मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|पांडवप्रताप| अध्याय १६ वा पांडवप्रताप मंगलाचरण अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय २० वा अध्याय १९ वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा अध्याय ५१ वा अध्याय ५२ वा अध्याय ५३ वा अध्याय ५४ वा अध्याय ५५ वा अध्याय ५६ वा अध्याय ५७ वा अध्याय ५८ वा अध्याय ५९ वा अध्याय ६० वा अध्याय ६१ वा अध्याय ६२ वा अध्याय ६३ वा अध्याय ६४ वा पांडवप्रताप - अध्याय १६ वा पांडवप्रताप ग्रंथवाचन म्हणजे चंचल मनाला भक्तियोगाकडे वळविण्याचा प्रवास. Tags : granthapandavapratappothiग्रंथपांडवप्रतापपोथी अध्याय १६ वा Translation - भाषांतर ॥ श्री गणेशाय नमः ॥ नारदाचे श्री चरण ॥ धर्म राजें प्रेमें वंदून ॥ म्हणे तुझ्या मुखें करून ॥ दिव्य निरू पण ऐकिलें ॥१॥तरी मय सभेसमान पाहें ॥ आणिक स्थान कोठें आहे ॥ तें सांगावें लवलाहें ॥ गुरु वर्या योगींद्रा ॥२॥नारद म्हणे तूं बहु श्रुत ॥ ऐकें सांगेन ययार्थ ॥ इंद्र सभा एक सत्य ॥ वरुण सभा दुसरी पैं ॥३॥तिसरी कुबेर सभा जाण ॥ यम सभा चवथी पूर्ण ॥ पांचवी ब्रह्म सभा सगुण ॥ धर्म सभा सहावी तुझी ॥४॥पुष्कर मालिनी सभा जाण ॥ इंद्र सभेची नाम खूण ॥ जी शतयो जनें विस्तीर्ण ॥ उंच जाण तितुकीच ॥५॥गगनचुंबित मणिस्तंभ ॥ शात कुंभाचे तुळवट स्वयंभ ॥ सूर्य प्रभे संनिभ ॥ जे दुर्लभ मनुष्यांसी ॥६॥तेथें नाहीं रात्रि दिवस ॥ सदा अखंड एक प्रकाश ॥ चंद्र सूर्यांचें निःशेष ॥ कार्य तेथें नसेचि ॥७॥क्षुधा तृषा रोग मृत्य ॥ नाहीं तेथें अधर्मा सत्य ॥ इच्छिले भोग बहुत ॥ चिंतितां सर्व पाविजे ॥८॥षडिवकार तापत्रय ॥ नाहीं शोक मोह भय ॥ महा पुण्य गांठीसी होय ॥ तैं ते सभा पडे द्दष्टी ॥९॥महा पुण्यवंत तेथें चढती ॥ तेथें बैसल्या ऋषि पंक्ती ॥ अष्टनायिका नृत्य करिती ॥ गाती गंधर्व किन्नर ॥१०॥तैसीच यम सभा जाण ॥ शतयो जनें विस्तीर्ण ॥ केवळ जांबूनद सुवर्ण ॥ नवरत्नख चित जे ॥११॥शक्र सभे हूनि अधिक ॥ यम धर्म सभा सुरेखा ॥ ऋषि राज यांच्या पंक्ती देख ॥ असंख्यात विरा जती ॥१२॥सगर भगीरथ दशरथ ॥ हे राज श्रेष्ठ वसती जेथ ॥ महोत्याह अद्भुत ॥ रात्र कीं दिवस सम जेन ॥१३॥वरुण सभा परम सुंदर ॥ सहस्त्र उगवले रोहिणीवर ॥ दिव्य मुक्ताफलें अपार ॥ कमावूनि रचियेली ॥१४॥रोग मृत्यु आणि शोक ॥ नाहींच तेथें निःशंक ॥ दिव्य द्रुम दिव्य फळें देख ॥ सदा तेथें विरा जती ॥१५॥महा पुण्य होय गांठीं ॥ तेव्हां ते सभा पडे द्दष्टी ॥ सकल नाग देव सृष्टी ॥ विराजत सर्वदा ॥१६॥मूर्ति मंत सप्त समुद्र ॥ भागीरथी मूर्ति मंत पवित्र ॥ कृष्ण गोदावरी सरिता समग्र ॥ मूर्ति मंत बैसल्या ॥१७॥कालिंदी नर्मदा भीमरथी ॥ तापी पयोष्णी सरस्वती ॥ सावित्री कावेरी गोमती ॥ विरा जती मूर्ति मंत ॥१८॥आठ नद मूर्ति मंत ॥ सकल तीर्थें वसती तेथ ॥ नामें सांगतां बहुत ॥ वाढेल ग्रंथ जाणिजे ॥१९॥जल चर दश लक्ष जाती ॥ विमिंगल राघव सेवा करिती ॥ वारुणी अर्धांगीं महा सती ॥ सिंहा सनीं वरुण शोभे ॥२०॥आतां कुबेर सभा सुंदर ॥ तेई तैसीच सविस्तर ॥ शतयो जनें परिकर ॥ सुवर्ण भूमि सभों वतीं ॥२१॥ अष्ट महा सिद्धि नव निधी ॥ मूर्ति मंत तेथें वर्तती विधीं ॥ पृथ्वीच्या धनाची समृद्धी ॥ धनेश्वराचे अधीन ॥२२॥सौदामिनी गाळूनि बहुत ॥ चित्रें रेखिलीं पैं तेथ ॥ मुक्ताफलांच्या रसें अद्भुत ॥ राजहंस काढिले ॥२३॥नीलरस गाळूनि मयूर ॥ काढिले गन गंधर्व यक्ष किन्नर ॥ पाच गाळूनि केले कीर ॥ धनेश सभे विरा जती ॥२४॥साठ गणां सहित ॥ तेथें बैसला उमाकांत ॥ सकल राक्षसां सहित ॥ बिभीषण तेथें सेवा करी ॥२५॥मेरु हिमाचल सर्व पर्वत ॥ रत्न शिखरें ज्यांचीं अमित ॥ कुबेरासी नमस्कारीत ॥ मूर्ति मंत पैं तेथें ॥२६॥आतां त्रिलोकीं दुर्लभ देख ॥ ती ब्रह्म सभा धर्मा ऐक ॥ प्रका शले सहखार्क ॥ प्रभा देख त्या हूनि ॥२७॥तया सभेचें सौंदर्य ॥ पाहूं न शके द्दष्टीं सूर्य ॥ देवेंद्र एवढा विबुधवर्य ॥ नयन त्याचे झांकती ॥२८॥स्तंभा विणें सभा जाण ॥ श्रेष्ठाची ते श्रेष्ठ पूर्ण ॥ सकळ आनंदाचें सदन ॥ दूःख शोक नसेचि ॥२९॥त्रिदशां सहित देवेंद्र ॥ द्वारीं राबे तेथें किंकर ॥ एका दश रुद्र द्वादश मित्र ॥ हस्त जोडूनि उभे पुढें ॥३०॥अमृताहूनि कोटि गुण देख ॥ गोड तेथील उदक ॥ वृक्षच्छा येचें पाहतां सुख ॥ ब्रह्मा नंद उचं बळे ॥३१॥चंद्र सूर्य आणि कृशान ॥ धुंधुर प्राय तेथें संपूर्ण ॥ तेथींचें वर्णितां महिमान ॥ सहस्त्र वदन मौनावे ॥३२॥तेथींचा पाहतां परिमल ॥ लाळ घोंटी मलया चल ॥ वसंत तेथें सर्व काळ ॥ प्रदक्षिणा करीतसे ॥३३॥सिंहा सनी कमला सन ॥ मान सपुत्र सप्त जाण ॥ पुढें उभे कर जोडून ॥ पाड काय इतरांचा ॥३४॥अपार ऋषींचे भार ॥ वेदघोषें गर्जती निरंतर ॥ पुढें उभे सनत्कुमार ॥ कर जोडूनि सर्वदा ॥३५॥चार्ही सभा कथिल्या जाण ॥ तेथील स्वामी येथें येऊन ॥ कुबेर यम इंद्र वरुण ॥ सेवा करिती नीचत्वें ॥३६॥गुणत्रय पंच भूतें ॥ मूर्ति मंत पाहें तेथें ॥ पंच प्राण इंद्रियें समस्तें ॥ मूर्ति मंत ते ठायीं ॥३७॥चार्ही वेद शास्त्रें पुराणें ॥ मूर्ति मंत देखिलीं नयनें ॥ चौदा विद्यांचीं तेथें स्थानें ॥ चौसष्ट कला मूर्ति मंत ॥३८॥ओंकारा सहित मातृका ॥ सप्त कोटी मंत्र देखा ॥ छंद रहस्यें बीजें ऐका ॥ मूर्ति मंत तये ॥ ठाय़ीं ॥३९॥इतुकीं नाना गोष्टी बोलून ॥ रंज विती कमला सन ॥ गायत्री मूर्ति मंत पूर्ण ॥ वाचा जाण प्रत्यक्ष पैं ॥४०॥दया क्षमा आणि शांती ॥ मूर्ति मंत तेथें वर्तती ॥ दिवस पक्ष अयनें वसती ॥ ऋतु संवत्सर मूर्ति मंत ॥४१॥नक्षत्रें वार आणि तिथी ॥ मास मुहूर्त गटिका वर्तती ॥ कल्प महा कल्प वसती ॥ मूर्ति मंत तये ठायीं ॥४२॥मरुद्न्ण आणि पितृ गण ॥ आदित्य वसु रुद्र जाण ॥ यक्ष राक्षस गुह्यक पुर्ण ॥ सहपरिवारें नांदती ॥४३॥लक्ष्मी सहित नारायण ॥ उमे सहित पंचानन ॥ वसती तेथें अनुदिन ॥ गजानन सरस्वती ॥४४॥अठ्ठयाशीं सहस्त्र ऋषीश्वर ॥ जितुकें आकारा आलें समग्र ॥ तितुकें तेथें आहे साचार ॥ किती पसारा बोलावा ॥४५॥ज्यांसी परनारी माते समान ॥ परद्रव्य मानिती जैसें तृण ॥ परनिंदा नाहीं मनांतून ॥ सत्य लोका ते जाती ॥४६॥जन्मा दारभ्य सत्यवंत ॥ वेदरत गायत्री भक्त ॥ सदाचारी शुचिष्मंत ॥ ब्रह्म सभे वसती ते ॥४७॥जे पूर्ण ब्रह्मचारी ॥ छळितां न येती क्रोधावरी ॥ ज्यांहीं आयुष्य वेंचिलें परोपकारीं ॥ तेचि अधिकारी सभे या ॥४८॥गोरक्षणीं वेंचिती प्राण ॥ ब्राह्यण कार्या देहदान ॥ प्रयागीं पावले मरण ॥ तेचि येथें पवती ॥४९॥जे अनन्य गुरु भक्त ॥ जे माता पित यांसी भजत ॥ शान्त दान्त आणि विरक्त ॥ सत्य लोक वासी ते ॥५०॥साधु संत ब्राह्मण ॥ यांसी आदरें देती अभ्युत्थान ॥ परोपकारीं वेंचिती धन ॥ बैसती जाण सभेसी जाण सभेसी त्या ॥५१॥अन्न सत्र उदकदान ॥ दरिद्रि यांचें घडविती लग्न ॥ सदा मुखीं हरिस्मरण । सत्य लोकीं राहती ते ॥५२॥ऐशा पांचही सभा वर्णून ॥ नारद पावला अंतर्धान ॥ धर्म म्हणे धन्य धन्य ॥ नारद स्वामी जग द्नुरु ॥५३॥जन मेज यासी हे पावन ॥ कथा सांगे वैशं पायन ॥ बरवें ऐकें साव धान ॥ कथा पुण्यश्लोकाची ॥५४॥कमलोद्भव नंदन नारद ऋषी ॥ एकदां आला यमस भेसी ॥ सूर्य सुतें सन्मानूमि त्यासी ॥ पूजा केली आदरें ॥५५॥तों यमस भेसी पंडुराज ॥ नारदें देखिला तेजःपुंज ॥ जो पुण्य देह पावोनि सहज ॥ सुखरूप बैस लासे ॥५६॥पंडुराज म्हणे नारदासी ॥ जरी स्वामी मृत्यु लोका जासी ॥ तरी शक्र प्रस्थीं मम पुत्रांसी ॥ इतुकीच आज्ञा सांगिजे ॥५७॥जरी कराल राज सूय यज्ञ ॥ तरी इंद्र सभे मी बैसेन ॥ यम करितो मज बहु मान ॥ परी माझें मन विटे येथें ॥५८॥येथें जीवांची जाचणी होत ॥ कुंभीपाकादि यातना ॥ अमित ॥ तेणें खेद पावत सदा चित्त ॥ न घडे परमार्था साधन ॥५९॥जरी राज सूय यज्ञ पुत्र करी ॥ तरी पुरंदर आपुल्या शेजारीं ॥ ठाव देऊनि निर्धारीं ॥ नानापरी सुख देई ॥६०॥मग बोले विरिंचि नंदन ॥ अवश्य मी धर्मासी सांगेन ॥ मग तत्काल उठला तेथून ॥ वीणा वाहुन ऊर्ध्वपंथें ॥६१॥मस्तकीं शोभे जटा भार ॥ गौर वर्ण जैसा शीतकर ॥ यज्ञोपवीत रुळे संदुर ॥ उत्तरीयवस्त्र झळकतसे ॥६२॥क्षीर समुद्रीं धुतलें ॥ तैसें आवरण वस्त्र शोभलें ॥ द्वादश टिळे सतेज मिरवले ॥ सिद्धपादुका पदयु गुलीं ॥६३॥दिव्य गंध दिव्य सुमनीं ॥ जो सदा पूजिजे देव गणीं ॥ ऐसा महाराज नारद मुनी ॥ शक्र प्रस्था प्रति आला ॥६४॥धर्में देखिला नारद मुनी ॥ साष्टांगें नमिला प्रेमें करूनी ॥ दिव्य सिंहा सनीं बैस वूनी ॥ षोडशोपचारें पूजिला ॥६५॥जोडूनियां दोन्ही कर ॥ धर्म उभा राहिला समोर ॥ म्हणे आजि माझें भाग्य थोर ॥ द्दष्टीं देखिला नारद मुनी ॥६६॥नारद म्हणे ते वेळां ॥ मज पंडुराज स्वर्गीं भेटला ॥ तेणें निरोप तुम्हांसी सांगितला ॥ राज सूय यज्ञ करा वेगीं ॥६७॥त्या पुण्यें करुनि सहज ॥ शक्राचे शेजारीं बैसेल पंडुराज ॥ तुम्ही पुत्र त्याचे तेजः पुंज ॥ करावें काज एवढें ॥६८॥ऐसें धर्मरा यासी सागोन ॥ ऊर्ध्वपंथें गेला ब्रह्म नंदन ॥ धर्म दान ॥ तपा चरण कायसें ॥७०॥वृथा दवडितां पितृवचनार्थ ॥ तो पुत्र नव्हे प्रत्यक्ष जंत ॥ तो वांचोनि भूभार व्यर्थ ॥ अनुपकारी अभाग्य ॥७१॥पितृवचनीं उपजे त्रास ॥ सद्नुरूशीं करी द्वेष ॥ कुशब्द बोले मातेस ॥ तो अल्पायुषी जाणिजे ॥७२॥सत्पुरुषांची करी निंदा ॥ अपमानी जो ब्रह्म वृंदा ॥ विद्या बलें जो प्रवर्ते वादा ॥ तो अल्या युषी जाणिजे ॥७३॥भक्त देखतां करी उपहास ॥ साधूंसी लावी नसते दोष ॥ सद्नुरूहूनि म्हणे मी विशेष ॥ तो अल्पायुषी जाणिजे ॥७४॥निंदी सदा तीर्थीं क्षेत्रें ॥ असत्य मानी हरिहरचरित्रें ॥ सर्वदा निंदी वेद शास्त्रें ॥ तो अल्यायुषी याणिजे ॥७५॥काया वाचा मनें ॥ परिडाहिंसा करणें ॥ भूतद्रोह करूं जाणे ॥ तो अल्पायुषी जाणिजे ॥७६॥निंदी महापुरुषांचे ग्रंथ ॥ नसतेचि काढी कुतर्कार्थ ॥ भाग्य विद्या गर्वें उन्मत्त ॥ तो अल्पायुषी जाणिजे ॥७७॥श्री हरीचें गुण कीर्तन ॥ अव्हेरी जो न करी श्रवण ॥ टाकी विष्णु भक्ति उच्छेदून ॥ त्यासी अधः पतन सुटेना ॥७८॥मी विष्णु भक्त मोठा ॥ म्हणोनि निंदी जो नीलकंठा ॥ तपस्वी देखोनि करी चेष्टा ॥ त्यासी अधःपतन सुटेना ॥७९॥शिव भक्त होऊनि निर्मळ ॥ जो विष्णुनिंदा करी चांडाळ ॥ नसते कुमार्ग स्थापी जो खळ ॥ तासी अधःपतन सुटेना ॥८०॥होतां साधूंचा अपमान ॥ संतोष वाटे मनांत पूर्ण ॥ करी वृद्धांचें मान खंडन ॥ त्यासी अधःपतन सत्य होय ॥८१॥सभोमाजी दुरुक्ति बोले ॥ जेणें भल्याचें ह्रदय पोळे ॥ मत्सर विष्ठेनें मन माखलें ॥ त्यासी अधःपतन सुटेना ॥८२॥निर्नासिक जो दर्पण न पाहे ॥ तोंवरीच रूपाचा अभिमान वाहे ॥ म्हणे माझे रूपासी तुलितां न ये ॥ रतिवरही शोधितां ॥८३॥मी एक जाणता सर्वज्ञ ॥ ऐसा वाहे सदा अभिमान ॥ शत मूर्खाहूनि नीच पूर्ण कर्में करी आपणचि ॥८४॥आतां असोत हे बोल ॥ जो पितृवचन न करी सफल ॥ तोचि अभागी केवल ॥ महाखल जाणावा ॥८५॥नारदें सांगितलें येऊन ॥ कीं राज सूय यज्ञ करावा पूर्ण ॥ तों बोलिले भीमार्जुन ॥ अत्युत्तम वचनातें ॥८६॥पृथ्वीचे राजे जिंकून ॥ द्र्व्य आणावें बळें करून ॥ तरी सिद्धीस पावेला सकल यज्ञ ॥ बहुत कठिण कार्य दिसे ॥८७॥तरी द्वारकानाथ श्री कृष्ण ॥ जो आनकदुंदुभीचें ह्रदयरत्न ॥ तो जग द्रुरु आलिया विण ॥ कार्य साधान नव्हेचि ॥८८॥मग श्री कृष्णासी दिव्य पत्र ॥ पाठवी धर्मराज पंडुपुत्र ॥ दूत धाडिले सत्वर ॥ द्वार काधीशा बोलावूं ॥८९॥तों जरा संधांचे बंदीं नृपती ॥ पडिले बावीस सहस्त्र छत्रपती ॥ त्यांहीं पत्रें लिहिलीं श्रीपती प्रती ॥ आम्हांसी जगत्पते सोडवीं ॥९०॥दोहीं कडोनि आलीं पत्रें ॥ तीं स्वयें वाचिलीं राजी वनेत्रें ॥ मग काय केलें स्मरारि मित्रें ॥ तें चरित्र पां ॥९१॥मनीं विचार करी कम लोद्भव पिता ॥ आधीं जावें शक्र प्रस्था ॥ भेटू नियां पंडुसुतां ॥ कार्य तत्त्वतां साधवें ॥९२॥ऐसें बोलोनि कंसारी ॥ वेगें आरूढला रथावरी ॥ पवनवेगें ते अवसरीं ॥ शक्र प्रस्था पातला ॥९३॥पुढें धांवूनि धर्म राजें ॥ वंदिलीं हरीचीं चरणां बुजें ॥ वर्तमान जाहलें सहजें ॥ तें सर्व कथिलें हरी प्रती ॥९४॥स्वर्गाहूनि पंडुनृपती ॥ सांगोनि पाठवी नारदा हातीं ॥ राज सूय करा निश्चितीं ॥ तरी कैसी गति करावी ॥९५॥कर्ता करविता पाहीं ॥ तुज विण दुजा नाहीं ॥ आम्हीं रक्षिसी सर्वोठायीं ॥ उडी घालूनि निजांगें ॥९६॥यावरी बोले पद्माक्षीरमण ॥ पृथ्वीचे राजे सर्व जिंकून ॥ बळें हिरोनि आणावें धन ॥ मग यज्ञ संपूर्ण होईल ॥९७॥बावीस सहस्त्र राजे जिंकिले ॥ जरा संधें बंदीं घातले ॥ तरी त्यासी मारिल्या वेगळें ॥ यज्ञ नव्हे तुमचा हा ॥९८॥जरा संध सतरा वेळ ॥ मथुरेसी पावला परम सबळ ॥ परी त्याला मरण काळ ॥ समीप आला यावरी ॥९९॥धर्म म्हणे घन नीळा ॥ जरा संध कैसा जन्मला ॥ ते कथा मज दयाळा ॥ किंचित आतां सांगवी ॥१००॥मग हरि म्हणे ऐक सुमती ॥ मगध देशींचा नृपती ॥ बृह द्रथ नामें महारथी ॥ जयाची कीर्ति त्रिभुवनीं ॥१०१॥काशी श्वरा चिया उदरीं ॥ जावळ्या जाहल्या दोघी कुमारी ॥ सुलक्षणा एक निर्धारीं ॥ गुण सुंदरी ते दुसरी पैं ॥१०२॥स्वयंवरीं बृह द्रथें जिंकोन ॥ स्त्रिया केल्या दोघी सुगुण ॥ परी नव्हे पुत्र संतान ॥ तेणें उद्विग्न बृह द्रथ ॥१०३॥उदंड केले प्रयत्न ॥ परी नव्हेचि पुत्र संतान ॥ मग स्त्रियांसी संगें घेऊन ॥ राजा हिंडे वनांतरीं ॥१०४॥मग पूर्व पुण्यें करून ॥ अकस्मात झालें ऋषि दर्शन ॥ चंड कौशिक नामा भिधान ॥ जो तपो धन ते जस्वी ॥१०५॥नमस्कार घाली बृह द्रथ ॥ नेत्रोदकें चरण क्षालीत ॥ केश वसनें चरण पुशीत ॥ मग संवादत स्त्रेहेंशीं ॥१०६॥आवडी देखोनि निर्मळ ॥ बोले चंड कौशिक स्त्रेहाळ ॥ तुझे पुरवीन मनोरथ सकळ ॥ माग कांहीं एधवां ॥१०७॥तेव्हां बृह द्रथ बोले वचन ॥ पोटीं नाहीं पुत्र संतान ॥ कुलीं दीपक पाजळून ॥ करीं प्रकाश ऋषि वर्या ॥१०८॥ऋषि बोले आनंदोन ॥ तुज होईल पुत्र संतान ॥ बलाद्भुत कीर्ति पूर्ण ॥ पृथ्वी माजी जयाची ॥१०९॥आम्रच्छा येसी ऋषि बैसला ॥ तो पक्कफल पडलें ते वेळां ॥ वायु पक्षी यांहीं ढका लाविला ॥ नाहीं त्यासी तत्त्वतां ॥११०॥तें उचलो नियां कृपाकर ॥ प्रसाद देत ऋषी श्वर ॥ तुज होईल दिव्य पुत्र ॥ देईं स्त्रियांसी भक्षा वया ॥१११॥प्रसाद घेऊनि नमन करीत ॥ परतोनि स्वस्थलासी येत ॥ दोघी स्त्रियांची भीड बहुत ॥ फल देत चिरोनि ॥११२॥अर्ध अर्ध भाग दिधला ॥ दोघींसी गर्भसं भव जाहला ॥ नव मास भरतां एकेचि वेळां ॥ प्रसूत जाहल्या दोघीही ॥११३॥अर्ध अर्ध शरीर ते अवसरीं ॥ जन्मत दोघींचे उदरीं ॥ जैसें कर्वतिलें करीं ॥ उभेंचि सम समान ॥११४॥दोघां सही असे प्राण ॥ परी बोल वया नाहीं वदन ॥ मातांनीं ह्र्दयें पिटून ॥ शरीरें धरणीं टाकिलीं ॥११५॥कपाळ पिटीत बृह द्रथ ॥ म्हणे कर्माची गति विपरीत ॥ मग वस्त्रें गुंडाळोन गुप्त ॥ नगरा बाहेर टाकिलीं ॥११६॥निशा जाहली अर्ध नेमस्त ॥ तों जरा यक्षिणी आली तेथ ॥ तीं जोडोनि जों पाहात ॥ तों अभेद शरीर जाहलें ॥११७॥जाहलें अभेद वज्र शरीर ॥ बत्तीस लक्षणी राज कुमार ॥ टाहो फोडितां सत्वर ॥ स्त्रेह उप जला जरेतें ॥११८॥मग यक्षिणी रूप पालटोनी ॥ जाहली ते दिव्य नितं बिनी ॥ रोदन सुस्वर ऐकोनी ॥ राजा धांवोनि येत तेथें ॥११९॥दोघी धांवत ॥ दोघींसी पान्हा स्तनीं फुटत ॥ तों दिव्य रूप जरा तेथ ॥ खेळवीत बाल कासी ॥१२०॥शक्तिरूपिणी ते जरा ॥ म्हणे बृह द्रथा राजेश्वरा ॥ पुत्र नेईं आपुल्या घरा ॥ देतें मी वरा तुजलागीं ॥१२१॥जरेनें बाळ जडिला शुद्ध ॥ म्हणोनि नाम जरा संध ॥ मी यक्षिणी देवी प्रसिद्ध ॥ मजला सर्व पूजिती ॥१२२॥माझें चित्र रेखूनि भिंतीसी ॥ पूजावें प्रति श्रावण मासीं ॥ अपुत्रिका स्त्रियांसी ॥ पुत्र होतील वरदानें ॥१२३॥मग पुत्र देऊनि राजेश्वरा ॥ गुप्त जाहली ते जरा ॥ स्त्रियां समवेत मंदिरा ॥ प्रवे शला बृह द्रथ ॥१२४॥पुत्रोत्साह द्वादश दिवस ॥ लागले मंगल तूर्यांचे घोष ॥ भांडारें फोडूनि विशेष ॥ धनें वसनें वांटीतसे ॥१२५॥विप्र करिती जातक ॥ तों आला चंडकौशिक ॥ सामोरा धांवे नृप नायक ॥ आणी मिरवीत सन्मानें ॥१२६॥पूजा जाह लिया समस्त ॥ मग चंडकौशिक बोलत ॥ बृहद्रथा तुझा हा सुत ॥ जिंकील समस्त पृथ्वीतें ॥१२७॥हा पाटोपेचि सुरासुरां ॥ बंदीं घालील नृपलील नृपवरां ॥ परी श्री कृष्णाशीं द्वेष करितां पुरा ॥ नाश पावेल तत्काल ॥१२८॥ऐसें सांगोनि कौशिक ऋषी ॥ गेला आपुल्या आश्रमासी ॥ पुढें थोर जाहलिया जरा संधासी ॥ पित्यानें राज्य दीधलें ॥१२९॥प्रधानासी निरवूनि सुत ॥ दोघी स्त्रिया घेऊनि बृह द्रथ ॥ तप करूनि अद्भुत ॥ स्वर्ग सदना पावला ॥१३०॥इकडे जरा संधें सबळ ॥ पृथ्वीचे नृप जिंकिले सकळ ॥ पांडव आणि यादवकुळ ॥ एवढें वेगळें करूनियां ॥१३१॥हा कंसाचा होय श्वशुर ॥ येणें घेऊनियां दळभार ॥ सतरा वेळ वेढिलें मथुरापुर ॥ युद्ध अपार जाहलें पैं ॥१३२॥वरुणपाश घेऊनि ते वेळां ॥ बळरामानें सतरा वेळ धरिला ॥ मग कालय वनासी घेऊनि आला ॥ भस्म जाहला तोही पुढें ॥१३३॥याकरितां धर्मा जाण ॥ जरा संधाचें जवळी मरण ॥ आलें असे त्यासी कारण ॥ राज सूय यज्ञ आरंभीं ॥१३४॥मग शिष्य करूनि भीमार्जुन ॥ गुरु जगद्नुरु स्वयें होऊन ॥ सडेचि त्रिवर्ग निघोन ॥ जाते झाले तेधवां ॥१३५॥चंद्र सूर्य हुताशन ॥ तैसे तेजस्वी तिघे जण ॥ देश पर्वत नद्या उल्लंघोन ॥ मगध पुरासी पातले ॥१३६॥दुर्ग ढांसळोनि बळें ॥ आडमार्गें ग्रामांत गेले ॥ तों महाद्वारीं देखिलें ॥ भेरी निशाण अंद्भुत ॥१३७॥समरीं मारू नियां दैत्य ॥ त्यांचीं चर्में काढोनि त्वरित ॥ भेरी तीन केल्या अद्भुत ॥ शतयोजनें नाद जाय ॥१३८॥तो नाद ऐकतां कानीं ॥ शत्रु भय भीत समरांगणीं ॥ गर्भ त्यागिती शत्रुकामिनी ॥ नादध्वनि ऐकतांचि ॥१३९॥धर्मानुर्जं तये क्षणीं ॥ भेरी टाकिल्या फोडूनी ॥ पुढें गंध माला विक्रय देखोनी ॥ घेत हिरोनि बळेंचि ॥१४०॥गंध चर्चूनि तिघां जणीं ॥ पुष्प माला कंठीं घालूनी ॥ आडमार्गें राज सदनीं ॥ प्रवेशले तत्काल ॥१४१॥याग संपादूनि समस्त ॥ जरासंध स्वस्थ बैसत ॥ भोंवते बहुत पंडित ॥ चर्चा करिती यागाच्या ॥१४२॥तों देखिले तिघे ब्राह्मण ॥ जरासंध करी त्यांसी नमन ॥ तों ते न बोलती धरिलें मौन ॥ आशी र्वचन न देती ॥१४३॥जरा संधाचे होम शाळे जाउन ॥ उगेचि बैसले तिघे जण ॥ राजा म्हणे कैसे ब्राह्मण ॥ कांहींच वचन न बोलती ॥१४४॥तिघांसी कनकासनें देत ॥ मधुपर्क पूजा समर्पीत ॥ म्हणती पूजा नेघों निश्चित ॥ इच्छा नसे कांहीं आम्हां ॥१४५॥उगेचि बैसले तटस्थ ॥ मध्य रात्र जाहली तेथ ॥ राजा मनीं चकित पहात ॥ न कळे मनोगत तिघांचें ॥१४६॥राजा म्हणे द्विज हो सांगा ॥ काय इच्छा असेल तें मागा ॥ हरि म्हणे युद्धभिक्षा देईं वेगा ॥ तिघां मधूनि एकातें ॥१४७॥राजा पाहे हस्त विलोकून ॥ देखे गोधां गुलीचें चिन्ह ॥ म्हणे हे नव्हेत ब्राह्मण ॥ महाक्षत्रिय दिसताती ॥१४८॥जरा संध बोले वचन ॥ म्यां भिक्षा दिधली तुम्हां लागून ॥ परी तुम्ही तिघे जण ॥ अहां कोण तें सांगा ॥१४९॥म्हणाल जरी भले ब्राह्मण ॥ तरी राज मार्गासी टाकून ॥ नगर दुर्ग ढांसळून ॥ भेरी निशाणें फोडिलीं ॥१५०॥आम्हीं केलें असोनि नमन ॥ नाहीं दिलें आशी र्वचन ॥ कदापि नव्हां श्रेष्ठ वर्ण ॥ वेष धारी दिसतसां ॥१५१॥काय कारण कल्पून ॥ येथें आलां सांगा वचन ॥ तुम्हां मध्यें गुरु कोण ॥ बोला कापटय सागर हो ॥१५२॥मग बोले तो श्रीरंग ॥ जे आमुचे सखे जिवलग ॥ त्यांच्या ग्रामांत शुद्ध मार्ग ॥ पाहोनि येतों महाद्वारें ॥१५३॥जे कां शत्रु दुर्जन ॥ विष्णु द्वेषी दुरात्मे पूर्ण ॥ त्यांचे नगर दुर्ग पाडून ॥ आडमार्गें प्रवेशतों ॥१५४॥जरा संध बोले उत्तर ॥ तुम्हां आम्हांत कास याचें वैर ॥ मग बोले यादवेश्वर ॥ ऐकें द्वेषिया दुर्जना ॥१५५॥सकल राजे करूनि बंधस्थ ॥ जाळूं पाहतोसी होमांत ॥ ऐसा तूं हिंसक पतित ॥ तुजशीं युद्ध करूं आतां ॥१५६॥बेवीस सहस्त्र नृपती ॥ जे धर्मात्मे छत्रपती ॥ ते तूं जिंकोनि क्षितिपती ॥ बंदी घातले दुर्जना ॥१५७॥जो ब्राह्यणांचा उपहास करी ॥ साधुसंतांशीं द्वेष धरी ॥ गुरु वचन अव्हेरी ॥ तोचि वैरी आमुचा ॥१५८॥जे निंदिती विष्णु चरित्रें ॥ अपमानिती सत्पात्रें ॥ अपूज्य पूजिती आदरें ॥ तेचि वैरी आमुचे ॥१५९॥कमला आणि चक्रपानी ॥ भेटों इच्छिती धर्म सदनीं ॥ कार्पण्य लोभें विघडी दोनी ॥ तोचि वैरी आमुचा ॥१६०॥भगवद्भक्तांचा द्वेष करी ॥ वेदमर्यादा अव्हेरी ॥ जो सर्वां भूतीं द्वेष धरी ॥ तोचि वैरी आमुचा ॥१६१॥आतां युद्धासी उठें वेगें करून ॥ नाहीं तरी नेऊं ओढून ॥ याज्ञिक घेती पशुचा प्राण ॥ तेवीं चूर्ण करूं तुझें ॥१६२॥ऐसें बोलतां मुकुंद ॥ क्रोधावला जरासंध ॥ म्हणे हा गोवळा गोविंद ॥ ओळखिला महाकपटी ॥१६३॥माझा कंस जामात ॥ कपटें मारिला मथुरेंत ॥ कलाय वन नेऊनि गुहेंत ॥ भस्म केला कापटयें ॥१६४॥हा म्यां ओळखिला पार्थ ॥ हा भीम होय यथार्थ ॥ क्रोधें जरा संध कांपत ॥ काय बोलत तयांसी ॥१६५॥तरणीच्या किरणांवरी देखा ॥ कैशा चढती पिपीलिका ॥ कल्पांत विजू मशक ॥ गिळवेल कैसी नेणवे ॥१६६॥चढोनि प्रलयाग्नीच्या शिखरीं ॥ पतंग कैसा नृत्य करी ॥ ऊर्णना भीच्या तंतूभीतरीं ॥ महागज कैसा गुंतेल ॥१६७॥तृणा चिया पाशें करून ॥ केवीं बांधिजेल पंचानन ॥ खगेंद्रासी अळी धरून ॥ केवीं नेईल आकाशीं ॥१६८॥दीपकतेजें करून ॥ केवीं आहाळेल चंडकिरण ॥ तैसें मज महावीरासी जिंकून ॥ जय कैसा पावाल ॥१६९॥जिंकिले पृथ्वीचे पार्थिव ॥ धरूनि आणीन यादव सर्व ॥ मशक प्राय पांडव ॥ आणीन क्षण न लागतां ॥१७०॥हे पशु माझिये नयनीं ॥ बांधीन एकेचि दावणीं ॥ यज्ञामाजी घालोनी ॥ बलिदान अर्पीन ॥१७१॥मज सिंहा चिये दरी आंत ॥ तिघे करी आले अकस्मात ॥ आतां जावया कैंचा पंथ ॥ आला मृत्यु जवळी तुम्हां ॥१७२॥खघोत आपुलें तेज पूर्ण । दावी केवीं गुरू लागून ॥ मृगेंद्रा पुढें येऊन ॥ मार्जारें उड्डाण मांडिलें ॥१७३॥कीं सज्ञान पंडिता पुढें ॥ बोला वया आलीं माहमूढें ॥ जंबुक आपुले पवाडे ॥ व्याघ्रा पुढें दावीत पैं ॥१७४॥वायसें ब्रीद बांधोन ॥ नारदा पुढें मांडिलें गायन ॥ मूषक बहुत निळोन ॥ वासुकीसी धरूं आले ॥१७५॥तैसी आगळीक करून ॥ मजवरी आलेति तिघे जण ॥ मंडूक जैसे उडोन ॥ चंद्रासी पाडूं इच्छिती ॥१७६॥यावरी काय बोले कंसारी ॥ जो भवग जविदारक केअरी ॥ तुझी सुकृतवात निर्धारीं ॥ सरली आतां सर्वही ॥१७७॥आयुष्यतैल सरलें पूर्ण ॥ भीम म्यां हातीं धरिला व्यजन ॥ प्रणज्योति जाईल विझोन ॥ समय जवळी पातला ॥१७८॥देहदीपपात्र रितें ॥ पडेल येथेंचि पालथें ॥ हें फल रोकडेंचि येथें ॥ पावशील तूं आतां ॥१७९॥वांचावें ऐसें असेल मनांत ॥ तरी बंदींचे राजे करीं मुक्त ॥ द्वेष सांडोनि समस्त ॥ सुखें राज्यीं वर्तें तूं ॥१८०॥आतां नृप सोडीं झडकरी ॥ नाहीं तरी युद्ध करीं ॥ जरा संध म्हणे निर्धारीं ॥ किती बोलसी गोवळ्या ॥१८१॥तुवां कधीं युद्ध केलें ॥ कपटेंचि कंसासी मारिलें ॥ अर्जुन तरी बाळ कोंवळें ॥ विद्या शिकतें द्रोणापाशीं ॥१८२॥भीम कांहीं तगेल मजशीं ॥ तोही जड बहु आळशी ॥ आयुष्य सरलें निश्चयेंसी ॥ म्हणोनि आलां चालत ॥१८३॥मग भीम म्हणे ऊठ मशक ॥ कळेल आतां तुझा आवांका ॥ मग जरा संधें राज्य देखा ॥ पुत्रा सहदेवा दीधलें ॥१८४॥प्रधानासी निरविला सुत ॥ भीम मल्लगांठी द्दढ घालीत ॥ सिंह मागें पुढें न पाहात ॥ धांवे जैसा मृगावरी ॥१८५॥किरीट काढूनि दोघां जणीं ॥ वीरगुंठी बांधिल्या ओढूनी ॥ भीमें मस्तक कृष्णचरणीं ॥ ठेऊनि म्हणे यश देईं ॥१८६॥कृतांताची बैसे दांतखिळी ॥ ऐसी दोघांहीं फोडिली आरोळी ॥ जरा संध आणि भीम बळी ॥ मिसळले तेव्हां मल्लयुद्धा ॥१८७॥परस्पर बळें थडका देती ॥ वर्मकला रडडोनि धरिती ॥ वज्र मुष्टि गुडघे हाणिती ॥ भिरकाविती एकमेका ॥१८८॥झिंजा धरूनि पाडिती ॥ आसडोनि बळें आपटिती ॥ कोंपरघायें हाणिती ॥ न्याहो उमटे अंबरीं ॥१८९॥मुष्टिघाय वाजती सबळ ॥ दणाणती सप्तपाताळ ॥ शेष कूर्म वराह सकळ ॥ सांवरूनि धरिती पैं ॥१९०॥लत्ता प्रहाराचे घाय थोर ॥ दणाणत वरी अंबर ॥ विमानें पळविती सुरवर ॥ दिशाकुंजर दचकती ॥१९१॥किंशुक फुलती वसंतकाळीं ॥ तैसे आरक्त दिसती ते वेळीं ॥ बाप रे भीम महाबळी ॥ बोले वनमाळी क्षणक्षणां ॥१९२॥तेरा दिवस पर्यंत ॥ भिडती दोघे बलवंत ॥ देव विमानीं चकित ॥ लोक तटस्थ पाहाती ॥१९३॥कार्तिक शुद्ध प्रतिपदादिनीं ॥ युद्ध मांडिलें दोघां जणीं ॥ त्रयोदशी गेली क्रमोनी ॥ मग चतुर्दशीचे रात्रीं पैं ॥१९४॥काडी चिरूनि अच्युत ॥ भीमासी दावी संकेत ॥ सांधा चिरीं त्वरित ॥ जरेनें जो सांधिला ॥१९५॥चीर चिरिजे जेवीं करें ॥ तैसा उभा चिरिला वृकोदरें ॥ दोन्ही खंडें एकसरें ॥ भिरकावूनि दीधलीं ॥१९६॥परी पुनः होऊनि सांधासांध ॥ उभा ठाकला जरा संध ॥ भीमार्जुन आणि मुकुंद ॥ आश्चर्य करिती देखोनि ॥१९७॥मग वैकुंठपुरविलासी ॥ संकेत दावी भीमासी ॥ खंडें विषम टाकीं वेगेंसि ॥ न जुळती ॥ पुती काहिव ॥१९८॥घेऊनि खर्जूरिकापत्र ॥ चिरूनि दाखवी शतपत्रनेत्र ॥ भीमें युद्ध केलें एक प्रहर ॥ पुढती तैसाचि चिरियेला ॥१९९॥विषम खंडें टाकितां जाणा ॥ जरा संध मुकला प्राणा ॥ सुमन संभार तेचि क्षणा ॥ सुरवर आनंदें वर्षती ॥२००॥भीमें फोडिली विजयहांक ॥ डळमळले तीन्ही लोक ॥ पार्थ आणि द्वारकानायक ॥ प्रीतीं भेटती भीमातें ॥२०१॥कृष्ण द्दष्टी जाहलें मरण ॥ मागध पावला वैकुंठ भुवन ॥ जरा संधाचें प्रेत बीभत्स पूर्ण ॥ नगरद्वारीं पडियेलें ॥२०२॥सहदेव पातला होऊनि सद्नद ॥ स्त्रेहें आलिंगीत मुकुंद ॥ म्हणे जैसा प्रर्हाद ॥ तैसा सुखी राहें तूं ॥२०३॥तुजवरी येईल जें विघ्न ॥ तें मी निजांगें वारीन ॥ उत्तर क्रिया करीं संपूर्ण ॥ पितयाची यथाविधि ॥२०४॥राजसूय यज्ञालागीं पाहीं ॥ सखया तूं सत्वरी येईं ॥ सहदेवें हरीसी ते समयीं ॥ अपार संपत्ति ओपिल्या ॥२०५॥राज सूय यज्ञ होऊनि उरे ॥ ऐशीं दिधलीं द्र्व्य भांडारें ॥ नवरत्नांचे एकसरें ॥ पर्वतचि ओपिले ॥२०६॥असो जरा संधाचा स्यंदन ॥ त्रिभुवनीं नाहीं ऐसा अन्य ॥ त्यावरी बैसला रमारमण ॥ चंडकिरण तेवीं दिसे ॥२०७॥पूर्वीं वधा वया वृत्रासुर ॥ जो सहस्त्राक्षा देत श्री धर ॥ तो शक्रें आपुला प्राण मित्र ॥ म्हणिनि दिधला बृह द्रथा ॥२०८॥त्यावरी जरासंध बैसोन ॥ पृथ्वीचे भूभुज जिंकोन ॥ विजयी जाहला संपूर्ण ॥ ख्याति केली त्रिभुवनीं ॥२०९॥तो रथ आणूनि त्वरा ॥ सहदेवें अर्पिला श्रीधरा ॥ त्यावरी बैसोनि सत्वरा ॥ कृष्ण भीमार्जुन चालिले ॥२१०॥स्मरण करितांचि जाण ॥ ध्वजीं बैसे येऊनि सुपर्ण ॥ उच्चैःश्रव्याचे बंधु जाण ॥ चार्ही अश्व जुंपिले ॥२११॥बंदींचे नृप ते क्षणीं ॥ सोडवीत चक्रपाणी ॥ ते सद्नद होऊनि लोटांगणीं ॥ शरण येती श्रीरंग ॥२१२॥रत्नपुष्पांजलि घेऊनि ॥ अर्पिते जाहले कृष्ण चरणीं ॥ एक मस्तक पदीं ठेवूनी ॥ प्रक्षालिती नेत्रोदकें ॥२१३॥प्राणदातया इंदिरावरा ॥ जलदवर्णा जलजनेत्रा ॥ आज्ञा कांहीं द्यावी आम्हां किंकरां ॥ ते वंदूं मुकुटीं आपुल्या ॥२१४॥हरि म्हणे ऐका वचन ॥ शक्रप्रस्थीं राजसूय यज्ञ ॥ सत्वरी यावें तनममधन ॥ घेऊनियां धर्म भेटी ॥२१५॥समस्त राजे संगें घेऊन ॥ निघती भीम कृष्णार्जुन ॥ शक्रप्रस्थासी घेऊन ॥ धर्मराजासी भेटले ॥२१६॥प्रेमें साष्टांग नमस्कार ॥ धर्मासी घालिती नृपवर ॥ क्षेमालिंगनीं क्षीराब्धिजावर ॥ संतोषवीत युधिष्ठिरा ॥२१७॥भीमार्जुनांसी धर्म ॥ भेटोनि बोले सप्रेम ॥ स्वामी माझा सर्वोत्तम ॥ सर्वही यश तयाचें ॥२१८॥बंधमुक्त नृप पूर्ण ॥ धर्मासी देती आलिंगन ॥ अपार द्र्व्यसंभार आणून ॥ प्रीतीनें पुढें ठेविती ॥२१९॥पुढें यावें राजसूययज्ञा ॥ गौरवूनि देत धर्म आज्ञा ॥ नमस्कारूनि जगन्मोहना ॥ राजे स्वस्थाना पावले ॥२२०॥श्री कृष्ण म्हणे धर्मा लागून ॥ तुझे कुलीं हे दीप भीमार्जुन ॥ मगध सदनीं पाजळोन ॥ शत्रुतम निरसिलें ॥२२१॥कृपापल्लवें झांकून ॥ मागुते आणिले सांभाळून ॥ धर्म धरी द्दढ चरण ॥ जाहलों धन्य तुझेनि ॥२२२॥हरि म्हणे धर्मराया ॥ बंधु पाठवीं जिंकावया ॥ उर्वीकामधेनु दोहूनियां ॥ करभारदुग्ध काढावें ॥२२३॥आरंभावा राजसूय यज्ञ ॥ मी सवेंचि येतों द्वारकेहून ॥ वसुदेवदेवकींचे चरण ॥ झडकरी वंदूनियां ॥२२४॥पांडव घालिती लोटांगणा ॥ जगद्नुरूसी करिती प्रदक्षिणा ॥ जा हें न बोलवे वचना ॥ यावें लवकरी गोविंदा ॥२२५॥पुढिले प्रसंगीं सुधारस ॥ वर्षेल स्वामी वेदव्यास ॥ तें वैशंपायन जन मेजयास ॥ निरोपीत सप्रेम ॥२२६॥संस्कृत इक्षुरस अपार ॥ त्याची प्राकृत हे साखर ॥ सुजन सेवणार ॥ प्रेमरसीं मिळवूनियां ॥२२७॥ब्रह्मानंदा पांडुरंगा ॥ श्री धरह्रदयशतपत्र भृंगा ॥ तुझी कीर्ति वंद्य त्रिजगा ॥ वर्णितां न सरे कल्यांतीं ॥२२८॥महागंगा व्यास भारत ॥ श्रीधर दीन तृषाक्रांत ॥ अवघी न प्राशवे अद्भुत ॥ अंजलीनें किंचित घेतलें ॥२२९॥तैसें हें सार निवडून ॥ पांडवप्रताप गोड जीवन ॥ प्राशितां शीतल होऊन ॥ ब्रह्मानंद जाहला ॥२३०॥सुरस पांडवप्रताप ग्रंथ ॥ सभापर्व व्यासभारत ॥ त्यांतील सारांश यथार्थ ॥ षोडशाध्यायीं कथियेला ॥२३१॥स्वस्ति श्रीपांडवप्रताप ग्रंथ ॥ सभापर्वटीका श्रीधरकृत ॥ सभावर्णन जरासंध प्राणान्त ॥ न्रुपवरमोचन कथन केलें ॥२३२॥इति श्रीश्रीधरकृतपांडवप्रतापे सभापर्वणि षोडशाध्यायः ॥१६॥ ॥ श्री कृष्णार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥ श्रीरस्तु ॥॥ श्रीपांडवप्रताप सभापर्व षोडशाध्याय समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : February 08, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP