खंड ५ - अध्याय १९

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः । मुद्‍गल सांगती दक्षाप्रत । हृदयांतून बाहेर येत । शेषाच्या तैं गणनायक । पुत्रभावें राहिला ॥१॥
मूषकावरी जो आरूढला । त्यास पाहतां प्रणिपात केला । कृतांजली पूजी तयाला । अथर्वउपनिषदें स्तुति करी ॥२॥
भक्तिनम्र मान वाकवून । नागेश करी विजापन । गणाध्यक्षा तूं योगेश पावन । ब्रह्मांचा नायक विख्यात ॥३॥
तरी माझा पुत्र होऊन स्थित । हें कैसें विडंबन वाटत । तेव्हां गजानन त्यास वेष्टित । आपुल्या मायामोहानें ॥४॥
त्या मायाप्रभावें मोहित । शेष गजाननासी मानी स्वसुत । स्त्रीसहित पालन करित । त्या बालक गणेशाचें ॥५॥
ऐसीं पाच वर्षें त्याच्या सदनांत । बाळ गणेश नांदत । तदनंतर दैत्याचा वृत्तान्त । ऐक जो त्यापुढें घडलासे ॥६॥
मायाकर नामक असुर । करी धर्मकर्मांचा संहार । सर्वत्र पसरवी कम आसूर । दुरात्मा तो जगतांत ॥७॥
त्यायोगें देवनायकासी घडत । उपवास स्वाहाशून्यतेनें सतत । हाहाकार सर्वत्र माजत । वर्णांश्रमयुक्त जनांत ॥८॥
स्वाहा देवांसी न मिळत । स्वधा पितरांसी न लाभत । ऐसीं कर्में करण्या धजत । न कोणीही असुरभयानें ॥९॥
तेव्हां सर्व मुनिवर करित । शंभुप्रमुख देवही समस्त । दैत्यनाशाचा विचार त्वरित । भयभीत तैं होवोनियांअ ॥१०॥
तेथ महायोगी बृहस्पति म्हणत । उदारबूद्धि सर्वांप्रत । गणेशाशी भक्तिभावयुक्त । भजावें स्वपद प्राप्तीसाठीं ॥११॥
चार पदार्थांच्या संयोगे होत । गणेश निजबोध दाता निश्चित । चार वर्जितां हा वधित । महाखलासी सत्वर ॥१२॥
तें ऐकतां ते समस्त । गुरु सहित महातप आचरित । निराहारही राहत । नाना अनुष्ठानें करिती ॥१३॥
ऐसीं शंभर वर्षें होत । तेव्हां गजानन प्रसन्नचित्त । त्यांना वर देण्या प्रकटत । भक्तीनें पूर्ण तोषून ॥१४॥
त्या महायशासी पाहून । हर्षसंयुक्त देवमुनिजन । त्यास करोनी वंदन । स्तविती विविध स्तोत्रांनी ॥१५॥
आदरभावें गणेशास मानिती । सर्वांचा नायक निश्चिती । त्यास सारे विनविती । गणाध्यक्षा मार मायाकरासी ॥१६॥
तुझी भक्ति मायाविहीन । देई आम्हांसी मिळवून । तुझ्या पादपद्यीं लीन । जाहलों आम्ही निःसंशय ॥१७॥
तें ऐकून गजानन । म्हणे मायाकरासी मी मारीन । शेषपुत्र मीं वेगें करून । जरी देवप वाहन होतील माझें ॥१८॥
चार देवांचें मिळून । जरी रचाल माझें वाहन । विप्रांनो मी त्यावर चढून । करीन वध असुराचा ॥१९॥
माझी दृढभक्ति निश्चित । उपजेल तुमच्या चित्तांत । तुम्हीं माझें दास विनीत । सर्वदा व्हाल विशेषें ॥२०॥
ऐसें बोलून अंतर्धान । गणेश पावला तत्क्षण । शेषाच्या ध्यानांतून । प्रकटला भक्तकार्य सिद्धिस्तव ॥२१॥
तदनंतर देवर्षि मुख्य करिती । विचार देवमय वाहनाचा स्वचित्ती । कैसें करावें हें वाहन म्हणती । विचारविनिमय चालला ॥२२॥
तैं साक्षात शिव सांगत । वाक्य उत्तम समस्तांप्रत । वेदमूर्तिमय देव विलसत । सर्वाचा गुरु सर्वदा ॥२३॥
शिव पुढती सांगत । हा वर्णिला असे वेदांत । मूषकवाहन नामें प्रख्यात । मुष धातूचा अर्थ चोरणें ॥२४॥
तैसाची हा धातू जाणावा । ब्रह्मस्तेयाचा उपाय बरवा । नामरूपात्मका सर्वा । असद्‍ ब्रह्म म्हणतात ॥२५॥
या नामरूपांत जे भोग असत । त्यांचा भोक्त स्वमायेनें होत । भोगभोक्त वर्तत । त्या त्या आकारें राहतसे ॥२६॥
परी अहंकारयुक्त न जाणत । जंतू सारे विमोहित । आपणासीच भोक्ते मानत । परी ईश्वर सर्वभोक्त ॥२७॥
तो चोरासम निवसत । त्यालाच उंदिर म्हणत । तो मूषक । तो मूषक मनुजांचा प्रचालक अद्‍भुत । मायेनें गूढरूप त्याचें ॥२८॥
त्या रूपानें भोग भोगित । तो चोरासम जगतांत । तैसाचि जीवनांत । सूर्यदेव आत्मा विशेषें ॥२९॥
तोच नाना जीवांत । चोरासदृश भोग भोगित । सर्व भोक्ता विष्णु असत । त्यासम होत निःसंशय ॥३०॥
सद्‍ असद्‍मय रूप असत । सहजांत शिवदेव भोक्ता ख्यात । चौरसदृश यांत संदेह नसत । निर्मोहमायेनें जो युक्त ॥३१॥
त्या चोर भावस्थ भोक्त्यास । वाहन करा सविशेष । मूषकाची आकृति तयास । देऊनि करा वाहन तेंच ॥३२॥
तैं गणपासी द्या वाहन । हें ऐकतां सारे मुदितमन । देव ऋषी म्हणती वचन । शिवासी तैंअ आनंदें ॥३३॥
वाहवा चांगलें सांगितलें । सदाशिवा ज्ञात झालें । तुझें सर्वज्ञत्व आम्हां पटलें । आता तैसीच कृती करूं ॥३४॥
तदनंतर गणेश्वरा घ्याऊन चारांचें शरीर कल्पून । त्यांत स्वअंश स्थापून । भोक्तृरूप जो प्रजापते ॥३५॥
त्या अंशांनी सजीव होत । मूषक तो बळसंयुक्त । ब्रह्मा देवर्षींसहित । अभिषेक करी तयावर ॥३६॥
अन्तर्बाहयादिक चोरी वर्तत । नानाविध तया एकरूप जगांत । त्यांत हा राजासम विलसत । म्हणोनि अभिषेक तयासी ॥३७॥
ऐसा अभिषेक होत । तैंतो मूषक हर्षित । यज्ञभागाचा त्यास भोक्ता करित । देव सारे वासवांसहित ॥३८॥
त्याचा आधार घेऊन । सर्व देव तैसे मुनि जन । पोहोचले शेषमंदिरात प्रसन्न । शेष विस्मय पावला ॥३९॥
तो नागराजा पुनीत । महायज्ञ त्या समस्ताप्रत । विविध आसनीं बैसवित । नंतर म्हणे तयांसी ॥४०॥
शेष म्हणे धन्य जन्म । धन्य माझें तपदान । धन्य माझें झालें ज्ञान । देवमुनि पितरांनो आज ॥४१॥
आपुलें जाहलें मज दर्शन । सांगा मज आगमन कारण । आपुल्या कृपेनें युक्त होऊन । करीन इष्ट भक्तीनें ॥४२॥
त्याचें हें ऐकून वचन । शंकर सर्वनायक हर्षपूर्ण । नागराजास सांगे आगमन कारण । म्हणे शेषा धन्य तूं ॥४३॥
सर्व मंडळांत धन्य तूं आम्हां वाटत । तुझ्या गृहीं पुत्र स्वयं होत । ब्रह्मनायक साक्षात । मूषकवाहन अवतार ॥४४॥
तों पांच वर्षांचा सांप्रत । त्यास न मानी सामान्य सुत । तुझ्या तपःप्रभावें समुद्‍भूत । ध्यानज प्रभू जाणी तो ॥४५॥
त्याचें चारदेवांशात्मक वाहन । मूषक स्तेय धर्मयुक्त असून । सर्वांच्या हृदयीं तो पूर्ण । सदैव नांदे लपून ॥४६॥
हयाच्यावर आरूढ होऊन । मूषकवाहन प्रतापवान । मायाकरासुराचें करील हनन । गणेश्वर सत्वरीं ॥४७॥
ऐसें त्यांचें ऐकून वचन । तो नागराजा खिन्नमन । कांहींच बोलला देवासी वचन । पुत्रवात्सल्याकारणें ॥४८॥
तदनंतर शंकर त्यांस म्हणत । खेद करूं नको तूं चित्तांत । विघ्नेश्वर हा न मरेल निश्चित । कल्याणरूपा नागराजा ॥४९॥
विविध तपें आचरून । मुनींनी प्रर्थिला गजवदन । मायाकराचा विनाश करण्या उत्सुकमन । जाहला तो पुत्र तुझा ॥५०॥
तूं आधीच आराधिला । देव गजानन संतोषला । वरदानप्रभावें झाला । तुझा पुत्र विघ्नेश्वर ॥५१॥
ऐसें संभाषण चालत । तेथ तैं मूषक येत । नागबालकांसहित । क्रीडा करीत होता प्रभू ॥५२॥
तो प्रभू येता आदरें उठती । त्यास देवासहित विप्र नमिती । सामवेद स्तोत्रें गाती । स्तुती तेव्हां गणेश्वराची ॥५३॥
त्या वेळीं तो गणराज बोलत । वचन हितकारक तयांप्रत । प्राज्ञहो सांगा इच्छित । आपुलें मजसी निःसंकोच ॥५४॥
तेव्हां हर्षयुक्त ते सुरर्षी म्हणती । स्वामी आमुची ऐका विज्ञप्ती । मायाकरअसुरासी मारूनि क्षिती । वाचवी तूं विघ्नहरा ॥५५॥
तुझ्या पदकमलांची भक्ति । करी तूं दृढ आमुच्या वित्तीं । दास आम्ही तुझे निश्चिती । पालन करी आमुचें तूं ॥५६॥
तथाऽस्तु ऐसें तो म्हण्ते । परी वाहन आणून द्या मज उचित । महादेवहो सांप्रत । चतुःपदार्थरूपहस्तें मरण न असुरा ॥५७॥
जरी चतुःपदार्थरूप माझें वाहन । तरी त्या असुराचें करीन हनन । यांत नसे संशय न्य़ून । अन्यथा मायाकरा मारूं कैसें ॥५८॥
त्या असुरासी वर अद्‍भुत । म्हणोनी वाहन मज ऐसें उपयुक्त । तें आणून द्या मजप्रत । तरी वधीन निश्चित त्यासी ॥५९॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खंडे लंबोदरचरिते मूषकदेवसमागमो नाम एकोनविंशतितमोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP