TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत ययाती देवयानी

संगीत ययाती देवयानी

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


प्रस्तुत नाटकाचे नाटककार आहेत - विष्णु वामन शिरवाडकर
(२०-८-१९६६). संगीत : जितेंद्र अभिषेकी


यतिमन मम मानित त्या
एकल्या नृपाला
आदि अंत ज्यास नसे त्या सनातनाला ॥
गगनधरा ज्या निवास
बंधनभय नाहिं त्यास
समिर करिल काय नमन सधन सागराला ॥


मी मानापमाना
नच मानतो
ना मना तो मोह आता
गौरव निंदा समान त्याला
ज्यास सदाशिव त्राता ॥


प्रेम वरदान
स्मर सदा
अरे भवा हाचि भगवान ॥
स्नेह सुगांधित करि संसारा
दाहि गरल वैर अभिमान


सर्वात्मका सर्वेश्वरा ।
गंगाधरा शिवसुंदरा
जे जे जगी जगते तया
माझे म्हणा करुणाकरा ॥
आदित्या या तिमिरात व्हा
ऋग्वेद या ह्रदयात व्हा
सुजनत्व द्या द्या आर्यता
अनुदारता दुरितां हरा ॥


तम निशेचा सरला सरला
अरुणकमल प्राचीवर फुलले
प्रकाश परिमल गगनी भरला
पावन मंगल जीवन झाले
शिवदयेचा दीप या भवि दिसला

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:03.5930000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अरिथ

  • पु. ( गो . ) अर्थ [ सं . अर्थ ] 
RANDOM WORD

Did you know?

लग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे? पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.