TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत शाकुंतल

संगीत शाकुंतल

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.प्रस्तुत नाटकाचे नाटककार आहेत - अण्णासाहेब किर्लोस्कर
(३१-१०-१८८०). संगीत : खुद्द नाटककार

नांदी

(राग : खमाज, ताल : धुमाळी, चाल : जय श्री रमणा भयहरणा)
पंचतुंड नररुंडमालधर पार्वतीश आधी नमितो ॥
विघ्नवर्गनग भग्न कराया विघ्नेश्वर गणपति मग तो ॥ पंच० ॥धृ०॥
कालिदास कविराज विरचित हें, गाती शाकुंतल रचितों
जाणुनिया अवसान नसोनि महत्कृत्यभर शिरिं घेतो
ईशवराचा लेश मिळे तरि मूठ यत्न शेवटि जातो
या न्याये बलवत्कवि निजवाक्यपुष्पिंउ रसिकार्चन करितो ॥ पंचतुंड नर० ॥


(राग : लीलांबरी, ताल : धुमाळी, चाल : बाळा म्हणसी पाणी रे पाणी)
किती मधुर रुप तरि यांचे । मम नेत्र धन्य अजि साचे
नृपमंदिरी यापरि कैचें । वन हरि सत्व बागेचें
किती वर्णु येईना वाचे । त्या बघता कामि न वाचे
हळुं हळुं चमकति बागेतुनिया । विद्युलता तशा या ऋषिजा
भाग्योदय माझा ॥


(राग : पिलू, ताल : धुमाळी)
सखये अनुसूये थांब कीं बाई । येते मी अशि का घाई
रुतला दर्भांकुर माझ्या पायीं । मजला तो दुस्सह होई
साडी कोरांटीस गुंतुन जाई । सोडविते तोंवरी राही


(राग : काफी, ताल : दीपचंद, चाल : भोलानाथ दिगंबर)
साध्य नसे मुनिकन्या । मज ही । परि वेडे मन ऐकत नाही ॥धृ०॥
पाहुनि सखिच्या विविध विलासा ॥ मन घेई हे बहु विश्वसा
स्मर जरि तुष्ट न होई ॥ मी परि बहु सुख यांतच घेई ॥१॥


(राग : पिलू, ताल : त्रिताल, चाल : सदाशिव धुंदी)
मना तळमळसि, उगिच का असा हळहळसि, प्रथम फसलेंसी ॥धृ०॥
ऐन सुखाच्या समयी भीति धरुनि कसें बसलेंसी ॥१॥
लतामंडपा सुख सेवाया, येईन पुन: पुन: तुजपासिं ॥२॥


(राग : आनंदभैरवी, ताल : दादरा)
(चाल : नको नको स्त्रीसंग नामग्रहण)
काय मला भूल पडलि, भान हरपलें
ते मुख वर केलें परि नाही चुंबिलें ॥ काय० ॥
सुंदरिने अंगुलिनी ओठ झांकिलें
नको नको ऐसे म्हणत तोंड फिरविलें
प्रेमभरे तिने अर्ध नेत्र मिटियलें
ऐशा त्या ऐन रंगि व्यंग जाहलें ॥१॥


(राग : असावरी, ताल : त्रिताल)
(चाल : गंगेत लोटा हो)
जाई परतोनी बाळा, जाई परतोनी ।
निष्ठुर मी तुज टाकुनि जातें, येशिं कशाला माझ्या मागोनी ॥धृ०॥
जन्मताच तव जननी गेली सोडुनि तुय या तपोवनी ॥
मीच पाळिले लाड करोनी, कांहि न अडलें कीं तुझें गेलें जरी मी,
काय उणें तुज, सांभाळिती बाबा तुजलागुनि । जाई० ॥१॥


(राग : पिलू, ताल : धुमाळी, चाल : अजि अक्रुर हा)
अजि शेवटचा, लाभचि हा ममतेचा, मज होय तुमच्या करिंचा ।
बहु दावियले प्रेम निरंतर अपुलें, कधी नाही अंतर पडलें
प्रति दिवशी कोमल करिंची वेणी फेणी आता कैची
त्या आशेया लेश न उरला साचा, शोका न आवरे मनिंचा ॥१॥


(साकी-राग : जोगी, ताल : धुमाळी)
परक्याचे धन कन्या ते त्या देउनि आज मी सुटलो ॥
ठेव जशी मालकासि अर्पुनि आज ऋणांतूनि फिटलो ॥
मुलींनो या आता, गेली लाडकि मम दुहिता ॥१॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:52:58.2970000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

exploratory survey

 • pilot survey 
 • समन्वेषक सर्वेक्षण, समन्वेषी सर्वेक्षण 
RANDOM WORD

Did you know?

जानवे म्हणजे नेमके काय ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.