मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|
संगीत सोन्याचा कळस

संगीत सोन्याचा कळस

मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीला रामप्रहरी पडलेले एक सुखद स्वप्न होय.


(२४-१-१९३२). संगीत : वझेबुवा
    

(म्हांने चाकर राखोजी ॥धृ०॥
ऊंचे ऊंचे महल बनावूं बिचबिच राखूं बारी
संवरियाके दरसन पाऊं पहिर कुसुंबी सारी ॥
चाकर रहसूं बाग लगासूं नित उठ दरसन पासूं
ब्रिंदावनके कुंजगलियनमों सारी लीला गासूं ॥१॥
मीरां के प्रभु गहन गँभीरा ह्रदी रहो जी धीरा ।
आधि रात प्रभु दरसन दीन्हो जमुनाजी के तीरा ॥२॥


(राग : मांड, ताल : केरवा)
मेघपटला व्यापिलज्ञ जो जगतिं भरुनी राहिला ।
मुरलिवाला या जिवाचा गरिबघरिंचा पाहिला ॥धृ०॥
करित लीला या सदा । बन्सि मुखिंची वाजतां
सकल गोपां बांधिलेल्या मुक्त करिता एकला ॥१॥


(राग : आनंद भैरवी, त्रिवट)
पथ दिसतां परि स्वतां विसरतां । चुकति रमतां या जगमय सदनिं ॥धृ०॥
नयनिं राहि स्मृतिवितान तारा । विजनिं विपिनिं पद न चलित तरि करि
अचुक शिरतां या मधुमय भुवनिं ॥१॥


(राग : जयंत-मल्हार, ताल : एकता)
या घरि असावा दावा निशिदिनिंचा । ती दयिता जरि कांता ।
कल्ह हरंघडि व्हावा ॥धृ०॥
कठिण ह्रदयिं धरुनिज कांत । हाणुनियां शांत करिल ।
धरिल गाल करिल हाल । चुरडि तरि जिव जावा ॥१॥


(राग : मारुबिहाग, ताल : त्रिताल)
तुझ्या वरदाना जीव भुकेला । योग जहाला तुजसह माझा ।
तेचि सुधेची धारा झाली ॥धृ०॥
जो नीवाला तुजविण फिरला । विसरुनि भाव जिवाला ।
तोंचि निराशा नाशा आली ॥१॥


(राग : भैरवी-अध्या)
प्रिय जाहला कां हा प्रेमा । कुटिल कुमति-रति लाविल कैसी मोला ॥धृ०॥
केवि परजना ॥ जोड धरावी । निजजन पारखि कैसा केला ॥१॥


(राग : बिलावल : त्रिवट)
जगिं वंचिता विषसंचिता । हरपलि ह्रदयशांति ।
नाहिं सुह्रय कुणि । प्रणयनाश करि जिवास हतबल, ।
मधुर जगति दिसतां ॥धृ०॥
मोहकभाव क्षणाला दिसला । अशान्त मनांत उपजवि सुखकर ।
विफल परि सकल पुरुषकुरुचि पाहतां ॥१॥
    

(राग : जोगी, ताल : झपताल)
फसलो या विरहानें । आतां । जीवा उदासकालिं रमणींच्या दानें ॥धृ०॥
पुरुषगुण हा सरे । मन भरुनि बावरें ।
झाला विनाश हाय । ह्रदयिंच्या गानें ॥१॥


(राग : जिल्हा, केरवा)
विसावा माझा साचा व्हावा । पती हा असावा ॥धृ०॥    
उगाचि राहिं घरी मानपान सोडुनिया ।    
कसाहि साहि कुणा प्रेमभाव मांडुनिया ।    
उदास नाहि कदा देई साद बोलविता ।
विषाद नाश करी त्याची साची सेवा ॥१॥

१०
(राग : सुगराई : त्रिवट)
ही जरि वसुधा उदार । प्रबल होई हे जनता ।
विरति नरा निराधारा ॥धृ०॥
धनमद भरला पाहुनि भडकत । लावित कर नशिबाला ।
उदासीन करित धनभार ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP