TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत लग्नाची बेडी

संगीत लग्नाची बेडी

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


प्रस्तुत नाटकाचे नाटककार आहेत - प्रल्हाद केशव अत्रे

ती पाहताच बाला । कलिजा खलास झाला
छातीत इष्क भाला, की आरपार गेला ।
स्वर्गातल्या पर्‍यांना की वस्त्रगाळ करुनी ।
कमनीय देह विधिने, रचिला तिच छबेला ।
लावण्य काय सारे, उकळोनि वा पिळोनी
त्या मस्त अत्तराचा, भरला गमेची बुधला
डौलांत चालता जी, हत्ती वनांत झुरती
रस्त्यांत गुंड जमती, तिज अन्‌ पहावयाला ।


चकोरा, मीच तव चंद्रिका
धरितोस मग का, बोल कुशंका ?
नाच पाखरा मिजासखोरा !
पसरुनि तुझा पिसारा !
भुलवि जिवाला नाजुक नखरा !
होय तुझ्याविण जीव घाबरा !
टोचति या मनि विरहशलाका !


प्रिय न कवणि तुजसमान !
अससी ना तूच प्राण !
प्रणयगंध करित धुंद !
भुलवित या जीवाला !
तूच दिव्य बाला !


भाग्यसूर्य नाशुनि तिमिरा ।
गमत उदयाला आला ।
सकल कामना सफला !
मनिच्या या होतिं पूर्ण ।
भ्रमनिरास झाला !

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:01.8900000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

उलट सुलट बोलणें, नाही तसे समजवणें

  • वितंडवाद करणें 
  • भलते सलते सांगणें व मुद्दाम गैरसमज करून घेणें. To make a cock and bull story. 
RANDOM WORD

Did you know?

गणेश गीता कोणी वाचावी ?
Category : Puranic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site