TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत सत्तेचे गुलाम

संगीत सत्तेचे गुलाम

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


प्रस्तुत नाटकाचे नाटककार आहेत - भार्गव विठ्ठल वरेरकर
( १५-६-१९२२). संगीत : वझेबुवा

१ (राग : सिंदुर, चाल : ते बुलाओरे माई)
त्यागिला थारा नाहीं भीति मातें सतत रमे सुखिं जन
बन सम मज वाटे आधारा ॥धृ०॥
विलासिता मला पाप जहाली । धन नरक मानि ।
वैरि मज न कुणी । जन वन० ॥

२ (राग : खमाज, त्रिवट, चाल : उदतन देरेना)
शठमति सजला आपुलें यश गाया ।
झाला बुध विसरला विधीला त पुरजन फसवाया ॥धृ०॥
चतुर वाणि मधुर मानि ती विकसित धी विलसित
स्वदेशावितानिं ! हो अपचय गुणानिदानीं ॥१॥

३ (राग : बागेसरी, त्रिवट, चाल : लेवो धाये धाये)
बोधाया न काय मन लागे । कृति हे विषमा ।
या प्रेमागमा ॥धृ०॥
बलाबल काल ध्यानिं आणुनि ।
वरिली रीति रमणिच्या भ्रमा ॥१॥

४ (राग : जीवनपुरी, त्रिवट, चाल : हरदम मौला तेरो)
वार्ता मौनदा हे झाली । मी हतभागी कां न रडावें ॥धृ०॥
नसे सुखाला स्थल पल मातें । मी हसें मीही रडें ॥१॥

५ (मांड : केरवा)
तुझे पालनेवाला है गिरीधर गोपाला ॥धृ०॥
ब्रिंद्राबनमें गौवे चरावे सावला प्यारा ॥१॥
मोर मुकुट पीतांबर साहे काली कामलवाला ॥२॥

६ (राग : देसकर, त्रिवट, चाल : एरी सजन बिना)
सदा कलहाविना । मना न ये नेम सुनें गमे प्रेम ॥धृ०॥
सुधा सुधाकर मुखावरि रुसे । नदिसि सागर सदा हंसतसे ॥
प्रभा रवीलागिं हास्यनिधाना ॥१॥

७ (राग : त्रिवट, मारा, चाल : घेर काम)
सुधी बालिका । प्रेमी । विलासी वचा भ्रमे फसे भाविका ॥धृ०॥
जना अनुगता बनता विधाता । कुणी नोळखे वाटे नरा दांभिका ॥१॥

८ (राग : अडाणा, ताल : त्रिताल, चाल : बंगरि मुरक गयि)
सुखाने रमाया जरि सांडि न विभवा । रीत अभिनवा समदशा धना ।
गमते वासना ही धन दाही ॥धृ०॥
सदा कामना जवळी विलय आणी । आस करी नाश ही धनवाही ॥१॥

९ (राग : बिहाग, ताल : त्रित्राल, चाल : देखोरी बमेरको)
ही माला विमला का जोडी त्या अनुरागाला अनुगता मला ॥धृ०॥
लगबग ह्रदया । कर करि जाया । जो भाळला त्याला ॥१॥

१० (गझल- बहारे गुल‍मे सदा)
विहार शल्कजनां कंटकी नसोनि असे । उदास मादकता
मंचकी बसोनि नसे । जगांत नाहि आशा आज विधाता दाता ।
विलास मोहकता पावकी जलांत नसे । सुवास पंकगता कुठेही नसे ।
निवास या वनिचा सौख्य असे नौरर्व्य असे ॥१॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:52:59.5170000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

spring catarrh

  • वसंत प्रतिश्याय 
RANDOM WORD

Did you know?

भारतीय विवाहसंस्थेचा पाया केव्हां घातला गेला?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site