मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत श्री

संगीत श्री

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(३-१२-१९२६). संगीत : वझेबुवा


सखि मुखचंद्र भ्रांत न करो मनासी
खर पाप तेंही वचनांहि वमाया ॥धृ०॥
कुवचा विधाता शिकवील कैसा
विधुकिरणिं तमभाव होईल कधीं काय ॥१॥


(राग : कर्नाटकी दुर्गा, ताल : एकताल)
पाणिदानीं प्रेरणा करी । सति शुभा रामा ।
सुमनपाशि करि नरासि या सुबुद्धशा जनासि ।
देवदूति प्रति गमते अवतरतां ॥
कांचनगुण द्यावयास आयसास
वधुवरासि स्पर्शकालि ॥१॥


(राग : तिलककामोद, ताल : एकताल)
दैव देत नवा घाव ॥
अंधार सभोंवार । तयात असु दे ठाव ॥धृ०॥
अभिजात अभिमान, परघरीं बंदिवान
अपमान नसे सान । हा विचार घेत प्राण ॥१॥


(गझल)
माम बंधु सखा शून्य़ जगीं एक असावा । नच अन्य दिसावा ।
आशाहि झरे, जीव झुरे, धीर न राही । जाई मति तीहि
मन भ्रांत वरी, देहिं तसा अग्नि जळावा । मज मृत्यु दिसावा
विश्राम कुठे पाहू ऐशा डोहिं जातां । विश्वात कोण होत दुजे आतां ।
कर देऊनिया देवगुणे पार करावा । मज मुक्त करावा ॥१॥


(राग : बिहागडा, ताल : झपताल)
आधार संसारिं दिनरात श्रीकांत
आल्हाद हानी मग होत काही ॥धृ०॥
शंका सुखाचि व्यसनांत येते
साधे समाधान केविं नाही ॥


(राग : अडाणा, ताल : त्रिवट)
पशुमात्र खचित गणला । निजामी हा तसा
जुपला जन । तनमनबंधन साधुनि सेवेला ॥धृ०॥
जरि विचारधन हरण होत नित । मानव राक्षस
बनत अदयसा । भया, नया, कदा, नच स्मरत ॥


(राग : पहाडी, ताल : केरवा)
कठीण कठीण जीवमान । दयाघना ॥धृ०॥
तुझ्या दयेची मला साऊली
पतीच्या स्वरूपे राखि प्राण ॥१॥


(राग : काफी, ताल : त्रिवट)
आशा हांसे, नाचे, माते गगनांगणि नेते ॥धृ०॥
उदयकालिंचे रंग नवलपर
हरघडि नव जग मन बघतें ॥१॥


(राग : सूरमल्हार, ताल : त्रिताल)
महिरत जीवाला छंद वेला । भय विरघळे नव मद घेता ॥धृ०॥
मादकतर धनमोह येता । आत्मभाव नच राहो ।
ध्यास भास वश । पाहतें मद मादक प्रतिबिंबाला ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP