मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय ५६ वा

पांडवप्रताप - अध्याय ५६ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्री गणेशाय नमः ॥ अद्भुत भारत कथेच महिमा ॥ देऊं गोदावरीची उपमा ॥ स्नान करितां कर्मा कर्मा ॥ पासूनि मुक्त होइजे ॥१॥
उभयलोकींची इच्छा अधिक ॥ हींच तटाकें जेथ सुरेख ॥ मनोरम स्वच्छ प्रवाह देख ॥ उचंबळत ब्रह्मानंदें ॥२॥
क्रुष्ण कथामृत जीवन ॥ प्रेमळ तेथें जलचरें पूर्ण ॥ देव गंधर्व मुनिजन ॥ तीरीं सघन ॥ तरु हेचि ॥३॥
अनेक चरित्रें तत्त्वतां ॥ त्याचि येथें मिळाल्या सरिता ॥ भक्ति ज्ञान वैराग्यता ॥ ऊर्मी येथें विलसती ॥४॥
बोध चालिला अद्भुत ॥ फोडूनियां पाप पर्वत ॥ अष्टादश पर्व मुखें मिळत ॥ भक्त ह्रदय सागरीं ॥५॥
त्रिविध तापें जे तापले ॥ तीर्थ व्रतें करितां जे भागले ॥ ते येथें स्नान करितां निवाले ॥ नाहीं परतले संसारा ॥६॥
या गंगेंत करितां स्नान ॥ अंगीं संचरे भक्तिज्ञान ॥ सकल चातुर्य तर्क येऊन ॥ पायां लागती आदरें ॥७॥
असो स्त्रीपर्व मागें संपलें ॥ पुढें शांतिपर्व सर्वा गळें ॥ जन मेजया प्रति स्वानंद मेळें ॥ वैशंपायन सांगत ॥८॥
स्त्रीपर्व संपतां मागें पूर्णं ॥ समस्तांची उत्तरक्रिया करून ॥ बंधूंसहित धर्म जगज्जीवन ॥ निजशिबिरा प्रति पावले ॥९॥
यावरी गंगा तटीं कुंती सहित ॥ धर्म राज राहे एक मास पर्यंक ॥ तों ऋषिचक्र मिळोनि समस्त ॥ धर्मासी भेटों पातलें ॥१०॥
विश्वमित्र असित कण्व ॥ दुर्वास भृगु अंगिरा वामदेव ॥ कश्यप अत्रि वसिष्ठ महानुभाव ॥ नारद आणि जमदग्नि ॥११॥
भरद्वाज आणि गौतम ॥ पराशर बादरायण ॥ शुक परम ॥ विभांडक अगस्ति देवल उत्तम ॥ रुचिक गाधि आर्ष्टिषेण पैं ॥१२॥
याज्ञवल्क्य धौम्य गार्ग्य ॥ श्रृंगी वाल्मीक मातंग ॥ व्याघ्रपाद हरींद्र ॥ चंद्रात्रि भरत ब्रह्मनिष्ठ ॥१३॥
राक्षायण रुक्षायण ऋभुक्षायण ॥ सांख्यायन शाकलायन सावर्ण्य ॥ पंचशिख पौलस्ति पुरुघन ॥ विश्रवा आणि तृणबिंदु ॥१४॥
अरुणि उपमन्यु देवर्षि उत्तंक ॥ जरत्कारु कौंडिण्य आस्तिक सम्यक ॥ च्यवन गाल्व शमीक सोमक ॥ याज उपयाज भार्गव पैं ॥१५॥
सुमेधा हरिमेधा श्वेत मुद्नल ॥ उद्दालक शांडिल्यकेतु कपिल ॥ अष्टावक्र शौनक सुयज्ञ कहोळ ॥ शक्ति उग्रश्रवा भेषजी पैं ॥१६॥
एककत द्विकत त्रिकत ॥ कर्दम संदीपन कक्षीवंत ॥ मृकंडु मार्कंडेय गंधमादन उतथ्य ॥ शतानंद दीर्घतमा ॥१७॥
कवि वाचस्पति कच शरभंग ॥ शंख पैल दंडी सुतीक्ष्ण गौरांग ॥ मंदकर्णि मयंक मंदपाल जीर्णांग ॥ प्रमादी रुरु कृष्णांग तो ॥१८॥
सोमश्रवा दधीचि पुंडरीश पुंडलीक ॥ बकदाल्भ्य भृशुंडी लोमहर्ष उत्तंक ॥ मांडव्य श्रुतकीर्ति सारस्वत जाबालक ॥ बाष्कल वैद्यपान दीर्घबाहु ॥१९॥
वत्स श्रीवत्स सनत्सुजात द्दढ विचार ॥ ऊर्ध्वरेता सुक्षवा अवत्सर ॥ अंबरीष अजमीढ आंगिरस थोर ॥ औद्दालिक आश्वलायन ॥२०॥
औशिज औदुंबरी अग्निवेष ॥ कुशिक कंटक कौतक ॥ औदवाहन ॥ काश्यपि कथकात्म और्वास ॥ कालप कुकुर करिण पैं ॥२१॥
कांकायन कामुकायन कौमुद गौपायन ॥ काप्य कुशिज वेद और्जायन ॥ कौमंडल क्रौंच गोवर्धन ॥ ऋतु गोभिल गविष्टिषेण पैं ॥२२॥
गवाक्ष गुरवी गोमती गौठण ॥ गौर्मुख गोपाळ गोकर्ण ॥ गौरिविंद गौण गार्गायन ॥ गंध सुकीर्ण चंड पैं ॥२३॥
घटजानु जंघिक जंघाल जातू कर्ण ॥ जयन्त जन्हुट जरठ देवर दमन ॥ तंतु तापस देव शर्मा भानु जाण ॥ श्रीदेव सौभरि धर्म धनंजय ॥२४॥
धवल धन्वंतरि निदाघ दंबत्रिवंत ॥ नैध्रुव पौरोग भोगवृत्त ॥ पिंगल पौंड पौल पर्णदंत ॥ पौरणिक पौति माष पैं ॥२५॥
बृहद्वल बौधायन ॥ वातांबु वणिक भवबुद्ध पूर्ण ॥ सौजन्य ऊर्ध्वमुख कृत द्रोण ॥ बाम्रव्य गंधमादन पैं ॥२६॥
पर्वत लिखित मसभलोकी गौरशिर ॥ हरिष्मा चंडकौशिक विमितस्कंद घटोदर ॥ विशाख माध्यांदिन कालांतक वैश्वानर ॥ स्थाणु विश्वत पैं महाशिरा ॥२७॥
मेघ वास इंद्रतपन ॥ त्वष्टा मरीचि सर्वांतक कक्षीवान ॥ देवहोत्र सविता प्रचेता मदन ॥ मैत्रेय धर्म अचळ पैं ॥२८॥
विदग्ध ऋतु सुरत्नदास ॥ मैत्रेय आर्त भाग विकुंठ विशेष ॥ वैराज विधूम अविमाश ॥ कूर्म नैमित्य नैयायिक ॥२९॥
ब्रह्मा नंदें विनवीं श्रीधर ॥ धर्मा भोंवते ऋषीश्वर ॥ मिळाले तेव्हां अपार ॥ नांवें त्यांचीं वर्णिलीं ॥३०॥
ते वसुधामर प्रति आदित्या ॥ नेमनिय मसा धनयुक्त ॥ शम दम अंगीं विराजित ॥ शांत दान्त सर्वदा ॥३१॥
मग सर्वही ऋषि पूजून ॥ धर्म राज करी स्तवन ॥ म्हणे तुमची सेवा करून ॥ सुखे राहीन वना मध्यें ॥३२॥
मज दुःख बहुत मनांत ॥ कुलक्षय केला समस्त ॥ कुंतीनें कर्ण आपुला सुत ॥ मज कळों दिला नाहीं कीं ॥३३॥
जो महाराज कर्ण उदार ॥ परोपकारी सत्त्वधीर ॥ कवचकुंडलें देऊनि पुरंदर ॥ तोषविला निजधैर्यें ॥३४॥
जो कां निधडा सूर्य भक्त ॥ एकदां रण माजलें अद्भुत ॥ व्हावा कर्णाचा प्राणान्त ॥ ऐसा समय पातला ॥३५॥
ते वेळे येऊनि ब्राह्नण ॥ घरचा घोडा मागे दान ॥ सारथ्यासी म्हणे कर्ण ॥ देईं सोडूनि आतांचि ॥३६॥
सूत म्हणे विजयी होईं ॥ मग अवघेचि घोडे दान देईं ॥ कर्ण म्हणे भरंवसा नाहीं ॥ शरीर आहे क्षणभंगुर ॥३७॥
तत्काळचि घोडा सोडून ॥ रणीं ब्राह्मणासी दिधला दान ॥ ऐसा उदार हें त्रिभुवन ॥ शोधितांही न सांपडे ॥३८॥
गाई ब्राह्मणासी दिधली दान ॥ परी क्षणक्षणां ते परतोन ॥ कळपांत येई पळोन ॥ बहुत ब्राह्मण शिणला पैं ॥३९॥
कर्णाजवळी येऊन ॥ गार्‍हाणें सांगे बाह्मण ॥ धेनु सत्वरी ये परतोन ॥ कळपा विण न राहे ॥४०॥
कर्णें उदक सोडिलें पाहीं ॥ पन्नास सहस्त्र माझ्या गाई ॥ तुम्हां दिधल्या सर्वही ॥ वस्त्राभरणां समवेत ॥४१॥
पन्नास सहस्त्र गोधन ॥ त्रिकाल करावें त्यांचें दोहन ॥ त्या कामधेनू समान ॥ इच्छिले समयीं दुग्ध देती ॥४२॥
रत्न जडित श्रृंगें पाहीं ॥ रजत खुर झळकती पायीं ॥ एकवर्ण कपिला सर्वही ॥ सौंदर्य अति शोभतसे ॥४३॥
चहूं चरणीं सुवर्णवाळे ॥ चालतां गर्जती खळाळें ॥ ज्या डावरिया बुजरिया कदाकाळें ॥ सर्वथाही न राहती ॥४४॥
मारूं नेणती कदा लात ॥ पन्नास सह्स्त्र गाई समस्त ॥ ब्राह्मणा लागीं उदार देत ॥ माझा ज्येष्ठ कर्ण बंधु ॥४५॥
एकदां पर्जन्य लागला बहुत ॥ ब्राह्मणाची स्त्री जाहली प्रसूत ॥ शेकावयासी काष्ठें किंचित ॥ सहसा त्यातें न मिळती ॥४६॥
कर्णा जवळी आला ब्राह्मण ॥ सांगे सर्व वर्तमान ॥ रत्न जडित मंचक फोडून ॥ दिला धाडून ब्राह्मणा घरीं ॥४७॥
रत्नें निघालीं अमोलिक ॥ तींही त्यासी दिधलीं सकळिक ॥ ऐसा उदार दाता देख ॥ भुवनत्रयीं असेना ॥४८॥
ब्राह्मण मागे तेल येऊन ॥ कर्णें वाटी दिधली उचलून ॥ ज्यावरी रत्नें चंद्रा समान ॥ त्रिभुवनाचे मोलाचीं ॥४९॥
काम धेनु सुरतरु चिंतामणी ॥ हींच रत्नें जड्लीं वर तीन्ही ॥ ऐसी ते वाटी उचलोनी ॥ दिधली दान उदारें ॥५०॥
सहज प्रत्यहीं जो कर्ण ॥ देत दहा सहस्त्र गोदान ॥ कर्णा सारिखा शूर कोण ॥ समर धीर रणपंडित ॥५१॥  
अर्जुन वेगळा करूनी ॥ आम्हां चौघां मारिता रणीं ॥ परी कुंतीनें त्याची भाक घेऊनी ॥ आम्हां चौघां वांचविलें ॥५२॥
कर्णें आम्हांसी जिंकून ॥ कुंतीचें वचन आठवून ॥ जा म्हणूनि सोडून ॥ स्नेहेंकरून दिधलें पैं ॥५३॥
कर्णा सारिखा नेम ॥ कोण चाल वील उत्तम ॥ कौरवांचा रक्षक परम ॥ शेवट वरी जाहला ॥५४॥
श्रीकृष्ण आणि कुंती बोधून ॥ आणीत होतीं आम्हां कडे कर्ण ॥ परी तो कृतघ्नता भयें करून ॥ कौरवांसी सोडीना ॥५५॥
सहा जणीं मिळोनी ॥ कर्णवीर मारिला रणीं ॥ एक इंद्र दुजा आंजनी ॥ चक्रपाणि तिसरा पैं ॥५६॥
चवथा परशुराम गुरु देख ॥ पांचवा ब्रह्म शाप जाहला बाधक ॥ पृथ्वीनें रथ चक्र सुरेख ॥ देहान्त समयीं गिळियेलें ॥५७॥
सहावा शल्य सारथी जाणा ॥ तेजो भंग करी क्षणक्षणां ॥ एवं सहा जणीं मिळोनी कर्णा ॥ समरांगणीं मारिलें ॥५८॥
कुंतीनें केला थोर घात ॥ मज कृष्णा नेंही केलें नाहीं श्रुत ॥ मी कर्णासी होतों शरणा गत ॥ प्रार्थूनि आणितों नाना परी ॥५९॥
त्यावरी छत्र धरूनि देखा ॥ मस्तकीं वंदितों त्याच्या पादुका ॥ कर्ण होता पाठिराखा ॥ तरी त्रिभुवन जिंकितों मी ॥६०॥
कर्ण पंडूसमान ॥ म्हणे अहा कर्ण गुण निधान ॥ अहा बहुती मारिलें मिळोन ॥ तुझे गुण किती आठवूं ॥६१॥
द्रोण लोभ पार्थावरी बहुवस ॥ म्हणवूनि ब्रह्मास्त्र न दिलें कर्णास ॥ शरणा गत झाला भार्गवास ॥ तेणेंही त्यास शापिलेम ॥६२॥
अर्जुनासी म्हणे नृपती ॥ मी जाईन वना प्रती ॥ जळो हें राज्य जळो जगती ॥ जळो निश्चितीं क्षात्र धर्म ॥६३॥
आठवूनि कर्णाचे स्वरूप गुण ॥ धर्म करी दीर्घ रुदन ॥ मग बहुत ऋषी मिळोन ॥ नीति सांगती धर्मातें ॥६४॥
परी धर्म नायके तत्त्वतां ॥ म्हणे मी वन सेवीन आतां ॥ मग व्यास म्हणे रे गुण वंता ॥ भीष्माकडे तूं जावें ॥६५॥
तो संशय वारील निःशेष ॥ त्याचेवरी ठेवीं विश्वास ॥ महायोग्य दयावंत पुरुष ॥ तो चंडांशु दुसरा पैं ॥६६॥
कवि गुरु परशुधर ॥ वसिष्ठ मार्कंडेय पुरंदर ॥ यांपासूनि विद्या अपार ॥ गंगा कुमार शिकला पैं ॥६७॥
जो जितेंद्रिय न्यायवंत ॥ भक्त सर्वज्ञ योगी विरक्त ॥ मग बोले द्वारकानाथ ॥ व्यास वचनीं चित्त देईं ॥६८॥
छप्पन्न देशींचे नृपती ॥ चार्‍ही वर्ण अठरा ज्ञाती ॥ सर्वांचे मनीं हेचि प्रीती ॥ कीं तुवां राज्यीं बैसावें ॥६९॥
अंगीकरूनि राज्या सना ॥ मग जाईं भीष्म दर्शना ॥ तो नीति सांगेल ती मना ॥ आणीं सर्वज्ञा आदरें ॥७०॥
मग तो धर्म राज उठिला ॥ सवेंचि निघाला ऋषींचा मेळा ॥ जैसा नक्षत्रीं वेष्टिला ॥ अत्रिपुत्र निराळीं ॥७१॥
धृत राष्ट्रही ते अवसरीं ॥ धर्म स्नेह जाणोनि अंतरीं ॥ गंगातीरीं मास भरी ॥ येऊनि राहिला होता पैं ॥७२॥
धृत राष्ट्रा सहित युधिष्ठिर ॥ गज पुरा निघाला सत्वर ॥ सवें ऋषींचे भार ॥ वहनारूढ चालिले ॥७३॥
रथीं बैसला धर्म नृपती ॥ भीम पुढें जाहला सारथी ॥ छत्र धरी सुभद्रा पती ॥ चामरें वारिती माद्री सुत ॥७४॥
समस्तांसी आनंद बहुत ॥ युयुत्सु पाठीमागें राहात ॥ सात्यकी आणि मदनतात ॥ एके रथीं बैसतीं ॥७५॥
धृत राष्ट्र बैसला नरयानीं ॥ गांधारी कुंती याज्ञा सेनी ॥ उत्तरा सुभद्रा सुखा सनीं ॥ बैसत्या जाहल्या तेधवां ॥७६॥
चतुर्विध वद्यें वाजती ॥ बंदी जन पुढें वाखाणिती ॥ नगर जन मंदिरें श्रृंगारिती ॥ कुंकुमें रेखिती सर्व वाटा ॥७७॥
कस्तुरी चंदनाचे निवाडे ॥ बिदीवरते घातले सडे ॥ तोरणें पताका चहूंकडे ॥ हेंही सांकडें नसे कोणा ॥७८॥
नगर देवतांचें प्राती करून ॥ धर्म राजें कर विलें पूजन ॥ त्रिकाल नैवेद्य रात्रं दिन तेथें लाविले ॥७९॥
कुंभ भरुनि सुवासिनी ॥ समोर आलिया तये क्षणीं ॥ गज पुरींच्या नितं बिनी ॥ ओंवालिती धर्मातें ॥८०॥
रत्न दीप घेऊनि हातीं ॥ लक्षा नुलक्ष मार्गीं युवती ॥ श्रीरंगा सहित ओंवाळिती ॥ पंचपांडवां ते समयीं ॥८१॥
चोवीस योजनें विस्तार ॥ विस्तीर्ण ॥ वसलें हस्तिनापुर ॥ भोंवता परिघ दुस्तर ॥ माजी जलचरें पोहती ॥८२॥
दुर्ग भोंवते गगन चुंबित ॥ ऋक्षें वरी जडलीं दिसत ॥ उल्हाटयेंत्रें वरी शोभत ॥ शस्त्रजुंबाडे ठायीं ठायीं ॥८३॥
आळो आळीं सुंदर मंदिरें ॥ मंदिरां मंदिरां प्रति दामोदरें ॥ दामोदरां प्रति एकसरें ॥ रत्न कळस झळकती ॥८४॥
पांडव पाहावया ते क्षणीं ॥ जाहली लोकांची मंडपघसणी ॥ नगरद्वारीं गजवदन पूजूनी ॥ गजपुरांत गेले पांडव ॥८५॥
गोपुरावरती गेले चढोनी ॥ ओंवाळिती कित्येक कामिनी ॥ द्दष्टीं देखोनि याज्ञ सेनी ॥ नितंबिनी बोलती ॥८६॥
मृग शावाक्षी लावण्या खाणी ॥ धन्य तूं पद्मजात जन कभगिनी ॥ वनीं कष्टलीस जाज्ञ सेनी ॥ आजि नयनीं देखिली ॥८७॥
धन्य आमुचे नयन ॥ जननी देखिली परतोन ॥ सत्य सत्याचे ठायीं पूर्ण ॥ आलें जाण साच हें ॥८८॥  
सकळ पौरजन प्रजा येऊन ॥ करिती धर्माचें धर्माचें प्रीतीनें स्तवन ॥ नाना उपायनें आणून ॥ धर्मा पुढें ठेविती ॥८९॥
कला पात्रें नाना कळा ॥ तेव्हां दविती धर्म भूपाळा ॥ सकल प्रजा नारी विप्र ते वेळां ॥ देती आशीर्वाद पांडवां ॥९०॥
तुम्ही चिरंजीव होऊनी ॥ चिरकाल भोगा हे मेदिनी ॥ असो नगर लोकांसी ते क्षणीं ॥ वस्त्रें भूषणें देत धर्म ॥९१॥
व्या सादिक जे मुनी ॥ आले नरयानीं बैसोनी ॥ त्यांसमवेत सदनीं ॥ धर्म राज प्रवेशला ॥९२॥
आधीं धौम्याची पूजा करून ॥ गौर विले सकल ब्राह्मण ॥ गोभूरत्नदानें संपूर्ण ॥ विधियुक्त दिधलीं पैं ॥९३॥
जें जें याचकीं इच्छिलें ॥ तें तें धर्में दश गुणें पुरविलें ॥ दरिद्री नाम घ्यावया उरले ॥ कोणी नाहीं सर्वथा ॥९४॥
जय वाद्यांचा एकचि घोष ॥ राज मंदिरीं चढविले कळस ॥ रत्न जडित आस मास ॥ तेज झळके भूमंडळीं ॥९५॥
देशो देशींचे राज कुमार ॥ नूतन छत्रें नूतन दळभार ॥ करभार घेऊनि युधिष्ठिर ॥ पाहवया येती त्वरेनें ॥९६॥
चहूं वेदींचे ब्राह्मण ॥ चतुर्दश विद्यापरयण ॥ चौसष्टकलांमाजी प्रवीण ॥ नामें मागेंचि वर्णिलीं ॥९७॥
सकल ऋषी धर्मासी विनविती ॥ नृपा तूं संशय न धरीं चित्तीं ॥ राज्य करीं न्यायनीती ॥ तुझेनि जगती सुखरूप ॥९८॥
नाना इतिहास शास्त्ररीत ॥ धर्मासी सांगती ऋषी बहुत ॥ आज्ञा करी द्वारकानाथ ॥ बैसें सत्वर सिंहासनीं ॥९९॥
मग सकळांच्या वचनासी मान ॥ देत कुंतीचा ज्येष्ठनंदन ॥ तों तेथें करावया विघ्न ॥ राक्षस एक पातला ॥१००॥
त्याचें नांव चार्वाक जाण ॥ तो त्रिदंडी संन्यासी होऊन ॥ धर्म सभेसी येऊन ॥ कपटवचनें बोलत ॥१०१॥
तो दुर्यो धनाचा मित्र ॥ कापटयराशि अपवित्र ॥ मायावेष धरूनि दुराचार ॥ विक्षेप घालूं पातला ॥१०२॥
जेवीं चुना माखूनि वायस ॥ बळेंचि जाहला राजहंस ॥ कीं मैंदें धरिला साधुवेष ॥ कक्षे पाश घेऊनियां ॥१०३॥
असो तो वेषधारी येऊन ॥ धर्मासी बोले कठोर वचन ॥ म्हणे धिक्‍ तुझें जिणें जावो जळोन ॥ कुलघातक्या पापिया ॥१०४॥
सर्व बाह्मणांचा पक्ष जाण ॥ मीच बोलतों तुज वचन ॥ तुवां गुरु हत्या केली पूर्ण ॥ महाराज द्रोण मारविला ॥१०५॥
वंधु पुत्र पापखाणी ॥ तुवां मारविले रणांगणीं ॥ कोण्या तोंडें सिंहासनीं ॥ बैसतोसी कुलघातक्या ॥१०६॥
धर्म म्हणे परिव्राजका ॥ म्यां धर्म न्यायें युद्ध केलें देखा ॥ तूं आपुलीं वचनें जेवीं अग्निशिखा ॥ तैसीं मज स्पर्शविलें ॥१०७॥
ज्ञान द्दष्टीनें पाहती ऋषीश्वर ॥ तंव तो चार्वाकनामें असुर ॥ दुर्यो धनमित्र अपवित्र ॥ कापटयवेष समजला ॥१०८॥
त्यासी निर्भार्त्सिती ब्राह्मण ॥ परी न राहे बोलतां वचन ॥ कदा न जाय सभेंतून ॥ मग द्विजजन ॥ क्षोभले ॥१०९॥
शाप देऊनि तात्कालिक ॥ तेथेंचि भस्म केला चार्वाक ॥ जैसा विरूपाक्षें पुष्पचाप देख ॥ भस्म केला द्दष्टीनें ॥११०॥
मग बोले कंदर्पतात ॥ म्हणे धन्य तुमचें सामर्थ्य ॥ रजनीचर ॥ परम पतित ॥ बरा भस्म केला तुम्हीं ॥१११॥
या चार्वाकानें पूर्वीं जाण ॥ प्रसन्न केला कमला सन ॥ म्हणे मज सर्वा पासून ॥ जप देईं विधात्या ॥११२॥
ब्रह्मा म्हणे ब्राह्मण ॥ तुज भस्म करितील शापून ॥ पांडवृगृहीं अन्योन्य ॥ बोलतां जाण तत्त्वतां ॥११३॥
अशास्त्र बोलतां जाण ॥ त्याचें आयुष्य होय क्षीण ॥ ब्रह्महत्येचें दारुण ॥ पातक माथां तयाच्या ॥११४॥
वेद शस्त्र पुराण ॥ सर्व माझें चरित्र पूर्ण ॥ तेथें ठेवितां दूषण ॥ चार्वाकाऐसें होईल ॥११५॥
असो धर्म आरूढला सिंहासनीं ॥ सोमकांताची चवई मांडोनी ॥ त्यावरी बैसला कैवल्यादानी ॥ वेदपुराणीं वंद्य जो ॥११६॥
धृतराष्ट्र गांधारी आणि कुंती ॥ विदुर युयुत्सु ते सुमती ॥ सात्यकी सर्व नूतन नृपती ॥ धर्मासी वेष्टूनि बैसले ॥११७॥
न कळतां धर्म रायासी ॥ अष्टाद्श धान्यराशी ॥ शस्त्र वस्त्र रत्न धनासी ॥ ठायीं ठायीं ठेविलें ॥११८॥
धर्मासी म्हणे जगन्नाथ ॥ सखया नेत्र झांकूनि त्वरित ॥ राशीवरी ठेवीं हात ॥ शुभा शुण शकुन पाहों ॥११९॥
मग धर्म रायाचा हात ॥ धन धान्यरा शीवरी पडत ॥ जय जय कार करिती समस्त ॥ म्हणती भद्र पुढें असे ॥१२०॥
पिंपळ शमी पलाश ॥ यांच्या समिधा अणिल्या बहुवस ॥ पंचपल्लव सप्तत्तिका विशेष ॥ पंचा मृतें सिद्ध केलीं ॥१२१॥
रत्न जडित केला कलश सज्ज अभिषेकावया धर्मा राज ॥ नूतन सिंहा सन तेजःपुंज ॥ श्वेत छत्र श्वेत चामरें ॥१२२॥
शुभ्र तुरंग शुभ्र गज ॥ मुक्तमाळ शुभ्र सतेज ॥ चतुःसमुद्रांचें उदक सहज ॥ आणविलें अभिषेका ॥१२३॥
दिव्य कुंभीं स्वर्धुनी जीवन ॥ शुद्ध ठेविलेंसे भरून ॥ सतेज लाजा करून ॥ अक्षता समीप ठेविल्या ॥१२४॥
अर्धांगीं द्रौपदी बैसवून ॥ धर्म राजें केलें हवन ॥ वेदघोषें गर्जती ऋषि जन ॥ न पडे न्यून कांहीं एक ॥१२५॥
पुण्या हवाचन ॥ मग मांडिलें अभिषेचन ॥ श्रीकृष्णें स्वयें शंख घेऊन ॥ अभिषेकिला धर्म राज ॥१२६॥
चौघे बंधु आणि धृत राष्ट्र ॥ यांहीं अभिषो किला युधिष्ठिर ॥ यावरी नृप ऋषीश्वर ॥ अभिषेकिती अनुक्रमें ॥१२७॥
सर्व प्रजा मिळोन ॥ हर्षें करिती अभिषेचन ॥ वस्त्रें अलंकार अपार धन ॥ आणिती मिति त्या नाहीं ॥१२८॥
समर्पूनि वस्त्रें अलंकार ॥ जग स्थापकावरी ॥ धरिलें छत्र ॥ मकर बिरुदें मेघडंबर ॥ मित्र पवित्रपंखे विंजती ॥१२९॥
सकल राजे उठोन ॥ धर्म द्रौपदींस अक्षता लावून ॥ अपार करभार समर्पून ॥ करिती नमन  उठोनियां ॥१३०॥
धर्म सांगे सर्व जनां ॥ पाळा धृत राष्ट्राची आज्ञा ॥ मग युव राज्य दिधलें भीम सेना ॥ आणीक कांहीं अमात्य स्थापिले ॥१३१॥
समस्त सेवकां पहिलियाहून ॥ वेतन केलें दश गुण ॥ प्रजा मनीं संतोषोन ॥ देती धन तितुकेंचि घ्यावें ॥१३२॥
शत्रु मर्दन सेनानाथ ॥ केला सुभद्रावर बलाद्भुत ॥ प्रजांचें हित अंतर्गत ॥ नकुल सहदेवीं सांगावें ॥१३३॥
विदुराज्ञेनें युयुत्सवें ॥ सर्व राज्यहित विलोकावें ॥ राज गुरुत्व आघवें ॥ कृपाचार्या समर्पिती ॥१३४॥
आल्या ब्राह्मणांचा सन्मान ॥ धर्मासी भेटवावा आणून ॥ हें धौम्य उपाध्यायाधीन ॥ कृष्णाज्ञेनें धर्म करी ॥१३५॥
सर्वांसी अधिकारवस्त्रें ॥ दिधलीं धर्म राजें पवित्रें ॥ समस्त ब्राह्मण धन संभारें ॥ युधिष्ठिरें तोषविले ॥१३६॥
तिन्ही वर्ण प्रजा समस्त ॥ त्यांसी वस्त्रें अलंकार देत ॥ असंतुष्ट नाहीं तेथ ॥ कोणी एक उरलाचि पैं ॥१३७॥
प्रति दिवशीं दान नेम ॥ धृत राष्ट्राहातीं करवी उत्तम ॥ स्वर्गवा सियांचीं धर्म ॥ श्राद्धें करवी यथाविधि ॥१३८॥
अग्निहोत्रादि सत्कर्में ॥ षोडश दानें असंभ्रमें ॥ नित्यनैमित्तिकें नेमें ॥ धर्म राज आचरे ॥१३९॥
कित्येक मित्र राजे पडिले रणीं ॥ ज्यांसी पुत्र पौत्र नाहीं कोणी ॥ त्यांचीं श्राद्धें करूनी ॥ धर्म गोदानें देववीत ॥१४०॥
ज्यांचे भ्रतार पडिले रणीं ॥ धर्में त्यांसी बोलावूनी ॥ म्हणे मी तुमचा आहें ऋणी ॥ यावज्जन्म पर्यंत ॥१४१॥
धन धान्य वस्तु पाहीं ॥ सर्व पुरवी त्यांचें गृहीं ॥ कोणता न्यून नाहीं ॥ न मागतां पाठवीत ॥१४२॥
धर्म सर्वांचें अंतरंग जाणत ॥ आशीर्वाद सर्वांचा घेत ॥ वृद्ध संन्यासी दहा सहस्त्र तेथ ॥ धर्मा श्रयें राहती ॥१४३॥
जेविले कोटी ब्राह्मण ॥ एके यतीस देतां भोजन ॥ दोहोंचें पुण्य समान ॥ शास्त्र प्रमाण मर्यादा ॥१४४॥
ऐसे दहा सहस्त्र संन्यासी ॥ धर्म त्रिकाळ भजे त्यांसी ॥ लक्ष बाह्मण कुटुंबांसीं ॥ धर्में आवडीं स्थापिले ॥१४५॥
राज्य करी यथाविध ॥ परी कृष्ण भजनीं सदा सावध ॥ हरिपदांबुजीं मिलिंद ॥ पंचपांडव सर्वदा ॥१४६॥
धर्माची आज्ञा घेऊनी ॥ राजे ऋषी पावले स्वस्थानीं ॥ चौघां बंधूं प्रति प्रिय वाणी ॥ धर्म राज बोलतसे ॥१४७॥
तुम्ही पावलां श्रम बहुत ॥ अज्ञातवास वनवास भोगीत ॥ युद्ध करूनि अद्भुत ॥ शत्रु रणीं विभांडिले ॥१४८॥
तरी आतां सर्व सुख भोगा ॥ सर्व काळ भजा श्रीरंगा ॥ न्यून पडेल तें तें सांगा ॥ सर्व प्रजांचें मज लागीं ॥१४९॥
दुर्यो धनाचें जे सदन ॥ तेथें राहिला भीम सेन ॥ पंडुगृही धर्म आपण ॥ यथा सूखें विराजित ॥१५०॥
धृत राष्ट्राचे आज्ञें करूनि सत्य ॥ पांच पांडव सदा वर्तत ॥ दुःशा सन सदनीं पार्थ ॥ राहता जाहला तेधवां ॥१५१॥
कर्णाचें गृह दिधलें नकुला ॥ शकुनिगृहीं सहदेव शोभला ॥ अर्जुनापाशी श्रीरंग रहिला ॥ महिमा गाइला वेदीं ज्याचा ॥१५२॥
सात्यकी वीर पाहें ॥ तोही पार्थ गृहीं सदा राहे ॥ न्य़ून पदार्थ कांहीं नोहे ॥ सदाळाळ वेंचितां ॥१५३॥
अष्ट महा सिद्धि नवनिधी ॥ कृष्ण कृपें सर्व समृद्धी ॥ अष्ट भोग यथा विधी ॥ भोगिती प्रीतीं यथान्यायें ॥१५४॥
यथा काळीं घन वर्षत ॥ कोणासी मरण नाहीं नगरांत ॥ आधिव्याधीं जन रहित ॥ स्वप्नीं दुःख नेणती ॥१५५॥
धौम्याचे गृहीं समृद्धि सर्व ॥ पुरवीत सदा धर्म राव ॥ विदुर गृहीं संपत्ति अभिनव ॥ धर्म राज पुरवीतसे ॥१५६॥
धृत राष्ट्रगांधारींचें मन ॥ क्षणोक्षणीं रक्षी पंडुनंदन ॥ सुभद्रे उत्तरेचें मन ॥ तोषवीत धर्म राव ॥१५७॥
द्रौपदीचें मनोरं जन ॥ करी कुंतीचें समाधान ॥ सकल प्रजा चार्‍ही वर्ण ॥ सुखरूप सर्वां विषयीं ॥१५८॥
तों नयन झांकूनि रमानाथ ॥ उगाचि बैसला ध्यानस्थ ॥ जैसा दीप निर्वात ॥ स्थळीं अभंग ठेविला ॥१५९॥
धर्म म्हणे ह्रषी केशी ॥ काय आठवलें मानसीं ॥ मज सांगा तें निश्चयेंसीं ॥ क्षीराब्धि ह्रदय विलासा ॥१६०॥
श्रीकृष्ण बोले सद्नदित ॥ प्राण माझा जान्हवीसुत ॥ शरपंजरीं पहुडला तो समर्थ ॥ ध्यान स्ववन करीत माझे ॥१६१॥
तयाकडे आजि माझें मन ॥ क्षणोक्षणीं जातें धांवोन ॥ ज्याणें तेवीस दिवस युद्ध करून ॥ भार्ग वराम जिंकिला ॥१६२॥
जेणें स्वसत्ताबळें पूर्वीं ॥ पालाणिली सकळ उर्वी ॥ ऋषि देव नर सर्वीं ॥ ज्याचे पाय वंदिले ॥१६३॥
परद्रव्य जैसें तृण ॥ परनारी माते समान ॥ चार्‍ही वेदशास्त्रीं निपुण ॥ करतलामल कवत पुराणें ॥१६४॥
चौदा विद्या चौसष्ट कळा ॥ भीष्माच्या दासी सकळा ॥ तरी त्या भीष्मा प्रति ये वेळां ॥ जाऊं चला युधिष्ठिरा ॥१६५॥
राज धर्म आपद्धर्म ॥ मोक्ष धर्म दान धर्म ॥ त्याच्या मुखें होय ज्ञान परम ॥ श्रवण करीं रे सर्वदा ॥१६६॥
धर्म म्हणे माझें मानस ॥ हेंचि चिंती रात्रं दिवस ॥ तूं स्वामी वैकुंठ विलास ॥ अंतकाळीं भेटें त्यासी ॥१६७॥
मग श्रीकृष्ण आणि पांडव ॥ स्यंदनारूढ जाहले सर्व ॥ आणि कही संत महानु भाव ॥ भीष्मदर्शना निघाले ॥१६८॥
जैसा किरण चक्रीं विराजे मित्र ॥ तैसा शरपंजरीं दिसे गंगापुत्र ॥ भोंवते व्यास नारदादि ऋषीश्वर ॥ वसिष्ठादिक बैसले ॥१६९॥
भीष्में देखिला जगन्निवास ॥ म्हणे हे परात्पर परम पुरुष ॥ सर्व व्यापक तूं जगन्निवास ॥ मण्यामाजीं सूत्र जैसें कीं ॥१७०॥
मग सहस्त्रनामें करून ॥ भीष्में केलें अपार स्तवन ॥ हे वेदोद्धारक जगज्जीवन ॥ कमठवेषधारका ॥१७१॥
नमो तुज वराहवेषा ॥ नमो प्रर्‍हादवरदा सर्वेशा ॥ वामनरूपा कमलेशा ॥ परम पुरुषा जगद्नुरो ॥१७२॥
भार्ग ववेषा मधुकैट भारी ॥ सर्व निःक्षत्रिय केली धरित्री ॥ असुरांतका रावणारी ॥ कालिय मर्दना श्रीरंगा ॥१७३॥
त्रिलोकींचें ज्ञान ॥ भीष्माचे ह्रदयीं घाली जगज्जीवन ॥ सकळिकीं केलें आदरें पूजन ॥ देवव्रताचें तेधवां ॥१७४॥
आणी कही वीर बहुत ॥ यात्रा आली पहावया गंगा सुत ॥ सकळ वाहना खालीं उतरत ॥ भीष्मासी दूरी देखोनि ॥१७५॥
मग प्रदक्षिणा नमन करून ॥ भोंवते शोभती अवघे जण ॥ जैसें मान ससरोवर वेष्टून ॥ राजहंस बैसती पैं ॥१७६॥
भीष्मासी म्हणे मनमोहन ॥ सावधान आहे कीं तुझें मन ॥ शरघातें शरीर जाण ॥ व्यथा पावत नाहीं कीं ॥१७७॥
तूं ऊर्ध्वरेता ब्रह्मचारी ॥ वर्तसी सुंदर स्त्रियां माझारीं ॥ देव न पावती तुझी सरी ॥ मनोजय केला त्वां ॥१७८॥
तूं विरक्त भक्त ज्ञानी ॥ तुजविण थोर नसे कोणी ॥ तरी धर्माचा शोक ये क्षणीं ॥ दूर करीं देवव्रता ॥१७९॥
सर्व धर्मांचें निरू पण ॥ यासी सांगें तूं स्वमुखें करून ॥ भीष्म म्हणे तूं सर्वज्ञ ॥ वेदरूप वेदज्ञ तूं ॥१८०॥
माझें शरीर जर्जर ॥ शरघायें जाहलें चूर ॥ देहान्त समय आतां सत्वर ॥ वाचा विवळ जातसे ॥१८१॥
तरी तूंचि करीं दिव्य निरू पण ॥ तूं षड्गुणैश्वर्यपूर्ण ॥ तुजहूनि मी काय सर्वज्ञ ॥ भक्त वत्सला स्नेहाळा ॥१८२॥
भणंगा पुढें क्षीरसागर ॥ क्षुधा लागली म्हणे फार ॥ वाचस्पति विचार ॥ बोल म्हणे मूढातें ॥१८३॥
याच कांकडे राजा मागे दान ॥ चातकासी घन म्हणे द्या जीवन ॥ तूं पूर्व ब्रह्म सनातन ॥ मज ज्ञान वद म्हणसी ॥१८४॥
हरि म्हणे दुर्धर धनुर्धरा ॥ सर्व ज्ञानी गंगा कुमारा ॥ देवव्रता योगेश्वरा ॥ मी वर तुज देतों पैं ॥१८५॥
क्षुधा तृषा व्यथा ॥ तुज न बाधती तत्त्वतां ॥ शरपंजर शेज पाहतां ॥ सुमना ऐसी तुज होय ॥१८६॥
षड्रिपुरहित तूं साचार ॥ सत्वर जत मातीत तूं निर्धार ॥ अवस्थात्रयातीत निर्विकार ॥ त्रिदोष रहित शरीर हो ॥१८७॥
भीष्मावरी सुमनें सुरेख ॥ वरूनि वर्षती वृंदारक ॥ यावरी तो गंगात्मज देख ॥ नीतिशास्त्रें वदेल पैं ॥१८८॥
धर्म राज भयभीत ॥ पुसावया नव्हे शक्त ॥ आपण अन्याय केले बहुत ॥ म्हणोनि पुढें न येचि ॥१८९॥
श्रीनिवास म्हणे गंगा कुमारा ॥ जवळी बोलावीं युधिष्ठिरा ॥ शंका वाटते त्याच्या अंतरा ॥ अन्यायी आपण म्हणो नियां ॥१९०॥
भीष्म म्हणे समर भूमीस ॥ युद्ध करितां नाहीं दोष ॥ तेथें हत्या कोणाची कोणास ॥ बाधक न होय सर्वथा ॥१९१॥
भीष्म म्हणे धर्म राजा ॥ सोमवंश विजय ध्वजा ॥ जवळी बैसें सुतेजा ॥ शंका मनीं न धरावी ॥१९२॥
मग धर्म राज करूनि नमन ॥ जवळी बैसला कर जोडून ॥ सकल ऋषि मंडळ पावन ॥ ऐकावया सरसावलें ॥१९३॥
यादव पांडव ऐकती ॥ प्रजा जन बहुत बैसती ॥ यावरी भीष्म बोलेल कोणे रीतीं ॥ तेंचि पंडितीं परिसावें ॥१९४॥
श्रीधरवरदा रुक्मिणीवरा ॥ ब्रह्मानंदा विश्वंभरा ॥ भीमातीरवासा दिगंबरा ॥ पुढें रचना बोलें कैसी ॥१९५॥
तूं जें सांगसी मम श्रोत्रीं ॥ तेंचि लिहितों कागद पत्रीं ॥ तुझ्या वचना शिवाय अन्य वक्रीं ॥ नाहीं लिहीत पांडुरंगा ॥१९६॥
स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ शांतिपर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ छप्पन्नाव्यांत कथियेला ॥१९७॥
इति श्री श्रीधरकृतपांडवप्रतापे शांतिपर्वणि धर्मराजज्याभिषेचनं नाम षटूपंचाशत्तमाध्यायः ॥५६॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP