TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत भावबंधन

संगीत भावबंधन

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


प्रस्तुत नाटकाचे नाटककार आहेत - राम गणेश गडकरी
१८-१०-१९१९


(राग : यमन कल्यान, ताल : दादरा)
कठिण कठिण किती पुरुष ह्रदय बाई ।
स्त्रीजातिप्रति झटता अंत कळत नाही ॥धृ०॥
रंगुनि रंगात मधुर मधुर बोलती ।
हंसत हंसत फसवुनि ह्रद‌बंध जोडिती ॥१॥
ह्रदयाचा सुंदरसा गोफ गुंफिती ।
पदर पदर परि शेवटी तुटत तुटत जाई ॥२॥


(राग : दरबारी, ताल : त्रिताल)
जरठबाला योग असा हा ।
भूस्तरी योग्य व्याकरणि तसा । योग असा ॥धृ०॥
हिरा तइ दिसे उपले मघवा श्वाने तुलियेले ॥१॥
न बालरवि त्या बुडत्या । विधुसि संमुख चिर ठेला ॥२॥


(राग : भीमपलास, ताल :ज त्रिताल)
स्त्रिया रणि बद्धपरिकरा । स्नेहबद्धशा प्रिय गमति नरा ॥धृ०॥
रंगक्रिडेमधि रमणीया  । क्रीडारंगी तेवी रुचिरा ॥१॥
संसाराच्या खुलविती खेळा ॥ खेळाच्या नटविती संसारा ॥२॥


(राग : बिहाग, ताल :पंजाबी)
सकल चराचरि या तुझा असे निवारा ॥धृ०॥
पाषाणाच्या अससि जरी मूर्तिमधी ।
उत्पलह्रदयि वससि खास ॥१॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:00.1570000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कळकळींत

  • वि. किळकिळी , किळकिळीत पहा . 
RANDOM WORD

Did you know?

पंचप्राणांना भोजनापूर्वी आहुती का द्यावी ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.