TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत संन्यस्तखड्‌ग

संगीत संन्यस्तखड्‌ग

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


प्रस्तुत नाटकाचे नाटककार आहेत - विनायक दामोदर सावरकर
(१९-१-१९३१). संगीत : वझेबुवा


(चाल : न पयाम आता है)
समयी सखा न ये । मी जात फसुनि आता गे ।
बघत वाट थकले । मी दारि बसुनि आता गे ॥धृ०॥
मानि ना आता गोडी गुलाभी पुन्हा । सख्याशीं मांडिले
मी युद्ध रुसुनि आता गे ॥१॥ गाठ होताचि या ।
शत्रूकंठि पाश हा । आलिंगनाचा । फेकीन कसुनि आतां गे ॥२॥
इति जा सांग । आलास जा तसेची ।
प्रिया रडवीनची । मी हंसुनि हंसुनि आतां गे ॥३॥


(चाल : आंखोने तेरे गममे)
शत जन्म शोधितांना । शत आर्ति व्यर्थ झाल्या)
शत सूर्यमालिकांच्या । दीपावली विझाल्या ॥१॥
तेव्हां पडे प्रियासी । क्षण एक आज गाठी ।
सुख साधना युगांची । सिद्धीस अंति गाठी ।
हा हाय जो न जाई । मिठि घालु मी उठोनी ।
क्षण तो क्षणात गेला । सखि हातचा सुटोनी ॥२॥


(चाल : मैं मनको फसिया)
सुकतातचि जगि या । जरी कीं । फुलें गळत पाकळी पाकळी ।
उमलति ना त्याही । कलिका ज्या ॥धृ०॥
परंतु सुंदर कळ्या पाकळ्या । फुलती जगि या ।
विसर ना हे वैतागी । तुझिया ॥१॥


मर्मबंधातली ठेव ही प्रेममय
ठेविं जपोनि सुखाने दुखवीं जीव ॥धृ०॥
ह्रदयांबुजीं लीन लोभी अती हा
मकरंद ठेवा लुटण्यासी आला
बांधी जिवाला सुखाशा मनीं ॥१॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:01.4670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

विसाड

  • m  The pole of a plough. A grafted tree. 
  • न. १ ( प्र . ) इसाड पहा . नांगराचा दांडा . २ कलम . 
RANDOM WORD

Did you know?

उगवत्या सूर्याला नमस्कार, मावळत्या का नाही?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site