हे हे देवकी माउली ॥ दुर्जनीं सभेंत गांजिली ॥ सुदर्शन सोडोनि ते वेळीं ॥ शिरें छेदावीं कौरवांचीं ॥१४७॥परी सत्त्वधीर जगन्नाथ ॥ क्षमा केली तेव्हां बहुत ॥ द्रौपदीचें करूनि निमित्त ॥ कुलक्षय करील तो ॥१४८॥संजय म्हणे धृतराष्ट्रासी ॥ आतां गोष्टी आल्या प्रत्ययासी ॥ वैशंपायन जनमेजयासी ॥ कथा सांगे रसाळ ॥१४९॥सभापर्व संपलें येथ ॥ पुढें वनपर्व अद्भुत ॥ जें ऐकतां पापपर्वत ॥ भस्म होती क्षणार्धें ॥१५०॥भारत सरोवर निर्मल ॥ सभापर्व त्यांत कमल ॥ सज्जन मिलिंद सकल ॥ आमोद सेवूं धांवती ॥१५१॥कीं भारत हा ब्रह्मगिरी ॥ सभापर्व निघाली गोदावरी ॥ प्रेमसिंहस्थीं नरनारी ॥ स्त्रानालागीं धांवती ॥१५२॥भारत हा क्षीरसागर ॥ असंभाव्य भरला थोर ॥ तेथें ब्रह्मानंद श्रीधर ॥ तृषाक्रांत धांवला ॥१५३॥त्यांतील अंजलीनें किंचित ॥ घेतलें तृषानिवारणर्थ ॥ तैसा सारभाग यथार्थ ॥ भारतांत निवडिला ॥१५४॥पाल्हाळ बोलतां अपार ॥ ग्रंथ होईल जैसा समुद्र ॥ बोलतां ध्वनित अणुमात्र ॥ कथा विचित्र दिसेना ॥१५५॥संकोच पाल्हाळ टाकूनि समस्त ॥ मित रसाळ प्रकटला ग्रंथ ॥ रचनासाहित्य पंढरीनाथ ॥ कर्ता येथें जाणिजे ॥१५६॥पांडवप्रताप ग्रंथ गहन ॥ पांडुरंगें हें अभिधान ॥ नाम ठेविलें असेल पूर्ण ॥ प्रीती करून सत्य पैं ॥१५७॥पुढें वनपर्व वसंतवन ॥ द्दष्टांतवृक्ष दाटले सघन ॥ साहित्यवन श्रीपूर्ण ॥ विराजमान टवटवीत ॥१५८॥ते छायेसी पंडित सुमती ॥ सदाकाल घेती विश्रांती ॥ श्रीधर तेथें अहोरात्रीं ॥ चरण तळहातीं तयाचे ॥१५९॥श्रीमद्भीमातट विलासा ॥ दिंगबरा पंढरीशा ॥ श्रीधरवरदा अविनाशा ॥ ब्रह्मानंदा दयाब्धें ॥१६०॥सुरस पांडवप्रताप ग्रंथ ॥ सभापर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांशी यथार्थ ॥ बेविसाव्यांत कथियेला ॥१६१॥स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ सभापर्वटीका श्रीधरकृत ॥ पांडव गेले वनवासाप्रत ॥ सभापर्व संपविलें ॥१६२॥इति श्रीपांडवप्रतापे सभापर्वणि द्वाविंशाध्यायः ॥२२॥॥ श्री कृष्णार्पणमस्तु इति सभापर्व समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : February 09, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP