मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप| अध्याय ५७ वा पांडवप्रताप मंगलाचरण अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय २० वा अध्याय १९ वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा पांडवप्रताप - अध्याय ५७ वा पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास. Tags : granthapandavapratappothiग्रंथपांडवप्रतापपोथी अध्याय ५७ वा Translation - भाषांतर ॥ श्री गणेशाय नमः ॥ यावरी तो गंगा नंदन ॥ सकल योगियां माजी मुकुट रत्न ॥ धर्मासी जवळी बोला वून ॥ करी अवघ्राण मस्तक ॥१॥शिरें ठेवूनियां हात ॥ म्हणे सखया न ठेवीं हेत ॥ अवघे मज पुसें शास्त्रार्थ ॥ पुरवीन प्रश्न तुझे पैं ॥२॥यावरी तो युधिष्ठिर ॥ जो शांतीचें पूर्ण सरोवर ॥ म्हणे जन कज नका सत्वर ॥ राज धर्म सांगें कां ॥३॥अंकुशें वळिजे इभजाती ॥ तैसी बोलें नृपनीती ॥ यावरी तो सत्वमूर्ती ॥ भीष्मदेव बोलतसे ॥४॥चार आश्रम चार वर्ण ॥ ऐका आतां सावधान ॥ म्हणे धर्मा करीं श्रवण ॥ राजनीति अगोदर ॥५॥राजा जो पुण्यपरायण ॥ तेणें करावें देव ब्राह्मण पूजन ॥ शिव विष्णु स्वरूप ॥ तेचि प्रतिमा धरामर ॥६॥देखतां द्यावें अभ्युत्थान ॥ बोलावें परम मृदु वचन ॥ अतिनम्रता धरून ॥ चरण त्यांचे वंदावे ॥७॥ब्राह्मणा पासूनि यद्यपि अन्याप ॥ घडे जरी पाहिला स्वयें ॥ तरी दंड न करावा निश्चयें ॥ कालत्रयीं जाण पां ॥८॥त्यासी दंड हाचि तत्वतां ॥ गौरव न करावा पाहतां ॥ मित्रदंड हाचि पंडुसुता ॥ भाषण तयाशीं न करावें ॥९॥नारीदंड हाचि देख ॥ शयन करावें आपण पृथक ॥ ऐसी जाहलिया अटक ॥ होय प्राणान्त स्त्रियेसी ॥१०॥जाईल तरी जावो प्राण ॥ ब्रह्मद्वेष न करावा जाण ॥ करू नियां विष भक्षण ॥ प्रचीत कोणीं पहावी ॥११॥महा सर्प उसां घेऊनि निजला ॥ पुनः तो कोणीं जागा ॥ देखिला ॥ तैसा ब्रह्मद्वेषें कल्याण पावला ॥ नाहीं ऐकिला त्रिभुवनीं ॥१२॥मुमुक्ष भक्त साधु संत ॥ हे प्राणाहूनि मानावे अत्यंत ॥ समयीं युद्धा येईल आप्त ॥ तरी अवश्य त्यासीं झुंजावें ॥१३॥तेथें पिता हो पुत्र बंधु ॥ त्याचा रणीं घडलिया वधु ॥ त्यासी कदा दोष शब्दु ॥ शास्त्र न ठेवी सर्वथा ॥१४॥रायें सदा करणें क्षमा ॥ तेही कदा न ये कामा ॥ बहु तीव्रता धर्मा ॥ तीही सर्वथा योग्य नव्हे ॥१५॥तरी देव ब्राह्मण साधु संत ॥ यांशीं क्षमा धरावी अत्यंत ॥ अत्यंत निर्दय असत्य ॥ त्यांशीं तीव्रता धरावी ॥१६॥खळासी करितां दंड ॥ जैसा वैवस्वत प्रचंड ॥ मतवादियांचें बंड ॥ निरसावया बृहस्पति ॥१७॥जैसी गर्भिणी गर्भ रक्षीत ॥ तैसी प्रजा पाळावी समस्त ॥ सुख सार घ्यावया यथार्थ ॥ दुःख सहसा न द्यावें ॥१८॥वृक्षाचें घ्यावें सुमन ॥ परी न उपडिजे मूळाहून ॥ अथवा शाखाही तोडून ॥ दुःख तयासी न दीजे ॥१९॥वस्त्रालंकारमंडित ॥ निर्भय प्रजा विचरत ॥ प्रजेचें द्रव्य असे बहुत ॥ नृपें तिकडे न पाहावें ॥२०॥राजा याचें अंतःकरण ॥ असावें मृदु नवनीताहून ॥ परी बाह्यवृत्ति व्याघ्र जाण ॥ ग्रासील काय सर्वांसी ॥२१॥अंतरीं निववावा क्रोध ॥ बाहेर दिसावा जातवेद ॥ प्रपंच परमार्थ विशद ॥ दोन्ही पक्ष चालवावे ॥२२॥दोहों पक्षांचे बळेकरूनी ॥ अंडज संचरे जेवीं गगनीं ॥ तैसें प्रपंचरप मार्थीं राजांनीं ॥ समानबुद्धि वर्तावें ॥२३॥प्राणि मात्रासी देख ॥ राजाचा असावा धाक ॥ शांति क्षमा सौम्यता अधिक ॥ ब्राह्मणां लागीं असावी ॥२४॥खळांसी राजा दिसतां शांत ॥ अवज्ञा करितील समस्त ॥ जैसा करी देखोनि शांत ॥ गजाकर्षक वरी चढे ॥२५॥एवढी थोर इभजाती ॥ अंकुशें आकर्षूनि हिंडविती ॥ सौम्य देखोनि नृपती ॥ अन्यायें वर्तती जन मग ॥२६॥परम उन्मत्त क्षुद्र ॥ धर्म वाटा पाडणार ॥ प्रति वर्षीं नृपें साचार ॥ धन त्यांचें हिरावें ॥२७॥गुह्य गोष्टी जे अत्यंत ॥ प्रकट न व्हावी जनांत ॥ वित्त मंत्र औषध गुप्त ॥ बहुत करूनि रक्षावें ॥२८॥राजयांची करिती चेष्टा ॥ उणी करूं इच्छिती प्रतिष्ठा ॥ राज पदवी करणी अचाटा ॥ आपुले ठायीं दाविती ॥२९॥करावें दुष्टांसी शासन ॥ प्रीतीं करावें साधूंचें पालन ॥ गुणी भेट लिया सद्नुण ॥ त्याचा सादर परिसिजे ॥३०॥कुटिल कपटी ओळखावे ॥ त्यांसी एकदां सांगोनि पाहावें ॥ नायकती तरी घालवावें ॥ ग्रामांतूनि बाहेरी ॥३१॥ज्ञानहीन आपण देख ॥ शिष्य करूं धांवे मूर्ख ॥ आचारह्ण जो दांभिक ॥ त्यासी द्दष्टीं न आणावें ॥३२॥जे मातृपितृ भजन ॥ पुत्र न करिती ते दुर्जन ॥ शिष्य न करिती गुरु भजन ॥ नृपें तयांसी दंडावें ॥३३॥प्रजेसी करिती नित्य रंजन ॥ त्यांचेंचि नाम राजा जाण ॥ लोकांसी शिकवावें सत्कारून ॥ हरिगुरु भजन करिजे सदा ॥३४॥पुराण श्रवण हरिकीर्तन ॥ अग्नि सेवा सात्त्विक जाण ॥ अन्नोदक अतिथि पूजन ॥ हरिस्मरण सर्वदा ॥३५॥द्रव्य वंतें घालावें अन्न सत्र ॥ वापी कूप तडाग पवित्र ॥ करावीं उद्यानें अपार ॥ उत्तम वृक्षारो पण ॥३६॥रायें आपुला कोश ॥ वर्धमान करावा विशेष ॥ द्रव्य व्यय नित्य आसमास ॥ द्दष्टीं पाहोन लिहिजे पत्रीं ॥३७॥आजि द्रव्य वेंचलें किती ॥ हें ॥ नित्य विचारावें नृपतीं ॥ तीन प्रहर होय रात्री ॥ नृपें करावें जाग रण ॥३८॥विद्यावंत परी दुर्जन ॥ करी कापटय जारण मारण ॥ तो बाहेर गांवांतून ॥ नृपें सत्वर दवडावा ॥३९॥विचार न करितां राया ॥ न करावी कांहीं एक क्रिया ॥ आदि अंत पाहो नियां ॥ कर्तव्य शुद्ध करावें ॥४०॥कोण काळ काय मित्र ॥ जोडी थोडी शत्रू फार ॥ या गोष्टींचा विचार ॥ नृपें करावा क्षणक्षणां ॥४१॥शास्त्र प्रमाण समयो चित ॥ वाक्य दावी जो पंडित ॥ तो पाळावा कुटुंबा सहित ॥ द्रव्य बहुत देऊ नियां ॥४२॥प्रजा वैभवें विचरती ॥ सुखें मार्गें येत जाती ॥ तस्कर वनांत न वसती ॥ ऐसी रीति रायें कीजे ॥४३॥नगर होय अथवा कांतार ॥ रात्रींत न हिंडावे तस्कर ॥ कुडें कपट करणार ॥ नगरा माजी नसावे ॥४४॥साधु भक्त ब्राह्मण ॥ नित्य चिंतन करिती कल्याण ॥ राजासी आयुष्य प्रजा संपूर्ण ॥ चिंतिती ऐसें वर्तावें ॥४५॥उत्तम मंदिरें बांधोन ॥ ब्राह्मणांसी द्यावीं दान ॥ विप्रांचें घर घेतां हिरोन ॥ ऐश्वर्य आयुष्य नाश होय ॥४६॥संतांचें मन रक्षावें ॥ त्यांसी गांवांतूनि जाऊं न द्यावें ॥ चिंता दुःख त्यांचें हरावें ॥ बहुत घ्यावे आशीर्वाद ॥४७॥रायें नित्य सभेसी बैसून ॥ पुसावें राज्यांतील वर्तमान ॥ कोणासी दुःख देतो कोण ॥ मनासी सर्व आणावें ॥४८॥आपणासी दावूनि आप्तपण ॥ शत्रूसी सांगे वर्तमान ॥ तो आधीं नगरांतून ॥ नृपें बाहेर घालावा ॥४९॥मैत्र मुखा वरी स्तुति करिती ॥ परी घरा जाऊनि काय बोलती ॥ तें कर्णीं ऐकोनि भूपतीं ॥ तैसें त्यांसी वाढ विजे ॥५०॥परम नीच बोलती पैशून्य ॥ सूक्ष्म दोष दाविती थोर करून ॥ तयांसी सभेचें स्थान ॥ यावयालागीं वर्जावें ॥५१॥सूक्ष्म दोष अन्याय ऐकोन ॥ रायें तेथें न घालावें मन ॥ त्यांसी एकांतीं सांगावें पाठवून ॥ पुण्यपंथें वर्तत जा ॥५२॥परराज्य घ्यावया ॥ रायासी नसावा बहु स्वार्थ ॥ शत्रु दुर्बळ हो निश्चित ॥ भरंवसा कदा न धरावा ॥५३॥रायासी एकचि प्रधान ॥ हेंही अनर्थकारक जाण ॥ तरी अमात्य असावे चौघे जण ॥ जाणती जे अंतर रायाचें ॥५४॥बहुत असतां दळ जवळी ॥ पुढें उडी न घालावी भूपाळीं ॥ पडती कलेवरें ज्यांचीं रण मंडळीं ॥ कुटुंबें त्यांचीं प्रतिपाळावीं ॥५५॥राजे आणावे जिंकोन ॥ पुनः सोडावे आपुलेसे करून ॥ ते करभार देती आणून ॥ न मागतां आपणचि ॥५६॥राज यांनीं आपुलीं मंदिरें ॥ एकांत स्थळीं बांधावीं सुंदरें ॥ कित्येक राखावीं गुप्तद्वारें ॥ कोणासी कळों न द्यावीं तीं ॥५७॥शय्याद्वारींचे रक्षक ॥ बहुत असावे विश्वासुक ॥ उदक देणार हडपी देख ॥ स्नेहाळ बहुत असावे ॥५८॥पाककर्तें आणि चिकित्सक ॥ अंगमर्दक आणि नापिक ॥ सर्वदा पृष्ठरक्षक ॥ स्नेहाळ बहुत असवे ॥५९॥उन्मत्त गज उन्मत्त तुरंग ॥ यांसी शिक्षा करावी सांग ॥ नृपें आरूढावें त्यांवरी मग ॥ न पडे व्यंग मग कांहीं ॥६०॥उत्तम तैल सुवास वस्त ॥ वस्तें पाठविती द्वेषी गुप्त ॥ विचार पाहूनि निश्चित ॥ मग नृपें अंगीकारावीं तीं ॥६१॥परम सुजाण चतुर ॥ त्यांसी न द्यावा अधम व्यापार ॥ सचिवपदवीवरी वृषली पुत्र ॥ सह साही न ठेवावा ॥६२॥विद्यावंतांचा अपमान ॥ कदाही न करावा जाण ॥ ते आणिके देशीं जाऊन ॥ दीर्घ निंदा करितील ॥६३॥त्यांसी देशावर देऊनि प्रीतीं ॥ बोळवावे नृपें निगुती ॥ याचकांची आशा पुरतां निश्चितीं ॥ करिती स्तुति स्थलांतरीं ॥६४॥सभास्थानीं दुर्जन तत्वतां ॥ येऊं न द्यावे नृपनाथा ॥ दुर्जनाचा विचार न पाहतां ॥ परकार्य निवटावें ॥६५॥तृप्त नव्हें उदर ॥ परी मूषक तोडिती दिव्य वस्त्र ॥ तैसा दुर्जन कातर ॥ महत्कार्य विध्वंसी ॥६६॥दुर्जनाचा सहवास ॥ संकटीं लोटीं सज्जनास ॥ जेवीं घटिका प्राशी जीवनास ॥ ताडण त्रास सोशीतसे ॥६७॥वंशचाप सद्नुण सहित ॥ विराजे कोटिद्वय संयुक्त ॥ परी तें पहा गर्व रहित ॥ कैसें लवत ओढितां ॥६८॥लक्ष साधूनि परिकर ॥ गर्वें न लवेचि अणुमात्र ॥ धन्य वंशज साचार ॥ सभाग्य आणि नम्र पैं ॥६९॥मी एक सर्वज्ञ पृथ्वी पती ॥ हा गर्व न धरावा चित्तीं ॥ मग लक्ष्मी माझी हे संपत्ती ॥ हें वाचे प्रति नाणावें ॥७०॥लक्ष्मीपति नारायण ॥ तीस आपुली म्हणतां दूषण ॥ सर्व कर्ता जगज्जीवन ॥ वारंवार स्मरावा ॥७१॥नेत्रवक्रांचे विकार ॥ त्यावरूनि समजावें कुटिलांचें अंतर ॥ जार तस्कर चहाड खोर ॥ चिन्हें तत्काळ दाविती ॥७२॥त्यजीं दुर्जन संसर्ग ॥ साधु संगीं धरीं अनुराग ॥ पुण्य क्रिया शुद्ध मार्ग ॥ लक्षो नियां जाइंजे ॥७३॥नित्या नित्य विचार श्रवण ॥ साधु मुखें करावें अनुदिन ॥ स्मरणें मधु सूदन ॥ आपणा धीन करावा ॥७४॥वाणी असावी सुरस मधुर ॥ ललना पतिव्रता आणि सुंदर ॥ ऐश्वर्य आणि औदार्य फार ॥ तरीच सफल जीवित पैं ॥७५॥लाभ फार अल्प प्रयत्न ॥ तेथें रायें घालावें मन ॥ ब्राह्मणांच्या अक्षता घेउना ॥ शिरीं नित्य वंदाव्या ॥७६॥परांची दुःख वेदना ॥ रायें बरवी आणावी मना ॥ दुर्बळासी देऊनि धना ॥ वर्धमान करावें ॥७७॥देवालयें होतां जीर्ण ॥ पुनः करावीं नूतन ॥ धर्म शाला मठ गुहा करून ॥ श्रीपादांसी देइंजे ॥७८॥पुस्तकांचें करावें संरक्षण ॥ विद्येचें करावें उद्धरण ॥ धन धान्य गोधन ॥ आपण ॥ स्वयें द्दष्टीं विलोकावें ॥७९॥चंद्रकळा बीजे पासून ॥ दिव सेंदिवस होय वर्धमान ॥ तैसी बुद्धि वाढे विशेष पूर्ण ॥ राजनीति मनीं धरितां ॥८०॥सेवकांचें वेतन ॥ पावतें करावें संपूर्ण ॥ अद्भुत कार्य येतां दिसून ॥ द्यावें वेतन ॥ वेगळें ॥८१॥ब्राह्मणा जाहलें बहुत ऋण ॥ गेला तरुण जाया टाकून ॥ रायें करूनि ऋण मोचन ॥ दोघें एकत्र करावीं ॥८२॥बहुत भोजन बहुत निद्रा ॥ कदाही नसावी नरेंद्रा ॥ नित्य नैमित्तिक कर्में उदारा ॥ यथा सांग आचरावीं ॥८३॥ऐसी राजनीति विचार ॥ निरूपीत स्वर्धुनी कुमार ॥ श्रवन करी युधिष्ठिर ॥ ऋषिरायां समवेत ॥८४॥यावरी कथिले आपद्धर्म ॥ सांगीतले दान धर्म सुगम ॥ राज धर्म उत्तम ॥ तोचि आधीं कथियेला ॥८५॥चौथा सांगितला मोक्ष धर्म ॥ जें अद्वैतज्ञान निःसीम ॥ अनुशासनपर्व उत्तम ॥ त्याचेंचि अंग जाणिजे ॥८६॥राज धर्म आपद्धर्म ॥ दान धर्म मोक्ष धर्म ॥ अनुशासाना सहित उत्तम ॥ शांतिपर्व एकचि ॥८७॥पंच दश सहस्त्र श्लोक ॥ बोलिला व्यास पुण्य श्लोक ॥ समुद्रतुल्य ग्रंथ सुरेख ॥ टीका न करवे सर्वथा ॥८८॥हा पांडवप्रताप ग्रंथ ॥ वदवीतसे पंढरीनाथ ॥ पाल्हाळ टाकूनि समस्त ॥ कथा मथित धरियेली ॥८९॥कथा राहिली नाहीं किंचित ॥ विस्तार धरिला नाहीं बहुत ॥ शांतिपर्व पर्यंत ॥ कथा रसाळ कथियेली ॥९०॥असो शांतिपर्वीं मथितार्थ ॥ चार्ही धर्म कथिले यथार्थ ॥ तों उत्तरायण जाहलें प्राप्त ॥ परम पुण्य पावन जें ॥९१॥धृत राष्ट्रही आला तेथ ॥ विदुर कृपाचार्य धांवले त्वरित ॥ राजे आणि ऋषिमेळा बहुत ॥ पूर्वींच आला श्रवणासी ॥९२॥भीष्म मुखें अद्भुत ज्ञान ॥ ऐकतां तोषले मुनिजन ॥ द्वारकानाथ विश्वंभर पूर्ण ॥ तोही जवळी बैसला ॥९३॥व्यास नारदादि मुनी ॥ बैसले जवळी येऊनी ॥ छप्पन्नकोटी वृष्णी ॥ भीष्म दर्शना पातले ॥९४॥अंतकाळीं भीष्माचें शरीर ॥ दिव्यरूप जाहलें साचार ॥ घाय बुजाले समग्र ॥ निघाले शर सर्वागाचे ॥९५॥शुद्ध अष्टमी माघमास ॥ माध्यान्हीं आला चंडांश ॥ भीष्में पुसोनि सर्वांस ॥ श्रीकृष्ण स्वरूप न्याहाळिलें ॥९६॥किरीटकुंडल मंडित वदन ॥ चतुर्भुज इंदिरामन मोहन ॥ तीन वेळां चरणां पासूनि ध्यान ॥ न्याहाळिलें आवडीनें ॥९७॥बाहेर देखिला मूर्तिमंत ॥ तैसाचि रेखिला ह्रदयांत ॥ पाहोनि स्थळ निवान्त ॥ दीप जैसा रक्षिजे ॥९८॥सहस्त्रनामें करून ॥ केलें श्रीरंगाचें स्तवन ॥ मग महावाक्य चिंतून ॥ योगधारणा अवलंबिली ॥९९॥आकर्षूनि सर्व प्राण ॥ दशमद्वार ऊर्ध्व भेदून ॥ दिव्यज्योति निघोन ॥ ब्रह्मानंदीं समरसली ॥१००॥जळ मिळालें जीवनीं ॥ कीं नाद विराला गगनीं ॥ तैसा गंगा नंदन ते क्षणीं ॥ तदाकार जाहला ॥१०१॥जाहला एकचि जय जय कार ॥ सुमनें वर्षती वृंदारक समग्र ॥ दुंदुभिनाद अपार ॥ सुरेंद्र करवी तेधवां ॥१०२॥देवव्रताची स्तुती ॥ वारंवार ऋषी करिती ॥ आद्यंत भीष्माची रीती ॥ श्रीरंग वर्णी वारंवार ॥१०३॥पांडवांचे नेत्रीं अवधारा ॥ लोटल्या तेव्हां विमलां बुधारा ॥ धर्म म्हणे श्रीकरधरा ॥ तूं आणि भीष्म एकचि ॥१०४॥येवढे कथूनि अद्भुत ज्ञान ॥ तुझे स्वरूपीं जाहला निमग्न ॥ मग बोले मन मोहन ॥ उत्तर कार्य संपादीं ॥१०५॥मग मलयागर कृष्णागर ॥ चंदनकाष्ठें आणोनि अपार ॥ कस्तूरी केशर कर्पूर ॥ यांचें संभार रचियेले ॥१०६॥भागी रथींत नेऊन ॥ भीष्मासी घातलें शुद्ध स्नान ॥ दिव्यगंधें करून ॥ शरीर आधीं चर्चिलें ॥१०७॥दिव्यवस्त्रें नेसविलीं ते अवसरीं ॥ चिता रचिली स्वर्धुनीतीरीं ॥ शुभ्रच्छत्र सतेज वरी ॥ वृकोदरें धरियेलें ॥१०८॥मकरबिरुदें राज चिन्हें आणून ॥ समस्त उभीं करिती जाण ॥ पार्थ पादुका घेऊन ॥ विलोकीत वदन भीष्माचें ॥१०९॥होय वांद्यांचा गजर ॥ सुरेंद्र वर्षे सुमनभार ॥ चितेवरी भीष्माचें कलेवर ॥ युधिष्ठिरें पहुडविलें ॥११०॥उभय चामरें घेऊन ॥ वरी वारिती माद्रीनंदन ॥ कुंती द्रौपदी येऊन ॥ गंगात्मजा विलोकिती ॥१११॥अपार रचूनि कर्पूर ॥ झांकिलें तेव्हां कलेवर ॥ धर्में लाविला वैश्वानर ॥ यथाविधि करू नियां ॥११२॥यावरी उत्तर क्रिया समस्त ॥ यथा सांग धर्म करीत ॥ त्रयोदश दिवस पर्वंत ॥ जान्हवीतीरीं राहिले ॥११३॥करूनि धर्में अपार दान ॥ तोषविला गंगानंदन ॥ यावरी करीत भीष्माचें स्तवन ॥ ऋषी गेले स्वस्थाना ॥११४॥श्रीरंगा सहित पांडव ॥ हस्तिना पुरासी आले सर्व ॥ धर्म न्यायें धर्म राज ॥ राज्य करिता जाहला ॥११५॥शांतिपर्व झालें हें अगाध ॥ येथूनि पुढें अश्वमेध ॥ तें श्रीधरवरद ब्रह्मानंद ॥ पांडुरंग बोलवील पैं ॥११६॥स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ शांतिपर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ सत्तावन्नाव्यांत कथियेला ॥११७॥इति श्री श्रीधरकृतपांडवप्रतापे शांतिपर्वणि सप्तपंचाशत्तमाध्यायः ॥५७॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥॥ श्रीपांडवप्रताप शांतिपर्व समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : February 10, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP