TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत महानंदा

संगीत महानंदा

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


प्रस्तुत नाटकाचे नाटककार आहेत - वासुदेव नीळकंठ आगटे
१९५१


(राग : भैरवी, ताल : गर्भा, चाल : बारो पियाकांता बिन)
शिव शिव जन्मा आले का अशा ॥ वारांगनादेह दुष्कीर्तीचे गेहे ॥धृ०॥
लोकी पती एक नारी कुणी । येतो गृही तो होतो धनी ॥
चित्ती न सद्‌भाव चिंती दुजा भाव ॥१॥ न ये कळू ऐसें बोले हळू ।
द्रव्याविशी मात्र जैसी जळू ॥ चिंती ॥२॥
माया दया काहि नाही मना । कामांध लोका उसे सर्पिणी ।
निष्काम ना प्रेम करणे असा धर्म ॥३॥
माता पिता बंधु ऐशा रिती ॥ कानी कपाळी कां सांगती ॥
निष्काम न प्रेमा करणे असा धर्म ॥४॥


(राग : सारंग, ताल : केरवा, चाल : हमदम देखे)
नटजनवेष खचित गमतीचा ॥ बहुत हिमतीचा अमित किमतीचा ॥धृ०॥
आंतर्बाह्य विरोध कृतीचा । गुप्त शोक वरि हास्यरसाचा ॥१॥
बाह्यांगी नव सुंदर योषा ॥ अंतरि विश्व विमा पुरुषाचा ॥२॥


(चाल : दिलदारा दिलारा)
मी नारिनरांचे तनमनधन आणि वेधित या नयने ।
चलबिचल करिन तरुणि, तरुण मन सारिगम गाउन अमित दाउन ॥धृ०॥
नरेंद्र पार्थ जसा सोडि बाण उजव्याने ॥
प्रसंगी तोचि तोचि योजितसे डाव्याने ॥
परशुराम जसा मारि अरी शापाने ॥
कधिं कधिं छेदितसे शिर बाणचापाने ॥१॥


(चाल : नई जीवनवालिका)
जें जें मी मागूं ते मला वाढा । जयभुवनी यश जोडा
मातेच्या हातुनि तनया वधोनी । रांधा करोनी मला वाढा ॥१॥
साध्वीने सदनी पाक करोनी । वसना त्यजोनी मला वाढा ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:52:59.9370000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

ह्रीनिषेध

RANDOM WORD

Did you know?

पिंपळाच्या झाडाला फक्त शनिवारीच स्पर्श का करतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site