खंड ५ - अध्याय २०

मुद्गल पुराणात श्री गणेशाच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.


॥ श्रीगणेशाय नमः । मुद्‍गल कथा पुढें सांगती । ऐकोनी मूषकवाहनाची उक्ती । देवेंद्र सारे हर्षित होती । कर जोडून विनविती जे ॥१॥
विघ्नेशा विघ्नवारणा वर्तत । चतुर्ब्रह्ममय वाहन अद्‍भुत । स्वानंदीं मुषकाख्य पुनीत । सर्वभोगकर जें असे ॥२॥
सांप्रत भोगकर वाहन । शिवमुख्यांनीं निर्मिलें पावन । आपापल्या कलांशांनी प्रसन्न । वाहन तुजला तें गणेशा ॥३॥
जीवांत जो सर्वभोक्त । परमेश्वर चोरासम कर्ता । तें चोररूप वाहन तत्त्वता । सांप्रत तुजला योजिलें ॥४॥
ऐसें प्रार्थिती गणेशानासी । मुनींसहित करिती स्तुतीसी । महावीर्या मूषकासी । मूषकाकृतीसही ते प्रार्थिती ॥५॥
स्तेयरूपा सर्व ह्रदयस्था तुजसी । अंतभोंगकर युक्तासी । मूषकासी स्तेयरूपासी । मायायुक्ता नमन असो ॥६॥
चराचर मोहविसी । चोरासम भोग भोगिसी । ऐश्या चोररूपा तुजसी । नमस्कार विनीतभावें ॥७॥
चराचरमयासी चराचरधारकासी । सर्वाधीशासी कालकालासी । अनादासी नमन असो ॥८॥
लोकमुख्यासी महेशासी । चतुवर्ग प्रदात्यासी । गणेशवाहनासी सर्वमात्रासी सर्वमात्रासी । गणेशघ्वजस्थितासी नमन असो ॥९॥
गणाधीशासी ह्रदयास्थितासी । चालकात्मवीर्या तुजसी । ब्रह्माकारशरीरासी । चोरांच्या स्वरूपाशी नमन असो ॥१०॥
परेशासी चतुर्मयस्वरूपासी । वाहन तुजला मूषकासी । चारांचा गणप रक्षणकर्ता त्यासी । नमन आमुचें मनोभावें ॥११॥
त्याचें रूप धारण करून । होई गणेशाचें मुख्य वाहन । ऐसी स्तुती ऐकून । प्रसन्न झाला मूषक ॥१२॥
म्हणे त्या सर्वांसी आश्वासून । होईन मी गणपाचें वाहन । महाभागांनो हें निश्चित वचन । निश्चिंत तुम्ही रहावें ॥१३॥
तदनंतर तो मूषक स्तवित । होतां दर्शन हर्षयुक्त । महाद्युती गणेशास भजत । स्तोत्र गाई भक्तीनें ॥१४॥
देवासी योगरुपासी । मूषकगासी गणेशासी । परेशासी परात्परतरासी । अनंतासी नमन तुला ॥१५॥
महेशासी महेशसंस्तुतासी । विघ्नेशासी महाविघ्नधारकासी । अनंताच्या पुत्रासी । दैत्यदानवमर्दना नमन ॥१६॥
देवांच्या पालकासी । हेरंबासी स्वानंदवासीसी । भक्तस्वानंदादात्यासी । ब्रह्मप्ती तुज नमन असो ॥१७॥
चारांच्या चालकासी । चारांच्या संयोगमूर्तीसी । चारांसी स्वपददात्यासी । त्यांविरहित स्थितीसी नमन असो ॥१८॥
योगेशासी योगरुपासी । योग्यांसी योगदात्यासी । शांतिरुपासी शांतिदासी । मूषकवाहना नमन तुला ॥१९॥
मूषकध्वजासी सिद्धिबुद्धिपतीसी । नमन नाथासी भक्तेशासी । वेदेवाक्यप्रमाणें मजसी । गजानना करी स्ववाहन ॥२०॥
भक्तिसंयुक्त सेवापर । माझें नाव धारण करिसी उदार । मूषकग ऐसा ख्यात थोर । अभेदभक्ति देई नाथा ॥२१॥
माझा नाथ ऐश्या रीती । नाम तुझें ख्यात जगतीं । तरी मूषकगा मज भक्ति । देई तुझी महा अद्‌भुत ॥२२॥
ऐसें गणाधीशास स्तवून । दंडवतू प्रणाम करुन । भक्तिपूर्ण भावें करी पूजन । गणाधीश उठवी तया ॥२३॥
उठवून म्हणे तयाप्रत । मूषकग तें प्रसन्नचित्त । अरे साधु भक्ता वाहन सतत । तूंच माझें होशील ॥२४॥
माझी भक्ति तव चित्तांत । सुदृढ होईल होईल निश्चित । तूं रचिलेलें स्तोत्र हें अद्‌भुत । धर्मार्थकाममोक्षप्रद ॥२५॥
पाठका वाचकासी सर्वप्रद । पुत्रपौत्रदातें हें सुखद । जें जें इच्छिलें तें तें लाभप्रद । फलप्राप्तीनें होईल ॥२६॥
आणखी ऐक माझें वचन । देवविप्रांनीं जें केलें स्तवन । तेही सर्वमान्य होऊन । सर्व इच्छा पुरवील ॥२७॥
जो या चौरेशस्तोत्रानें स्तवित । मानव मूषका तुजप्रत । त्यास स्र्व ईप्सित लाभत । यांत संशय अल्प नसे ॥२८॥
अंतीं स्वानंदलोकांत । होईल तो ब्रह्मभूत । माझ्या कृपेनें तो ख्यात । तुझ्यासम प्रिय होईल मज ॥२९॥
ऐसें महादेवास सांगून । मूषकासी आश्वासून । गणनायक त्यावरतो बसून । गेला दैत्याधिप जेथें ॥३०॥
त्याच्या समवेत तेथ जाती । देवराज मुनी तैसे यती । नाग शेषमुख्यादी सत्वरगती । गेले ब्रहयासमवेत ॥३१॥
मूषकग देव पाठवित । ब्रह्मदेवासी प्रतापवंत । दूतत्वें मायाकराप्रत । बोधार्थ नीतिपालक तैं ॥३२॥
त्या असुरासमीप जात । त्यास हितकर वचन सांगत । आखुवाहा शरण जा त्वरित । अन्यथा व्यर्थ मरशील ॥३३॥
चार ब्रह्मांच्या योगांत । मूषकग असे प्रख्यात । स्वानंदवासकर तो असत । गणेश हा जाण असुरेश्वरा ॥३४॥
सुरासुरमय हा असत । भक्तिभावें जा तयाप्रत । माझा पुत्र झाला तो कृपायुक्त । हित तुझें मी सांगतसे ॥३५॥
ब्रह्मदेवाचें ऐकून वचन । म्हणे तयासी क्रोधमग्न । मायाकरासुर पापी महान । पापबुद्धी मनानें ॥३६॥
तू देवपक्षपाती होऊन । मोहविण्या मज आलास दुष्टमन । पंचम ब्रह्म सर्वत्र महान । योगरूपें राहतसे ॥३७॥
तें कोठेही न जात । तैसेंची ना तें येत । प्रजापते जो समागत । त्या गणेशासी मी मारीन ॥३८॥
तूं दूतरूपें आलास मजप्रत । तरी महामते जा परतून तयाप्रत । दूत म्हणोनि सहन करित । अपराध तुझा या वेळीं ॥३९॥
नाहीं तर देवप्रिया तुजसी । मारिलें असतें जिवानिशीं । ऐसें बोलून तयासी । पाठविला गणेशानाप्रत ॥४०॥
तो ब्रह्मदेव जाऊन । गणेशास प्रणास करून । सांगे सकल वर्तमान । तें ऐकून तो क्रोधें आरक्त ॥४१॥
देवांसी गणेश आज्ञापित । असुरा जिंकण्या चला त्वरित । ते शस्त्रसंघातयुक्त । दैत्यगणांवरी हल्ला करिती ॥४२॥
युद्धांत दैत्यगण मारिती । कित्येक असुर छिन्नभिन्न होऊनी पडती । कांहीं पळून तैं जाती । मायाकर असुरा म्हणती ते ॥४३॥
जाऊन त्याच्या सभेंत । दैत्य तयांसस विनवीत । महावीरा काय बैसलास शांत । देवांनी आकान्त मांडिला ॥४४॥
ते येऊनिया समस्त । अस्त्रांनी पीडिलेम नगर अवचित । त्यांचें वचन ऐकता उठत । क्रोधें जळत मायाकर ॥४५॥
प्रधार असुरां समवेत । रणमंडळाप्रत जात । मायाकरा बलिष्ठा पाहत । देववीर तैं पळून गेले ॥४६॥
मूषकग देवासमीप जाती । त्या असुराचें शोर्य शौर्य निवेदिती । तदनंतर देव गणपति । काय करिती तें पुढें ऐका ॥४७॥
ओमिति श्रीमदान्त्ये पुराणोपनिषदि श्रीमन्मौद्‍गले महापुराणे पंचमे खण्डे लंबोदरचरिते मूषकगमायाकरासुरसमागमो नाम विंशोऽध्यायः समाप्तः । श्रीगजाननार्पणमस्तु ।

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP