मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीमुद्गल पुराण|खंड ५| अध्याय २३ खंड ५ अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ खंड ५ - अध्याय २३ मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे. Tags : mudgal puranpothipuranपुराणपोथीमुद्गल पुराणसंस्कृत अध्याय २३ Translation - भाषांतर ॥ श्रीगणेशाय नमः ॥ मुद्गल म्हणती दक्षाप्रत । महाभागा ऐक सांप्रत । गणपतीचें रूप अदभुत । ज्यानें होईल गाणपत्य ॥१॥जो नर गणेशभक्तिमार्गांत । गणेशास तोषवावया इच्छित । त्यानें व्हावें दीक्षायुक्त । गाणपत्यमार्गीं विधीनुसार ॥२॥गाणपत्य जो वेदपारंगत । ऐसा गुरु जो शांतियुक्त । त्यास वंदून म्हणावें विनीत । दीक्षा द्यावी महाप्रभो ॥३॥तूंच गणराज मजप्रत । गाणपत्य परायण पुनीत । मज सुशीलयुक्ता जगांत । करावें गाणपत्य आपुल्यासम ॥४॥ऐसें जो शिष्य विचारित । शीलवंत जो विनीत । श्रौतस्मार्त क्रियायुक्त । गणेशभावीं लालस ॥५॥त्यास प्रथम शिकवावे । गणेंशपंथाचे परमघर्म बरवे । ते ती तुज सांगतों ऐकावे । सर्वसुखदायक जे ॥६॥दुसर्यांचे घरीं न जेवावें । रजस्वला स्त्रीसी न पहावें । परस्त्रीगमन न करावें । कोठेही कदापि मनानेही ॥७॥स्वार्थासाठी क्रोध न करावा । लोभ मानसीं न धरावा । अभक्ष्य भक्षणाचा नसावा । छंद कधी गणेशभक्तासी ॥८॥गुरुद्रोह नसावा न निष्ठुरता । ज्येष्ठांच्या अपमानीं नसावी आसक्ति चित्ता । वेदशास्त्रविहितमार्गीं हीनता । कदापिही न आचरावी ॥९॥इहलोकीं वा परलोकांत । असावें ब्रह्मपरायण विरक्त । ऐसे विविध नियम उपदेशून साधकाप्रत । नंतर मंत्र सांगावा ॥१०॥प्रारंभी कृच्छ्रादिक द्यावें । नंतर गाणपत्यांस विचारावें । सुदिनीं सुमुहूर्त पहावे । तेव्हाच द्यावा दीक्षामंत्र ॥११॥किंवा गणराजाच्या उत्सवदिनीं । शुक्लकृष्ण चतुर्थी पाहोनी । गणेशाची प्रियवेळ अवलोकूनी । गुरूने शिष्यास मंत्र द्यावा ॥१२॥भक्तिपूर्वक आदरें मंत्र द्यावा । तेथ दक्षा सुखदविधि बरवा । तो मी वर्णितों आघवा । ऐक आता आदरें ॥१३॥पवित्र जागीं मंडप घालून । भूमी गोमयाने सारवून । मातीची चौकोनी वेदी करून । त्यात स्थापावे पवित्र घट ॥१४॥प्रथम गणेशयंत्र काढावें । कुंकुमानें त्यास आराधावें । अष्ट गणेशांसी पूजावें । विधिपूर्वक त्या वेळीं ॥१५॥दीक्षायुक्त जे गणेशव्रतधर । त्यांसी पूजावे होऊन विनम्र । त्यांस द्यावें भूषण वस्त्र । शाठयभाव सोडून ॥१६॥त्यांच्याकडून गणेशमंत्राचा । जप करवावा पुरश्चरणाचा । लाख दशसहस्त्र वा हजारांचा । त्याचा दशांश अर्पण होमांत ॥१७॥नंतर करावें बलिप्रदान । पूर्णाहुती आदरें देऊन । विघ्नेशासी पुनरपि पूजून । गुरुस प्रणाम करावा ॥१८॥मनोभावें करावी प्रार्थना । प्रभो माझी पुरवी कामना । रक्षावें मज दीना । गाणपत्य मंत्र द्यावा ॥१९॥पुनरपि गुरूसी पूजून । करावें कलशाचें पूजत । इष्टदेवाची स्थापना करून । गणेशमंत्रानें त्या वेळीं ॥२०॥नंतर विघ्नेश्वराचें करून ध्यान । स्वल्प मार्गें पूजून । तदनंतर करुन वस्त्राच्छादन । मस्तकावरून शिष्यानें ॥२१॥गुरूस प्रणाम करून । प्रार्थावे मंत्र म्हणा म्हणून । द्विजोत्तमा संसार जावा तरून । म्हणोनि मजला मंत्र द्यावा ॥२२॥ऐसें शिष्य प्रार्थित । तैं महर्षि गुरु त्यास शिकवत । गणेशास मनीं ध्यात । मंत्र देण्यास शिष्यातें ॥२३॥तदनंतर त्या कलशांतून । पूर्वदिशेचा क्राम ठेऊन । अभिमंत्रित जल घेऊन । गुरुनें अभिषेक करावा ॥२४॥अष्टोत्तरशत जप करावा । तदनंतर स्नानविधि उरकावा । प्रत्येक कलश जाणावा । अपूर्व सिद्धिप्रदायक ॥२५॥ऐसा शिष्य होत स्नात । त्यास घेऊन करावा प्रणिपात । शिष्यहस्ते पूजन विधिवत । करवून त्यास निरोप द्यावा ॥२६॥तदनंतर गाणपत्यासी नमन । करावें त्या शिष्यानें एकमन । त्यांना दक्षिणा देऊन । भूयसी भक्तिपूर्वक ॥२७॥शाठय न धरता मानसांत । भोजन द्यावें तयांसी पुनीत । मोदक लाडू पायस मनसोक्त । वाढावें त्या ब्राह्मणांना ॥२८॥बारीक तांदुळांचें ओदन । नाना परींची पक्वान्नें मिष्टान्न । यथेष्ट त्यांना वाढून । पुनः पुनः प्रणास करावा ॥२९॥त्यांना प्रार्थना करावी । भवार्णवी तरण्या मदत द्यावी । गुरुस दक्षिणा द्यावी । ग्रुरुवंशास नमावें सदा ॥३०॥गाणपत्यांस भेटून । तयांसी करावे नमन । गाणपत्य भेटता वंदन । न करी तो अपराधी ॥३१॥गाणपत्यांच्या अनादर । तेणें कोपे साक्षातू विघ्नेश्वर । यांत संशय नसे खरोखर । ऐसा दीक्षाविधि जाणावा ॥३२॥त्यानंतर पूजावे गणेशास । पुरश्चरणयुक्त विशेष । आता सांगतों धर्मास । गाणपत्यांनी जे पाळावे ॥३३॥दंतमंजन न करतां देवळांत । गणेशाच्या जो जात । तैसेंचि मैथुनानंतर मंदिरांत । जाता भ्रष्ट होतसे ॥३४॥अशुद्ध वस्त्र घालून । विघ्नराजाचें करतां पूजन । परक्यांचें वस्त्र नेसून । गणाधिपा पूजितां दोष असे ॥३५॥छिद्रयुक्त वस्त्र परिधान । करून न करावें पूजन । यथाविधि धरून मौन । गणेश्वरासी पूजावें ॥३६॥गणेशपूजन करित । त्यासमयीं जरी बोलत । तरी अंतराय पूजेंत होत । विघ्नयुक्त नर होई ॥३७॥स्नान न करितां अभ्यंगसंयुक्त । देवालयांत प्रवेश करित । तरी तो भ्रष्ट होय भक्त । आणखीही नियम असत ॥३८॥पादत्राण घालून जात । परी पाय न प्रक्षालित । तैसाच गणेशमंदिरात । प्रवेश करितां विघ्न येई ॥३९॥गंधानें चर्चित शरीर असत । परी गणनायका न पूजित । तैसाच देवालयीं जात । तरी भ्रष्ट होय तो नर ॥४०॥अजीर्णांदि दोषयुक्त जो देवासमीप बैसत । ढेकर देतां पूजेंत । विघ्नयुक्त नर होय ॥४१॥ भेरी नगारा न वाजवित । तैसाच गणेशमंदिरीं प्रवेशत । तो भ्रष्ट जगीं होत । देवगृहय प्रभंजक हो ॥४२॥देवालयात जाऊन । जो बोले असत्य वचन । अथवा न करी देवस्तवन । तोही भ्रष्ट जाणावा ॥४३॥नित्य प्रजानाथ तेथ संयत । देवाच्या सन्निध राहत । मर्यादांचें पालन करित । तरीच ईप्सित लाभेल ॥४४॥यथाशास्त्र विचारें भजत । सर्वसिद्धिद गणेशाप्रत । तो गाणपत्य स्वयं होत । गणेस साक्षात् या जगी ॥४५॥ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे पंचमे खण्डे लंबोदरचरिते गाणपत्यदीक्षावर्णनं नाम त्रयोविंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु । N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP