मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप| अध्याय ८ वा पांडवप्रताप मंगलाचरण अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय २० वा अध्याय १९ वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा पांडवप्रताप - अध्याय ८ वा पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास. Tags : granthapandavapratappothiग्रंथपांडवप्रतापपोथी अध्याय ८ वा Translation - भाषांतर ॥ श्री गणेशाय नमः ॥ कुंतीमाद्री उदर गगनांत ॥ उदय पावले पंच आदित्य ॥ कीं पंचशाव कांशीं ऐरावत ॥ पंडु विचरे काननीं ॥१॥वस्त्र भूषणां वीण ॥ दिसती परम शोभा यमान ॥ क्रीडा करिती कौतुकें करून ॥ माता पिता संतोषती ॥२॥ऋषि आणि ऋषिका मिनी ॥ देव स्वरूपें म्हणूनी ॥ फलें मूलें उपचार देऊनी ॥ क्रीडाकौतुक विलो किती ॥३॥पंच कुमारां सहित कुंती ॥ दिव्य वनीं कौतुकें विचरे ती ॥ माद्री आणि पंडुनृपती ॥ अन्य काननीं वसती हो ॥४॥वृक्ष भेदीत गेले गगन ॥ माजी न दिसे सूर्य किरण ॥ वसंत अवतरला संपूर्ण ॥ शोभे वन फल पुष्पीं ॥५॥कोकिलांचे सुस्वर ॥ कमलीं भ्रमरांचे झंकार ॥ हंसहं सिणी प्रीतीं प्रीतीं थोर ॥ सुरतानंदें क्रीडती ॥६॥करी आणि करिणी ॥ मृग आणि कुरंगिणी ॥ चक्रवाक त्याम धूनी ॥ अति संतोषें विचरती ॥७॥बाप रे न चुके होणार ॥ ह्र्दयीं संचरला काम विखार ॥ रक्षिला होता दिवस फार ॥ तो फुंफाटत ऊठिला ॥८॥घ्यावया पंडूचे प्राण ॥ मनीं उद्भवला पंच बाण ॥ आधींच तें एकान्त वन ॥ वनिता मंडन माद्री सवें ॥९॥मरण विसरोनि पतंग ॥ दीपावरी पडे सवेग ॥ तैसें माद्रीचें अंग ॥ पंडुराज स्पर्शीतसे ॥१०॥ वाम हस्तें आकळी नारी ॥ सव्य हस्तें आसुडी निरी ॥ अहा म्हणे तदा माद्री ॥ मरण तुम्हांसी या कर्में ॥११॥परी नाय केचि नृपती ॥ बळोंचि मिसळला सुरतीं ॥ वीर्य होतां अधोगती ॥ गेला प्राण निघो नियां ॥१२॥माद्रीचे शरीरावरी अद्भुत ॥ पसरलें पंडुनृपाचें प्रेत ॥ दीर्घ स्वरें रोदन करीन ॥ ऐकतां कुंती धांविन्नली ॥१३॥कुंतीसी म्हणे माद्री ॥ कुमार ठेवूनि बाहेर दूरी ॥ तूं जवळी येईं झडकरी ॥ अनर्थ थोर जाहल ॥१४॥अंतरें ठेवूनि पंच सुत ॥ जवळी येतां देखिलें राज प्रेत ॥ हाहाकार पृथा करीत ॥ नाहीं अंत शोकातें ॥१५॥मग म्हणे माद्री प्रती ॥ म्यां बहुत दिवस रक्षिला नृपती ॥ मूर्खे तुवां आजि एकांतीं ॥ परम प्रलय केला हा ॥१६॥माद्रा म्हणे म्यां वारिलें बहुत ॥ परी नाय केचि नृपनाथ ॥ अहो होणार बळवंत ॥ हरिहरांसी टळेना ॥१७॥आतां वल्लभा सांगातें जाण ॥ मी करीन सहग मन ॥ कुंती म्हणे तूं अज्ञान ॥ मीच जाईन समागमें ॥१८॥माद्री बोले प्रर्थून ॥ माझा काम जाहला नाहीं पूर्ण ॥ राव ऐसाचि ह्रदयीं धरून ॥ प्रवेश करीन हुताशीं ॥१९॥मज करितां जाहलें मरण ॥ तरी मीच त्याची सांगातीण ॥ नकुल सहदेव दोघे जण ॥ करीं पालन तूं माये ॥२०॥ते तुंवा दिधले तुझेचि नंदन ॥ तरी मी प्रार्थूं कासया लागून ॥ हें बोलूनि न लागतां क्षण ॥ माद्रीनें प्राण सोडिले ॥२१॥कुंती म्हणे कर्म गहन ॥ क्षणांत गेली सृष्टि टाकून ॥ अपार मिळाले ऋषि जन ॥ करिती सांत्वन कुंतीचें ॥२२॥ऋषि म्हणती पंडुभूपाल ॥ आमुचे संगतीं क्रमूनि बहुकाल ॥ परम प्रतापी पुण्य शील ॥ भाग्यें लाधला सुपुत्रांतें ॥२३॥समागमें कुंती आणि कुमार ॥ दोन्ही प्रेतें घेऊनि ऋषीश्वर ॥ लंधीत देश अपार ॥ हस्तिना पुरा पातले ॥२४॥नगरा बाहेर गंगा तीरीं ॥ ऋषि मेळा थोकला ते अवसरीं ॥ प्रेतशिबिका भूमीवरी ॥ उतरली कीं ते कालीं ॥२५॥पंच कुमारांशी कुंती ॥ प्रेतें घेऊनि आली नगरा प्रती ॥ राज हेरीं त्वरितगती ॥ वार्ता नेली नगरांत ॥२६॥भीष्म बाल्हीक धृतराष्ट्र ॥ कृपाचार्य आणि विदुर ॥ यांसी हेरीं सांगितला समाचार ॥ त्यांहीं स्त्रियांसी जाण विलें ॥२७॥अंबिका अंबा लिका सत्यवती ॥ ह्रदय पिटीत धांवती ॥ सकल स्त्रियांसीं गांधारी सती ॥ कुंती पाशीं धांवत ॥२८॥गज बजलें हस्ति नापुर ॥ बाहेर धांवती नारी नर ॥ दाटी जाहली अपार ॥ जावया मार्ग फुटेना ॥२९॥भीष्म विदुर धृत राष्ट्र ॥ धांवले वेगें नगरा बाहेर ॥ चतुरंग सेना अपार ॥ गंगा तीरीं धांवतसे ॥३०॥ताप समेळा पाहूनि समस्त ॥ साष्टांगें नमीत गंगा सुत ॥ गर्जोनि तापसी बोलत ॥ ऐका समस्त पौरजन हो ॥३१॥शत श्रृंगीं बहुकाल ॥ तप आचरला पंडुभूपाल ॥ पंच देवता स्वरूप अचल ॥ पंचपुत्र जाहले ॥३२॥पंडु पावला निधना ॥ पांडव आणिले स्वस्थाना ॥ आतां यांवरी करूनि करुणा ॥ पालन करावें सर्वांहीं ॥३३॥पंडूने सोडूनि प्राण ॥ आजि जाहले सप्तदश दिन ॥ उत्तर कार्य यथा विधि करून ॥ करा पालन पांचांचें ॥३४॥ऐसें बोलूनि ते वेळां ॥ गुप्त जाहला ताप सांचा मेळा ॥ आश्चर्य वाटे सकळां ॥ म्हणती धन्य तपस्वी ॥३५॥भीष्म म्हणे दर्शन देऊन ॥ पूजा न घेतां गेले निघोन ॥ ईश्वरी पुरुष सभाग्य पूर्ण ॥ चाड त्यां काय आमुची ॥३६॥आम्ही राजे आणि दीन ॥ दोन्ही त्यांचे द्दष्टीं समान ॥ द्रव्य संपदा तृण वत पूर्ण ॥ वैराग्य भावें सभाग्य ते ॥३७॥असो ह्रदयीं धरूनि पंडु सुत ॥ धृत राष्ट्र आक्रोशें रडत ॥ कुंतीच्या गळां मिठी घालीत ॥ सत्य वती गांधारी ॥३८॥अंबिका अंबा लिका सत्यवती ॥ शोक समुद्रीं करिती वस्ती ॥ असो बारा दिवस भागीरथी ॥ तीरीं शिबिरें उभविलीं ॥३९॥भार्ये सहित पंडुचें शरीर ॥ अग्नींत घालिती सत्वर ॥ चंदन काष्ठें आणि कर्पूर ॥ शेज यांची रचियेली ॥४०॥मलयागर कृष्णागर ॥ तुल सीबिल्व काष्ठें पवित्र ॥ कस्तूरी चंपक समग्र ॥ सुवा सवस्तु बहुतचि ॥४१॥गंगेंत न्हाणूनि ॥ मग चर्चिली चंदन कस्तूरी ॥ दिव्यां बरीं अलंकारीं ॥ श्रृंगारिलीं दोघेंही ॥४२॥छत्र चामर मकर बिरुद ॥ श्रृंगारूनि उभीं केलीं सिद्धू ॥ राज चिन्हें नाना विध ॥ विधुत्प्राय झळकती ॥४३॥गर्जती वाद्यांचे गरज ॥ गंगा तट पाहूनि पवित्र ॥ चिता रचूनि सत्वर ॥ शरीरें दोन्ही ओपिलीं ॥४४॥तेरा दिवा पर्यंत ॥ दानें केलीं यथोक्त ॥ न्यून कांहीं न पडे तेथ ॥ धन अमित वांटिलें ॥४५॥मग प्रवेशलीं नगरांत ॥ मुख्य राज गृहीं कुती राहात ॥ संपत्ति भरिल्या अमित ॥ वर्णितां अंत न लागेचि ॥४६॥पांडव जें जें मागती ॥ तें तें देऊनि करी तृप्ती ॥ धृत राष्ट्र येऊनि गृहा प्रती ॥ सांभाळीत क्षण क्षणां ॥४७॥घडिघडि गंगा सुत ॥ बालुकांचे लळे पुरवीत ॥ विदुर अहो रात्र वसत ॥ पांडव गृहीं आवडीं ॥४८॥सत्यवतीसी एकांती ॥ व्यास देव येऊनि सांगती ॥ येथूनि संतोषग भस्ती ॥ मावळत चालिला ॥४९॥क्लेशकाळ येथूनि बहुत ॥ धर्म क्रिया लोपेल समस्त ॥ वाढेल अनाचार अत्यंत ॥ वैराग्य विवेक लोपेल ॥५०॥अविद्येचे धुराळे उठती ॥ तेथें कोणा कोणी नोळखती ॥ बदरी वना ऋषि जाती ॥ सिद्ध न देती दर्शना ॥५१॥पृथ्वी ग्रासील रत्नें धन ॥ यथाकालीं न वर्षे घन ॥ मंत्र वीर्त्यें होती अप्रमाण ॥ औषधें गुण त्यागिती ॥५२॥दैवतें सांडिती देव पण ॥ राहती होऊनि पाषाण ॥ कुलीं कलि उपजेल दारुण ॥ भूभुज सर्व संहारती ॥५३॥गांधारीचा वडील सुत ॥ तो कुरुकुल जाळील समस्त ॥ तरी तूं माते त्वरित ॥ निघें आतां येथूनि ॥५४॥हे एक दांचि मरती समस्त ॥ यांची माया सोडीं यथार्थ ॥ पुढें दिसतो महा अनर्थ ॥ ऊठ त्वरित आतांचि ॥५५॥सत्य वती म्हणे व्यासातें ॥ हा प्रलय न देखवे मातें ॥ मी येईन तुज सांगातें ॥ सार्थक आपुलें करा वया ॥५६॥उभय स्त्रुषा हातीं धरून ॥ पुसे भीष्म विदुरांसी येऊन ॥ व्यास संगें करून ॥ बदरी वनीं सुखी राहूं ॥५७॥सत्समागम सच्छास्त्र श्रवण ॥ आचरूं खडतर तप पूर्ण ॥ साधूं परत्र साधन ॥ न राहूं आतां क्षण भरी ॥५८॥भविष्य जाणोनि समग्र ॥ आज्ञा देती भीष्म विदुर ॥ व्यास संगें तिघी सत्वर ॥ बदरिका श्रमीं पातल्या ॥५९॥श्रवण मनन निदिध्यास ॥ साक्षात्कारें जाहल्या समरस ॥ गंगेंत शरीर ठेवूनि निर्दोष ॥ कैवल्यपद पावल्या ॥६०॥यावरी प्रज्ञा चक्षु राजेश्वर ॥ कौरव आणि पंडुकुमार ॥ मौंजी बंधन वेद संस्कार ॥ करी तेव्हां सर्वांसी ॥६१॥भोजन पानें सुरवाडती ॥ वस्त्रा भरणीं मिरवती ॥ दिवसें दिवस वाढती ॥ शुक्लशशि सारिखे ॥६२॥नाना यानीं आरूढती ॥ लोक फिरतां विलो किती ॥ कुमार दशेचे खेळ खेळती ॥ नाना गती विचित्र ॥६३॥दक्षत्वें पांडव आगळे होती ॥ डाव मात्र कौरव हरती ॥ जैसा श्वाप दांत ऐरावती ॥ भीम सेन तेवीं दिसे ॥६४॥पळतां अवघे मागें सांडी ॥ झोंबींत अवघ्यांसी एकला पाडी ॥ पृष्ठीं वाहूनि तांतडी ॥ शिवोनि हारी आणीत ॥६५॥माणिक गोटिया रत्न कुंदुक ॥ भोंवरे चक्रें विटिया सुरेख ॥ सर्व खेळीं हारी आणी अधिक ॥ अजा शब्दें बाहे तयां ॥६६॥म्हैसा करुनि भीम सेन ॥ शकुनि आणि दुर्यो धन ॥ दुःशा सनादिक मिळोन ॥ हस्त पाद कवळिती ॥६७॥मुसंडी देरूनि सबळ ॥ मस्तकें फोडूनि पाडी सकळ ॥ चरण कर खुरें केवळ ॥ अंगें चूर्ण करी त्यांचीं ॥६८॥एका झुगारीत गगनीं ॥ एकासी आपटीत मेदिनीं ॥ बाहीं बहु साल कवळूनी ॥ अगाध डोहीं बुडवीत ॥६९॥नाकीं तोंडीं पाणी भरत ॥ मग बाहेर टाकी प्रेतवत ॥ वृक्षावरी कौख चढत ॥ फळें तोडितां देखिले ॥७०॥लत्ता प्रहारें वृक्ष मोडी ॥ एकदांचि तितुके खालीं पाडी ॥ टेंकावरूनि बळें ओढी ॥ पाठी खरडी सर्वांच्या ॥७१॥आपण एडला होत ॥ थडका कौरवांसी देत ॥ धर्मासी राजा करीत ॥ आपण होत कुंजर पुढें ॥७२॥चोर करूनि कौरव ॥ आपुले चरणीं बांधीं सर्व ॥ शिला संधींत घेत धांत ॥ तेव्हां मस्तकें फुटती पैं ॥७३॥कौरवांसी म्हणे अवधारा ॥ असंख्य मुष्टघातें मज मारा ॥ मग मूर्खें आठवूनि वैरा ॥ हाणितां मागें न पाहती ॥७४॥हाणितां भागतां भागती त्यांचे कर ॥ मग त्यांसी म्हणे वृकोदर ॥ आपुलें उस्णें घ्या समग्र ॥ व्याजा सहित येधवां ॥७५॥मग मुष्टि प्रहारें हाणी बळी ॥ तेणें कुंभिनी डळमळी ॥ मूर्च्छित पडती कौरव सकळी ॥ उसणें देतां तयांचें ॥७६॥म्हणे उसणें घेतां हांसतां ॥ देतां कां रे अवघे रडतां ॥ मग म्हणे उठा आतां ॥ रडी खेळतां नका खाऊं ॥७७॥धर्मासी ॥ आपण बैसे अनुष्ठानीं ॥ कौरव आहुति मानूनी ॥ अग्नींत ढकली बळानें ॥७९॥मत्स्या वतार होय भीम सेन ॥ म्हणे शंखा सुर हा दुःखा सन ॥ मत्स्या कार तळपोन ॥ पायीं धरून ओढी तया ॥८०॥कूर्म पृष्ठी करूनि आपुली ॥ म्हणे मुष्टिघातें मारा सकलीं ॥ मारितां मुष्टी फुटल्या ते वेळीं ॥ परी सह साही डळमळेना ॥८१॥आपण वराह होत ॥ म्हणे हे हिरण्याक्ष समस्त ॥ त्यांचे ह्रदयीं रोंवी दांत ॥ मुसंडी देत नाटोपे ॥८२॥आपण नरसिंह होत ॥ दुःशा सनासी आडवें घेत ॥ म्हणे नखें पोट फोडूं येथ ॥ किंवा पुढें विदारूं ॥८३॥आपण त्रिविक्रम दुःशा सन बळी ॥ म्हणे आतां घालितों पाताळीं ॥ भार्गव होऊनि म्हणे सकळी ॥ कौरव क्षत्रिय मारीन ॥८४॥आपण राघव होय देखा ॥ जय द्रथा करी शूर्पणखा ॥ पार्थ हा लक्ष्मण सखा ॥ प्रतिष्ठा नासिक छेदील पुढें ॥८५॥कृष्णा वतारींचे खेळ ॥ माजेल जेव्हां रणमंडळ ॥ तेव्हां दाखवूं सकळ ॥ रथीं घननीळ बैस वूनी ॥८६॥तेरा वर्षें पर्यंत ॥ बौद्ध रूप धरूं यथार्थ ॥ पुढें कलि माज वूनि समस्त ॥ कौरवम्लेच्छ संहारूं ॥८७॥ऐसा भीम खेळ खेळत ॥ कौरव विषाद पावती समस्त ॥ बल न चाले पाहती तटस्थ ॥ न दाविती बोलो नियां ॥८८॥दुर्यो धन संतापत ॥ शकुनीसी संकेत दावीत ॥ येरू त्याचा ह्स्त दडपीत ॥ याचें उसणें घेऊं पुढें ॥८९॥कौरव जाऊनि अंधासी सांगती ॥ निजांगींची क्षतें दाविती ॥ न खेळूं म्हणतां आम्हां प्रती ॥ ओढूनि नेतो भीम सेन ॥९०॥धृत राष्ट्रासी शकुनि सांगत ॥ आतां न वांचती तुजे सुत ॥ खेळतां मेले कीं जित ॥ भीम सेन न पाहे ॥९१॥धृत राष्ट्र तें न आणी मन ॥ म्हणे पंडु गेला स्वर्ग भुवना ॥ विपरीत बोलतां जना ॥ माजी भेद दिसेल पैं ॥९२॥मनांत म्हणे दुर्यो धन ॥ हा एक मरवा भीम सेन ॥ मग उरले चौघे जण ॥ त्यांचा लेखा कायसा ॥९३॥सुयोधन कर्ण दुःशासन ॥ चौथा शकुनि एकांतीं बैसून ॥ म्हणती नाना उपाय करून ॥ भीम सेन मारावा ॥९४॥एक म्हणे पाश घालावे ॥ दुजा म्हणे विष चाल वावें ॥ एक म्हणे महा सर्प आणावे ॥ करवावे दंश बळानें ॥९५॥शकुनि म्हणे प्रकट न होय ॥ ऐसा करावा कांहीं उपाय ॥ भीमासी मोद्क वाटती प्रिय ॥ विषमि श्रित करावे ते ॥९६॥वन क्रीडेसी जाऊ नियां ॥ त्यासी द्यावे भक्षा वया ॥ अवघ्यांस मान वली हे क्रिया ॥ म्हणती प्रकट बोलूं नका ॥९७॥सूत्र धारां सांगे सुयोधन ॥ गंगातीरीं निर्मावें दिव्य सदन ॥ गुप्त ओवर्या निद्रा स्थान ॥ माडया बहुत निर्माव्या ॥९८॥सांगितल्या हूनि विशेष सूत्र धारीं ॥ क्रीडा धाम रचिलें गंगा तीरीं ॥ सुयो धन धर्मासी विनंती करी ॥ म्हणे चला जाऊं जल क्रीडे ॥९९॥अजात शत्रु धर्मराज ॥ अवश्य म्हणिनि उठला तेजः पुंज ॥ बंधु चौघे सहज ॥ समागमें चालती ॥१००॥षड्रस आणि चतुर्विधान्नें ॥ सवें घेतलीं सुयो धनें ॥ विषमोदक भीमाकारणें ॥ अति प्रयत्नें कर विले ॥१०१॥बचनाग सोमल अहिफेण ॥ जेपाळ राज विषें दारुण ॥ ज्यांचा वास घेतां पूर्ण ॥ तत्काल मरण जीवांसी ॥१०२॥ऐसें विषें मिळवूनि देख ॥ भीमालागीं वळिले मोदक ॥ इकडे सेने सहित सकळिक ॥ गंगा तीरा पातले ॥१०३॥नाना यानीं बैसले ॥ फिरूनि वाहनीं श्रमले ॥ मग जल क्रीडे प्रवर्तले ॥ कौरव पांडव तेधवां ॥१०४॥परस्परें जल शिंपिती ॥ अगाध नीरीं बुडया देती ॥ एकासी एक शोधिती ॥ हांका फोडिती आवेशें ॥१०५॥भीमासी बुडवा वया जळीं ॥ कौरव झोंबती सकळी ॥ येरू अवधियां वाहे पृष्ठीं मौळीं ॥ वारणा परी पोहत ॥१०६॥नाना जलचरें धरिती ॥ ओढूनि बाहेर काढिती ॥ तों अस्त पावला गभस्ती ॥ कडेसी येती सर्वही ॥१०७॥परम स्त्रेहें दुर्यो धन ॥ वस्त्रें ओपी पांडवां लागून ॥ सकल परिवार गौरवून ॥ अन्नपानें सुखी केले ॥१०८॥यावरी एकान्त स्थानीं ॥ पांडव कोरव बैसले भोजनीं ॥ सुवर्ण ताटें झळकती सदनीं ॥ रत्न वाटिया प्रकाशती ॥१०९॥सुस्वाद अन्नें ते वेळां ॥ एक पंक्तीं वाढिलीं सकळां ॥ जया जो पदार्थ आवडला ॥ तो तो वाढिती साक्षेपें ॥११०॥आपुले हस्तें दुर्यो धन ॥ भीम सेनासी वाढी अन्न ॥ असंख्य मोदक वाढून ॥ मधूरान्नातें भक्षवी ॥१११॥तृप्त होऊनि भीम सेन ॥ एकान्त सदनीं करी शयन ॥ अर्ध निशा लोटतां पूर्ण ॥ भेदलें विष सर्व गात्रीं ॥११२॥उडोनि गेलें सर्व स्मरण ॥ एक वटले पंच प्राण ॥ सुयोधन कर्ण शकुनि दुःशा सन ॥ जवळी आले तेधवां ॥११३॥तयांसी म्हणे सुयो धन ॥ भलें गव सलें अनु संधान ॥ आतां याचा घ्यावा प्राण ॥ नाना यत्नें करूनी ॥११४॥मग द्दढ लता ताशीं बहुत ॥ बांधिले माघारें ह्स्त ॥ कंठचरणांसी गांठी देत ॥ केली मोट सर्वां गाची ॥११५॥चौघे मिळोनि ते वेळां ॥ सबळ शिळा बांधिली गळां ॥ गंगा जळीं बुडविला ॥ मध्य भागीं नेऊ नियां ॥११६॥वाहत गेला भीम सेन ॥ परम आनंदला सुयो धन ॥ इकडे प्रवाहीं जातां कुंती नंदन ॥ समुद्र जीवमीं मिळाला ॥११७॥तों बहुत जलविखारीं ओढून ॥ पाताळा नेला भीम सेन ॥ सर्प दंशें संपूर्ण ॥ विष आंगींचें उतरलें ॥११८॥गंगा जलें जाहला शीतळ ॥ विखारीं विष शोषिलें सकळ ॥ सावध जाहला कुंती बाळ ॥ तोडीतसे पाश बंधनें ॥११९॥देखतां भीमाचे परम बळ ॥ दंदशूक पळाले सकळ ॥ वासु कीसी जाण विती तत्काळ ॥ प्रचंड पुरुष एक आला ॥१२०॥बांधूनि गंगा जलीं टाकिला ॥ प्रेतत्व जाऊनि सावध जाहला ॥ वासुकी परिवारेंसीं निघाला ॥ तेथें आला पहावया ॥१२१॥सावध देखूनि भीम सेन ॥ म्हणे महा पुरुषा तूं आहेसी कोण ॥ कोण्या दुर्जने तुज मारून ॥ गंगा जलीं टाकिलें ॥१२२॥येरू म्हणे मी पंडुनंदन ॥ वसुकी देत आलिंगन ॥ बोले तूं श्री कृष्ण प्रिय पूर्ण ॥ चल आमुच्या सदनासी ॥१२३॥मग गृहासी नेऊन ॥ नाग राज करी पुजन ॥ म्हणे महाविषें संपूर्ण ॥ अंग तुझें जळतसे ॥१२४॥एला पात्र म्हणे वासुकीस ॥ यासी पाजावा सुधारस ॥ समयो चित देणें निर्दोष ॥ महायश जोडे तेणें ॥१२५॥कन्या दान तरुणास ॥ मिष्टान्न वाढिजे क्षुधितास ॥ द्र्व्य ओपिजे दरिद्रियास ॥ महायश जोडे तेणें ॥१२६॥नातरी कामा तुरासी संन्यास देणें ॥ क्षुधा तुरासी उपवास कर विणें ॥ धालि यासी दिव्यान्न वाढणें ॥ समयो चित हें नव्हें ॥१२७॥तृषाक्रांतासी घृतपान ॥ नव ज्वरितासी दुग्धदान ॥ शीतें पीडिल्यासी लावणें चंदन ॥ समयो चित हें नव्हें ॥१२८॥तरी यासी सुधार सपान ॥ हेंचि समयो चित पूर्ण ॥ मग वासुकीनें भीमा सेन नेऊन ॥ अमृत कुंडें दाविलीं ॥१२९॥अष्ट कुंडें भरलीं अमृतें ॥ भीम हळूहळू नेला तेथें ॥ विकल शरीर जाहलें होतें ॥ सर्पीं धरिलें सांब रूनी ॥१३०॥एक कुंड दाविलें भीमास ॥ म्हणती प्राशीं आतां सुधारस ॥ तों अष्टही कुंडें सावकाश ॥ शोषिलीं क्षण न लागतां ॥१३१॥समाचार सांगती सेवक ॥ आश्चर्य करी भोगिनायक ॥ म्हणे यासी बल चढलें अधिक ॥ पहिल्या हून शत गुणीं ॥१३२॥तृप्त जाहला धर्मानुज ॥ मग सेजेवरी निजवी नागराज ॥ भीम चिंतारहित सहज ॥ काळजी कांहीं असेन ॥१३३॥इकडे कौरव उठोनि प्रातःकाळीं ॥ स्त्रानें करूनि गंगा जळीं ॥ दला समवेत सकळी ॥ नगरा माजी प्रवे शती ॥१३४॥आनंद परम कौरव मानसीं ॥ मग बोलती येरयेरांशीं ॥ पांडव बंधु होती आम्हांसी ॥ परी मानसीं स्त्रेह नसे ॥१३५॥भावंडे टाकूनि मागें समस्त ॥ आपण एकला गेला नगरांत ॥ भीम निष्ठुर अत्यंत ॥ सुह्रत्संग नावडे ॥१३६॥आमुचें मन त्या वरी बहुत ॥ त्याचें आम्हां कडे नाहीं चित्त ॥ चतुर पणें डोलोनि बहुत ॥ कर्ण यथार्थ म्हणतसे ॥१३७॥ऐशा कपट युक्ति बोलूनि नाना ॥ जाण विती धर्मा र्जुनां ॥ ते न देती प्रतिव चना ॥ चिंताक्रांत मानसीं ॥१३८॥जैसें दीपा विण सदन ॥ तैसे म्लान दिसती चौघे जण ॥ ह्र्दय जाहलें उद्विग्न ॥ परी बोलूनि न दाख विती ॥१३९॥वहनें धांवडीत ते वेळे ॥ कौरव स्वसदनीं प्रवेशले ॥ इकडे धर्म दुःखे तळमळे ॥ भीम सेना आठवूनी ॥१४०॥धर्म पुसे कुंती प्रत ॥ भीम आला काय गृहा प्रत ॥ कीं कांहीं कार्यार्थ ॥ तुंवा प्रेरिला सांग पां ॥१४१॥माता म्हणे नाहीं आला ॥ धर्माचा कंठ दाटला ॥ अश्रुधारा वाहती डोळां ॥ धनं जयाच्या तेधवां ॥१४२॥नकुल सहदेव तळमळती ॥ भीमा तुझी काय जाहली गती ॥ घात केला अर्ध रात्रीं ॥ अंध पुत्रें वाटतें ॥१४३॥जननी पिटी वक्षःस्थळ ॥ शोकें आंग टाकी विकल ॥ विदुरही पातला तत्काल ॥ स्थिर स्थिर म्हणतसे ॥१४४॥यादवी विदुरास म्हणत ॥ वाटे दुर्योधनें केला घात ॥ येरू म्हणे न बोलें मात ॥ करितील निःपात उरलियांचा ॥१४५॥धीर धरू नियां चित्तीं ॥ ह्र्दयीं चिंतीं कमला पती ॥ स्वस्तिक्षेम मागुती ॥ भीम भेटेत तुज लागीं ॥१४६॥त्रिकाल ज्ञानी महाराज विदुर ॥ त्याचे वचनें राहिली ती स्थिर ॥ इकडे वासुकी सदनीं वृकोदर ॥ अष्ट दिवस निद्रित पैं ॥१४७॥उदया चलीं उगवे तरणी ॥ तैसा भीम बैसला उठोनी ॥ वासुकी म्हणे सखया ये क्षणीं ॥ सोयरा होईं आमुचा ॥१४८॥मग आपुली कन्या पद्मा वती ॥ ते दिधली भीम सेना प्रती ॥ तिचें स्वरूप रतिपती ॥ देखो नियां तटस्थ ॥१४९॥बहुत देऊनि आंदण ॥ गौर विला भीम सेन ॥ वासुकी म्हणे त्वरें करून ॥ हस्तिना पुरा जाइंजे ॥१५०॥माता बंधु विदुर भक्त ॥ तुज कारणें परम दुःखित ॥ शोक समुद्रांतूनि त्वरित ॥ काढीं सत्वर जाऊनि ॥१५१॥भीमासी करवूनि मज्जन ॥ दिधलें दिव्यान्न भोजन ॥ अलंकार वस्त्रें देऊन ॥ गौरवून बोळ विला ॥१५२॥सांगातें देऊनि रक्षक सर्प ॥ पाठ विला गज पुरा समीप ॥ भीम निर्भय निःशंक ॥ नगरा माजी प्रवेशला ॥१५३॥अवघीं बैसलीं चिंता ग्रस्त ॥ तों भीम देखिला अकस्मात ॥ हर्षें अंगीं रोम उभे ठाकत ॥ माता बंधु धांवलीं ॥१५४॥मग साष्टांग नमस्कार ॥ कुंतीसी घाली वृकोदर ॥ वसु देव भगिनी सत्वर ॥ गळां मिठी घाली तेव्हां ॥१५५॥विदुर आणि धर्म ॥ यांसी साष्टांग नमी भीम ॥ आवडीं दिधलें क्षेम ॥ न मावे प्रेम दश दिशां ॥१५६॥पार्थ नकुल सहदेव राय ॥ वंदिती तेव्हां भीमाचे पाय ॥ कंठीं मिठी घालूनि मोहें ॥ प्रेमें करूनि स्फुंदती ॥१५७॥सकलांसी बैस वूनि वृकोदर ॥ विदित करी समाचार ॥ वसुकी कृपाळू थोर ॥ उपचार केला तेणें मज ॥१५८॥कुंती जीत वण करून ॥ भूषणें टाकी ओंवाळून ॥ करूनियां अपार दान ॥ याचक ब्राह्मण सुखी केले ॥१५९॥येथूनि दिदुर मतें कुंती नंदन ॥ सदा वर्तती साव धान ॥ न करिती कौरवांशीं भाषण ॥ संगें गमन सोडिलें ॥१६०॥पांच जण सदा एके ठायीं ॥ वेगळें न होती कदाही ॥ सखोल बुद्धि सर्व दाही ॥ मर्या देनें वर्तती ॥१६१॥कृष्ण चरित्र करिती श्रवण ॥ सदा कृष्ण मूर्तीचें भजन ॥ अखंड कृष्ण नाम स्मरण ॥ सदा ध्यान कृष्णाचें ॥१६२॥कृष्ण प्रतिमा करून ॥ त्रिकाल पूजिती पांचही जण ॥ कृष्ण मंत्राचें अनुष्ठान ॥ करिती गायन कृष्णाचें ॥१६३॥नाना कला राज युक्ती ॥ विदुर शिकवी धर्मा प्रती ॥ बहु भाषा संकेतरीती ॥ पढवीत त्यांतें तेधवां ॥१६४॥स्वदेश भाषा दुर्जनांत ॥ बोला वया शंका वाटत ॥ यालागीं बर्बर भाषा शिकवीत ॥ विदुर तेव्हां पांचांतें ॥१६५॥यावरी पुढें ऐकें कथा ॥ अंध मनांत होय कल्पिता ॥ धनुर्वेद शिकवाचा या समस्तां ॥ राज गुरु ठेवूनि ॥१६६॥शत कौरव आणि वेश्या सुत ॥ कर्ण पांडवां सहित एकशें सात ॥ इतुक्यांसी कृपाचार्य शिकवीत ॥ धनुर्वेद सर्वदा ॥१६७॥कृपाचार्य गौतम पुत्र ॥ शरस्तंबीं जन्मला पवित्र ॥ राजा म्हणे तें चरित्र ॥ वैशंपायना सांगें कां ॥१६८॥वक्ता म्हणे सर्व ऋषींत ॥ गौतममुनि परम विख्यात ॥ तप खडतर आचरत ॥ जान्हवीतीरीं सर्वदा ॥१६९॥मुखीं चतुर्वे दांचें पारायण ॥ पृष्ठीं सदा धनुष्य बाण ॥ क्षत्रिय धर्म ब्राह्मण पण ॥ शापें शरें समर्थ जो ॥१७०॥जैसा धनु र्धर भार्गव राम ॥ तैसाचि जाणिजे योद्धा गौतम ॥ मधवा भय भीत परम ॥ तपासी हानि करूं इच्छी ॥१७१॥धनुष्य बाण घेऊनी ॥ विपिनीं हिंडे गौत ममुनी ॥ ज्वालावती कन्या निर्मूनी ॥ अमरनाथें पाठविली ॥१७२॥तिचें विलो कितां वदन ॥ आंगीं द्रवला मीन केतन ॥ चाप शर भाता गळोन ॥ भूमीवरी पडियेला ॥१७३॥वीर्य द्रवलें अद्भुत ॥ शरस्तं बावरी पडत ॥ दोन भाग जाहलें रेत ॥ कुमार कुमारी जन्मलीं ॥१७४॥इंद्रें ठकविलें परम ॥ जाणोनि तपा गेला गौतम ॥ मृग यामिषें राजोत्तम ॥ शंतनु तेथें पातला ॥१७५॥अग्निहोत्र पात्रें टाकूनी ॥ गेला तेथूनि गौत ममुनी ॥ कुमार कुमारी तान्हीं ॥ शंतनुराव देखत ॥१७६॥जाणूनि ब्रह्मवीर्य हें अद्भुत ॥ कृपेनें राव दोघां उचलीत ॥ कृप कृपी नांवें ठेवीत ॥ पालन करीत दोघांचें ॥१७७॥वर्वमान जाणूनि गौत ममुनी ॥ रायासी भेटला येऊनी ॥ मग द्रोणाचार्या लागूनी ॥ कृपी दिधली संभ्रमें ॥१७८॥कृपाचार्य आपुला सुत ॥ त्यासी विद्या दिधली बहुत ॥ धनुर्वेद शिकवीत ॥ मंत्रा स्त्रविद्येशीं ॥१७९॥कृपी द्रोणाची रामा ॥ तिसी पुत्र जाहला अश्वत्थामा ॥ पुढें ऐकें राजोत्तमा ॥ कथा कैसी वर्तली ॥१८०॥कृपा चार्य गुरु कृपार्णव ॥ विद्या शिकती कौरव पांडव ॥ आणि कही राज कुमार सर्व ॥ देशो देशींचे पातले ॥१८१॥भीमार्जुनांची प्रज्ञा फार ॥ कृपा चार्य सांगे अणुमात्र ॥ जैसा बहुत क्षुधातुर ॥ अल्प त्यासी वाढिजे ॥१८२॥शिष्याची प्रज्ञा गाढी ॥ गुरुची सर्व ज्ञता थोडी ॥ तरी विद्या सागराची पैलथडी ॥ सर्व थाही न देखिजे ॥१८३॥तों निज भाग्यें अकस्मात ॥ द्रोणा चार्य आले तेथ ॥ त्या द्रोणाची कथा किंचित ॥ ऐक राया आदरें ॥१८४॥तपिया शिरोमणि भरद्वाज पूर्ण ॥ गंगा द्वारीं करी अनुष्ठान ॥ तों घृताची देवां गना जाण ॥ पर्व काळीं आली स्त्राना ॥१८५॥स्त्रान करूनि हेम वसन ॥ नेसतां देखे भरद्वाज पूर्ण ॥ ह्रदयीं चेतली मीन केतन ॥ अहि खवळे ज्यापरी ॥१८६॥सुराता नंद आठवीत ॥ अधो मुखें चालिलें रेत ॥ ऋषि पर्ण द्रोणीं धरीत ॥ तेथेंचि द्रोण जन्मला ॥१८७॥पितया पासूनि संस्कार ॥ वेद शास्त्रें पढला समग्र ॥ अग्निवेश नामा अग्निकुमार ॥ धनुर्वेद पढें तेथें ॥१८८॥तों तेथें राव द्रुपद ॥ पढूनि शिकला धनु र्वेद ॥ गुरु बंधु जोडला प्रसिद्ध ॥ पांचा लराया सारिखा ॥१८९॥दोघां विद्या जाहली पूर्ण ॥ द्रुपद गेला आज्ञा मागून ॥ तों गुरु बंधु बोलिला द्रोण ॥ द्रुपदा प्रति तेधवां ॥१९०॥जनकें राज्य ओपिल्या तूतें सांभाळावें आम्हांतें ॥ द्रुपद म्हणे गुरु बंधूतें ॥ विसरूं सर्वथा न घडे हें ॥१९१॥अहिच्छत्रा द्रुपद गेला ॥ पिता त्याचा परत्र पावला ॥ द्रुपद राज्य करूं लागला ॥ पितया ऐसें सर्वही ॥१९२॥इकडे द्रोणें प्रजो त्पत्ती ॥ व्हा वया वरिली शारद्वती ॥ कृपी तेचि निश्चिती ॥ शंत नुरायें दीधली ॥१९३॥कृपीचे पोटीं जन्मला सुत ॥ जन्म काळीं टाहो फोडीत ॥ ऊच्चैःश्रवा जैसा गर्जत ॥ देव सर्व तोषले ॥१९४॥तो रुद्राचा अंश पूर्ण ॥ विद्या समुद्र बल गहन ॥ अश्वत्थामा अभिधान ॥ देवीं ठेविलें तेधवां ॥१९५॥चिरंजीव केला पूर्ण ॥ विद्या अपार शिकवी द्रोण ॥ तों पर शुरामें निःक्षत्रिय करून ॥ पृथ्वी ब्राह्मणां दीधली ॥१९६॥सभाग्य केले ब्राह्मण ॥ हें ऐकोनि निघाला द्रोण ॥ महेंद्र पर्वतां जाऊन ॥ भार्गव रामा भेटला ॥१९७॥राम कल्याण पुसत ॥ काय इच्छा आहे मनांत ॥ येरू म्हणे दरि द्रानलें संतप्त ॥ कुटुंबा सहित जाहलों ॥१९८॥भार्गव म्हणे सर्वही ॥ ब्राह्मणांसी दिधली मही ॥ पूर्वीं तुम्ही आलां नाहीं ॥ आतां काय देऊं तुम्हांतें ॥१९९॥सकल पृथ्वी सभाग्य करून ॥ कश्य पासी दिधली दान ॥ आतां शरीर अस्त्र विद्या पूर्ण ॥ उरलीं जाण मज पाशीं ॥२००॥दोहींत जें आवडे ॥ तेंचि मागा रोकडें ॥ द्रोण म्हणे अस्त्र विद्येचें गाढें ॥ भाग्य ओपीं मज लागीं ॥२०१॥अवश्य म्हणे रेणुका नंदन ॥ मग शिष्य केला तेव्हां द्रोण ॥ अस्त्र विद्या सूर्य पूर्ण ॥ ह्रदया काशीं उगवला ॥२०२॥म्हणे क्षत्रिय आणि ब्राह्मण ॥ यांवांचूनि विद्या न सांगें कोणा जाण ॥ मग आज्ञा घेऊनि द्रोण ॥ निजा श्रमा पातला ॥२०३॥पीडला दरिद्रें करून ॥ जवळी धनवंतांचे नंदन ॥ सुवर्ण वाटींत क्षीरपान ॥ स्वेच्छें करिती कौतुकें ॥२०४॥तें द्दष्टीं देखोन ॥ अश्वत्थामा करी रोदन ॥ म्हणे मज करवीं क्षीरपान ॥ म्हणोन आळी घेतली ॥२०५॥मग पिष्टोदक शुभ्र करून ॥ माता पाजी तया लागून ॥ म्यां दुग्ध प्राशिलें म्हणून ॥ अश्वत्थामा नाच तसे ॥२०६॥तें देखोनि ह्रदयांत ॥ द्रोण दुःखे दाटला बहुत ॥ म्हणे मी दरिद्री अत्य़ंत ॥ पिष्टो दक बाळ प्यालें ॥२०७॥आपुलें कुटुंव दरिद्रें कष्टी ॥ मीच पाहतों आपुले द्दष्टीं ॥ म्हणे हे शिव हे परमेष्ठी ॥ काय संसारीं घातलें ॥२०८॥मग आठ विलें मनांत ॥ द्रुपदाचें दर्शन घ्यावें त्वरित ॥ बाल कासी क्षीरपानार्थ ॥ धेनु एक मागावी ॥२०९॥मग निघाला वेगें करून ॥ पांचाल पुरा प्रति येऊन ॥ सभेसी बैसला द्रुपद पूर्ण ॥ तों द्रोण तेथें पातला ॥२१०॥उत्साहें आशी र्वाद देत ॥ परी प्रत्युत्तर नेदी नृपनाथ ॥ तूं कोण म्हणोनि पुसत ॥ द्रोण मनांत लाजला ॥२११॥तुम्हां आम्हां गुरु निःशेष ॥ महाराज ऋषि अग्निवेश ॥ तूं गुरु बंधु होसी आम्हांस ॥ नेळखसी राजेंद्रा ॥२१२॥दरिद्रें बहु केलें कष्टी ॥ म्हणेनि आलों बंधूचे भेटी ॥ द्रुपद म्हणे तुज द्दष्टीं ॥ देखिलें नाहीं म्यां ॥२१३॥मी राव द्रापद जाण ॥ तूं भिकारी अनाथ ब्राह्मण ॥ तुझें बंधुत्व आम्हां लागून ॥ घडेल कैसें सांग पां ॥२१४॥गुरु कैसा कोठील तूं कोण ॥ बोलसी अवघें कृत्रिमवचन ॥ मूर्खा शंका नसे तुज लागुन ॥ मित्र म्हणसी भूपातें ॥२१५॥द्रुपद मातला मदें करून ॥ म्हणे माघारा जा येथून ॥ नाहीं तरी दूत लावून ॥ बाह्रेर घालीन क्षणार्धें ॥२१६॥परम अपमानिला द्रोण ॥ माघारा फिरला तेथून ॥ म्हणे राया धन्य तुझें वचन ॥ ऐकोनि मन निवालें ॥२१७॥अतंरीम यथार्थ जाणसी ॥ परी ऐश्वर्य मदें मात लासी ॥ मज द्रोणासी अपमानिसी ॥ फळ पावसी शेवटीं ॥२१८॥एका शिश्यासी सांगोन ॥ तुज मी नेईन बांधोन ॥ तरीच मी होईन द्रोण ॥ कौतुक दावीन तुज लागीं ॥२१९॥ऐसें बोलोनि निघाला ॥ विषाद संगाती द्दष जाहला ॥ हस्तिना पुरा प्रति आला ॥ खेदें जाहाला क्षीण बहु ॥२२०॥हातीं धरिली गौतमी दारा ॥ पाठीसी बांधिलें कुमारा ॥ गज पुरांत येऊनि सत्वरा ॥ वस्तीस राहिला गुप्त रूपें ॥२२१॥धृतराष्ट्र गंगा त्मज सुजाण ॥ त्यांचें घेऊं इच्छी दर्शन ॥ तों अकस्मात राज नंदन ॥ बाहेर आले खेळा वया ॥२२२॥नगरा बाहेर भूमिका समान ॥ तेथें खेळती इटी घेऊन ॥ दुरूनि पाहतसे द्रोण ॥ कौतुक राज पुत्रांचें ॥२२३॥खेळतां इटी उसळली ॥ कूपा माजी जाऊनि पडली ॥ राज कुमारांची पाळी ॥ कूपा भोंवतीं पाहतसे ॥२२४॥कूप अंवघड आंत अंधार ॥ तटस्थ पाहती ॥ राज कुमार ॥ तों मुद्रिका गळोनि सत्वर ॥ धर्म हस्तींची पडियेली ॥२२५॥तों तेथें पातला द्रोण ॥ म्हणे क्षत्रिय तुम्ही राज नंदन ॥ व्हावें असा ध्याव स्तुसाधन ॥ ऐसा गुरु केला नाहीं ॥२२६॥मग तेथें टाकिला दर्भ मंत्रून ॥ इटी तत्काल बाहेर ॥ काढून ॥ सवेंचि लाविला धनुष्या बाण ॥ दिधला सोडून कूपांत ॥२२७॥धर्म मुद्रिका मुखीं धरून ॥ परतोनि वरती आला बाण ॥ राज कुमार धरिती चरण ॥ धर्म भीम अर्जु नादि ॥२२८॥म्हणती चलावें राज मंदिरा ॥ आवडीं भेटावें राजे श्वरा ॥ द्रोण म्हणे आधीं श्रुत करा ॥ गंगा त्मजा जाऊ नियां ॥२२९॥पुढें कथा सुरस गहन ॥ सादर परिसोत पंडित जन ॥ ब्रह्मा नंदें करून ॥ श्री धर विनवी समस्तां ॥२३०॥सुरस पांडव प्रताप ग्रंथ ॥ आदिपर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ अष्टमा ध्यायीं कथियेला ॥२३१॥इति श्री श्री धर कृतादिपर्वणि अष्टमाध्यायः ॥८॥ ॥ श्री कृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥॥ श्रीपांडवप्रताप आदिपर्व अष्टमाध्याय समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : January 18, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP