TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत आशीर्वाद

संगीत आशीर्वाद

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


प्रस्तुत नाटकाचे नाटककार आहेत - मोतीराम गजानन रांगणेकर
(३०-११-१९४१). संगीत : डी. पी, कोरगावकर


हांसते मनी डोलते । तव प्रीतीची फुलवेल सखया ॥
नयनी बोले वदनी खेळे
ह्रदयि तव प्रतिमा डुले ॥धृ०॥
राजसा फुलली पहा । प्रणयात ही वसुधा अहा ॥
मुदित होऊनि मजसि मोहुनि
हांसते ते अधरात अपुल्या ॥ प्रीतिची ॥१॥
बोलु मी कुणाची  ।
मनींच्या, जिवाच्या, सुखाशा ।
गुंगवी मज प्रेमगानी ॥ प्रीतीची ॥२॥


अंतरिच्या खुणा माझ्या । ओळखसी एकला तू ।
धुंडिती हे नेत्र कोणा । ओळखसी एकला तू ।
थरथरती हे ओठ माझे । ओढते पाऊल मागे ।
भरुनि का ये ऊर माझा ॥ ओळखणे एकला तू ॥१॥
ऐकता चाहूल तुझी । मूक होऊ वाणी माझी ।
परि बोले मी किती मुखानी । ओळखली एकला तूं ॥२॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:02.3270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

येड देणें

  • ( व.) लगामाच्या इशार्‍यानें घोडयास मागें परतविणें. 
RANDOM WORD

Did you know?

गणपतीची पूजा आणि व्रत फक्त पुरूषच करतात, मग फक्त स्त्रियांसाठी गणेश व्रत आहे काय?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site