मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत धन्य ते गायनी कळा

संगीत धन्य ते गायनी कळा

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(१६-१२-१९६८). संगीत : भीमसेन जोशी


हे करुणाकरा, ईश्वरा । कृपादान मज देई ।
तुजविण कोण निवारी संकट । दृढता ही तव पायी ॥धृ०॥
तूही अनादि अनंत । तूही दुस्तर भवनिधि तारक
तानसेन प्रभु तुम्ही उद्धरा ॥


दान करी रे गुरूधन पावन ।
श्रेयभाग जाण हा कुठुनि तुजसीं लाभला ॥धृ०॥
देत हात तोच घेत । सांगतसे तानसेन
जात न शिव विलयाला ॥


चिरंजीव राहो जगी नाम रामा
जोवरि रविशशि पाव सुखरामा ॥धृ०॥
नाद-सिद्धि सकळ वरदान देवो
अचल राहो तुझा स्नेह अभि रामा ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP