मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ५| अध्याय ३३ खंड ५ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ खंड ५ - अध्याय ३३ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय ३३ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ दक्ष विचारी मुद्गलाप्रत । तुलसीपत्र गणेशपूजनांत । जो कोणी कळून वाहत । न कळत वा त्याचें काय फळ ॥१॥कथामृत ऐकून रमणीय । माझी तृप्तता न होय । गणेशभक्ति दुर्लभ असाध्य । यांत संशय मुळी नसे ॥२॥मुद्गल म्हणती दक्षाप्रत । प्राचीन इतिहास तुजप्रत । सांगतों तो ऐकतां जात । सर्व संशय विलयासी ॥३॥ब्राह्मण कोणी काश्यपकुळांत । नित्य तुलसीनें गणेशास पूजित । निषिद्धता जाणूनही करित । हट्टानें तो ऐसें कर्म ॥४॥अन्य ब्राह्मण त्यास निवारिती । परी त्याची त्या न क्षितो । बौद्ध ज्ञानाची तर्करीती । प्रतिपादी तो खल तेव्हां ॥५॥गणेश सर्वत्र सर्वरूप असत । तरी विधि निषेध कैसा उरत । अमुक स्वीकारार्ह अमुक त्याज्य ही रीत । गणेश पूजनांत न तर्कसंमत ॥६॥तें ऐकून अन्य द्विजोत्तम । भयोद्विग्न होऊन परम । परस्परां म्हणती ते गाणपत्य उत्तम । आतां काय करावें ॥७॥एक दिवसाचा अपवाद सोडून । जरी गणेशमस्तकीं तुलसीदर्शन । तरी तो त्वरित दूर करून । गाणपत्यें नियम पाळावा ॥८॥जरी तेथ विलंब लावित । तरी पापी तो नर होत । आतां काय करावें त्या दुष्ट द्विजाप्रत । विचार याचा करूया ॥९॥र्जैसी पर्वतांसी वज्रानें पीडा होत । तैसा तुलसी वाहतां गणेश कथित । ऐश्या विचारें घालवून देत । त्या हटवादी विप्रासी ॥१०॥गणेश मंदिरांतून बहिष्कृत । तो पापी विप्र स्वगृहीं जात । तेथ तुलसीपत्रें पूजित । गणेशासी हट्टानें ॥११॥तदनंतर अल्प अवधीत । तो काश्यप द्विज झाला मृत । यमदूत त्यासी त्वरित । नरकांत तैं टाकिती ॥१२॥एककल्पापर्यंत राहत । तो पापी विविध नरकांत । तदनंतर राक्षसाचा जन्म लाभत । सुदारुण त्या विप्रासी ॥१३॥तो क्षुधेनें सतत पीडित । दाह रोगादींनी युक्त । सर्व कार्यांत अशक्त । वनामध्यें संचार करी ॥१४॥एके दिनीं गार्ग्य मुनि येत । स्वेच्छेनें त्या वनांत । तो प्रख्यात गणेशभक्त । महायोगी जगतांस ॥१५॥त्यास पाहून राक्षस धावत । त्यास भक्षण्या आतुरचित्त । गार्ग्य गणेशमंत्र जपित । मंत्रजल फेकिलें राक्षसावरी ॥१६॥त्या मंत्रजलाचा पुण्यप्रभावें होत । गार्ग्यदर्शनें स्मरण चित्तांत । त्या राक्षसाच्या त्वरित । पूर्व जन्मीच्या वृत्तान्ताचें ॥१७॥त्यायोगें तो अति खेदयुक्त । रडत रडत प्रणाम करित । कर जोडून गार्ग्यास म्हणत । हाहाकार करीत तेव्हां ॥१८॥पूर्वींचा तो धर्मध्रुक् ब्राह्मण । गार्ग्यास करी अभिवादन । म्हणे मुनिशार्दूला खूण । आता पटली मदंतरीं ॥१९॥आपण गाणपत्य महायश ख्यात । आपल्या चरणीं मी लीन विनीत । त्वरित सोडवा सांप्रत । संसार सागरांतून मजला ॥२०॥तदनंतर तो राक्षस सांगत । पूर्व जन्मींचा सर्व वृत्तान्त । म्हणे तुमच्या मंत्रजलानें मजप्रत । सर्व वृत्त आठवलें ॥२१॥त्याचा वृत्तान्त ऐकून । शरणागत त्यास जाणून । महामुनि दयायुक्त होऊन । गणेशमंत्र देई तयासी ॥२२॥गार्ग्य मुनि त्या राक्षसास सांगत । हितावह हा मंत्र असत । हा नाममंत्र जप सतत । तुलसीकृत स्तोत्रही वाच ॥२३॥ऐसें बोलून अंतर्धान । पावला तैं गार्ग्यं परम पावन । तो दुष्ट राक्षस उपदेश स्मरून । दुखभयें मंत्र जपत होता ॥२४॥तेव्हां त्याची क्षुधा शमली । रोगहीनता नष्ट झाली । काया सबळ जाहली । गाणपत्य प्रिय तो झाला ॥२५॥राक्षस जन्माचा भोग संपला । तैं तो गणेश्वराप्रत गेला । दुःखर्वीजत जाहला । विघ्नेश्वराचें भजन करी ॥२६॥योग स्वभावें त्यास पूजित । ऐसें हें कथिलें तैं प्रेमें वृत्त । तुलसी वर्जन करण्या निमित्त । सर्व संशय नाशकर ॥२७॥म्हणोनि जो नर गणनाथपूजेंत । तुलसीपत्रें समर्पण करित । तो चांडाल निःसंदेह होत । नरकांत अंतीं जातसे ॥२८॥त्यांचा वंश खंडित होत । लक्ष्मी सारी विनष्ट होत । रोगादींनी पीडित अत्यंत । मृत्यूनंतर नरकवास ॥२९॥ऐशा नरास स्पर्श न करावा । झाल्यास स्नानविधि आचरावा । सचैल स्नान न करिता जीवा । पाप अत्यंत लागेल ॥३०॥ऐशा पाप्याचें नावही न घ्यावें । याहून अधिक काय सांगावें । पापरूपी नर तो हें जाणावें । रहस्य सर्वदा मनांत ॥३१॥तुझी उत्कंठा ऐकून । हें सर्व केलें तुज कथन । आणखी काय ऐकण्य़ा मन । उत्सुक तुझें तें सांग ॥३२॥ओमिती श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे पंचमे खंडे लंबोदरचरिते तुलसीसमर्पणवर्जनवर्णनं नाम त्रयस्त्रिंशत्तमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP