मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप|
अध्याय ६ वा

पांडवप्रताप - अध्याय ६ वा

पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास.


॥ श्री गणेशाय नमः ॥
जन मेजय मग बोलिला ॥ वैशंपायना विवेक कुशला ॥ मज पर्यंत वंशमाला ॥ मूळापासूनि सांगिजे ॥१॥
मग म्हणे विशंपायन ॥ क्षीराब्धि शायी नारायण ॥ नाभिकमलीं चतुरानन ॥ त्या पासूनि दक्ष प्रजा पती ॥२॥
दक्ष कन्या अदितिरत्न ॥ तिचा पुत्र विव स्वान ॥ त्यापासोनि मनु निर्माण ॥ पुरूरवा तेथोनियां ॥३॥
तेथूनि अयुनामा नरेश ॥ त्या पासूनि जाहला नहुष ॥ त्याचा ययाति विशेष ॥ शुक्र श्वशुर जयाचा ॥४॥
तेथूनि पुरुनामा नरराय ॥ त्यापुढें त्वन्नामा जन मेजय ॥ तेथूनि प्रचिन्वान होय ॥ पुत्र तयाचा राजेंद्रा ॥५॥
तयाचा पुत्र शर्याती ॥ त्यापासूनि अहंयाती ॥ सार्व भौम निश्चिती ॥ महाराज तयाचा ॥६॥
तेथूनियां जयत्सेन ॥ त्यापासून विचिन्वान ॥ तेथूनि महा भीम जाण ॥ प्रताप वंत जन्मला ॥७॥
प्राचीन धन्वा तेथोन ॥ त्याचा अयुत नामा बली पूर्ण ॥ त्यापासोन अक्रोधन ॥ देव तिथि तेथोनियां ॥८॥
ऋच नामा तेथून ॥ ऋचाचा रुक्षाभिधान ॥ तेथोनि मतिनार कुरु जाण ॥ तृष्यंत त्याचा जाणिजे ॥९॥
तया पासोनि जाहला ईलिन ॥ त्याचा दुष्यंतराव जाण ॥ त्यापासोनि भरत निधान ॥ त्याचे वंशीं भारत तुम्ही ॥१०॥
भरता सुहोत्र पुण्य रूप ॥ तयाचा पुत्र हस्तिप ॥ तेणें आपला नाम प्रताप ॥ हस्तिनापुर रचियेलें ॥११॥
त्याचा विकट पुढें अजमीढ नृपनाथ ॥ त्याचा संवरण ॥ पुण्यवंत ॥ तेथूनि कुरुक्ष त्रियनिर्मित ॥ कुरुवंशीं कौरव तुम्ही ॥१२॥
त्याचा पुत्र परीक्षिति अभिधान ॥ तेंच नाम आथिलें त्वत्पित्याचें पूर्ण ॥ त्याचा भीम नामें नंदन ॥ त्याचा प्रतीप जाणिजे ॥१३॥
त्याचा पुत्र शंतन ॥ त्याचा बाल्हीक सहोहर पूर्ण ॥ शंतनुसुत देवव्रत जाण ॥ भीष्म नाम तयाचें ॥१४॥
शंतनु वरी सत्यवती ॥ दोघे पुत्र जाहली प्रसवती ॥ चित्रांगद नामें नृपती ॥ विचित्र वीर्य दूसरा ॥१५॥
त्या विचित्र वीर्याचे पुत्र ॥ धृत राष्ट्र पंडु विदुर ॥ एक शत कुमार ॥ धृत राष्ट्रासी जाहले ॥१६॥
पंडूचे पांच सुत ॥ नामें त्रिभुवनीं विख्यात ॥ द्रौपदी उदरीं जन्मत ॥ पांच कुमार पांडवांचे ॥१७॥
प्रतिविंध्य श्रुतसोम ॥ श्रुतसोम ॥ श्रुतकीर्ति शतानीक उत्तम ॥ पांचवा श्रुत कर्मा नाम ॥ पांच कुमार पांचांचे ॥१८॥
पार्थ भार्या कृष्ण भगिनी ॥ सुभद्रा देवी वसु देव नंदिनी ॥ तिचे उदरीं अभिमन्यु गुणी ॥ प्रति अर्जुन जन्मला ॥१९॥
अभिमन्युपुत्र परीक्षिती ॥ तुझा पिता जाण भूपती ॥ त्याचे पोटीं तूं पुण्य मूर्ती ॥ जनमेजय राजेंद्र ॥२०॥
तुझे पुत्र दोघे जण ॥ शतानीक शतकर्ण ॥ त्याचा पुत्र सुंदता भिधान ॥ नातू तुझा जन मेजया ॥२१॥
एवं नारायणा पासोन ॥ तुझा नातु सुंदत पावन ॥ अठ्ठेचाळीस पुरुष पूर्ण ॥ वंशमाला सांगितली ॥२२॥
इक्ष्वा कुवंशीं परम ॥ राजा जाहला महाभिष नाम ॥ तेणें अश्वमेध उत्तम ॥ एक सह्स्त्र केले पैं ॥२३॥
शत एक राज सूय़ यज्ञ ॥ करूनि पावला स्वर्ग भुवन ॥ त्यास बहु मानी सहस्त्र नयन ॥ देव मान अति देती ॥२४॥
एकदां ब्रह्म सभेस महा भिष ॥ येऊनि बैसला पुण्य पुरुष ॥ तों गंगा मूर्ति निर्दोष ॥ सुवस्त्र नेसे त्वरेनें ॥२५॥
तों वातें फिटलें वसन ॥ सभा पाहे  अधोवदन ॥ परी महा भिषें अवलो कून ॥ क्षण एक ती पाहिली ॥२६॥
महा भिषाकडे पाहोन ॥ गंगा जाहली हास्य वदन ॥ तें देखोनि चतुरानन ॥ शाप वचन बोलत ॥२७॥
स्वर्गवास टाकून विशेष ॥ मृत्यु लोकीं व्हाल मनुष्य ॥ कामना पुरतां स्वपदास ॥ बहुकालें पावाल ॥२८॥
असो गंगा विचरतां गगनीं ॥ अष्ट वसु देखिले नयनीं ॥ रोदन करितां देव तटिनी ॥ तयां साक्षेपें पुसतसे ॥२९॥
वसु म्हणती भागीरथी ॥ वसिष्ठें शाप दिला आम्हां प्रती ॥ मानव होऊनि अधोगती ॥ मृत्यु लोकीं उपजाल ॥३०॥
वसिष्ठाची गाय चौरूनी ॥ आम्हीं आश्रमीं बांधिली नेऊनी ॥ म्हणोनि शाप वदला मुनी ॥ तुझे उदरीं जन्मूं आतां ॥३१॥
तरी उपजतांच नेऊन ॥ गंगेंत देईं टाकून ॥ सोडवीं मनुष्य देहा पासून ॥ शापमोचन होईल ॥३२॥
गंगा म्हणे ते अवसरीं ॥ लोक मज म्हणतील असुरी ॥ अष्ट पुत्र निर्धारीं ॥ कैसे टाकूं उदकांत ॥३३॥
वसु म्हणती ते वेळीं ॥ सात टाकीं गंगा जळीं ॥ आठवा वसु प्रति पाळीं ॥ प्रताप सूर्य सज्ञान ॥३४॥
अष्ट वसूंचे मिळोन अंश ॥ एक पुत्र होईल विशेष ॥ महाज्ञानी निर्दीष ॥ जितें द्रिय धर्मात्मा ॥३५॥
हस्तिना पुरीचा प्रतीप नृप्वर ॥ मृगयामिषें हिंडे गिरिगव्हर ॥ भागीरथीतीरीं जातां सत्वर ॥ श्रम पावोन बैसला ॥३६॥
तों प्रवाहां तून अकस्मात ॥ गंगा निघाली मूर्मि मंत ॥ दिव्या भरणीं भूषित ॥ श्वेतव सना गौरांगी ॥३७॥
गंगा आनंद वल्लीचें सुमन ॥ कीं लावण्य भूमीचें निधान ॥ कीं शुभ्र सुमनमाला पूर्ण ॥ अपर्णा वर मस्तकींची ॥३८॥
कीं श्रृंगारन भींची चपला ॥ कीं साक्षात दुसरी कमला ॥ आनंद वनींची वेल्हाळा ॥ कुरंगिणी चमकत ॥३९॥
ऐसें देखोनि तो अवसरीं ॥ प्रतीप मनीं आश्चर्य करी ॥ म्हणे उमा रमा कीं सावित्री ॥ कीं सरस्वती साक्षात ही ॥४०॥
रायाचे सव्यांकीं ते वेळीं ॥ बैसे गंगा शृंगारवल्ली ॥ म्हणे राया तूं प्रतापबळी ॥ मज वरीं ये वेळे ॥४१॥
राजा म्हणे देवतटिनी ॥ मी व्रतस्थ आहें एकपत्नी ॥ सव्यांकीं बैसलीस येऊनी ॥ तरी स्त्रुषा कन्या तैसी ॥ तूं ॥४२॥
तरी माझिया पुत्राची पत्नी होऊन ॥ राज भोग घेईं संपूर्ण ॥ गंगा म्हणे मी पुत्र जन्मवीन ॥ विजय ध्वज वंशासी ॥४३॥
सुरनदी ऐसें बोलोन ॥ सवेंच पावली अंतर्धान ॥ पुढें महा भिष जाहला शंतन ॥ पुत्र प्रतीपरायाचा ॥४४॥
देशो देशींचे भूपती ॥ शंतनूस कन्या देऊं म्हणती ॥ वचन न गोंवीच नृपती ॥ स्त्रुषा गंगा इच्छीत ॥४५॥
शंतनु नामक पुत्रा प्रती ॥ सांगे एकांतीं ॥ तुज गंगा वरील अति प्रीतीं ॥ आणिक युवती न वरीं तूं ॥४६॥
ऐसें बोलोन झडकरी ॥ छत्र धरिलें पुत्रावरी ॥ आपण तपा गेला ते अवसरीं ॥ परत्र मोक्ष साधावया ॥४७॥
इकडे शंतनु गंगातीरीं ॥ सर्व काल मृगया करी ॥ मार्ग लक्षीत अंतरी ॥ तों जन्हु कुमारी प्रकटली ॥४८॥
इंदिरेची अपर प्रतिमा ॥ तैसी प्रकटली दिव्य रामा ॥ माळ घाली सार्व भौमा ॥ शंतनुराया ते काळीं ॥४९॥
म्हणे जें मी राया करीन ॥ तें तुवां मानावें ॥ माझें कर्तृत्व म्हणतां अप्रमाण ॥ मी जाईन तेच क्षणीं ॥५०॥
राव म्हणे जें तूं करिशी ॥ तें मी न मोडीं निश्चियेंसीं ॥ भाष देऊनि तियेसी ॥ पट्टमहिषी आणिली घरा ॥५१॥
जान्हवी संगें उल्हास ॥ तृणवत मानी स्वर्ग सुखास ॥ वर्ष तें वाटे निमिष ॥ तिशीं विलास भोगितां ॥५२॥
गर्भवती जाहली राणी ॥ पुत्र प्रसवली सुगुणी ॥ परी तें बाळ तत्काळ नेऊनी ॥ गंगा गर्भीं टाकिलें ॥५३॥
सप्त पुत्र ऐसेच टाकिले ॥ शंतनु भिडेनें न बोले ॥ आठवा पुत्र यथा कालें ॥ प्रति सूर्य जन्मला ॥५४॥
तो गंगा जळीं टाकावा ॥ तों वसुधापति आला आडवा ॥ म्हणे एवढा तरी न टाकावा ॥ महाता मसे असुरी ॥५५॥
वंश वृक्षनिर्मूळ कारिणी ॥ केवळ तीक्ष्ण कुठारिणी ॥ तूं नारी नव्हेस सर्पिणी ॥ पिलीं प्रसवूनि भक्षिलीं ॥५६॥
देव तटिनी बोले वचन ॥ जाहलें वसुशापविमोचन ॥ मी जात्यें आतां येथून ॥ तूम मज विण राज्य भोगीं ॥५७॥
आठवा पुत्र उत्तम ॥ तुज पुढें देईन भीष्म ॥ ऐसें बोलोन सप्रेम ॥ गुप्त जाहली जान्हवी ॥५८॥
सांगातें नेला कुमार ॥ मग तळमळी राजेश्वर ॥ भोग वाटती जैसे विखार ॥ गंगे विना रायातें ॥५९॥
रायें केला विवेक ॥ म्हणे नश्वर सर्व क्षणिक ॥ मग इंद्रियें नियमूनि नैष्ठिक ॥ राज्य नीतीनें चालवी ॥६०॥
गंगा वियोगें आकळे मनीं ॥ न पाहे दुसरी कामिनी ॥ छत्तीस वर्षें या प्रकारें करूनी ॥ शंतनु राज्य लोटी हो ॥६१॥
भागीरथीच्या तीरीं त्वरित ॥ राव मृगया करीत जात ॥ गंगा आठवूनि मनांत ॥ सद्नदित पहातसे ॥६२॥
तों भागी रथीचें जल ॥ स्वल्प वाहे झुळझुळ ॥ चकित पाहे भूपाळ ॥ म्हणे मूळ शोधूं आतां ॥६३॥
हरि द्वारा पर्यंत ॥ राव चालिला शोधीत ॥ तों प्रवाह कोंडिला अद्भुत ॥ शरसंधानीं भीष्म देवें ॥६४॥
पुत्र आपुला हें न कळे ॥ परी मोहें अंतर भरलें ॥ भूषणीं भूषित स्वरूप चांगलें ॥ राव बोले ते वेळीं ॥६५॥
म्हणे कोणाचा तूं सुत ॥ स्त्रेह उपजला मज बहुत ॥ तों भीष्म देव जाहले गुप्त ॥ गंगा जळीं ते वेळीं ॥६६॥
राजा खेद पावला बहुत ॥ गंगा आठ विली मनांत ॥ नयनीं आले अश्रुपात ॥ म्हणे धांवें वल्लभे ॥६७॥
आठवा पुत्र देईन ॥ म्हणून बोललीस वचन ॥ सत्य करीं मज भेटून ॥ कठिण मन करूं नको ॥६८॥
तों हातीं धरून सुत ॥ गंगा प्रकटली अकस्मात ॥ जैसें परम भाग्यें आराध्य दैवत ॥ निधान देत आणूनि ॥६९॥
वस्त्रा भरणीं भूषित ॥ मुक्तामाला पदकें झळकत ॥ ऐसा आणू नियां सुत ॥ देती जाहली रायातें ॥७०॥
म्हणे सांभाळीं आपुला नंदन ॥ यासी वसिष्ठा पासोन विद्यादान ॥ हा भार्ग वरामा पासून ॥ धनु र्वेद शिकलासे ॥७१॥
मंत्र विद्ये माजी प्रवीण ॥ जाहला वाच स्पती पाशीं पूर्ण ॥ सोमवंश विजय ध्वज जाण ॥ नेईं नंदन गृहातें ॥७२॥
युव राज्य यासी देईं ॥ सागरान्तमेदिनी सर्वही ॥ तुझी आज्ञा चाल वील पाहीं ॥ नाहीं ज्ञानी दूसरा ॥७३॥
ऐसें बोलोनि देव तटिनी ॥ गुप्त जाहली तेच क्षणीं ॥ हातीं कुमार धरूनी ॥ शंत्तनु आला हस्तिना पुरा ॥७४॥
सकळ प्रजा राजे येऊन ॥ भीष्मास करिती नमन ॥ भेरी मंगल तुरें वाजवून ॥ राज्य भार ओपिला ॥७५॥
सर्व विषयीं चतुर ॥ कार्य मात्रीं दक्ष फार ॥ आवरिला सर्व राज्य भार ॥ व्यंग न पडे कोठेंही ॥७६॥
विशेष वेतन मान बहुत ॥ देऊन सेवक मोहिले समस्त ॥ याचक दानें केले तृप्त ॥ दरिद्र नाहीं शोधितां ॥७७॥
अवलो कून गंगा नंदन ॥ राजा सदा आनंद घन ॥ म्हणे आयुष्य परिपूर्ण ॥ चतुरानन देवे यासी ॥७८॥
शंतनुराव एके दिनीं ॥ मृगया जंव करीत वनीं ॥ तों दिव्य सुवास घ्राणीं ॥ येऊ नियां झगटला ॥७९॥
म्हणे कोठें आहे सुवा सवस्त ॥ यमानु जातीरीं शीधीत जात ॥ तों पुढें दाश नगर देखत ॥ नौका रक्षीत दाश कुमारी ॥८०॥
रूप पाहतां सतेज ॥ भुलोन जाय मकर ध्वज ॥ अंगींचा सुवास फांके सहज ॥ योजन एक सभोंवता ॥८१॥
राजा म्हणे तियेसी ॥ तूं कोण येथें नौका रक्षिसी ॥ येरी म्हणे उतरीं पांथिकांसी ॥ दाश कुमारी मी असें ॥८२॥
मन्मथ बाणें भेदिला शंतन ॥ मग दाश गृहा आदरें जाऊन ॥ भेटे स्त्रेहादरें पूर्ण ॥ तो म्हणे धन्य भाग्य माझें ॥८३॥
मग म्हणे कुंभिनी पालक ॥ तुज मागणें आहे एक ॥ येरू म्हणे मी तुझा रंक ॥ प्राण सांडीन ओंवाळूनी ॥८४॥
परम सुंदर तुझी नंदिनी ॥ ते करीं माझी पट्टराणी ॥ दाश म्हणे ते क्षणीं ते क्षणीं ॥ विचार एक असे पैं ॥८५॥
इचे पोटीं होईल पुत्र ॥ तो वंशव र्धनीं नृप छत्र ॥ ऐसी भाष द्यावी निर्धार ॥ ऐकूनि नृप्वर दचकला ॥८६॥
भीष्मा ऐसा पुत्र पाहीं ॥ ब्रह्यांडांत दुजा  नाहीं ॥ तनुमन धन सर्वही ॥ ओंवाळावें त्याव रूनी ॥८७॥
मौनेंच राव उठोन ॥ स्वग्रामा गेला परतोन ॥ मनीं लागलें सत्यवतीचें ध्यान ॥ न बोले वचन कोणाशीं ॥८८॥
शंतानुराव चिंतातुर ॥ भीष्में ऐकतां साचार ॥ पुसे रायास येऊनि विचार ॥ नमस्कार करोनियां ॥८९॥
मज सारिखा पुत्र असतां ॥ तुम्हां काय पडली चिंता ॥ शक्रास दुर्लभ ज्या वस्ता ॥ आणून देईन क्षणार्धें ॥९०॥
मग बोले नृपवर ॥ तुज सारिखा नाहीं पुत्र ॥ परी तुज बंधु असावे साचार ॥ पाठिराखे वाटतें ॥९१॥
एक डोळा एक चरण ॥ एक पाणि एक वसन ॥ याचें सुख मानी तो विवेकहीन ॥ चतुर नव्हे सर्वथा ॥९२॥
संसार क्षणिक साचार ॥ एक कुमार तो नव्हे कुमार ॥ एक स्तंभीं अवघें घर ॥ तगेल कैसें सांग पां ॥९३॥
ऐसें बोलतां शंतन ॥ भीष्मास कळलें वर्त मान ॥ प्रधानास पाचा रून ॥ गंगा त्मज सांगतसे ॥९४॥
रायास नाहीं विषय स्वार्थ ॥ परी पत्नी पाहिजे धर्मार्थ ॥ गृह स्वामिणी नसतां गृहांत ॥ वाटत शून्य अवघें गृह ॥९५॥
तरी वधू पहा सुंदर ॥ ऐसें ऐकूनि नृपवर ॥ पुरोहित पाचा रून समग्र ॥ एकांतीं सांगे तयांतें ॥९६॥
सत्यवती दाश नंदिनी ॥ ती करून द्यावी मज राणी ॥ तिज विणें नितं बिनी ॥ दुसरी न लगे सर्वथा ॥९७॥
ऐसा हा वृत्तान्त ॥ भीष्मास जाण विती पुरो हित ॥ अवश्य म्हणोनि देव व्रत ॥ दाश गृहासी पातला ॥९८॥
कैवर्तक सामोरा येत ॥ सन्मानें बैस विले समस्त ॥ दाश राजासी म्हणे देव व्रत ॥ तूं सोयरा आमुचा ॥९९॥
सत्यवती करीं आमुची जननी ॥ विलंब न करावा ये क्षणीं ॥ दाश म्हणे माझे मनीं ॥ चिंता एक वर्त तसे ॥१००॥
महाराज तूं देव व्रत ॥ माझे माथां ठेवीं हस्त ॥ तरी मग बोलेन मात ॥ राग मनांत न धरावा ॥१०१॥
इचे पोटीं होईल कुमार ॥ तो व्हावा छत्रपति वंश धर ॥ ऐसें ऐकतां गंगा कुमार ॥ गर्जो नियां बोल तसे ॥१०२॥
इचे पोटीं होईल कुमार ॥ त्यावरी मी धरीन छत्र ॥ त्याचा वंश स्थापीन समग्र ॥ सत्य सत्य त्रिवाचा ॥१०३॥
हा अप्रमाण होईल शब्द ॥ तरी म्लेच्छ मुखीं प्रवेशो वेद ॥ धन्य धन्य म्हणती ब्रह्म वृंद ॥ देव व्रत सत्य वचनी ॥१०४॥
यावरी बोले किरात ॥ तुझे पुढें होतील सुत ॥ ते हिरोन घेतील समस्त ॥ युद्ध व्यवहार करूनी ॥१०५॥
तूं सत्य व्रत महाराज ॥ परी कैसे होतील नेणों आत्मज ॥ बलाद्भुत सतेज ॥ ज्येष्ठ अधिकारी राज्यातें ॥१०६॥
ऐसें ऐकतां भीष्म ॥ करिता जाहला अचाट नेम ॥ जे कोणा न चले निःसीम ॥ त्रिभुवनांत एक तो ॥१०७॥
यावरी आजन्म पर्यंत ॥ मी ब्रह्मचारी व्रतस्थ ॥ गंगे समान स्त्रिया समस्त ॥ त्रिभुवनींच्या केल्या म्यां ॥१०८॥
मन्मथाचा केला म्यां शिरश्छेद ॥ पायीं बांधिलें येथूनि ब्रीद ॥ माझा वाङ्नेम प्रसिद्ध ॥ ब्रह्मांड भरी उभ विला ॥१०९॥
संतती विणें मी विशद ॥ पावेन स्वर्गमोक्षपद ॥ ऐसें ऐकतां सभावृंद ॥ जय जय कार करिती हो ॥११०॥
दिव्य सुमनांचे संभार ॥ वर्षती करून सुरवर ॥ माथे तुकविती ऋषी श्वर ॥ पितृ भक्त धन्य हा ॥१११॥
तत्काल ती सत्यवती ॥ दाशें दिधली भीष्माचे हातीं ॥ तेणें वाहोनि कन करथीं ॥ हस्तिना पुरा आणिली ॥११२॥
तंव ते समयीं सुमुहूर्त ॥ पाहूनि दोघांचें लग्न लावीत ॥ पिता संतोषेनि वदत ॥ देव व्रत नाम तुज साजे ॥११३॥
भीषण केला जेणें नेम ॥ म्हणोन नाम तुझें भीष्म ॥ इच्छा मरण पावसी परम ॥ इह परत्रीं धन्य तूं ॥११४॥
सत्यवतीसी भोगितां भोग ॥ रायासी उणा वाटे स्वर्ग ॥ तों पुत्र जाहला सवेग ॥ चित्रां गद या नांवें ॥११५॥
आणीक एक संवत्सरा ॥ गरोदर जाहली सुंदरा ॥ विचित्र वीर्य दुसरा ॥ पुत्र जाहला सुलक्षणी ॥११६॥
जात कार्मादि संस्कार ॥ शंतनु करीत समग्र ॥ भीष्में याचक सत्वर ॥ तृप्त केले सर्व दानें ॥११७॥
बालत्व क्रमिलें संपूर्ण ॥ प्राप्त झालें तरुण पण ॥ तों शंतनु देह ठेवून ॥ स्वर्गा प्रती पावला ॥११८॥
तेव्हां उत्तर क्रिया समस्त ॥ भीष्म स्वांगें संपादीत ॥ चित्रां गद ज्येष्ठ सुत ॥ भीष्में राज्यीं बैस विला ॥११९॥
चित्रां गदें पुरुषार्थ करून ॥ जगत्‍ जिंकिलें संपूर्ण ॥ दिव्य वस्तु आणिल्या हिरोन ॥ राजां पासून पराक्रमें ॥१२०॥
जिंकू नियां याद वेंद्र ॥ वस्तु आणिल्या अपार ॥ भीष्म पाठिराखा महाशूर ॥ उणें न पडे कोठेंही ॥१२१॥
तों एक नामाच्या विषादें करूनी ॥ गंधर्व राज येऊनी ॥ हस्तिना पुरीं समरां गणीं ॥ युद्ध केलें अपार ॥१२२॥
मग कपट विद्या करून ॥ घेतला चित्रांग दाचा प्राण ॥ भीष्म भेणें तेथून ॥ पळोन गेला स्वर्ग लोका ॥१२३॥
जाहला एकचि हाहाकार ॥ शोक करी सत्यवती अपार ॥ मग विचित्र वीर्य सत्वर ॥ राज्या सनीं स्थापिला ॥१२४॥
सर्व शास्त्रीं केला निपुण ॥ धनु र्वेद अभ्यासी संपूर्ण ॥ सर्व विषयीं भीष्म आपण ॥ अंतर्बाह्य रक्षीतसे ॥१२५॥
विवाह करावा यावरी ॥ गंगात्मज चिंती अंतरीं ॥ तों वार्ता सांगितली ऋषीश्वरीं ॥ दिव्य कुमारी काशी श्वराच्या ॥१२६॥
अंबा अंबिका अंबालिका ॥ स्वयंवर मांडलें त्यांचें देखा ॥ राजे मिळाले नाहीं लेखा ॥ ऐकतां भीष्म आवेशे ॥१२७॥
प्रतापें जिंकोनि स्वयंवरीं ॥ आणिल्या काशी श्वराच्या कुमारी ॥ शाण्णव कुळींचे ते अवसरीं ॥ राजे युद्धासी प्रवर्तले ॥१२८॥
वाता पुढें जलद जाळ ॥ तैसे राजे विभांडिले सकळ ॥ त्यांमाजी शाल्वें तुंबळ ॥ युद्ध केलें भीष्माशीं ॥१२९॥
महापंडिता पुढें युक्ती ॥ अबलांच्या जेवीं न चलती ॥ तैसी शाल्वाची झाली रीती ॥ पाठ दावूनि चालिला ॥१३०॥
असो विजयी झाला देव व्रत ॥ कुंजर पुरा पातला त्वरित ॥ कन्या सत्यवती हस्ती ॥ ओपीत ॥ कनिष्ठ बंधू कारणें ॥१३१॥
विवाहा रंभीं ते काळीं ॥ वडील अंबा काय बोलिली ॥ शाल्वा पाशीं वृत्ति गुंतली ॥ मनीं घातली त्या माळ ॥१३२॥
ऐसें ऐकतां जान्हवी सुत ॥ अंबेसी रथीं बैसवीत ॥ संगें सेना देऊनि बहुत ॥ शाल्वा पाशीं पाठविली ॥१३३॥
भीष्में शाल्व विभांडिला ॥ तेणें खेद परम पावला ॥ तों दळ भारेंसीं ते वेळां ॥ अंबा आली शाल्वा पाशीं ॥१३४॥
सभेंत बोले येऊन ॥ तुझे ठायीं गुंतलें माझें मन ॥ मी भीष्माचा निरोप घेऊन ॥ आलें तुज वरावया ॥१३५॥
शाल्व म्हणे तुज जिंकून ॥ गेला गंगा त्मज घेऊन ॥ मज युद्धीं परा भवून ॥ नेलें जाण तुज लागीं ॥१३६॥
आतां गेलिया हा प्राण ॥ तुजशीं न करीं कदा लग्न ॥ एकें स्पर्शितां अन्न पात्र पूर्ण ॥ इतरां जाण उच्छिष्ट तें ॥१३७॥
परम खेद पावोन ॥ अंबा निघाली तेथून ॥ कुंजर पुरा लागून ॥ येती जाहली फिरो नियां ॥१३८॥
इकडे अंबिका अंबालिका दोनी ॥ व्या सादि ऋषि बोला वूनी ॥ विचित्र वीर्याशीं लग्न लावूनी ॥ भीष्म करी सोहळा ॥१३९॥
संपा दिले चार्‍ही दिन ॥ तों अंबा आली परतोन ॥ म्हणे मी माळ घालीन ॥ गंगा त्मजा तुज लागीं ॥१४०॥
शाल्व न वरी मज लागून ॥ तुवां मज आणिलें हिरोन ॥ मी तुझी भाजा होईन ॥ वाढवीन वंशातें ॥१४१॥
भीष्म म्हणे माते समान ॥ तुज सहित सर्व स्त्रिया जाण ॥ ऊठ जाईं येथून ॥ आपु लिया पितृ गृहा ॥१४२॥
भीष्में धिक्कारितां जाण ॥ जाहला परम अपमान ॥ मग एक लिच अंबा निघोन ॥ बद्रिका श्रमा प्रति गेली ॥१४३॥
तप करून खडतर ॥ प्रसन्न केला रेणुका पुत्र ॥ जेणें एकवीस वेळां सर्वत्र ॥ कुंभिनी केली निःक्षत्रिया ॥१४४॥
प्रसन्न जाहला जाम दग्न्य ॥ येरी सांगे सर्व वर्तमान ॥ तुझा शिष्य गंगा नंदन ॥ वर देईं करू नियां ॥१४५॥
मग अंबेस घेऊन सांगातें ॥ भार्गव आले गज पुरातें ॥ समाचार कळतां गंगा त्मजातें ॥ येत सामोरा गजेंरसीं ॥१४६॥
करू नियां साष्टांग नमन ॥ नगरांत आणिला भृगुनंदन ॥ रत्नाभिषेक करून ॥ सर्वोप चारें पूजिला ॥१४७॥
मग म्हणे पर शुधर ॥ ईस वरीं तूं सत्वर ॥ भीष्म बोले जोडूनि कर ॥ सर्व स्त्रिया माझ्या माता ॥१४८॥
परम कोपला जाम दग्न्य ॥ मोडिसी माझें आज्ञा वचन ॥ मजशीं करीं युद्ध कंदन ॥ किंवा लग्न लावीं इशीं ॥१४९॥
भीष्म बोले धरूनि चरण ॥ मी अवश्य युद्ध करीन ॥ मग सिद्ध करूनि दोन स्यंदन ॥ नगरा बाहेर पातले ॥१५०॥
एक रथ आणि सारथी ॥ दिधला मग भार्गवा प्रती ॥ आपण बैसला दुजे रथीं ॥ महा व्रती भीष्म बोले ॥१५१॥
म्हणे स्वामींनीं टाकावे बाण ॥ तों भार्गवें चाप ओढून ॥ दोन शर सोडून ॥ भुजा दोन्ही भेदिल्या ॥१५२॥
भीष्म उतरून रथाखालता ॥ गुरुचरणीं ठेवी माथा ॥ म्हणे माझे क्षत्रियाचे बाण आतां ॥ केवीं साहसी विप्रवर्या ॥१५३॥
पुढती रथावरी बैसोन ॥ युद्ध करी गंगा नंदन ॥ पांच बाणीं संपूर्ण ॥ शरीर भेदिलें भार्ग वाचें ॥१५४॥
तोवीस दिवस पर्यंत ॥ युद्ध जाहलें अत्यद्भुत ॥ मेरु मांदार भिडत ॥ तेवीं दोघे दिसती हो ॥१५५॥
कीं इंद्र आणि चंद्र जाण ॥ कीं रमानाथ आणि उमारमण ॥ शस्त्र जाळें संपूर्ण ॥ भरिती गगन दोघेही ॥१५६॥
कीं सागर आणि अंबर ॥ किंवा वासुकी आणि सहस्त्र वक्र ॥ कीं वसिष्ठ आणि विश्वा मित्र ॥ तैसे दोघे भीडती ॥१५७॥
कौतुक पाहती निर्जर ॥ भीष्में भार्गव केला जर्जर ॥ ह्रदयीं खडतरतां निर्वाण शर ॥ ध्वजस्तंभीं टेंकला ॥१५८॥
ऐसें गंगा त्मजें देखोन ॥ धांवला सद्नद होऊन ॥ नेत्रांस जीवन लावून ॥ घाली पवन ॥ स्वहस्तें ॥१५९॥
सावध जाहला पर शुधर ॥ ह्रदयीं धरिला गंगा पुत्र ॥ म्हणे माझी विद्या समग्र ॥ तुझे ठायीं बिंबली ॥१६०॥
पुनः म्हणे पर शुराम ॥ पूर्ण जाहला माझा नेम ॥ अंबे तूं पितृ गृहास जाईं परतोन ॥ देह दंहून करीं तप ॥१६१॥
गज पुरांत आला भीष्म ॥ स्वस्थानीं गेला भार्ग वराम ॥ मग त्या अंबेनें परम ॥ घोर वन सेविलें ॥१६२॥
म्हणे भीष्माचा घेईन प्राण ॥ घोर तप आचरोन ॥ मग योग साधन करून ॥ देह टाकिला अंबेनें ॥१६३॥
इकडे द्रुपद त्रिनेत्र ॥ प्रसन्न करून मागे पुत्र ॥ मग बोलिला पंचवक्र ॥ ऐक सादर जन मेजया ॥१६४॥
पूर्वीं स्त्री मग पुरुष जाण ॥ ऐसा होईल तुज नंदन ॥ तीच अंबा स्त्री होऊन ॥ द्रुपदोदरीं जन्मली ॥१६५॥
शिखंडी नाम ठेवीत ॥ लोकांत गुप्त केली मात ॥ पुरुष वेष त्यास देत ॥ जाला सुत थोर तो ॥१६६॥
दशार्ण देशींचा हिरण्य नृपती ॥ त्याची कन्या केली शिखंडी प्रती ॥ लग्न जाहल्या एकांतीं ॥ स्त्री पातली भोग काम ॥१६७॥
नाहीं पुरुषत्व काम विकार ॥ ओळ खिलें स्त्रीशरीर ॥ राज कन्या उठोनि सत्वर ॥ जात माहेरा आपुल्या ॥१६८॥
सांगे पित्यास वर्तमान ॥ तेणें दळ सिद्ध करून ॥ पांचाल पुरास येऊन ॥ आरं भिलें भांडण द्रुपदाशीं ॥१६९॥
म्हणे स्त्रीचा करून सुत ॥ कैसा केला अनर्थ ॥ मी करीन तुझा घात ॥ कीं माझा प्राण वेंचीन ॥१७०॥
इकडे शिखंडीनें रात्रीं उठोन ॥ पळत घेतलें घोर अरण्य़ ॥ एकांतीं करितां रोदन ॥ तों कुबेर गण पातला ॥१७१॥
त्याचें नाम स्थूल करण ॥ पुसता झाला शिखंडी लागून ॥ तेणें जाहलें तें मुळीं हून ॥ वर्तमान निवेदिलें ॥१७२॥
स्थूल करण म्हणें तुझें स्त्रीपण ॥ मी घेतों आठ दिवस जाण ॥ माझें पुरुषत्व तूं घेऊन ॥ कार्य संपादीं जाऊनि ॥१७३॥
मग स्त्रीपण देऊनि त्यासी ॥ पुरुष होऊनि आला नगरासी ॥ वर्त मान सांगे द्रुपदासी ॥ येरू मनीं संतोषला ॥१७४॥
मग हिरण्या कडे पाठविले चार ॥ म्हणे पाहें येऊन समाचार ॥ माझा पुरुष असतां पुत्र ॥ काय विचार मानिला ॥१७५॥
पाहती स्त्रिया पाठवून ॥ तों शिखंडी देखिला जेवीं मदन ॥ जाहलें स्त्रीचें समाधान ॥ सेना घेऊन श्वशुर गेला ॥१७६॥
लोट लिया आठ दिवस ॥ शिखंडी गेला कुबेर वनास ॥ उदया आलें भाग्य विशेष ॥ वैश्रवण आला कानना त्या ॥१७७॥
तों स्थूल करण स्त्रीवेष धरून ॥ बैसला लज्जित आकर्षून ॥ कुबेर जाणोन हें वर्तमान ॥ शाप देता जाहला ॥१७८॥
शिखंडीचा होय जों देहान्त ॥ तोंवरी असो त्यास पुरुषत्व ॥ तूं स्त्री होऊन बैस येथ ॥ वचन असत्य नव्हे कदा ॥१७९॥
तों शिखंडी येऊन ॥ धरीत कुबेराचे चरण ॥ येरू म्हणे पुरुषत्वं करून ॥ सुखें नांदें निज गृहीं ॥१८०॥
शिखंडी आला परतोन ॥ पित यास सांगे वर्तमान ॥ सदाशिव जाहला पूर्वीं प्रसन्न ॥ चरित्र जाण त्याचें हें ॥१८१॥
एवं भीष्मवध कल्पून मनांत ॥ अंबा शिखंडी जाहला सत्य ॥ सिंहा वलो कनें समस्त ॥ कथा ऐकें मागील ॥१८२॥
उभय दारां सहित ॥ विचित्र वीर्य क्रीडत ॥ पुढें संतान नसतां अकस्मात ॥ रोग रायातें लागला ॥१८३॥
उदंड वैद्य आणून ॥ भीष्म करी औषध प्रयत्न ॥ परी आयुष्य सूर्य़ अस्तमान ॥ पावता झाला ते काळीं ॥१८४॥
विचित्र वीर्य पावतां मरण ॥ सत्यवती आणि गंगा नंदन ॥ शोकार्णवीं जाहलीं निमग्न ॥ वंश संतान बुडालें ॥१८५॥
उत्तर कार्य संपूर्ण ॥ करिता जाहला गंगा नंदन ॥ सत्यवती करी रोदन ॥ भीष्मकंठीं झोंबोनि ॥१८६॥
मग भीष्में विवेकयुक्तीं ॥ शांत केली सत्य वती ॥ माता भीष्मास म्हणे एकांतीं ॥ वंश वाढवीं पुढारां ॥१८७॥
तूं आपलें करून लग्न ॥ वाढवीं वंश संतान ॥ भीष्म म्हणे माते समान ॥ नारीमात्र सर्वही ॥१८८॥
चळती मेरु आणि मांदार ॥ वरुण दिशे उगवे मित्र ॥ मर्यादा सोडील सागर ॥ परी नेम माझा टळेना ॥१८९॥
वायु पडे मोडून चरण ॥ कुंभिनी सांडील सहस्त्र वदन ॥ परी माझें नेमवचन ॥ न टळे माते कल्पांतीं ॥१९०॥
तरी आपत्कालीं आपद्धर्म साचार ॥ पूर्वींच स्थापिती शास्त्रकार ॥ प्रार्थू नियां ऋषी श्वर ॥ क्षत्रियुकुलें वाढवावीं ॥१९१॥
एकवीस वेळ निःक्षत्री ॥ पर शुरामानें केली धरित्री ॥ मग राजांगनांनीं ब्राह्मण श्रोत्री ॥ प्रार्थूनियां वश केले ॥१९२॥
सत्यवती म्हणे भीष्मास ॥ तुज सांगतें ऐक रहस्य ॥ कुमारी दशेंत जाहला व्यास ॥ यमुनाद्वीपीं मज पासूनी ॥१९३॥
महायोगी परा शर ॥ सुगंध केलें माझें शरीर ॥ कुमारीत्व न मोडतां साचार ॥ व्यास महाराज जन्मला ॥१९४॥
तरी तयासी प्रार्थून ॥ वाढवावें वंश संतान ॥ ऐसें ऐकतां गंगा नंदन ॥ आनंदें टाळी पिटीत ॥१९५॥
म्हणे माते न लावीं व्यवधान ॥ प्रार्थीं आतां कृष्ण द्वैपायन ॥ येरी करपाद प्रक्षा लून ॥ करी ध्यान व्यासाचें ॥१९६॥
निशांतीं प्रकटे आदित्य ॥ कीं कुंडांतून निघे आराध्य दैवत ॥ तैसा सत्यवती पुढें प्रकटत ॥ साक्षात्‍ व्यास नारायण ॥१९७॥
चंद्र सूर्य कृशान ॥ एके ठायीं जाहले संपूर्ण ॥ तैसें स्वरूप देदीप्य मान ॥ पाहतां मन निवतसे ॥१९८॥
अवलो कितां व्यास ध्यान ॥ दुःख दोष जाय विरोन ॥ ज्याचें करितां स्मरण ॥ सकल विघ्नें नासती ॥१९९॥
भीष्में धरिले द्दढ चरण ॥ मग तो कृष्ण द्वैपायन ॥ मातेस करी नमन ॥ म्हणे स्मरण कां केलें ॥२००॥
म्हणे पुत्रा संकट पडलें ॥ म्हणोनि तुज बोला विलें ॥ दोघे अनुज तुझे पडले ॥ कालानलीं जाऊनि ॥२०१॥
तुटला वंश खंटलें संतान ॥ तुज अधिकार असे पूर्ण ॥ तरी देऊनि वीर्य दान ॥ पुत्र वती करीं दोघींस ॥२०२॥
भारत वल्ली खंडोन ॥ गेली विचित्र वीर्या पासून ॥ तरी शुक्रजीवन घालून ॥ वृद्धि पुढें करावी ॥२०३॥
अवश्य म्हणे कृष्ण द्वैपायन ॥ शुचि र्भूत स्त्रिया होऊन ॥ माझें तेज परम दारुण ॥ साहिलें पाहिजे निर्भजें ॥२०४॥
सत्य वती म्हणे सुता ॥ तूंचि तयांस धैर्यदाता ॥ उशीर न लावीं आतां ॥ फलोत्पत्ति होऊंदे ॥२०५॥
एकांतीं आसन घालूनी ॥ व्यास बैसले अनुष्ठानीं ॥ मध्य झालिया निशीथिनी ॥ स्त्रूषेस सांगे सत्यवती ॥२०६॥
करूनियां मंगल स्त्रान ॥ करावें हरिहर पूजन ॥ देऊनियां अपार दान ॥ विप्र भोजन मनेच्छा ॥२०७॥
तैसेंच करी अंबिका ॥ चातुर्य कासार मारा लिका ॥ कीं चढत चालिली कनक लतिका ॥ व्यास कल्प द्रुमावरी ॥२०८॥
उग्र तेज देखतां वेगीं ॥ कंप सुटला अंबिके लागीं ॥ व्यास प्रवर्तले सुरत संगीं ॥ नयन झांकी नारी ती ॥२०९॥
वीर्य निक्षेपून उदरीं ॥ वेद व्यास आले बाहेरी ॥ जननी म्हणे व्यासा सांग निर्धारीं ॥ पुत्र कैसा उपजेल ॥२१०॥
व्यास म्हणे सुत सुलक्षण ॥ नवनाग सहस्त्र बली पूर्ण ॥ परी इणें भयें झांकिले नयन ॥ पुत्रही अंध होईल ॥२११॥
सत्यवती म्हणे कर्म गहन ॥ अंधास काय राज्यासन ॥ मग म्हणे सुता कृपें करून ॥ अंबालिकेस पुत्र देईं ॥२१२॥
निकें म्हणोनि परा शरा नंदन ॥ तत्काल पावला अंत र्धान ॥ तों धृतराष्ट्र जन्मला चक्षु हीन ॥ नवना गसहस्त्रबली ॥२१३॥
पुत्र देखतां द्दष्टीं ॥ सत्यवती जाहली कष्टी ॥ मग म्हणै कैसी करावी गोष्टी ॥ धांवें जगजेठी व्यास देवा ॥२१४॥
तत्काल प्रकटला कृष्ण द्वैपायन ॥ बैसला एकांतीं जाऊन ॥ अंबालिका श्रृंगार ॥ करून ॥ तया जवळी पातली ॥२१५॥
नृसिंह देखतां इंदिरा ॥ कांपूं लागली थरथरां ॥ तैसी भोगा प्रवर्ततां सुंदरा ॥ व्यास तेज न सोसे ॥२१६॥
शरीर जाहलें पांडुर वर्ण ॥ बार्हर आले भोग देऊन ॥ माता म्हणे बोल वचन ॥ सुलक्षणी पुत्र कैसा तें ॥२१७॥
परम सुलक्षण राज पुत्र ॥ होईल धर्मात्मा अति पवित्र ॥ मातृदोषें शरीर ॥ कर्पूरवर्ण होईल ॥२१८॥
धृत राष्ट्रास शत पुत्र ॥ पंडूस होतील पांच कुमार ॥ त्या पांडवांस श्रीकर धर ॥ साह्य होईल सर्व स्वें ॥२१९॥
व्यास स्वस्थाना पावत ॥ पुढें अंबा लिका जाहली प्रसूत ॥ कर्पूर गौर तैसा सुत ॥ पंडुराज जन्मला ॥२२०॥
सर्व लक्षणीं संपूर्ण ॥ परी बाल देखतां पांडुरवर्ण ॥ सत्यवती स्मरे व्यासा लागून ॥ तत्काल प्रकटला जग द्नुरु ॥२२१॥
म्हणे एक अंध एक पांडुर वर्ण ॥ अंबिकेसी पुनः भोग देऊन ॥ तृतीय पुत्र सुलक्षण ॥ निर्मीं आतां गुणा लया ॥२२२॥
कुमारी दशेंत जाहला म्हणोनी ॥ एकांतीं बैसला काननीं ॥ कानीन म्हणती व्यासा लागूनी ॥ अर्थ पूर्ण हाचि असे ॥२२३॥
अंबिकेस सांगे सत्यवती ॥ तूं जाईं धैर्य धरीं एकांतीं ॥ अवश्य म्हणोनि ते दासी प्रती ॥ शृंगार करूनि पाठवीत ॥२२४॥
तेज न सोसे आपणासी ॥ म्हणोन पाठ विलें दासीसी ॥ तंव ते आनंद मय मानसीं ॥ सुरता नंदें रिझवीत ॥२२५॥
न धरी उग्रतेचें भय ॥ काया वाचा मनें पाहे ॥ संतोष विला ऋषि वर्य ॥ स्तवनें अंगमर्दनें ॥२२६॥
परिचारिका जाति हीन ॥ ह्रदयीं निर्मल शुद्ध मन ॥ दोघीं परीस तिचे संगें करून ॥ सुखी झाला श्रीव्यास ॥२२७॥
बाहेर आला कानीन ॥ माता पुसे पुत्रा लागून ॥ तो म्हणे भक्त राज होईल पूर्ण ॥ परी क्षेत्र पालटलें ॥२२८॥
आतां सीमा जाहली येथून येथून ॥ गुप्त जाहला द्वैपायन ॥ पुढें विदुर जन्मला पूर्ण ॥ त्रिकाल ज्ञानी भक्त जो ॥२२९॥
सर्व गुणीं पुरता ॥ जन्मला हा ऐसा क्षत्ता ॥ धर्माचा अवतार तत्त्वतां ॥ विवेकी आणि निपुण पैं ॥२३०॥
मांडव्यें शाप दिधला ॥ म्हणोनि दासी उदरीं जन्मला ॥ जन मेजय म्हणे ते वेळां ॥ शापाचा काय हेतु ॥२३१॥
वैशं पायन म्हणे ऐक सादर ॥ मांडव्य महाराज मुनी श्वर ॥ तरुतलीं उभा निरंतर ॥ एके चरणीं एकान्त वनीं ॥२३२॥
ऊर्ध्व बाहु उभा अहो रात्र ॥ तों नृप भांडारीं पडले तस्कर ॥ वस्तु हरिल्या अपार ॥ पळती सत्वर तेथू नियां ॥२३३॥
पाठीं धांवती राज दूत ॥ तस्कर जाहले भयभीत ॥ ऋषीचे पाठीशीं लपत ॥ संकोचित होऊ नियां ॥२३४॥
मांडव्य हें कांहीं नेणे ॥ तंव तेथें आलें धांवणें ॥ म्हणती चोर संग्रहिले येणें ॥ ताप सीवेषें मैम्द हा ॥२३५॥
तस्करां सहित मांडव्यासी ॥ मारीत आणिलें राज द्वारासी ॥ शूलीं घातला महर्षी ॥ तस्करां सहित राजाज्ञें ॥२३६॥
शूलीं घातला तपो धन ॥ परी योग बलें रक्षिला प्राण ॥ तैसाच करी अनुष्ठान ॥ शूलीं आसन चळेना ॥२३७॥
तों पक्षिवेषें सखेद मुनी ॥ पुसती मांडव्याला गुनी ॥ कवण्या कर्में करूनी ॥ पावलासी या दुःखी ॥२३८॥
येरू म्हणे अन्याय नसतां मातें ॥ शूलीं दिधलें नृपनाथें ॥ हेर सांगती रायातें ॥ ऋषि नेणतां दंडिला ॥२३९॥
राजा धांवला सपरिवारीं ॥ मांडव्या देखोन रोदन करी ॥ म्हणे नेणतां अपराध निर्धारीं ॥ मज घडला ऋषिवर्या ॥२४०॥
मग सूत्र धारी आणूनी ॥ शूल काढी कर्व तूनी ॥ ऋषी तत्काल देह त्या गूनी ॥ यमपुरीस पातला ॥२४१॥
तमास म्हणे ते वेळीं ॥ मज कां तुवां दिधलें शूलीं ॥ येरू म्हणे पतंगी कां घातली ॥ कंटकाग्रीं पूर्वीं तुवां ॥२४२॥
त्याचि दोषें सबल ॥ तुज प्राप्त जाहला शूल ॥ ऋषि कोपला तत्काल ॥ शाप देत यमातें ॥२४३॥
दोष बहुत लहान ॥ मेरू हूनि दंड गहन ॥ परम हिंसक तूं दुर्जन ॥ जगद्भक्षक दुष्टात्मा ॥२४४॥
दासी पोटीं तुज हो जनन ॥ वर्तसी दरिद्रें करून ॥ यम धरी मग चरण ॥ उश्शापवचन बोलावें ॥२४५॥
उपजसी व्यास वीर्थें करूनी ॥ परी महा भक्त त्रिकाल ज्ञानी ॥ रत होशील कृष्ण भजनीं ॥ पंडिता चार्य विवेकी ॥२४६॥
म्हणोनि महा ज्ञानी विदुर ॥ व्यासवीर्यें धर्मावतार ॥ पुढें कथा परम सुंदर ॥ ब्रह्मा नंदें परिसिजे ॥२४७॥
ब्रह्मा नंदा यतिवर्या ॥ श्री धर वरदा पंढरीराया ॥ पांडव पालका करूणा लया ॥ जगदुद्धारा जग द्नुरो ॥२४८॥
सुरस पांडव प्रताप ग्रंथ ॥ आदिपर्व व्यास भारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ षष्ठा ध्यायीं कथियेला ॥२४९॥
स्वस्ति श्री पांडव प्रताप ग्रंथ ॥ आदिपर्वटीका श्री धर कृत ॥ वंशावलि भीष्माची जन्म मात ॥ धृतराष्ट्र पंडुविदुरांची ॥२५०॥
इति श्रीधर कृत पांडव प्रतापे षष्ठाध्यायः ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : January 18, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP