TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत स्वयंसेवक

संगीत स्वयंसेवक

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


प्रस्तुत नाटकाचे नाटककार आहेत - भार्गव विठ्ठल वरेरकर
(५-८-१९३४). संगीत : वझेबुवा

१ (राग : बिहाग, ताल :ज त्रिताल, चाल : घन घन बाजे)
निजवश केला चेला । करिन चरणि प्राणदान जनकजननी तुम्ही मजला ॥धृ०॥
नाहि काहि आधार या भावे ।
जो भावें । तो भयकर विपट मिटे कृति अतुला ॥१॥

२ (राग : देस, ताल : एकताल)
पाहिला देवसखा सजला । तोचि एकमात्र निकट राहिला ॥धृ०॥
दे शरणा दीन जना आप्तकाम भावना । देवपणा नाहि उणा,
राहे अनुगत जरि जनिं तयो दयामया सतत ॥१॥

३ (राग : बागेश्री, ताल : एकताल)
गुलामी ह्रदयगामी मला परिहरिता गृहममता हे पशुता
मनुजा कसला ॥धृ०॥ विषाद झाला तुटली प्रणयवीणा
सुखाला निरखिता । निकट दिसत कवळित करि मरणगति ॥१॥

४ (अभंग)
जेथे जातो तेथे तू माझा सांगाती । चालविसी हातीं धरोनियां
चालो वाटे आम्ही तुझाचि आधार । चालविसी भार सवे माझा ॥१॥
बोलूं जातां सरळ करिसीं तें नीट । मेली लाज धीट केलों देवा
अवघे जन मज झाले लोकपाळ । सोईरे सकळ प्राणसखे
तुका म्हणे आतां खेळतों कौतुकें । झाले तुझें सुख अंतर्बाहीं ॥

५ (राग : हिंडोल, ताल : एकताल)
नाहि दयिता मी ॥ नच कुणा पतिची कांता विधियुता ॥धृ०॥
तुटलि सकल माया । हटली विकल काया ।
दिंगता वरिन मी आतां ॥१॥

६ (राग : सूरमल्हार, ताल : त्रिताल)
या प्रणयी ललना मना । ये परकामना ।
आभास दे भयभावना ॥धृ०॥
मानमया ह्रदया अबलेच्या । कटुता ये हताश दीना ॥१॥

७ (चाल : बरवा, ताल : त्रिताल)
देवा तुज नाहि दया । किती देसि धाय
सरल शांत ह्रदया ॥धृ०॥
खोटा धरावा दावा ।
तया देसि का थारा । मानी जनांच्या हरिसी विभवा ॥१॥

८ (राग : देसकार, ताल : त्रिताल)
अणुभरि जिव जगला माझा ।
आस विफलता जाळि ह्रदय जरि
कठिण शांत मनि विरह साहिला ॥धृ०॥
दिसत विषमया विषम छाया ।
घोर कालगति नाश निरखिला ॥१॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:52:59.4530000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

stand insulator

  • पु. उपस्तंभ निरोधी 
RANDOM WORD

Did you know?

How to make essay about Hindu culture
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.