मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत संशयकल्लोळ

संगीत संशयकल्लोळ

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(३०-१०-१९१६). संगीत : गंधर्व नाटक मंडळी


ह्रदयिं धरा हा बोध खरा ॥ संसारीं शांतिचा झरा ॥धृ०॥
संशय खट झोटिंग महा ॥ देउ नका त्या ठाव जरा ॥१॥
निशाचरी कल्पना खुळी ॥ कवटाळिल ही भीति धरा ॥२॥
बहुरूपा ती जनवाणी ॥ खरी मानितां घात पुरा ॥३॥

२ (भूप : लावणीची चाल)
सुकांत चंद्रानना पातली भ्रुधनु सरसावुनी ॥
कटाक्ष खरशर सोडूनि भेदित ह्रदयचि गजगामिनी ॥
वदन दिसति जणु शशिबिंबाचे खंड मुखीं खोंविले ॥
कुरळ केश शिरिं सरळ नासिका नयन कमलिनीदलें ॥

३ (राग : तिलक कामोद, चाल : जाव मोरे बैया)
साम्य तिळहि नच दिसत मुखाचें ॥ नाम तरी कोरवा शिरावरि
ओळखुं येईल चित्र कुणाचे ॥धृ०॥ मजजवळी असे याहुनि
सुंदर प्रीतिचितारिणि करिचें । प्रतिबिंब सुबक या मूर्तीचे ॥१॥

४ (राग : भीमपलास, चाल : छोलन मेढें घर जावे)
निंद्य जीवनक्रम अमुचा ॥ आमरणांत निशिदिनिं सततचि
एकरुप पालट ना त्याचा ॥धृ०॥
स्मित सोंगी स्तुति लटकी आर्जव ॥ तोषरोष दांभिक वरवरचा ॥१॥

५ (आरभी : भय हें नवें)
कर हा करीं धरिला शुभांगी ॥ सुदिनीं रमाकांतासमोरी ॥धृ०॥
सुखदा सदा मत्स्वामिनी तूं ॥ गृहसंपदा उपभोगि सारी ॥१॥

६ (राग : सारंग, चाल : आज अंजान)
धन्य आनंददिन पूर्ण मम कामना
मुदित कुलदेवता सफल आराधना ॥धृ०॥
लाभ व्हावा जिचा लोभ धरिला महा
प्राप्त मज होय ती युवति मधुरासना ॥१॥

७ (राग : खमाज, चाल : कोयलिया कूक)
ही बहु चपल वारांगना ॥ साहस, दंभ, लोभ, कपटानृत भाषण
टाकिल कशि या स्वगुणा ॥ साहस, दंभ, लोभ, कपटानृत भाषण
टाकिल कशि या स्वगुणा ॥धृ०॥
प्रेमचित्रिका दिधली तीतें ॥ अर्पी परि ती प्रिय पुरुषातें ॥
कुललीला या तिच्या देति संताप मना ॥१॥

८ (पहाडी)
लग्नविधींतील खरें मर्म काय । ठाउक तें मुळीहि तुज नसे ॥धृ०॥
वैवाहिक होममंत्र अंत:पट अक्षतादि ॥ पोषक हे विधि, मिळणि
जीव जिवा सार हें असे ॥१॥

९ (राग : दरबारी, चाल : ठुमल चलत)
नाटयगायननिपुण कलावतिची ही माया ॥धृ०॥
अंतरिचा भाव एक ॥ दाखवि वरपांगी एक
बाह्यांतर वृत्ति देख ॥ भिन्न भिन्न छाया ॥१॥

१० (राग : खमाज, चाल : शाम घुंगट पट खोलो)
संशय कां मनिं आला ॥ कळेना ॥ कारण काय तयाला ॥धृ०॥
आळ वृथा कीं, चित्र दिले मीं ॥ कोणा पर-पुरुषाला ॥१॥
कोपुनि गेले, ही मज लागे ॥ हळहळ थोर मनाला ॥२॥

११ (राग : बहार, चाल : कर नुले जाये)
कुटिल हेतू तुझा फसला ॥ निजपाशीं मज बांधायाचा ॥धृ०॥
महा घोर मरणांतुनि सुटलों ॥ उरीं विषारी नेत्र भल्ल
हा होता घुसला ॥१॥

१२ (राग : अडाणा, चाल : नगरी मोरी)
स्वकर शपथ वचनिं वाहिला । उगीच कां तुंवा ? ॥
निजतनु दिहली मला, तो काय पोरखेळ नवा ॥धृ०॥
पसरिली माया लटकिच कां ती ॥
वरिलें मग का धरूनि ॥ साक्षी त्या माधवा ॥१॥

१३ (राग : खमाज, चाल : एक क्षण जो)
मानिली आपुली तुजसि मीं एकदां
दु:ख शोक न कदा शिवुत तुललागिं ते ॥धृ०॥
वंचिलें त्वां जरी हितचि तव वांछितों ।
वरुनि सन्मार्ग तो धरि सुमति ते ॥१॥
कष्ट जरी सोहिता वच न ये मोडितां ॥
म्हणुनी जातों अतां गाळिं नयनाश्रु ते ॥२॥

१४ (राग : दरबारी, चाल : बंधनवा बांधो)
मृगनयना रसिक मोहिनी ॥ कामिनी होति ती मंजुळमधुरालापिनी ॥
नवयौवनसंपन्न रम्य रतविलासिनी ॥धृ०॥
आल्हादल मुखचंद्रहि होता ॥ होती दृष्टि ती प्रेम-रस-वाहिनी ॥१॥

१५ (रग : पहाडी, चाल : मेरा चित्त)
मजवरी तयांचे प्रेम खरे ॥ जें पहिलें जडलें तें उरें ॥धृ०॥
कसास लावुनि अंत पाहिला ॥ परि न जराही ओसरे ॥१॥
संशय-पटला दूर सारितां ॥ प्रकाशेल कीं मग पुरे ॥२॥

१६ (राग : काफी, चाल : ये गरज धाय धाय)
हा नाद सोड सोड ॥ अहिताची न करि जोड ॥
मित्र करिति बोध गोड ॥धृ०॥
नायकिलें त्या बोधा ॥ होतो मी धुंद तदा
अंध मंद मोडलि परी पुरति खोड ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP